संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit Subhashit knowledgepandit
भाषासु
मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।
तस्माद्धि
काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् ॥ १॥
अर्थ
-
सर्व भाषांमधे दिव्य अशी संस्कृतभाषा मधुर आहे. त्या संस्कृत भाषेतल्या साहित्यातही काव्य मधुर आहे व त्या संस्कृत काव्यांमध्येही नाना
कवि, विद्वांन, पंडितांनी केलेली सुभाषिते अधिक
मधुर आहे.
पृथिव्यां
त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् ।
मूढै:
पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥२॥
अर्थ
- सुभाषितांची महती महात्म्य किती
थोर आहे म्हणाल तर या पृथ्वीवर
१) पाणी २) अन्न ३) सुभाषित ही तीनच रत्ने आहेत. चवथे रत्न नाही. पण मूर्ख
अज्ञान लोक दगडाच्या चमकणाऱ्या तुकड्यांनाच रत्न असे म्हणतात. आणि सुभाषितांचा संग्रह करणे सोडून ते चमकणारे तुकडे
जमा करत बसतात.
संसारकटुवृक्षस्य
द्वे फले अमृतोपमे ।
सुभाषितरसास्वाद:
सङ्गति: सुजनै: सह ॥३॥
अर्थ - संसार हा दुःखदायी आहे असे सर्व
धर्मांनी, संतांनी एकमुखाने मान्य केलेले आहे. त्या संसाररूपी कडु वृक्षाची दोनच फळे अमृताप्रमाणे (गोड)
आहेत. एक म्हणजे सुभाषितांच्या रसाचा आस्वाद व दुसरे म्हणजे सज्जनांबरोबर संगत. सज्जनांची,
साधुसंतांची संगत आणि सुभाषितांचे रसग्रहण ही दोनच गौल्य फळे या संसाररूपी वृक्षावर
लागलेली आहेत. ही दोन फळे फक्त विद्वांन मंडळी सेवतात. आणि इतर मुर्ख लोक विषयभोगरूपी
कडु फळे खाण्यात मग्न असतात.
द्राक्षा
म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता ।
सुभाषितरसस्याग्रे
सुधा भीता दिवं गता ॥४॥
अर्थ
- त्या
सुभाषित रसाचा आस्वाद किती मधुर आहे म्हणाल तर ऐका, सुभाषिताच्या
रसापुढे द्राक्षाची गोडी म्लानमुख झाली, साखरेचा दगड झाला व
अमृत घाबरून स्वर्गात पळून गेले.
नायं
प्रयाति विकृतिं विरसो न य: स्यान्न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीत: ।
जाड्यं
निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं नूनं सुभाषितरसोऽन्यरसातिशायी ॥२-५॥
अर्थ
- सुभाषितांचा
रस हा इतर रसांच्या कितीतरी
वरचढ आहे. तो कधीच बिघडत नाही, बेचव होत नाही, खूप लोकांनी सतत पान केले तरी तो कधीच नाहीसा होत नाही, बुद्धीचे मांद्य घालवतो, मधुर असतो व (पिणार्याची) तृप्ती सुद्धा करतो.
खिन्नं
चापि सुभाषितेन रमते स्वीयं मन: सर्वदा
श्रुत्वान्यस्य
सुभाषितं खलु मन: श्रोतुं पुनर्वाञ्छति ।
अज्ञान्
ज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्
कर्तव्यो
हि सुभाषितस्य मनुजैरावश्यक: सङ्ग्रह: ॥६॥
अर्थ - उदास झालेले स्वत:चे
मन सुद्धा सुभाषितामुळे रमते. दुसर्याचे सुभाषित ऐकून मन पुन्हा ते सुभाषित
ऐकण्याची इच्छा करते. अज्ञानी व ज्ञानी मनुष्यांना सुद्धा (सुभाषिताने) वश करणे
शक्य होईल. म्हणून मनुष्यांनी सुभाषितांचा
अवश्य संग्रह करावा.
ससदि
तदेव भूषणमुपकारकमवसरे धनं मुख्यम् ।
सूक्तं
दधति सुवर्णं कल्याणमनर्घमिह धन्या: ॥७॥
अर्थ - सोने धारण करणारे, कल्याणकारक
व मौल्यवान असे सूक्तच सभेमधे भूषणावह उपकारक असे मुख्य धन आहे. तात्पर्य विद्वानांच्या
सभेत कितीही सुवर्णालंकार, माणिक मोती परिधान करून बसला. पण त्याच्याजवळ जर सुभाषितरूप
धन नसेल तर त्याच्या तिथे असण्याला काहीच अर्थ नाही.
किं
हारै: किमु कङ्कणै: किमसमै: कर्णावतंसैरलम्
केयूरैर्मणिकुण्डलैरलरलं
साडम्बरैरम्बरै ।
पुंसामेकमकण्डितं
पुनरिदं मन्यामहे मण्डनं
यन्निष्पीडितपार्वणामृतकरस्यन्दोपमा:
सूक्तय:॥८॥
अर्थ - (हिरा मोत्यांच्या)
हारांची काय आवश्यकता ?
कंकणांचा काय उपयोग? कानातील कुंडलांचा काय
उपयोग? बाजूबंद कशाला ? रत्नखचित
कुंडलांचा काय उपयोग? भपकेबाज उंची वस्त्रेही नकोत. आम्ही तर
असे मानतो की (अमृतमय किरणांनी युक्त अशा) पूर्ण चंद्राला पिळल्यावर त्यातून
पाझरणार्या अमृतरसासारखी असलेली (मधुर) सुभाषिते हा एक मनुष्याचा कायम टिकणारा
अलंकार आहे.
सुभाषितरस्वाद:
सज्जनै: सह सङ्गति: ।
सेवा
विवेकिभूपस्य दु:खनिर्मूलनं त्रयम् ॥९॥
अर्थ - सुभाषितांच्या रसाचा
आस्वाद, सज्जनांबरोबर संगत व विवेकी राजाची सेवा या तीन गोष्टी दु:ख समूळ नाहीसे
करतात.
सुभाषितमयैर्द्रव्यै:
सङ्ग्रहं न करोति य: ।
सोऽपि
प्रस्तावयज्ञेषु कां प्रदास्यति दक्षिणाम् ॥१०॥
अर्थ - सुभाषितरूपी भरपूर
द्रव्याचा जो संग्रह करत नाही तो आरंभलेल्या कार्यरूपी यज्ञामधे काय बरं दक्षिणा
देईल? ज्याने अनेक
सुभाषितांचे पाठांतर करून ठेवले आहे. आणि ते सुभाषित ज्याला समयोचित स्फुरतात. त्याच्यासाठी
कोणतेही कार्य अवघड नसते. सर्व प्रकारच्या कार्यांचा आरंभ आणि शेवट त्याच्याकडून सहज
होववतो.
सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया ।
मनो न
भिद्यते यस्य स योगी अथवा पशु: ॥११॥
अर्थ - स्त्रियांनी
सहज गायलिलेले सुभषित ऐकून ज्याचे मन द्रवत नाही तो मनुष्य एकतर योगी तरी आहे
किंवा पशु तरी आहे.
सभाषितरसास्वादादजातरोमाञ्चकञ्चुका: ।
विनापि
कामिनीसङ्गं कवय: सुखमासते ॥१२॥
अर्थ - सुभाषित
रसाच्या आस्वादामुळे कामिनीच्या संगाशिवायच अंगावर रोमांच उभे राहिले.
त्यामुळे कवी आनंदी
होतात.
यस्य वक्त्रकुहरे सुभाषितं नास्ति नाप्यवसरे प्रजल्पति ।
आगत:
सदसि धीमतामसौ लेप्यनिर्मित इवावभासते ॥१३॥
अर्थ - ज्याच्या
मुखात सुभाषित नाही व योग्य वेळी जो बोलतही नाही, बुद्धिमानांच्या सभेत आलेला
असा मनुष्य जणु काही चिखालाने तयार केल्याप्रमाणे भासतो.
धर्मो यशो नयो दाक्ष्यं मनोहारि सुभाषितम् ।
इत्यादिगुणरत्नानां
सङ्ग्रही नावसीदति ॥१४॥
अर्थ - धर्म, यश, न्याय, दाक्षिण्य व मनोहर असे सुभाषित इत्यादी
गुणरूपी रत्नांनी युक्त असा मनुष्य (इत्यादी गुणांचा संग्रह करणारा मनुष्य) नष्ट
पावत नाही.
बोद्धारो मत्सरग्रस्ता: प्रभव: स्मयदूषिता: ।
अबोधोपहताश्चान्ये
जीर्णमङ्गे सुभषितम् ॥१५॥
अर्थ - जाणते लोक
असूयेने ग्रासलेले असतात,
अधिकारी लोक गर्वाने पीडित असतात. आणि इतर लोक अज्ञानाने पीडलेले असतात. म्हणून सुभाषित (मनातच) लुप्त होते.
सौ मनीषाताई अभ्यंकर