बोधकथा - bodhakatha
पैसाच सर्वकाही नसतो म्हणून सत्कर्मांचे धन संग्रहीत करा !
तेच सोबत येणार आहे !
सत्कर्म केल्याशिवाय मनाची शुद्धी होत नाही आणि
चित्तशुद्धीशिवाय ज्ञान टिकत नाही. सत्कर्माने सर्व इंद्रिये
शुद्ध होतात. ज्याचे मन दूषित आहे, त्याला
भगवंताचा अनुभव येत नाही. दुष्ट विचारांमुळे व दुष्कर्मांमुळे मन तर दुषीत होतेच
पण तो दुराचारी मनुष्य सर्वांगाने दुषीत होतो. त्याकडे कुणाला पाहावेसे देखील वाटत
आहे. तो चालता बोलता नकारात्मक उर्जा स्फारत असतो. अनेकांचा तळतळाट त्याने घेतलेला
असतो. आणि चांगली कर्मे करणारा मनुष्य सर्वांना आवडतो. वाईट कर्म करणाऱ्याचे मरतांना
देखिल खुप हाल होतात. आणि मेल्यानंतर नरकातच तो भटकत असतो. गाई, म्हैस, बैल, रेडा,
गाढव होऊन लोकांचे कर्ज फेडावे लागते. हे तर आपल्याला दिसणारे नरक सांगितले. न दिसणारे
नरक तर अगणित आहेत. यावर एक बोधकथा -
मुंबई राजधानीच्या शहरात एक श्रीमंत सेठ राहत होता. एका श्रीमंत सेठला एकुलता एक मुलगा होता, पण अगदी लहान वयातच चुकीच्या कुसंगतीमुळे त्याचा मार्ग चुकला. आणि तो दुर्व्यसनांच्या आहारी गेला. त्याला सेठने बरेच समजावून पाहिजे पण तो ऐकेना. शेवटी त्याच्या कुकर्मांनी त्रासलेल्या सेठला काहीच समजत नव्हते म्हणून तो देवाच्या मंदिरात गेला आणि ईश दर्शनानंतर तेथील पुजाऱ्याला आपली समस्या सांगितली. ‘‘समस्या काही इतकी मोठी नाही भगवंतांच्या इच्छेनुसार तुमची समस्या लवकरात लवकर दूर व्हावी म्हणून तुम्ही काही दिवस त्याला नित्यनेमाने मंदिरात पाठवा’’, असे पुजाऱ्याने सांगितले.
सेठने मुलाला सांगितले की, ‘‘तुला काही दिवस मंदिरात जावेच लागेल, अन्यथा तुला संपत्तीतून बेदखल केले जाईल. तुला एक रुपयाही माझ्या संपत्तीतून मिळणार नाही.’’ मुलाने मान्य केले. घरापासून मंदिर जरा लांबच होते. रोज त्याला वाहणाने जावे लागे. आणि शेठ त्याला भाड्याचे पैसे मोजून द्यायचे! एकही रुपया जास्त देत नव्हते. आता तो एक प्रकारे बंदिस्तच झाला होता! त्याला स्वच्छंद वर्तन करता येत नव्हते. तो नित्यनेमाने मंदिरात जाऊ लागला. मंदिरात एक म्हातारा माणूस बसलेला असायचा आणि त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेदना होती. कोणत्यातरी मानसिक दुःखाने हा म्हातारा ग्रस्त आहे. असे पाहणाऱ्यांना वाटे. पण त्याची विचारपुस करणारा मात्र कुणीही नव्हता. तो मुलगाही त्या म्हाताऱ्याला रोज बघायचा.
एके दिवशी नेहमीप्रमाणेच मंदिरात बसलेल्या म्हाताऱ्याला पाहून त्याची गंमत करावी असे त्याला वाटले. आणि तो त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि त्याच्याकडे बघून मुद्दाम हसायला लागला. आणि त्याने त्या म्हाताऱ्याला विचारले, ‘‘म्हाताऱ्या, तू असं घरदार सोडून इथे असा का बसला आहेस? तुझ्याकडे पाहिल्यावर तुझ्या जीवनात खूप वेदनादायक घडले आहे असे वाटतं’’ आणि पुढे तो उपहासात्मक शब्दात म्हणाला, ‘‘कदाचित आयुष्यात तुझ्याकडून मोठ मोठ्या चुका झाल्या आहे वाटते म्हणून तु आता त्याचे प्रायश्चित व्हावे म्हणून येथे येऊन बसतो, सौ चुहे खा के बिल्ली, हज को चली?’’ असं म्हणून तो मोठ्याने हसला. त्याचे बोलणे म्हातारा शांतपणे ऐकत होता. मग म्हातारा त्याला असे काही बोलला की त्याचे मुलाचे जीवनच बदलून गेले.
म्हातारा म्हणाला ‘‘हो बाळा,
आज तुझी हसण्याची वेळ आहे, पण एवढं लक्षात ठेव वेळ बदलली की एक दिवस तुझ्यावर कोणीतरी
असेच हसेल! आणि तु माझ्यासारखाच हतबल होऊन ऐकशील. अरे
बळा मी पण मदोत्मत्त होऊन आयुष्यात खुप धावलो, पैसा कमावला. मला चार मुलं आहेत आणि त्यांना खुप शिक्षण दिले, आयुष्यात लायक बनवलंल आज ते खूप उंचीवर आहेत आणि ते
इतक्या उंचीवर आहे की आज मी त्यांना पाहू शकत नाही! आणि माझी सगळ्यात मोठी चूक
होती की मी स्वतःचा काहीच विचार केला नाही! फक्त पत्नी
मुलांसाठी आयुष्यभर मरमर करत राहिलो.
हे शेवटचे दिवस मी
स्वतःसाठी काहीच पैसे ठेवले नाहीत म्हणून आज मी असे हलाकीचे जीवन
जगत आहे! आणि मी काही पुण्यही कमावले नाही की, माझी आयुष्याची संध्याकाळ सुखात
जाईल. माझ्याकडे भिक मागण्याची वेळ आली होती. मी जन्मभर केलेल्या पापकर्मांमुळे मला
कुणी भिकही घालत नाही. शेवटी भटकत भटकत मी या श्रीकृष्ण भगवंतांच्या देवळात आलो आहे.
आता या मुरलीधराने माझी काळजी घेतली आहे, म्हणून
मी इथेच बसत असतो. तुला ही सांगतो बाळा होईल तेवढे सत्कर्म कर, सत्कर्मांचेच गाठोडे
सोबत असते. कुकर्मे तर नरकातच नेतात. कुकर्मे आपल्याजवळ असलेले धन-द्रव्य हिसकावून
नेतात. जसे माझे झाले. मी कमावलेले मलाच उपभोगायला मिळाले नाही.’’
या शब्दांनी तो मुलगा नखशिखांत हादरला. व देवाकडे हात जोडून म्हणाला ‘‘मी केलेल्या गुन्ह्याबद्दल मला क्षमा करावी प्रभु!’’ मग त्या म्हाताऱ्याकडे पाहून म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणालात की, ‘तू भविष्यात परावलंबी राहू नये, यासाठी आताच काहीतरी कर’ हे मला काही समजले नाही? मी काय करायला पाहिजे?’’ म्हातारा म्हणाला. ‘‘बाळा हे तुला खरोखरच जाणून घ्यायचे असेल तर नीट ऐक. या दिर्घ अशा नरकमय सृष्टीचक्रात, अनंत काळाच्या प्रवासात मानवी शरीर हाच एक थांबा आहे, जीवाला येथेच थोडीफार विश्रांती मिळते. त्यातही दुःख असतेच . संसारात कुणीच सुखी नाही. आणि पराधिनतेपेक्षा मोठा शाप नाही आणि स्वातंत्र्यापेक्षा मोठे वरदान नाही! पण प्रत्येक जीव हा कर्मांनी बांधलेला आहे. म्हणून कुणीही जीव स्वतंत्र नाही. सारखे या देहातून त्या देहात त्याला घातले जाते काढले जाते.
पुण्य कर्मे केले असतील तर सुख मिळते. पाप कर्मांमुळे दुःखच मिळते. आणि आपण मनुष्य पावलापावलावर पापच जोडत असतो. दिवसभरात पापाच जास्त जोडतो. पैशांच्या हव्यासापोटी अनेकांना फसवतो. तो फसवणुकीचा पैसा बरोबर त्या मनुष्याची तडतड घेऊन येते. आणि आपल्या सुखात विर्जन पडते. या जन्ममरणाच्या शापातून मुक्त होण्यासाठी, नक्कीच काहीतरी चांगली कर्मे करत रहा! शरीरासाठी पैसा महत्त्वाचा आहे पण आत्म्यासाठी तप, चांगली कर्मे खूप महत्त्वाची आहे. कारण शरीरासाठी कितीही केले तरी शरीर हे नश्वर आहे. तुझ्या नित्यनेमाच्या देवधर्मात तपरूपी धनाची भर घाला. तेच तुझ्या पुढच्या प्रवासात कामी येईल! कारण जेव्हा तुझा शेवटची वाईट वेळ येईल. शरीराच्या शेवटच्या घटीकेत हेच उपयोगी पडेल आणि शरीर संपेल, मग पुढचा प्रवास सुरू होईल त्यात तपरूपी धनाचे मोठा उपयोग असेल!
आणि हो एक गोष्ट नीट लक्षात ठेव, पैसा फक्त इथेच उपयोगी पडेल, पण तपरूपी धन इथेही उपयोगी पडेल! आणि मेल्यानंतरही उपयोगी पडेल. चांगली कर्मे आणि जर केली असली, आणि दुदैवाने वाईट वेळ आलीच तर तुला साथ देणारेही भरपुर असतील!’’ एवढे बोलून तो म्हातारा थांबला. व त्यानंतर त्या मुलाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले! म्हणूनच नियमित साधनेतून तपरूपी धन गोळा करा..!! नंतर मुलगा घरी आला. वडिलांच्या पायावर कपाळ टेकवून रडला. आणि ‘माझ्याकडून खुप चुकले. मी कुळाला, तुम्हाला समाजात अपमानित केले’ म्हणून क्षमा मागु लागला. वडिल म्हणाले, ‘‘ बाळा, तु भरपुर चुका केल्या आहेत, म्हणून हताश होऊ नको. अजुन संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर आहे. तू देवपूजेसमोर जाऊन देवासमोर प्रायश्चित कर. आणि नव्याने चांगल्या जीवनाची सुरूवात कर.’’
कवयित्री सौ. निर्मला ताई कुलकर्णी
आपल्या कवितेत म्हणतात.
यमदूताने केस पकडले, फरपटवीत नेईल ।
यमदरबारी उभा करुनी तव, मृत्युलेख वाचेल ॥
चित्रगुप्त हा असे यमाचा, वकील रे सरकारी ।
वकिलपत्र तू तुझे सोपवी, धावेल तो मध्वारि ॥
जाँमण मरण विचार करि कूडे काँम निबारि ।
जिनि पंथ तुझ चालणाँ सोई पंथ सँवारि ॥
जन्ममृत्युचा विचार करुनी, सत्कर्मी प्रवृत्त ।
होसिल जर तू कशास चिंता, सहाय तुज भगवंत ॥
अर्थ - यमदूत तुला फरफटवत यमलोकी घेऊन
जाईल आणि चित्रगुप्त तुझ्या पापांचा पाढा वाचून दाखवेल आणि तुला त्या त्या पापयोनीत
टाकले जाई, म्हणून जन्म-मृत्यूचा विचार करून वाईट कामे करण्यापासून
परावृत्त हो. ज्या रस्त्यावरून तुला चालायचे आहे तो मार्ग ठीकठाक बनवून घे. ।।