संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
कस्यापि
कोऽप्यतिश योऽस्ति स तेन लोके
ख्यातिं
प्रयाति नहि सर्वविदस्तु सर्वे।
किं केतकी
फलति किं पनसः सुपुष्पः
किं
नागवल्ल्यपि च पुष्पफलैरुपेता॥
हिंदी अर्थ :- दुनिया में ख्याति किसी किसी को ही प्राप्त
होती है । और उनमें कुछ प्रकार की ऐसी विशेषता होती है, जिसकी वजह से वह ख्यातिप्राप्त होते है।
बाकी ख्याति पाने वाले सभी सर्वज्ञ होते हैं ऐसा नही होता, और जो सर्वज्ञ हैं वह सभी ख्यातिप्राप्त
होते हैं ऐसा भी नही होता। क्या केवडे के पेड को फल आता है? (बिलकुल नही) क्या फणस के पेड को अच्छा फूल
आता है? (बिलकुल नही) और क्या नागरवेल
फुल/फलों वाली होती है? (बिलकुल नही) फिर
भी यह सब उनकी एक विशिष्ट विशेषता को लेकर प्रख्यात हैं।
मराठी अर्थ :- जगात प्रसिद्धी कुणा-कुणालाच मिळते. आणि ज्यांच्यात अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. ज्यांना प्रसिद्धी मिळते ते सर्व सर्वज्ञ आहेत, असे नसते, आणि जे सर्वज्ञ आहेत ते सर्वच प्रसिद्ध आहेत, असेही होत नाही. केवड्याच्या झाडाला फळे येतात का? (अजिबात नाही) फणसाच्या झाडाला चांगली फुले येतात का? (अजिबात नाही) आणि नागरवेल काय फूल/फळयुक्त आहे का? (अजिबात नाही) तरीही ते सर्व त्यांच्या एका खास वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहेत.
शीलावलम्बनमहर्निशमिष्टचिन्ता
वित्तानुरूपमशनाभरणादि कार्यम्।
कार्यं च दुर्जनसमाजनिजप्रशंसा
हास्यादि सज्जनवचो हृदये निधेयम्॥
हिंदी अर्थ :- इन्सान ने नित्य
शील-सदाचार का अवलम्बन करते रहना चाहिये,
इष्ट
देव अथवा पदार्थ का चिन्तन करते रहना चाहिये,
खुद
के आर्थिक परिस्थिती अनुरूप खान-पान,
आभूषण
इ. रखने चाहिये, दुर्जनों के
समाज में खुद की प्रशंसा हो या मस्करी हो दोनों ही झूठे हैं इसलिये उसको रोकना
चाहिये; और सज्जनों के वचनों को
हृदय में धारण करना चाहिये।
मराठी अर्थ :- मानवाने नित्य
शील-सदाचाराचे अवलंबन करत रहावे,
इष्ट
देवता अथवा पदार्थांचे चिंतन करीत रहावे,
स्वतःच्या
आर्थिक परिस्थिती अनुरूप खान-पान,
आभूषण
इ. ठेवली पाहिजे. दुर्जनांच्या समाजांत स्वतःची प्रशंसा किंवा मस्करी ह्या दोन्ही
खोट्या आहेत, त्यामुळे
त्यांचा अवरोध केला पाहिजे. आणि सज्जनांच्या वचनांना नेहमी हृदयांत धारण केले
पाहिजे.
पश्यन्ति नैव कवयो निजकाव्यदोषं
भक्षन्ति नो बलिभुजो निजजातिमांसम् ।
जल्पन्ति नैव मधुपा निजमर्मवाक्यं
कुर्वन्ति नो युवतयः पुरुषेषु बीजम् ॥
हिंदी अर्थ :- कवि जन खुद के काव्य दोषों को नही देखते, बलि (बलिदान, कर अथवा वैरी) खाने वाले (कौवे, राजपुरुष अथवा क्षत्रिय) खुद के जाति के
माँस (अथवा द्रव्य) नही खाते। मद्यपान करने वाला (शराबी) खुद की गुप्त वार्ता नही
कहता और स्त्री युवान हो फिर भी पुरुषों में गर्भाधान नही कर सकती।
मराठी अर्थ :- कवींना स्वतःचे काव्य दोष दिसत नाहीत, जे यज्ञ (बलिदान , कर घेणारे किंवा वैरी) खाणारे (कावळे, राजे किंवा क्षत्रिय) ते स्वतःच्या जातीचे मांस (किंवा द्रव्य) खात नाहीत. मद्यपान करणारा (मद्यपी) स्वतःची गुप्त गोष्ट सांगत नाही आणि स्त्री तरुण असली, तरीही ती पुरुषांमध्ये गर्भधारणा करू शकत नाही.
कीर्तिं मृणालकमनीयभुजामनिद्र
चन्द्राननां स्मितसरोरुहचारुनेत्राम् ।
ज्योत्स्नास्मितामुपगतां दयितामिव स्वां
लब्धुं न कः परमुपक्रममातनोति॥
हिंदी अर्थ :- कमल के डंडे जैसी सुकोमल हाथोंवाली, प्रकाशित चन्द्र के जैसी मुखवाली, खिले हुए कमल जैसे सुंदर दो नेत्रों वाली, वैसे ही चांदनी के जैसे धवल हास्य वाली
स्त्री जैसी कीर्ति को प्राप्त करने के लिये कौन सा शूरवीर दूसरों पर आक्रमण करता
नही?
मराठी अर्थ :- कमळांच्या देठासारख्या
सुकोमल हातांची, उजळलेल्या
चंद्रासारख्या चेहऱ्याची, उमललेल्या
कमळासमान सुंदर दोन नेत्र असलेली तसेच चांदणी समान धवल हास्य असणार्या स्त्री
सारख्या ख्याति ला प्राप्त करण्यासाठी कोणता शूरवीर दुसऱ्यावर आक्रमण करणार नाही?
शास्त्रं सुनिश्चलधिया परिचिन्तनीयं
सेव्यो नृपोऽपि सततं परिसेवनीयः ।
अङ्के स्थितापि युवतिः परिरक्षणीया
शास्त्रे नृपे च युवतौ च कुतः स्थिरत्वम् ॥
हिंदी अर्थ :- अध्ययन किये हुए शास्त्रों का भी अच्छि तरह
से स्थिर बुद्धि से वारंवार चिन्तन करते रहना चाहिये। सेवा के पात्र राजा की भी
सतत सेवा करनी चाहिए। युवान स्त्री हमेशा पास में ही रहती हो फिर भी उसका सतत
रक्षण करना चाहिये, संभालना चाहिये।
क्योंकि शास्त्र, राजा या युवति
इनमें स्थिरता कहाँ होती है? (शास्त्र नित्य
चिंतन से नये नये विशेष अर्थ बताता है,
राजा
की अगर नित्य सेवा नही करें तो वह अन्य सेवकों की तरफ मूड जाता है, वैसे ही युवति का भी नित्य रक्षण नही किया
तो वह दूषित बनने की संभावना है।)
मराठी अर्थ :- अध्ययन केलेल्या
शास्त्रांचेही स्थिर बुद्धीने वारंवार चिंतन केले पाहिजे, जो राजा सेवेस पात्र आहे त्याचीही नित्य
सेवा केली पाहिजे. एक तरुण स्त्री नेहमीच जवळ असते, तरीही तिला सतत संरक्षित केले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण शास्त्र, राजा आणि युवती मध्ये स्थिरता कोठे असते? (शास्त्र दैनंदिन चिंतनाने नित्य नवे-नवे
अर्थ सांगत असतांत, राजाची जर नित्य
सेवा केली नाही तर तो अन्य सेवकांकडे वळतो त्याचप्रमाणे युवतिचे संरक्षण नीट केले
नाही तर ती भ्रष्ट होण्याची शक्यता असते.)
हंसो विभाति नलिनीदलपुञ्जमध्ये
सिंहो विभाति गिरिगह्वरकन्दरासु।
जात्यो विभाति तुरगो रणयुद्धमध्ये
विद्वान्विभाति पुरुषेषु विचक्षणेषु॥
हिंदी अर्थ :- हंस कमलों के
समूह में शोभा देते हैं, सिंह पर्बत की
गुफाओं और कंदराओं में शोभा देते हैं,
उत्तम
जाति का घोडा रणसंग्राम में युद्ध करते हुए शोभा देता है वैसे ही विद्वान व्यक्ति
चतुर पुरुषों के बिच शोभा देता है।
मराठी अर्थ :- हंस कमळांच्या समूहांत
शोभतो, सिंह पर्वताच्या गुहेंत
शोभतो, उत्तम वंशाचा घोडा
युद्धात युद्ध करतांना शोभतो, त्याचप्रमाणे
विद्वान पुरुष हुशार माणसांच्या मध्यभागी शोभतो.
हंसो न भाति बलिभोजनवृन्दमध्ये
गोमायुमण्डलगतो न विभाति सिंहः।
जात्यो न भाति तुरगः खरयूथमध्ये
विद्वान्न भाति पुरुषेषु निरक्षरेषु॥
हिंदी अर्थ :- जैसे हंस बलि
खानेवाले कौंवों की टोली में शोभा नही देता,
जैसे
शेर गीधड के झुंड में शोभा नही देता,
जैसे
उत्तम घोडा गधों के झुंड में शोभा नही देता,
वैसे
ही विद्वान व्यक्ति निरक्षर-मूर्ख व्यक्तियों के बीच शोभा नही देता।
मराठी अर्थ :- हंस ज्याप्रमाणे बळी
खाणाऱ्या कावळ्यांच्या समूहांत शोभत नाही,
सिंह
कोल्ह्यांच्या कळपांत शोभत नाही,
चांगला
घोडा गाढवांच्या कळपांत शोभत नाही,
त्याचप्रमाणे
विद्वान मनुष्य अशिक्षित मूर्ख लोकांमध्ये शोभत नाही.
विश्वेश्वरस्तु सुधिया गलितेऽपि भेदे
भावेन भक्तिसहितेन समर्चनीयः।
प्राणेश्वरश्चतुरया मिलितेऽपि चित्ते
चैलाञ्चलव्यवहितेन निरीक्षणीयः॥
हिंदी अर्थ :- जिस प्रकार
दोनों के चित्त एकरुप होने पर भी चतुर नारी खुद के प्राणनाथ के दर्शन साडी के छोर
से करती रहती है, वैसे ही
ज्ञानप्राप्ति होने पर भेद निकल कर गल जाने के बाद भी सुबुद्धिवाले बुद्धिशाली
इन्सान ने भक्तियुक्त भाव से विश्वनाथ का पूजन-अर्चन करते रहना चाहिए। (
मूर्तिपूजा>द्वैत!)
मराठी अर्थ :- ज्या प्रमाणे चित्त
एकरुप झालेले असतांना पण स्त्री पदराआडून स्वतःच्या प्राणनाथ कडे बघत असते, त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्ति झाल्यावर भेद
निघून गळून गेल्यावरही सुबुद्धिच्या बुद्धिशाली मानवाने भक्तियुक्त अंतःकरणाने
विश्वनाथाचे पूजन-अर्चन करीत राहिले पाहिजे. ( मूर्तिपूजा>द्वैत!)
किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते
किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण।
मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेन
किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण॥
हिंदी अर्थ :- वसंत ऋतू चले
जाने पर कोकिल के गान का क्या अर्थ रह जाता है? डरपोक व्यक्ति बहुत अस्त्र-शस्त्र धारण कर लेता है, उसको क्या अर्थ है? आपत्ति में जो खुद का मुख भी दिखाता नही, ऐसे मित्रों का क्या अर्थ है? वैसे ही इन्सान अगर निरक्षर-मूर्ख रहे तो
उसके जीने का क्या अर्थ है?
मराठी अर्थ :- वसंत ऋतु संपला की
कोकिळेच्या गाण्याचा अर्थ काय? एखादा भित्रा
माणूस भरपूर अस्त्र-शस्त्रे वापरतो,
त्याला
काय अर्थ आहे? आपत्ति मध्ये
स्वतःचे तोंडही न दाखवणाऱ्या मित्रांना काय अर्थ आहे? तसेच माणूस अशिक्षित आणि मूर्ख राहिला तर
त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे?