स्वातंत्र्य दिनाच्या संस्कृतमध्ये शुभेच्छा आणि संस्कृत राष्ट्रगीत
मरुता प्रकम्पमानं, उच्चैः विराजमानम् ।
रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ॥
अर्थ :- (राष्ट्रभक्तांच्या आणि भारतीय नागरिकांच्या मनात) अतिशय उच्चस्थानी (उंचीवर) विराजमान होऊन वाऱ्याच्या वेगामुळे फडफडणाऱ्या, तेजस्वी अशा तीन रंगानी शोभून दिसणाऱ्या, (माझ्या भारतीय) राष्ट्रध्वजाला मी वंदन करतो.
जगतीह बन्धुभावं विजयं जयं च लभताम्।
मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि॥
अर्थ : - अखिल विश्वामध्ये बंधुत्वभावनेचा विजय होवो, (प्रेम, मेत्री, परस्परस्नेह वृद्धिंगत होवो). तसेच (सत्याचा सदैव) जय होवो. (अशी प्रार्थना करून मी) राष्ट्राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट्रध्वजाला वन्दन करतो.
देश रक्षा समं पुण्यं देश रक्षा समं व्रतं ।
देश रक्षा समं यागो दृष्टो नैव च नैव च ॥
अर्थ :- देशरक्षणासम कोणतेही पुण्य नाही, देशरक्षणासारखे कोणतेही व्रत नाही, देशरक्षणासमान कोणताही यज्ञ नाही. स्वतंत्र भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व देशबांधवांना सुमंगल आणि हार्दिक शुभेच्छा ! प्राचीन भारतीय संस्कृतीच्या सहिष्णुता, समता, बंधुता, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य या सर्वश्रेष्ठ नैतिक जीवनमूल्यांना आपण सगळे सदैव अंगिकारु या.
संस्कृत
राष्ट्रगीत -
गुणगणमण्डित-यदुवरलसिता
राजति भारतमाता ।
नीतिबोधकपरात्परगीता
बोधकयोगिजनाप्ता ॥१॥
रम्यसुरालय-सरिदाक्रीडैः
भव्यसुललितनिजाङ्गा ।
अभिमतसिद्धा धन्या
शुभफलवृद्धिसुमान्या
जीयाद् भारतशोभा ॥२॥
अनुदिन-मङ्गलदायक-दयया
भारतमाता जयतात् ।
जयतात्, जयतात्, जयतात्
निजजनगणमवतात्
भारतमाता जयतात् ॥३॥
- श्री सीतारामाचार्य: