date :- 16-8-2022
संस्कृत सुभाषित रसग्रहण
-
संस्कृत सुभाषिते हिंदी मराठी अर्थासहीत -
इयं
प्रीतिर्वल्ली हृदयभुवि दैवात्समुदिता
तथा
यत्नाद्रक्ष्या प्रकृतिमृदुलापायबहुला ।
यथा
नैनां स्फीतां पिशुनजनदुर्वाक्यदहनो
दहत्यन्तः
शोषं व्रजति न पुनः सौहृदनिधे ॥
हिंदी अर्थ :- यह प्रीतिरूपी लता
दैव की कृपा से हृदयभूमी पर उगी है। वह स्वभाव से ही कोमल है। और कई बाधांए और
नुकसान इसके उपर बडे तादात में आयी है। ऐसे खतरों में पली हुई यह लता बडी हुई है
तो उसको द्वेषी,
चुगलखोर व्यक्ति के दुष्ट वचनरुपी अग्नि जला न दे अथवा तो वह
सौहार्द्र (मित्रता) रूपी निधी के अंदर कुशंका से सुक ना जाए इसके लिये उसका
प्रयत्नपूर्वक रक्षण करना चाहिये ।
मराठी अर्थ :- ही प्रीतिरूपी लता दैवकृपेने हृदयभूमी वर उमललेली आहे. ती स्वभावतःच कोमल आहे. आणि ह्या लतेवर कित्येक अडथळे, तोटे मोठ्या प्रमाणांत आलेले आहेत. अशा संकटांत ही लता वाढलेली आहे, त्यामुळे कुणी द्वेषी, चुगलखोर व्यक्तिच्या वचनरूपी अग्निच्या ज्वाळेंत होरपळून जाऊ नये किंवा सौहार्द्र (मित्रता) रूपी निधीच्या कुशंके मुळे सुकली जाऊ नये ह्या साठी तिचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे.
न रम्यं नारम्यं प्रकृतिगुणतो वस्तु किमपि
प्रियत्वं यत्र स्यादितरदपि तद्ग्राहकवशात्।
रथाङ्गाह्वानानां भवति विधुरङ्गारशकटी
पटीराम्भःकुम्भः स भवति चकोरीनयनयोः॥
हिंदी अर्थ :- कोई भी वस्तु उसके
भीतर रहे हुए गुणों से (उसकी खुद की दृष्टीसे) रम्य या अरम्य नही रहता। (प्रिय या
अप्रिय नही रहता);
इतना होने पर भी जहाँ प्रियत्त्व या अप्रियत्त्व दिखाई देता है,
वह उस वस्तु को ग्रहण करने वाले की वजह से दिखता है। जो चाँद
चक्रवाक पक्षी को अंगारे की सिगडी की तरह लगता है, वही चाँद
चकोर के नेत्रों को चंदन के जल से भरे हुए घडे जैसा लगता है।
मराठी अर्थ :- कोणतीही वस्तु तिच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे (तिच्या स्वतःच्या नजरेतून) रम्य किंवा अरम्य (प्रिय किंवा अप्रिय ) रहात नाही. ; इतके असून ही जेथे प्रियत्त्व किंवा अप्रियत्त्व दिसते, ते त्या वस्तुला ग्रहण करणाऱ्यामुळे दिसते. जो चंद्र चक्रवाक पक्षाला अंगाऱ्याने भरलेल्या शेगडी सारखा भासतो, तोच चंद्र चकोरच्या नेत्रांना चंदनाच्या जलाने भरलेल्या घड्यासारखा भासतो.
अरण्यं सारङ्गैर्गिरिकुहरगर्भाश्च हरिभिः
दिशो दिङ्मातङ्गैः सलिलमुषितं पङ्कजवनैः।
प्रियाचक्षुर्मध्यस्तनवदनसौन्दर्यविजितैः
सतां माने म्लाने मरणमथवा दूरगमनम्॥
हिंदी अर्थ :- (एक प्रेमी खुद की प्रिया के
सौंदर्य का वर्णन करते हुए कहता है।) जिन के चक्षु सुंदर माने जाते हैं ऐसे हिरण
मेरे प्रिया के चक्षु के सौंदर्य से पराजित होकर अरण्य में जाकर रहने लगे, जिनकी कमर पतली और सुंदर मानी जाती है ऐसे सिंह मेरी प्रिया के कमर के
सौंदर्य से पराजित होकर पर्बत की गुफाँ में जाकर रहने लगे हैं, पुष्टता और मोटाई की सुंदरता से युक्त दिशाओं के हाथी मेरे प्रिया के
स्तनों के मध्यप्रांत के सौंदर्य से पराजित होकर दिशाओं के छोर पर रहने लगे हैं और
इसके वदन के सौंदर्य से पराजित होकर कमलों के वन जल में रहने चले गए। सच में जब
सज्जनों का मान घायल होता है अथवा म्लान बनता है तब उनका मरण आता है या वह दूर चले
जाते हैं।
मराठी अर्थ :- (एक प्रियकर स्वतःच्या प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन करतांना सांगतो,) ज्याचे चक्षु सुंदर मानले जातात, असे हरीण माझ्या प्रेयसीच्या चक्षुंच्या सौंदर्याने पराभूत होऊन अरण्यात जाऊन राहू लागले. ज्याची कटि बारीक आणि सुंदर मानली जाते, असे सिंह माझ्या प्रेयसीच्या कटि सौंदर्याने पराभूत होऊन पर्वताच्या गुहेत राहू लागले आहेत, पुष्टता आणि भारदस्तपणाच्या सौंदर्याने संपन्न दिशांचे हत्ती माझ्या प्रियेच्या स्तनांच्या मध्यवर्ती प्रदेशाच्या सौंदर्याने पराभूत झाले आहेत आणि दिशांच्या टोकांवर राहू लागले आहेत आणि वदनाच्या सौंदर्याने पराभूत होऊन कमळांचे वन सरोवरांतल्या पाण्यांत जाऊन स्थायिक झाले आहेत. खरेच! जेंव्हा सज्जनांचे मन घायाळ होते, किंवा म्लान होते तेंव्हा एकतर त्यांना मरण येते किंवा ते दूर निघून जातांत.
नभोभूषा पूषा कमलवनभूषा मधुकरो
वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम्।
मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः॥
हिंदी अर्थ :- आकाश का भूषण सूरज
है, कमलवन का भूषण भ्रमर है, वाणी का भूषण सत्य है,
उत्तम वैभव का भूषण दान है, निर्मल मन का भूषण
मैत्री है, वसंत ऋतू का भूषण कामदेव है, सभा का भूषण अच्छी वाणी है और सभी गुणों का भूषण विनय अथवा अच्छे संस्कार
है।
मराठी अर्थ :- आकाशाचे भूषण सूर्य आहे, कमलवनाचे भूषण भ्रमर आहे, वाणीचे भूषण सत्य आहे, उत्तम वैभवाचे भूषण दान आहे, निर्मल मनाचे भूषण मैत्री आहे, वसंत ऋतूचे भूषण कामदेव आहे, सभेचे भूषण सुसंस्कृत वाणी आहे आणि सर्व गुणांचे भूषण विनय अथवा चांगले संस्कार आहे.
कलासीमा काव्यं सकलगुणसीमा वितरणं
भये सीमा मृत्युः सकलसुखसीमा सुवदना।
तपःसीमा मुक्तिः सकलकृतिसीमाश्रितभृतिः
प्रिये सीमाह्लादः श्रवणसुखसीमा हरिकथा॥
हिंदी अर्थ :- सकल कलाओं की सीमा- उत्तमता की हद
काव्य है। (एक सचमें अच्छे काव्य में कला की पराकाष्ठा होती है।) सब उत्तम गुणों
की हद दान देने में है। भय की सीमा-हद मृत्यु है। सकल सुखों की सीमा-हद सुंदर
सुमुखी स्त्री है। तप की सीमा मुक्ति है। सकल सत्कार्यों की सीमा खुद के आश्रितों
का भरण-पोषण है। प्रिय वस्तु की हद होनेवाला आह्लाद है। और श्रवणेंद्रियों के सुख
की सीमा यह भगवान की कथा है।
मराठी अर्थ :- सकल कलांची सीमा-उत्तमतेची हद्द काव्य आहे. (खरेंच चांगल्या काव्यांत कलेची पराकाष्ठा असते.) सर्व उत्तम गुणांची हद्द दान देण्यांत आहे, भयाची सीमा-हद्द मृत्यु आहे, सर्व सुखांची सीमा-हद्द सुंदर सुमुखी नारी आहे, तपाची सीमा मुक्ति आहे, सर्व सत्कार्यांची सीमा स्वतःच्या आश्रीतांचे भरण-पोषण आहे. प्रिय वस्तु ची हद्द होणारा आह्लाद आहे, आणि श्रवणेंद्रियांच्या सुखाची हद्द (सीमा) ही भगवत् कथा ऐकण्यांत आहे.
शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वीकृतेः।
प्रभुर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो
नृपाङ्गणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे॥
हिंदी अर्थ :- दिन में धुंधला बना हुआ चन्द्र, यौवनहीन स्त्री, कमल बिना सरोवर, सुंदर आकृती है उसका अक्षररहीत- बिना विद्या का अशिक्षित मुख, धन प्राप्त करने में तत्पर राजा अथवा कंजूस लोभी सेठ, हमेंशा गरिबी में निठल्ला बैठा हुआ सज्जन और राजसभा में स्थान प्राप्त दुर्जन यह सात मेरे हृदय में धंसे हुए शूल है। (यह सात बाते मेरे मन में शूल जैसे सलते हैं।)
मराठी अर्थ :- दिवसा अंधूक बनलेला चंद्र, यौवनहीन स्त्री, विना कमळांचे सरोवर, ज्याची सुंदर आकृती आहे त्याचे अक्षरांविना असलेले अशिक्षित मुख, धन प्राप्त करण्यांत तत्पर राजा किंवा कंजूस लोभी शेठ, नेहमी गरिबी मध्ये रिकामचोट बसून असलेला सज्जन आणि राजाच्या सभेत स्थान प्राप्त दुर्जन हे सात माझ्या हृदयांत धसणारे शूळ आहेत, (हे सात माझ्या मनांत शूळा सारखे बोचत आहेत.)
प्रसरति मनः कार्यारम्भे दृढीभवति स्पृहा
स्वयमुपनयन्नर्थान्मन्त्रो न गच्छति विप्लवम्।
फलति सकलं कृत्यं चित्तं समुन्नतिमश्नुते
भवति च रतिः श्लाघ्ये कृत्ये नरस्य भविष्यतः॥
हिंदी अर्थ :- अभ्युदय की तरफ जाने
वाले इन्सान की स्थिती कुछ ऐसी होती है: कार्य का आरम्भ करने में मन फैलने लगता
है. अभिलाषा दृढ बनती जाती है, विचार या योजना बिखर या उलझ ना जाते हुए अपने आप
कार्य में लगने वाले पदार्थ इकठ्ठा कर देते हैं। सभी क्षेत्र में कार्य को सफलता
मिलने लगती है। चित्त उन्नतता अनुभव करता है और यशःप्रद कामों में रस उत्पन्न होने
लगता है।
मराठी अर्थ :- अभ्युदयाकडे जाणाऱ्या व्यक्तिची गति काहीशी अशी असते; कार्य आरम्भ करण्यांत मनांचा विस्तार होऊ लागतो, अभिलाषा दृढ बनत जाते, विचार किंवा योजना विस्कळीत न होता किंवा अडकल्या न जाता आपोआप कार्यांत लागणारे पदार्थ एकत्र करू लागतांत, सर्वंच क्षेत्रांत कार्याला सफलता प्राप्त होऊ लागते, चित्त उन्नततेचा अनुभव करू लागते आणि यशःप्रद कार्यांत रस उत्पन्न होऊ लागतो.
स्वफलनिचयः शाखाभङ्गं करोति वनस्पतेः
गमनमलसं बर्हाटोपः करोति शिखण्डिनः।
चतुरगमनो जात्यो योऽश्वः स गौरिव वाह्यते
गुणवति जने प्रायेणैते गुणाः खलु दूषणम्॥
हिंदी अर्थ :- पेड की टहनियाँ खुद
के ही फल के जथ्थे से टूट जाती है, पिच्छों का बडा भार मोर की गति धीमी
कर देता है, अच्छे गतिवाले उत्तम जाती के अश्व को (घोडागाडी
इ. में) बैल जैसे जोड देते हैं। सच में गुणवान जनों में भी ऐसे गुण उनके लिये
दोषरुप (हानीकारक) बन जाते हैं।
मराठी अर्थ :-झाडाच्या फांद्या स्वतःच्याच फळांच्या भाराने तुटून जातात, पिसांचा भार मोराची गति हळू करतात, चांगली गति असलेल्या उत्तम जातीच्या घोड्यांना टांगा इ. बैलासारखे जोडतांत. खरेंच गुणवान लोकांना पण असे गुण त्यांच्यासाठी हानीकारक (दोषरूप) बनतात.
कृमिकुलचित लालाक्लिन्नं विगन्धि जुगुप्सितं
निरुपमरसं प्रीत्या खादन्नरास्थि निरामिषम्।
सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते
नहि गणयति क्षुद्रो जन्तुः परिग्रहफल्गुताम्॥
हिंदी अर्थ :- अनेक कीडों से
लबलबाता, लाळ से भीगा हुआ, दुर्गंधीयुक्त, घीन से कंपकपी छुटने जैसा निंद्य, तद्दन नीरस वैसे
ही जिसमें मांस भी बचा हुआ नही है ऐसे मनुष्य के हड्डी को प्रीतिपूर्वक खा रहा है
ऐसा कुत्ता पास में खडे हुए इंद्र को देखकर भी शरमाता नही। (लज्जा नही आती) सचमें
क्षुद्र (विषयी) प्राणी खुद ग्रहण कर रहे वस्तु की तुच्छता के उपर ध्यान नही देता।
(अर्थांत विषयी मनुष्य खुद के विषय पदार्थों की हीनता और भोगनें में रही हुई खुद
की अधमता को देख नही पाता।)
मराठी अर्थ :-अनेक किटकांनी लडबडलेला, लाळेने भिजलेला, दुर्गंधीयुक्त, घृणेमुळे कापरे भरण्यासारखा निंद्य, अगदीच नीरस तसेच ज्यांत थोडे पण मांस शिल्लक नाही असा, मनुष्याचे हाड प्रीतिपूर्वक चघळण्यांत मग्न असलेला कुत्रा जवळ उभ्या असलेल्या इंद्राला पाहून ही लाजत नाही. खरेंच क्षुद्र (विषयी) प्राणी स्वतः ग्रहण करित असेलेल्या वस्तुच्या तुच्छते वर लक्ष देत नाही. (अर्थांत विषयी मनुष्य स्वतःच्या विषय पदार्थांतली हीनता तसेच भोगण्यांत असलेली स्वतःतली अधमता बघू शकत नाही.)
यथा मधु समादत्ते रक्षन् पुष्पाणि षट्पदः!
तद्वदर्थान् मनुष्येभ्यः आदद्यादविहिंसया!!
सुभाषितसुधानिधि:, सायणाचार्य
यथा ( ज्याप्रमाणे) षट्पदः (
भुंगा) पुष्पाणि (फुले) रक्षन्
( राखून) मधु ( मध) समाधत्ते ( स्वीकारतो) तद्वत् (
त्याप्रमाणे) अविहिंसया
( कोणत्याही प्रकारची विशेष हिंसा न करता)
मनुष्येभ्यः (मनुष्यांकडून) अर्थान् ( धन) आदद्यात्
( घ्यावे). महाभारतामध्ये
भीष्मांनी युधिष्ठिराला राजनीतीची काही तत्त्वे सांगितली आहेत. त्यामध्ये कर कसा
गोळा करावा याबद्दल काही श्लोक आहेत. प्रस्तुत श्लोक त्या करपद्धतीमधला आहे. कर (tax) या अर्थी
संस्कृत भाषेत दोन शब्द आहेत; बलि आणि कर. उत्पन्नाचा सहावा
भाग, मग ते उत्पन्न गाईगुरांच्या स्वरूपातले असो, आर्थिक असो किंवा शेतमाल असो, राजाला द्यावा लागत
असे. ऋषी, मुनी, पाठशाळा यांना कर नसे.
कर गोळा करताना त्याचा प्रजेला त्रास होणार नाही याची काळजी राजानं घ्यावी असं
प्रस्तुत श्लोकात सांगितले आहे.
त्यासाठी अनेक सुंदर उपमा दिल्या आहेत. या आधीच्या श्लोकात ' फूलन् फूल गोळा करावं पण मुळं तोडू नयेत' असा सल्ला दिला आहे. या श्लोकात राजाला भुंग्याची उपमा दिली आहे. भुंगा फुलातला मध गोळा करतो. पण त्या फुलाला जराही धक्का लावत नाही. अशा पद्धतीने कर घ्यावा. कालिदासाने रघुवंशात दिलीप राजाचं वर्णन करताना आणखी एक सुंदर उदाहरण दिलं आहे. सूर्य समुद्रातून पाणी घेतो आणि त्याच्या हजारपटीनं पावसाच्या रूपात परत करतो. दिलीप राजाही अशाच प्रकारे कर घेत असे. सायणाचार्य बुक्कराजाचे मंत्री असल्यानं प्राचीन साहित्यातल्या राज्यकारभार विषयक श्लोकांच्या अंतर्भाव त्यांनी सुभाषितसुधानिधीमध्ये आवर्जून केला आहे.
मधुकरगणश्चूतं त्यक्त्वा गतो नवमल्लिकां
पुनरपि गतो रक्ताशोकं कदम्बवनं ततः।
तदपि सुचिरं स्थित्वा तेभ्यः प्रयाति सरोरुहं
परिचितजनद्वेषी लोको नवं नवमीहते॥
हिंदी अर्थ :- भ्रमरों का समूह आम
के वृक्ष को छोडकर नवमल्लिका उपर गये, वहाँ से फिर नवपल्लवों से युक्त अशोक
वृक्ष पर गये, वहाँ से कदम्ब के वनों में गये, वहाँ थोडी देर रुककर बाद में सरोवर के कमलों पर बैठे. सच में लोग भी
परिचित जनों का द्वेष-अनादर करते हैं, और नये नये की कामना
करते हैं।
मराठी अर्थ :- भ्रमरांचा समूह आम्र वृक्षाला सोडून नवमल्लिकां कडे गेले, तेथून परत नवमल्लिकां (नविन लतासमूह) नी वेढलेल्या अशोक वृक्षा कडे गेले, तेथून कदम्बाच्या वनांत गेले, थोडा वेळ तेथे थांबून नंतर ते सरोवरांतल्या कमळांवर बसले. खरेंच लोक पण परिचित जनांचा द्वेष-अनादर करतात आणि नव्या नव्यांची कामना करित असतात.
दद्यात्साधुर्यदि निजपदे दुर्जनाय प्रवेशं
तन्नाशाय प्रभवति ततो वाञ्छमानः स्वयं सः।
तस्माद्देयो विपुलमतिभिर्नावकाशोऽधमानां
जारोऽपि स्याद्गृहपतिरिति श्रूयते वाक्यतोऽत्र॥
हिंदी अर्थ :- सज्जन अगर खुद के
स्थान में दुर्जन को प्रवेश देते हैं, तो वह दुर्जन खुद ही उस स्थान की
इच्छा रखकर उस सज्जन का नाश करने में समर्थ बन जाता है। इसलिये बहुत बुद्धिशाली
इन्सान ने अधम इन्सान को प्रवेश करने का मौका ही नही देना चाहिये। इस विषय में
कहते हैं कि, एकबार प्रवेश देने पर जार पुरुष भी घरधनी बन
बैठता है।
मराठी अर्थ :- सज्जनाने जर स्वस्थानांत दुर्जनाला प्रवेश दिला, तर तो दुर्जन स्वतःच त्या स्थानांची इच्छा धरून त्या सज्जनांचा नाश करण्यात समर्थ बनतात, आणि म्हणूनच अत्यंत बुद्धिशाली माणसाने अधम माणसाला प्रवेश करण्याची संधीच देऊ नये. या विषयांत असे सांगतात की, एकदा प्रवेश दिल्यानंतर जार पुरुष पण घरधनी बनतो.
मौने मौनी गुणिनि गुणवान्पण्डिते पण्डितोऽसौ
दीने दीनः सुखिनि सुखवान्भोगिनि प्राप्तभोगः।
मूर्खे मूर्खो युवतिषु युवा वाग्मिषु प्रौढवाग्मी
धन्यः कोऽपि त्रिभुवनजयी योऽवधूतेऽवधूतः॥
हिंदी अर्थ :- मौनी- संयमी के साथ
संयमी बनता है,
गुणवान के साथ गुणवान, पंडीत के साथ पंडीत,
दीन के साथ दीन-समदुःखी, सुखीयों के साथ सुखी,
भोगीयों के साथ भोग भोगने वाला, मूर्ख के साथ
मूर्ख, युवतीयों के साथ युवान, वक्ताओं
के साथ गंभीर वक्ता वैसे ही अवधूत के साथ अवधूत बनता है। ऐसा तीनों लोक में विजय
प्राप्त करने वाला धन्य इन्सान कोई एक ही होता है।
मराठी अर्थ :- मौनी- संयमी बरोबर संयमी बनतो, गुणवाना सह गुणवान, पंडीतांसोबत पंडीत, दीनांसोबत दीन-समदुःखी, सुखी लोकांसह सुखी, भोगी जनांसह भोग भोगणारा, मूर्खांसोबत मूर्ख, युवतिं सोबत युवान, वक्त्यासोबत गंभीर वक्ता तसेच अवधूत सोबत अवधूत बनतो. अशा प्रकारे तिन्ही लोकांत विजय प्राप्त करणारा धन्य व्यक्ति कुणी एखादाच असतो.
विद्यातीर्थे जगति विबुधाः साधवः सत्यतीर्थे
गङ्गातीर्थे मलिनमनसो योगिनो ध्यानतीर्थे।
धारातीर्थे धरणिपतयो दानतीर्थे धनाढ्या
लज्जातीर्थे कुलयुवतयः पातकं क्षालयन्ति॥
हिंदी अर्थ :- इस जगत में विद्वान ज्ञानी
इन्सान विद्यारूपी तीर्थ में, साधूजन सत्यरूपी तीर्थ में, मलिन मन वाले लोग गंगारूपी तीर्थ में, योगीजन
ध्यानरूपी तीर्थ में, राजा पृथ्वी के राज्यरूप लोगों के
धारण-पोषण अभ्युदय करने के रूप तीर्थ में, धनिक लोग दानरूपी
तीर्थ में, वैसे ही कुलिन नारीयाँ लज्जारूपी तीर्थ में खुद
के पाप धोते हैं।
मराठी अर्थ :- ह्या जगांत विद्वान ज्ञानी व्यक्ति विद्यारूपी तीर्थात, साधूजन सत्यरूपी तीर्थात, मलिन मन असलेले गंगारूपी तीर्थात, योगीजन ध्यानरूपी तीर्थात, राजा पृथ्वीच्या राज्यरूपी लोकांचे धारण-पोषण अभ्युदय करण्याच्या (रूपी) तीर्थात, धनिक लोक दानरूपी तीर्थात, तसेच कुलिन नारी लज्जारूपी तीर्थात स्वतःचे पाप धुतात.
साध्वीस्त्रीणां दयितविरहे मानिनां मानभङ्गे
सल्लोकानामपि जनरवे निग्रहे पण्डितानाम्।
अन्योद्रेके कुटिलमनसां निर्गुणानां विदेशे
भृत्याभावे भवति मरणं किं तु संभावितानाम्॥
हिंदी अर्थ :- सति-साध्वी
स्त्रियों का मरण खुद के प्रिय पति के विरह होने में होता है, मानियों का
मरण मानभंग होने में होता है, अच्छी कीर्ति होने वालों का
मरण उनके उपर के अपयशजनक लोकापवाद में होता है, पण्डित-बुद्धिशालियों
का मरण शास्त्रार्थ में परास्त होने में होता है, कुटिल-खल
जनों का मरण दूसरों की उन्नति होने में होता है, कुछ भी
अच्छा न लगने वाले अक्कल बिना के गुणहिन व्यक्तियों का मरण दूसरे देश में जाने से
(वहाँ निभा ना पाने की वजह से) होता है और बडे संभावित जनों का मरण उनकी आज्ञा का
पालन करने वाला कोई नही हो- उनकी आज्ञा व्यर्थ निष्फल हो जाने में होता है।
मराठी अर्थ :- सती-साध्वी स्त्रियांचा आपल्या प्रिय पतीपासून विभक्त झाल्यामुळे मरण होते, मानभंग झाल्यामुळे मानी लोकांचे मरण होते, ज्यांची प्रतिष्ठा चांगली आहे ते त्यांच्या वरील शोचनीय लोकापवादामुळे मरतात, शास्त्रार्थांत पराभव झाल्यामुळे ज्ञानी लोक मरतात, कुटिल-खल लोक इतरांची प्रगति झाल्यामुळे मरतात, ज्यांना काहीही आवडत नाही अशा अक्कलहीन, गुणहिन व्यक्तिंचे मरण दुसऱ्या देशांत जाण्यामुळे (त्यांना तेथे निभावणे शक्य नसल्याने) होते आणि महान संभावित लोकांचे मरण त्यांचे आज्ञापालन करणारा कुणीही नसल्यामुळे - त्यांची आज्ञा निष्फळ जाते त्यामुळे होते.
शीतेऽतीते वसनमशनं वासरान्ते निशान्ते
क्रीडारम्भं कुवलयदृशां यौवनान्ते विवाहम्।
सेतोर्बन्धं पयसि चलिते वार्धके तीर्थयात्रां
वित्तेऽतीते वितरणमतिं कर्तुमिच्छन्ति मूढाः॥
हिंदी अर्थ :- जो मूढ लोग
है वह काल (समय) निकल जाने पर कार्य करना शुरु करते हैं। जैसे जाड़ा-सर्दी निकल
जाने पर वस्त्र सिलाते हैं, दिन ढल जाने पर भोजन तैयार कराते
हैं, रात ढल जाने के बाद स्त्री के साथ क्रीडा करने तैयार
होते हैं, चपल नेत्र वाली युवति का यौवन जाने के बाद विवाह
कराते हैं, पानी ढह जाने के बाद बाँध बँधाते हैं, वृद्धावस्था आनेपर तीर्थयात्रा करने निकलते हैं वैसे ही धन समाप्त होने के
बाद ही दान देने की बुद्धि होती हैं।
मराठी अर्थ :- जे मूढ (मूर्ख) लोक आहेत ते काळ निघून गेल्यानंतर कार्य प्रारंभ करतात, जसे हिवाळा निघून गेल्यानंतर वस्त्र शिवतात, दिवस ढळल्यानंतर अन्न शिजवतात, रात्र ढळल्यानंतर स्त्री सोबत क्रीडा करण्यासाठी तयार होतात, चपल नेत्र असलेल्या युवतिचा यौवन निघून गेल्यानंतर विवाह करतात, पाणी निघून गेल्यानंतर बांध बांधतात, वृद्धावस्था आल्यानंतर तीर्थयात्रा करण्यांस जातात, तसेच धन निघून गेल्यानंतर दान देण्याचा विचार करतात.
श्रेयो नूनं व्रजति स पुमाञ्शिक्षया वर्धितो यः
स्वच्छन्दं यश्चरति स पराभूतिमाप्नोति काले।
पूज्यो वेणुर्भवति च नतिं प्रापितो भूपतीनाम्
अन्यं नृत्तोचितमिति करे नर्तकाः कल्पयन्ति॥
हिंदी अर्थ :- जिसको शिक्षा देकर
उत्कृष्ट बनाया है,
वह इन्सान सच में कल्याण प्राप्त करता है। लेकिन जो इन्सान
स्वच्छंदि बनकर किसीका कहा मानता नही, वह समय आने पर पूर्ण
पराभव प्राप्त करता है। जैसे ‘राजदंड’ बना
हुआ बाँस का टुकडा पूज्य बनता है, और उसको राजा महाराओं का
नमन प्राप्त होता है; लेकिन जो अन्य बाँस का टुकडा है,
वह ‘नाचते वक्त काम आएगा’ ऐसा सोचकर नाचने वाला नट उसको हाथ में रखता है।
मराठी अर्थ :- ज्याला शिकवून उत्कृष्ट बनविले आहे, अशी व्यक्ति खरेंच कल्याण प्राप्त करून घेते. परंतु जो व्यक्ति स्वच्छंदी बनून कोणाचेच म्हणणे ऐकत नाही, तो वेळ आल्यानंतर पूर्ण पराभव प्राप्त करतो. जसे ‘राजदंड’ बनलेला बांबूचा तुकडा मानसन्मान प्राप्त करतो; परंतु जे बांबुचे अन्य तुकडे आहेत, ते ‘नाचतांना कामास येतील’ या विचारांने नाचणारा नट हातांत ठेवतो.
बाले बाला विदुषि विबुधा गायने गायनेशाः
शूरे शूरा निगमविदि चाम्नायलीलागृहाणि।
सिद्धे सिद्धा मुनिषु मुनयः सत्सु सन्तो महान्तः
प्रौढे प्रौढाः किमिति वचसा तादृशा यादृशेषु॥
हिंदी अर्थ :- बालक के साथ
बालक जैसा, विद्वान के साथ विद्वान जैसा, गायक के साथ गायकों में रसिक, शूरों में शूरवीर,
वेदों को जानने वालों के साथ वेदों की बातें करनेवाला, सिद्धों में सिद्धजन, मुनियों में मुनीजैसा, संत साधुओं में संत महंत, वैसेही प्रौढ जनों में
प्रौढजन; वाणी से विशेष क्या कहुँ, संक्षिप्त
में इतना ही कहता हूँ कि, जिसके साथ वैसा बनने वाला ही
बहादूर होता है।
मराठी अर्थ :- बालकासोबत बालका सारखा, विद्वानांसोबत विद्वानांसारखा, गायका सोबत गायकांत रसिक, शूरवीरांत शूरवीर, वेदांना जाणणाऱ्यां सोबत वेदांच्या गोष्टी करणारा, सिद्धां मध्ये सिद्ध, मुनीजनांत मुनी सारखा, संत साधूंमध्ये संतमहंत, तसेच प्रौढजनांत प्रौढ; वाणीने विशेष काय सांगू, थोडक्यांत इतकेच सांगतो की, ज्याच्या सोबत तसा बनणारा खरा पराक्रमी आहे.
यावत्स्वस्थमिदं शरीरमरुजं यावज्जरा दूरतो
यावच्चेन्द्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषः।
आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान्
सन्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः॥
हिंदी अर्थ :- जब तक खुद का शरीर
निरोगी है, जब तक वृद्धावस्था दूर है, जब तक इंद्रियों की
शक्तिका नाश हुआ नही है और जब तक आयुष्य का नाश नही हुआ है, तब
तक सयाने इन्सान ने खुदके कल्याण का प्रयत्न करते रहना चाहिये; क्योंकि घर में आग लगने के बाद कुँवा खोदने की शुरूवात करना इसके जैसा
विपरित उद्यम और कौनसा हो सकता है?
मराठी अर्थ :- जो पर्यंत स्वतःचे शरीर निरोगी आहे, जो पर्यंत वृद्धावस्था दूर आहे, जो पर्यंत इंद्रियांच्या शक्तिचा नाश झालेला नाही, तो पर्यंत शहाण्या माणसाने स्वतःच्या कल्याणार्थ प्रयत्न करीत राहिले पाहिजे; कारण की घरांत आग लागल्यानंतर विहीर खोदण्याची सुरुवात करण्यासारखा विपरित उद्यम अन्य कोणती असु शकतो?
निर्वृत्ताध्वरकृत्य ऋत्विजमहो तीर्णापगो नाविकं
युद्धान्ते सुभटं च सिद्धविजयो वोढारमाप्तस्थलः।
वृद्धं वारवधूजनं च कितवो निर्घृष्टतद्यौवनो
ध्वस्तातङ्कचयश्चिकित्सकमपि द्वेष्टि प्रदेयार्थिनम्॥
हिंदी अर्थ :- यज्ञ कार्य
पूर्ण होने पर यजमान दक्षिणा मांगने वाले ऋत्विज-ब्राह्मणों का द्वेष करता है,
नदी पार उतरने के पश्चात इन्सान पैसे मांगने वाले नाविकों का द्वेष
करते हैं, युद्ध में विजय सिद्ध करने के बाद राजा भेट-सत्कार
की इच्छा रखने वाले योद्धाओं का द्वेष करता है, सामान सहित
खुद की जगह पर पहुँच जाने के बाद किराया मांगने वाले गाडीवान का इन्सान द्वेष करता
है, यौवन का उपभोग कर लेने के पश्चात बुढी बनी हुई वेश्या का
धूर्त इन्सान द्वेष करता है, रोग निर्मळ होने पर निरोगी बना
हुआ इन्सान चिकित्सक का द्वेष करता है; इस तरह बडे पैमाने पर
अपना स्वार्थ निकल जाने के बाद इन्सान किंमत मांगने वाले का द्वेष ही करता है।
मराठी अर्थ :- यज्ञ कार्य संपन्न झाल्यानंतर यजमान दक्षिणा मागणाऱ्या ऋत्त्विज-ब्राह्मणांचा द्वेष करतात, नदी पार करून उतरल्यावर माणूस पैसे मागणाऱ्या नाविकाचा द्वेष करतो, युद्धात विजय साकारल्यानंतर राजा भेटवस्तु- सत्कारांची इच्छा करणाऱ्या योध्यांचा तिरस्कार करतो, सामाना सह स्वतःच्या इप्सित स्थळी पोहोचल्यानंतर भाडे मागणाऱ्या गाडीवानाचा माणूस द्वेष करतो, यौवनाचा उपभोग घेतल्यानंतर वृद्ध बनलेल्या वेश्येचा धूर्त माणूस तीरस्कार करतो, रोग निर्मळ झाल्यानंतर निरोगी बनलेला माणूस चिकित्सका (डॉक्टर) चा द्वेष करतो; अशाप्रकारे मोठ्याप्रमाणांत स्वतःचा स्वार्थ सिद्ध झाल्यानंतर माणूस किंमत मागणाऱ्याचा द्वेषच करतो.
मित्रं स्वच्छतया रिपुं नयनबलैर्लुब्धं धनैरीश्वरं
कार्येण द्विजमादरेण युवतिं प्रेम्णा शमैर्बान्धवान्।
अत्युग्रं स्तुतिभिर्गुरुं प्रणतिभिर्मूर्खं कथाभिर्बुधं
विद्याभी रसिकं रसेन सकलं शीलेन कुर्याद्वशम्॥
हिंदी अर्थ :- खुद के हृदय के
निर्मलता से मित्र को वश करना चाहिये, नीति के बल पर शत्रु को वश करना,
लोभीयों को धन से वश करना, ब्राह्मण को आदर से
वश करना, युवती को प्यार से वश करना, अत्यंत
उग्र ऐसे गुरु को स्तुति, प्रशंसा और नमस्कार से वश करना,
मूर्खों को कथा से वश करना, सयाने इन्सान को
विद्या से वश करना, रसिक जन को रसभरी बातों से वश करना वैसे
ही सभी लोगों को शील-सदाचार से वश करना चाहिये।
मराठी अर्थ :- स्वतःच्या हृदयांत असलेल्या निर्मळतेने मित्राला वश करावे, नीतिच्या बळावर शत्रुला वश करावे, लोभी लोकांना धनाने वश करावे, ब्राह्मणांना आदराने वश करावे, युवतीला प्रेमाने वश करावे, अत्यंत उग्र अशा गुरूला स्तुति, प्रशंसा आणि नमस्काराने वश करावे, मूर्खांना कथा सांगून वश करावे, शहाण्या माणसाला विद्येने वश करावे, रसिक जनांना रस भरल्या गोष्टी सांगून वश करावे तसेच सर्व लोकांना शील-सदाचाराने वश करावे.
दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यतिः सङ्गात्सुतो लालनात्
विप्रोऽनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात्।
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषिः स्नेहः प्रवासाश्रयात्
मैत्री चाप्रणयात्समृद्धिरनयात्त्यागात्प्रमादाद्धनम्॥
हिंदी अर्थ :- दुष्ट मंत्री की
सलाह से राजा का नाश होता है, आसक्ति की वजह से तपस्वी साधक का, लाड-प्यार-सर पर चढाने से पुत्र का, विद्या प्राप्त
न करने से-अध्ययन न करने से ब्राह्मण का, खराब पुत्र से कुल
का, दुर्जन के संगत से सदाचार का, शराब
के सेवन से लज्जा का, निगरानी न रखने से खेती का, सतत प्रवास में रहने से विरह की वजह से स्नेह का, प्रेम
ना रखने से मैत्री का, अनीति से समृद्धि का और चाहे जैसा
व्यय करने से बेदरकारीसे और आलस से धन का सर्वनाश होता है।
मराठी अर्थ :- दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्याने राजाचा नाश होतो, आसक्तिमुळे तपस्वी साधकाचा, लाड-प्रेमाने डोक्यावर बसविलेल्या पुत्राचा, विद्या प्राप्त न केल्यामुळे-अध्ययन न केल्यामुळे ब्राह्मणाचा, वाईट मुलामुळे कुळाचा, दुर्जनांच्या संगतीत सदाचाराचा, मदिरेच्या सेवनाने लज्जेचा, निगराणी न ठेवल्यामुळे शेताचा, सतत प्रवासांत राहिल्यामुळे विरहामुळे स्नेहाचा, प्रेम न ठेवल्यामुळे मैत्रीचा, अनीतिमुळे समृद्धिचा, तसेच वाटेल तसा व्यय केल्यामुळे, बेदरकार वृत्तीमुळे आणि आळसामुळे धनाचा सर्वनाश होतो.
कोऽर्थान्प्राप्य न गर्वितो विषयिणः कस्यापदोऽस्तं गताः
स्त्रीभिः कस्य न खण्डितं भुवि मनः को नाम राज्ञां प्रियः।
कः कालस्य न गोचरान्तरगतः कोऽर्थी गतो गौरवं
को वा दुर्जनवागुरासु पतितः क्षेमेण यातः पुमान्॥
हिंदी अर्थ :- संपत्ति प्राप्त
करने के बाद कौनसा इन्सान गर्विष्ठ नही होता? कौन से विषय में इन्सान की आपत्ति दूर
हुई है? इस धरा पर स्त्रियों के विषय में किसका मन
खंडित-चलित नही हुआ है? कौन सा इन्सान राजा को हमेशा प्रिय
बना है? काल के नजर में ना आया हो ऐसा कौन सा प्राणी है?
याचना करने वाला कौन गौरव को प्राप्त हुआ है? और
कपटीजनों के जाल में फंसने के बाद कौन सा इन्सान कुशलतापूर्वक उसके जाल से निकल
पाता है? (अर्थांत कोई नही।)
मराठी अर्थ :-संपत्ति प्राप्त केल्यानंतर कोणता व्यक्ति गर्विष्ठ बनत नाही? कोणत्या विषयांत माणसाचे विपत्ती दूर झाली आहे? ह्या धरणीवर स्त्रीयांच्या विषयांत कोणाचे मन खंडित-चलित झालेले नाही? कोणता व्यक्ति राजाला नेहमी प्रिय बनला आहे? काळाच्या नजरेंत न आलेला कोणता प्राणी आहे? याचना करणारा कोण गौरवास प्राप्त झालेला आहे? आणि कपटीजनांच्या जाळांत फसल्यानंतर कोणता व्यक्ति कुशलतापूर्वक त्या जाळांतून बाहेर पडलेला आहे? (अर्थांत कोणीच नाही!)
वैद्यं पानरतं नटं कुपठिनं स्वाध्यायहीनं द्विजं
योधं कापुरुषं हयं गतरयं मूर्खं परिव्राजकम्।
राजानं च कुमन्त्रिभिः परिवृतं देशं च सोपद्रवं
भार्यां यौवनगर्वितां पररतां मुञ्चन्ति ते पण्डिताः॥
हिंदी अर्थ :- शराब पिने वाले
वैद्य का, खराब उच्चारण करने वाले नट का, अध्ययन ना करने वाले
ब्राह्मण का, डरपोक और दुर्बल योद्धा का, वेग हीन घोडे का, मूर्ख सन्यासी का, खराब मंत्रियों से घिरे हुए राजा का, उपद्रवों से
भरे हुए प्रदेश का, यौवन से गर्विष्ठ और परपुरुष में
प्रीतिवाली भार्याका जो तुरंत त्याग कर देते हैं, वह पण्डित
( बुद्धिमान ) है।
मराठी अर्थ :- दारू पिणाऱ्या वैद्याचा, वाईट उच्चारण करणाऱ्या नटाचा, अध्ययन न करणाऱ्या ब्राह्मणांचा, डरपोक आणि दुर्बळ योध्याचा, वेगहीन घोड्यांचा, मूर्ख सन्याशाचा, खराब मंत्र्यांनी घेरलेल्या राजाचा, उपद्रवाने भरलेल्या प्रदेशाचा, यौवनाने गर्विष्ठ आणि परपुरुषांत प्रीति असलेल्या भार्येचा जो तातडीने त्याग करतो, तेच पण्डित ( बुद्धिमान ) आहेत .
वृक्षं क्षीणफलं त्यजन्ति विहगाः शुष्कं सरः सारसा
निर्द्रव्यं पुरुषं त्यजन्ति गणिका भ्रष्टं नृपं मन्त्रिणः।
पुष्पं पर्युषितं त्यजन्ति मधुमा दग्धं वनान्तं मृगाः
सर्वः कार्यवशाज्जनोऽभिरमते तत्कस्य को वल्लभः॥
हिंदी अर्थ :- फलों का नाश हुए
वृक्ष को पक्षी त्याग देते हैं, सुके हुए सरोवर को सारस त्याग देते हैं, धनहीन पुरुष को गणिका त्याग देती है, मुरझे हुए
फुलों को भ्रमर त्याग देते हैं, जले हुए वनप्रदेश को मृग-पशु
त्याग देते हैं, इस तरह सभी प्राणी समुदाय कार्यवशात् ही
किसी के साथ प्रीतिवाला होता है। (इसलिये निरपेक्ष तरह से देखते हुए कौन किसका
प्रिय है?)
मराठी अर्थ :- फळांचा नाश झालेल्या वृक्षांचा पक्षी त्याग करतात, सुकलेल्या सरोवरांचा सारस त्याग करतात, धनहीन पुरुषाचा गणिका त्याग करते, कोमजलेल्या फुलांचा भ्रमर त्याग करतात, जळालेल्या वनप्रदेशांचा मृग-पशु त्याग करतात. अशा प्रकारे सर्व प्राणीसमुदाय प्रसंगावशात् च कोणाशी तरी प्रीति असलेला असतो. (त्यामुळे निरपेक्ष रित्या कोण कोणाचा प्रिय असतो?)
सन्तश्चेदमृतेन किं यदि खलस्तत्कालकूटेन किं
दातारो यदि कल्पशाखिभिरलं यद्यर्थिनः किं तृणैः।
किं कर्पूरशलाकया यदि दृशः पन्थानमेति प्रिया
सम्सारेऽपि सतीन्द्रजालमपरं यद्यस्ति तेनापि किम्॥
हिंदी अर्थ :- अगर सत्पुरुष मिल गये हो तो अमृत की क्या जरूरत है? अगर खलजनों के साथ पाला पडा हो तो जहर की क्या जरूरत है? धरा पर अगर दाता लोग हैं तो फिर कल्पवृक्ष की क्या जरूरत है? इस धरा पर अगर याचकजन है तो फिर तिनके की क्या जरूरत है? (याचना करने वाला तिनके के समान ही है।) अगर दृष्टिक्षेप में सुंदर युवतियाँ आती हो तो फिर कपूर या सुरमा आँखों में डालने की क्या जरूरत है? और यह संसार ही इंद्रजाल (मायाजाल) जैसा है तो फिर इसके बदले नकली मायाजाल-जादू की क्या जरूरत है?
मराठी अर्थ :-जर सत्पुरुष मिळाले तर अमृताची गरजच काय? जर खलजनांशी भेट झाली तर विषाची गरज काय? धरणीवर दाता असल्यानंतर कल्पवृक्षाची गरज काय? ह्या पृथ्वीवर जो पर्यंत याचक जन आहेत तो पर्यंत गवताच्या काडीची गरज काय? (याचना करणारा तृण समानच असतो.) जर सुंदर युवती दृष्टिक्षेपांत येत असतील तर कपूर किंवा काजळ डोळ्यांत टाकण्याची गरज काय? आणि हा संसारच इंद्रजाल (मायाजाल) आहे तेथे नकली मायाजाल (जादू) ची गरजच काय?
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः
सत्यं चेत्तपसा च किं शुचि मनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणैः स्वमहिमा यद्यस्ति किं मण्डनैः
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना॥
हिंदी अर्थ :- किसी इन्सान में अगर
यदि लोभ है तो फिर अन्य अवगुणों की आवश्यकता ही क्या है? अगर
चुगली-चहाडी की आदत है तो अन्य पापों की आवश्यकता क्या है? अगर
सत्य है तो तप कि क्या आवश्यकता है? अगर पवित्र मन है तो
तीर्थसेवन की क्या आवश्यकता है? अगर सज्जनता है तो अन्य
गुणों की क्या आवश्यकता है ?अगर खुद में बडप्पन, खानदानी, उदारता हो तो आभूषणों की आवश्यकता ही क्या
है? अगर अच्छी विद्या है तो धन की क्या जरूरी है? और अगर अपयश ही जीवन में हो तो मृत्यु की क्या आवश्यकता है? (अपयश यह मृत्यु से भी भयंकर है।)
मराठी अर्थ :- कोण्या माणसांत जर लोभ असेल तर मग अन्य कोणत्याही अवगुणांची आवश्यकताच काय आहे? जर चहाडी-चुगली करण्याची सवय असेल तर अन्य पापांची आवश्यकता काय? जर सत्य असेल तर तपाची आवश्यकता काय? जर पवित्र मन असेल तर तीर्थ सेवनांची आवश्यकता काय? जर सज्जनता असेल तर गुणांची आवश्यकता काय? जर स्वतःमध्ये मोठेपणा, उदारता, खानदानी असेल तर अन्य आभूषणांची आवश्यकताच काय? जर खरी विद्या आहे तर धनाची आवश्यकता काय? आणि जर अपयशच जीवनांत असेल तर मृत्युची आवश्यकता काय? (अपयश हा मृत्यु पेक्षा ही भयंकर आहे.)
छेदश्चन्दनचूतचम्पकवने रक्षापि शाखोटके
हिंसा हंसमयूरकोकिलकुले काकेषु नित्यादरः।
मातङ्गेन खरक्रयः समतुला कर्पूरकार्पासयो
रेषा यत्र विचारणा गुणिगणे देशाय तस्मै नमः॥
हिंदी अर्थ :- जिस देश में चंदन, आम, चंपा इ. वृक्षों का कत्ल होता हो और बभूल जैसे वृक्षों का रक्षण होता हो,
जहाँ हंस, मयूर, कोकिल
इ. पक्षियों की हिंसा होती हो और कौंवों के प्रति नित्य आदर भाव रखते हो, जहाँ हाथी को गधे के बदलेमें बेचते हो, वैसे ही कपूर
और कपास को एक समान भाव से तौला जाता हो, इस तरह से जहाँ
गुणीजनों के प्रति व्यवहार होता हो ऐसे देश को दूर से ही नमस्कार हो ।
मराठी अर्थ :- ज्या देशांत चंदन, आंबा, चंपक सारख्या वृक्षांना तोडले जाते आणि बाभळी सारख्या वृक्षांचे संवर्धन होते, जेथे हंस, मोर आणि कोकिळे सारख्या पक्ष्यांची हिंसा होते आणि कावळ्यां प्रति आदरभाव ठेवला जातो, जेथे हत्तीला गाढवाच्या बदल्यांत विकले जाते, आणि कापूर व कापूस या दोघांना एकाच भावाने तोलले जाते, अशा तऱ्हेने जेथे गुणीजनांच्या प्रति असा व्यवहार होत असेल अशा देशाला दूरूनच नमस्कार असो.
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी॥
हिंदी अर्थ :- जो पुर्णिमा बिना
बादलों की और चंद्र से सुशोभित है, वही सुंदर रात्री है, जो कामिनी (युवति) सौंदर्य और गुणों से युक्त है वही पति पर प्रेम करने
वाली सच्ची कामिनी है, जो मधुरता गोविंद के रसामृत से मधुर
है वही सच्ची मधुरता है और मनुष्य की जो चतुराई (समझता) इस लोक और परलोक को सिद्ध
कराने वाली है वही सच्ची चतुराई है।
मराठी अर्थ :- जी पोर्णिमा बिना ढगांची आणि चंद्राने सुशोभित आहे, तीच सुंदर रात्र आहे. जी कामिनी (युवती) सौंदर्य आणि गुणांनी युक्त आहे तीच पतिवर प्रेम करणारी खरी कामिनी आहे. जी मधुरता गोविंदाच्या रसामृताने भारलेली आहे तीच खरी मधुरता आहे आणि मनुष्याची जी चतुरता (समजूतदारपणा) ह्या लोकाला आणि परलोकाला सिद्ध करणारी आहे तीच खरी चतुरता आहे.
किं तीर्थं हरिपादपद्मभजनं किं रत्नमच्छा मतिः
किं शास्त्रं श्रवणेन यस्य गलति द्वैतान्धकारोदयः।
किं मित्रं सततोपकाररसिकं तत्त्वावबोधः सखे
कः शत्रुर्वद खेददानकुशलो दुर्वासनासञ्चयः॥
हिंदी अर्थ :- ‘हे मित्र!
तीर्थ (पवित्र करनेवाला) क्या है? ईश्वर के चरणकमलों का भजन’;
‘रत्न क्या है? पवित्र
निर्मल बुद्धि ही सच्चा (प्रकाशित) रत्न है।’;
‘शास्त्र क्या है? जिसके श्रवण से द्वैत-भेदबुद्धिरूप अंधःकार का उदय-लय होता है वह।’;
‘मित्र कौन
है? जो सतत उपकार करने में प्रवृत्त रहता है वह, और तत्त्वज्ञान भी सच्चा मित्र है, जिससे इन्सान का
सतत उपकार हित होता है।’;
‘शत्रु कौन है?
जो दुख देने में कुशल है वह, और सही ढंग से
देखें तो दुर्वासनाओं का समुदाय यही इन्सान को नित्य दुख देने वाला उसका सबसे बडा
शत्रु है।’
मराठी अर्थ :- हे मित्रा! तीर्थ
(पवित्र करणारे) काय आहे?
‘ईश्वराच्या चरणकमलांचे भजन’;
रत्न काय आहे? ‘पवित्र
निर्मळ बुद्धि हिच खरे (प्रकाशित) रत्न आहे.’;
शास्त्र काय आहे? ‘ज्याच्या
श्रवणाने द्वैत-भेदबुद्धिरूप अंधःकाराचा उदय-लय होतो, ते.’;
मित्र कोण आहे? ‘जो सतत
उपकार करण्यांत प्रवृत्त राहतो तो, आणि तत्त्वज्ञान पण खरा
मित्र आहे, ज्यामुळे मनुष्याचे सतत उपकार-हित होत रहाते.’;
शत्रु कोण आहे? ‘जो दुःख देण्यांत कुशल आहे तो. आणि खरे पाहता दुर्वासनांचा समुदाय हाच मनुष्याला नित्य दुःख देणारा त्याचा सर्वांत मोठा शत्रु आहे.’
क्षान्तिश्चेद्वचनेन किं किमरिभिः क्रोधोऽस्ति चेद्देहिनां
ज्ञातिश्चेदनलेन किं यदि सुहृद्दिव्यौषधैः किं फलम् ।
किं सर्पैर्यदि दुर्जनाः किमु धनैर्विद्यानवद्या यदि
व्रीडा चेत्किमु भूषणैः सुकविता यद्यस्ति राज्येन किम्॥
हिंदी अर्थ :- जिस इन्सान के पास
क्षमा है उसे कवच की क्या आवश्यकता? (अर्थांत क्षमा कवच के बदले में
इन्सान का रक्षण करती है, लडने को तैयार व्यक्ति के क्रोध से
या कुवचनों से क्षमावान के शांती का भंग नही होता।), अगर
इन्सान में क्रोध है तो दुष्मन की आवश्यकता ही क्या? (इन्सान
में रहा हुआ क्रोध ही उसका सबसे बडा शत्रु है और उसको अनेक रीति से नुकसान
पहुँचाता है।) अगर ज्ञाति-संबंधी हो तो अग्नि की क्या जरूरी है? (यह लोग जैसे ईर्ष्या, दुर्वचन, ताने मारना और निंदा से इन्सान को अग्नि की भांति जला देते हैं।), अगर सच्चे हृदयवाला मित्र हो तो दिव्य औषधी की क्या आवश्यकता? पास में अगर दुर्जन रहते हो तो साँप की क्या आवश्यकता? अच्छि विद्या प्राप्त करी हो तो धन की क्या आवश्यकता? अगर लज्जा (बुरा काम करने में संकोच) हो तो गहनों की क्या आवश्यकता?
और अगर इन्सान में अच्छा कवित्त्व, पारदर्शित्त्व
हो तो फिर उसको राज्य की क्या आवश्यकता?
मराठी अर्थ :- ज्या व्यक्तिजवळ क्षमा आहे त्याला कवचाची आवश्यकता काय? (अर्थांत क्षमा कवचाच्या बदली मनुष्याचे रक्षण करते, लढण्यासाठी तयार व्यक्तिच्या क्रोधाने किंवा कुवचनांनी क्षमावानाच्या शांतीचा भंग होत नाही.) जर मनुष्यांत क्रोध आहे तर अन्य शत्रुची आवश्यकताच काय? (माणसांत असलेला क्रोधच त्याचा सर्वांत मोठा शत्रु आहे जो त्याचा सर्व बाजूंनी नाश करत असतो.) जर नाते-संबंधी असतील तर अग्निची आवश्यकताच काय? (हे लोक, जसे ईर्ष्या, दुर्वचन, टोमणे मारणे आणि निंदेने अग्निसारखे जाळत असतांत.) जर निर्मळ हृदय असलेला मित्र असेल तर दिव्य औषधींची आवश्यकता काय? जवळ जर दुर्जन रहात असतील तर सापाची आवश्यकता काय? जर योग्य विद्या प्राप्त केली असेल तर धनाची आवश्यकता काय? जर लज्जा (वाईट कार्य करण्यांत संकोच) असेल तर अन्य दागिन्यांची आवश्यकता काय? आणि जर मानवांत चांगले कवित्त्व, पारदर्शित्त्व असेल तर मग त्याला साम्राज्याची आवश्यकताच काय?
सूनुः सच्चरितं सती प्रियतमा स्वामी प्रसादोन्मुखः
स्निग्धं मित्रमवञ्चकः परिजनो निःक्लेशलेशं मनः।
आकारो रुचिरः स्थिरश्च विभवो विद्यावदातं मुखं
तुष्टे विष्टपकष्टहारिणि हरौ सम्प्राप्यते देहिना॥
हिंदी अर्थ :- अच्छे आचरणवाला
पुत्र, बहुत प्रीतिवाली और सती पत्नी, प्रसन्नता और उत्साह
से भरे हुए मुख वाला और मेहेरबानी करने में तत्पर ; कृपावान
वैसे ही उदार सेठ, प्रेमळ मित्र, छलकपट
ना करनेवाले नौकर, थोडा भी क्लेश या चिंता बिना का मन,
सुंदर रुप या आकृति हो ऐसा शरीर, स्थिर वैभव
हो, और विद्या से पवित्र बना हुआ मुख हो, इतनी वस्तुएं मनुष्य को इस जगत् में जब संसार के दुख दूर करने वाला
श्रीहरी प्रसन्न होता है, तब ही प्राप्त होती है।