परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींनी केलेले अस्पृश्यता निवारण

परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींनी केलेले अस्पृश्यता निवारण

 परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींनी केलेले अस्पृश्यता निवारण



              तीन मातंग समाजातील मित्र श्री चक्रधर स्वामींच्या मंदिराजवळ आले व त्यातील दोघांनी कळसाला नमस्कार केला व तिसऱ्याला म्हणाले आपण आता पुढे जावू या पण तिसऱ्या मित्राने दोघांना सांगितले की मित्रांनो मी प्रभुंचे प्रत्यक्षात दर्शन घेतल्याशिवाय येणार नाही. असा त्याने मनाशी दृढ निश्चिय घेतला होता तुम्ही जावू शकता.

              ते दोघे मित्र निघून गेले व तो तिसरा मित्र प्रभु मला दर्शन देतील या आशेने प्रभुची भक्ती भावानं प्रतिक्षा करीत होता. दर्शनाकरीता तो तेथेच थांबला. काही वेळाने आतमधुन आऊसा बाहेर आल्या त्याने आऊसाला म्हटले माई तुम्ही माझ्या प्रभुला जावून सांगा तुमचा भक्त प्रभुच्या दर्शनासाठी बाहेर उभा आहे. त्याने जसे म्हटले तसे आऊसा स्वामींना सांगू लागल्या एक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी बाहेर उभा आहे. तो म्हणतो की मी प्रभुंचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही.

              स्वामींनी बाईसाला एक लाडू मागितला व तो आऊसाला दिला व त्याला सांगा की हा लाडू प्रभुने दिला हा लाडू घे आणि चालता हो! असा प्रभुंचा तुला आदेश आहे! नाही माई मी आपल्या प्रभुचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. आऊसाला फार राग आला. कारण प्रभुंची तिला तशी आज्ञा होती. ती पुनः पुनः त्याला तेच सांगत होती. तो न ऐकल्यासारखा करत होता. नाही माई मी प्रभुचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे बाबा जा! स्वामींचा तसा आदेश आहे. तो तशाच उभा राहून प्रभुंच्या दर्शनाची लालसा मनात बाळगून होता की प्रभु मला निश्चितच दर्शन देतील ते घेतल्याशिवाय या जागेवरून हलायचे नाही. स्वामी मला कधी दर्शन देतात त्या वेळेची त्याला उत्कंठा लागली होती.

              परत स्वामीजवळ आऊसा येवून म्हणाली स्वामी तो म्हणतो की मी आपल्या प्रभुंना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहल्याशिवाय जाणार नाही.

              तेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराज स्वतः दरवाज्याजवळ आले तो त्याने (मातंगाने) लाडू स्वामींच्या श्रीचरणावर दर्शन भेट म्हणून अर्पण केली. श्रीचरणावर मस्तक ठेवून दंडवत केले तेव्हा त्याचे मनाला अतिशय आनंद झाला ते वर्णन करणे कठीण आहे. कारण त्याची भेटीची इच्छा आमच्या स्वामींनी पूर्ण केली व तो स्वामींच्या चरणांचे दर्शन घेवून निघून गेला आणि आनंदाने तो लाडू प्रसाद म्हणून सर्व भक्तजनांनी वाटून दिला व स्वतः मोठ्या आनंदाने खाल्ला त्यात त्यांच्या भक्तीचे प्रेम होते.

आज हे अस्पृश्यता निवारण करा असे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे सातशे ते साडेसातशे वर्षापूर्वीच श्री चक्रधर स्वामींनी ती अस्पृश्यता नष्ट केली होती हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे विसरता कामा नये. आता हे जे 'अस्पृश्यता निवारण करा" असे नारे लावणारे स्वतःकडे त्याचे श्रेय घेणारे चुकत आहेत की ते श्रेय श्री चक्रधर स्वामींना आहे. त्यांची महानता व त्यांनी केलेले हे अनमोल कार्य किती मोठे आहे याकडे लक्ष देण्यास विसरता कामा नये. ते सर्वांना एकसमान समजत होते. एवढे मोठे कार्य त्यावेळेस स्वामींनी केले आहे.

              परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी हे या समाजात महान क्रांतीकारी परिवर्तन रुजविणारे आहेत. तत्काळी या भारतात चार्तुवर्ण्य व्यवस्था पक्की रुजलेली होती. जाती-पातीच्या भिंती मजबूत झालेल्या होत्या. त्यातून उच्च निचतेच्या सुसंस्काराची मजबूत पकड समाजातल्या प्रत्येक घटकाचे मनावर पक्की बसलेली होती. त्यामुळे विकृत विषम समाज व्यवस्था ही समाजाला विघटीत करणारी अभेद्य तटबंदी तोडण्याचे कार्य करण्याची गरज होती. ते कार्य स्वामी श्रीचक्रधर प्रभूनीं आरंभिलेले होते.

              मातंगाचे हातचा लाडू आपल्या ब्राह्मण शिष्यांना प्रसाद म्हणून देतांना स्वामीराज म्हणतात, हा साधा प्रसाद नाही हा तुमच्या विकल्पाचा कानवाथर तोडणारा आणि समतेचा संस्कार रुजविणारा लाडू आहे घ्या? ही मूलगामी मत परिवर्तनाची स्वामींची कृती महानुभाव वाङ्मयाची प्रेरणा आहे. समाज एकसंघ, एकात्म व्हावा म्हणून परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी महाराष्ट्रात संघर्ष करीत होते. त्या संघर्षाला त्यांनी ममतेचा स्पर्श दिलेला होता.

              ब्राह्मणांना ब्राह्मणत्वाचा अहंकार सोडायला सांगून शूद्रांना शुद्रत्वाचा न्यूनगंड त्यागायला सांगणाऱ्या मना मनातून विकल्प त्यागाचा संदेश दिला होता. समाज परिवर्तनासाठी 'विकार आणि विकल्प' या दोन्हींचा त्याग करूनच समाज पुढे नेण्याचा मूलगामी प्रयत्न स्वामींनी सुरू केलेला होता. समतेचा मंत्र ममतेने शिकविण्याचा व त्यासाठी न निर्विकल्प मन घडविण्याचा प्रयत्न करणे ही स्वामींची तात्विक भूमिका जगाच्या इतिहासात अन्यत्र आढळून येत नाही. आपल्या हक्कासाठी समतेसाठी, वा समानतेसाठी लढा देणे ही क्रांतीकारी परिवर्तनवादी साहित्याची प्रेरणा जगाने पाहिलेली आहे. परंतु या क्रांतीकारी समाज परिवर्तनाला मेनाहूनही मऊ ममतेचा तात्विक आधार देण्याचे मूलगामी कार्य केवळ श्रीचक्रधर स्वामींनीच केलेले दिसून येते. हीच खरी महानुभाव वाङ्मयाची मूलगामी तात्विक प्रेरणा अमौलिक तथा महान कार्य आहे. त्या आधारावरच परिवर्तनवादी नव्या साहित्याची निर्मिती होण्याची गरज आहे.

 

कर्मापासून मुक्तता

ये मे मतमिदं नित्यम् - अनुतिष्ठान्ति मानवाः ।

श्रध्दावन्तोऽ नसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ।। (अ-३-३१)

जे कोणीहि मनुष्य श्रध्दासंपन्न होऊनच द्वेषबुध्दि सोडून निरंतर माझ्या मताचे (परमेश्वराने सांगितलेले) अनुकरण करतात, ते कर्मापासून मुक्त होतात.

भावार्थ - कोणीही मानव असो, त्याने श्रध्दा संपन्न असावयास पाहिजे व कोणतीही व्यावहारिक वर्णधर्मादि कमें का असत ना, द्वेषबुध्दि सोडून करावयास पाहिजे. ती सुध्दा भगवंताच्या आज्ञेप्रमाणे निरंतर आचरावयास पाहिजे. अर्थात त्याबरोबर ईश्वरचिंतन करावयास हवे. ब्रह्मचर्य गृहस्थ तसेच संन्यस्ताच्या नियमाचे आचरणही करावयास हवे. त्यामुळेच मानव कर्मापासून (कर्मबंधनातून) मुक्त होतो याचा सारांश अशा की द्वेषबुध्दि गेली, अहंता व ममता गेली की पुष्कळशा अशुभ कर्मापासून सहज वाचतो. मग न कळत घडणारे सूक्ष्म हिंसादि दोषच काय ते शिल्लक राहतात. इतर हळू-हळू थांबूनच जातात. राहिली शुभ कर्मे ती निष्काम (निर्हेतुक) बुध्दिने करावीत, म्हणजे ती सुध्दा बंधनकारक होत नाही. त्यायोगाने संस्कार वाढून योग्य वेळी भूत-भजनादि घडून ज्ञान प्राप्त होते व ज्ञानाने मोक्ष मिळतो. मात्र त्याला काळ अवश्य लागतो. त्याबद्दल भगवंतांनी म्हटलेच आहे 'अनेक जन्म संसिध्दः ततो याति परां गतिम् ' अनेक जन्मांनी सिध्दी प्राप्त करून मनुष्य मोक्षरूप परमगतीला प्राप्त होतो. असा हा कर्मापासून मुक्तता होण्याचा मार्ग आहे.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post