महाभारतातल्या गोष्टी
महाभारताला एक अप्रसिद्ध महायोद्धा - सात्यकी
Mahabharatatla Ek aprasiddh Yoddha - satyaki
महाभारत म्हणजे शुर वीरांचा एक विशाल समूह आहे, जेव्हा जेव्हा महाभारताची चर्चा होते आणि त्या काळात कोण किती शूर होते यावर चर्चा होते, तेव्हा वेगवेगळ्या जिभेवर वेगवेगळी नावे असतात, कोणी म्हणते अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा होता, कोणी म्हणते कर्ण सर्वश्रेष्ठ योद्धा होता, कोणी म्हणते अर्जुनापेक्षा एकलव्य सरस योद्धा होता, कोणी म्हणते भीष्म पितामह यांच्यासारखे कुणीच नव्हते, असे द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, भीमसेन अभिमन्यू, जयद्रथ, जरासंध, श्रीकृष्ण, अशी मोठी नावे असणे स्वाभाविक आहे.
पण महाभारतात एक असाही योद्धा होता जो अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकला, भगवान श्रीकृष्णाकडून रणनीती शिकला, आणि इतर शास्त्रविद्या ही श्रीकृष्ण भगवंतांकडून अवगत केली, असा योद्धा जो पांडवांसाठी जीव देण्यास सदैव तयार होता. तो योद्धा म्हणजे सात्यकी. गीतेच्या पहिल्या अध्यायात सात्यकी चे नाव आलेले आहे. “सात्यकिश्च अपराजितः” पांडवांशी अत्यंत स्नेहाने असलेला सात्यकी एक अपराजित योद्धा होता. अठरा अक्षौहिणी सैन्यातून वाचलेल्या फक्त १० योद्ध्यांमध्ये सात्यकीचे नाव आहे.
काही कारणास्तव अर्जुनाला सहा वर्षे एकटे राहावे लागले. या वेळेचा सदुपयोग त्याने प्रवासासाठी केला. उत्तर, ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भारतात दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर तो पश्चिम भारतात गुजरात राज्यात आला. आणि द्वारका नगरी येथे वर्षभर वास्तव्य केले, द्वारका हे त्याचे आजोळही होते.
सात्यकीची मावशी कुंती यांचा मुलगा अर्जुन, जो एक महान धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध झाला आहे, तो द्वारकेत राहत आहे हे ऐकून द्वारकेतील लोकांना खूप आनंद झाला. सात्यकीही आनंदित झाला. सात्यकी हा यादवांचा सरदार सात्यकचा मुलगा होता, म्हणून त्याला सात्यकी असे म्हणतात. तो एक महान यादव योद्धा होते आणि लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी होता. अर्जुन बराच काळ द्वारकेत राहणार हे कळल्यावर त्याने अर्जुनाला मला धनुर्विद्या शिकवण्याची विनंती केली. अर्जुनाने, त्याला धनुर्विद्या शिकण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून ओळखून, धनुर्विद्या शिकवली आणि दिव्य शस्त्रास्त्रांशिवाय जवळजवळ सर्वच ज्ञान त्याला दिले. त्यामुळे सात्यकी महान धनुर्धर झाला. महाभारत युद्धात अनेक वेळा त्याने द्रोणाचार्याला जेरीस आणले होते.
सात्यकी हा नारायणी सैन्याचा सेनापती असला तरी दुर्योधनाने नारायणी सैन्यासाठी लढण्याची घोषणा केली होती, सात्यकीने आपल्या बाजूने लढणे योग्य न वाटल्याने त्याने आपले पद सोडले आणि पांडवांच्या वतीने युद्ध केले, असे म्हणतात की अर्जुनानंतर कौरव सैन्याचे सर्वात जास्त नुकसान कोणी केले असेल तर तो सात्यकी होता. भीम व अर्जुनासह सात्यकीने कौरवांच्या ११ अक्षौहिनी सैन्यापैकी ७ अक्षौहिनी सैन्य १ दिवसात नष्ट केले. कौरव-पांडवांचे गुरू असलेल्या द्रोणाचार्यांचे एकापाठी एक शंभर धनुष्य तोडणारा महापराक्रमी योद्धा सात्यकी महाभारत युद्धात पांडवांचा उजवा हात होता असे म्हटले तरी चालेल.
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचाही सात्यकीवर अतूट विश्वास होता, जेव्हा भगवान श्रीकृष्ण पांडवांचे शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला गेले तेव्हा त्यांनी फक्त सात्यकीला सोबत घेतले. सात्यकीनेच श्रीकृष्णाला सांगितले की दुर्योधन त्याला बंदिवान करण्याचा विचार करत आहे. दुर्योधन श्रीकृष्ण भगवंताला बंदी बनवणार हे ऐकून सात्यकी चा क्रोध अनावर झाला होता. कौरव सभेतच दुर्योधनाचा वध करण्यासाठी त्याने तलवार उपसली होती, पण वेळेवर श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला भिमाच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली आणि त्याला दुर्योधनाचा वध करण्यापासून रोखले.
सात्यकी हे महाभारतातील काही योद्ध्यांपैकी एक आहे जे युद्धाच्या शेवटच्या दिवसापर्यंत लढून जिवंत राहिले आणि नंतर अनेक वर्षे यदुवंशाचे सेनापती पदही भूषवले. सात्यकीच्या वडिलांचे नाव शिणी असे होते. तो यादव कुळातील राजकुमार होता. महाभारतात सात्यकीच्या पराक्रमाचे वर्णन बऱ्याच ठिकाणी येते. सत्य की एक अजेय धर्मवान नीतीमान योद्धा होता.
महाभारत युद्धात कौरवांकडून एकमेव यादव लढला त्याचे नाव कृतवर्मा तो यादव सैन्याचा सेनापती होता. दुर्योधनाने श्रीकृष्ण भगवंतांना नारायणी सेना देण्याची विनंती केली त्या दोन अक्षौहिणी सैन्याचा सेनापती कृतवर्मा होता. नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी युक्ती प्रयोग तिने ते यादव सैन्य द्वारावतीला परत पाठवले. पण कृतवर्मा म्हणाला दुर्योधनाला मी वचन दिले आहे मी त्याच्याकडून युद्ध करेल.
कृतवर्म्याला अर्जुनाबद्दल मत्सर होता म्हणून तो कौरवांची बाजू घेऊन लढला. व शेवट पर्यंत जिवंत राहिला. माने द्रौपदीचे पाच पुत्र व झाले तेव्हा कृतवर्मा याने त्याला मदत केली होती. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर संपूर्ण यादव सैन्य आपसात लढून मेले कृतवर्म्याला शेवटी शेवटी सात्यकीनेच मारले. नंतर त्या गृह युद्धात सात्यकी ही मरण पावला.