संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit हिंदी मराठी अर्थ
नीचं समृद्धमपि सेवति नीच एव
तं दूरतः
परिहरन्ति पुनर्महान्तः।
शाखोटकं
मधुरपक्वफलैरुपेतं
सेवन्ति
वायसगणा न तु राजहंसाः॥
हिंदी अर्थ :- हलका इन्सान ही हलके धनिक इन्सान का सेवन
करता है, परंतु उच्च तो ऐसे हलके
धनिक जन का दूर से ही त्याग कर देता है। जैसे शखोट वृक्ष के मधुर फलों का कौवा ही
सेवन करता है, राजहंस नही।
मराठी अर्थ :- हलका व्यक्तिच हलक्या
धनिकाचे खात असतो. परंतु उच्च व्यक्ति तर हलक्या धनिकाचा तर दूरूनच त्याग करतो.
जसे शखोट वृक्षाची मधुर फळे तर कावळाच सेवन करतो, राजहंस नाही.
उपकर्तुं
प्रियं वक्तुं कर्तुं स्नेहम् अकृत्रिमम्!
सज्जनानां
स्वभावोऽयं केनेन्दुः शिशिरीकृतः?
(सुभाषितरत्नभाण्डागारम्)
दुसऱ्यावर उपकार करणे, गोड बोलणे, सहज मैत्री करणे हा सज्जनांचा स्वभावच असतो.
इन्दुः (चंद्र)
केन (कुणी)
शिशिरीकृत: ( शीतल केला आहे?)
सज्जन लोक परोपकारी
असतात. ते सर्वांशी गोड बोलतात, उगाचच कठोर बोलत
नाहीत. ते कोणताही उद्देश नजरेसमोर ठेवून मैत्री करत नाहीत. त्यांचा स्नेह
अकृत्रिम असतो. हे सर्व गुण त्यांना कुणी शिकवत नाही. त्यासाठी त्यांना विशेष
प्रयत्न करावे लागत नाहीत. चंद्र स्वभावतःच शीतल असतो. त्याला मुद्दाम शीतल करावे
लागत नाही.
माकन्दराजपरिरम्भणलालितापि
मल्लीवधूर्मधुपरागवती बभूव।
दृष्ट्वापि तत्कुटिलतां न जहाति चूतः
प्रायः कुजातिनिवहेषु कुतोऽभिमानः॥
हिंदी अर्थ :- जुई के वेलरुपी
सुंदरी को रसराज आम्र आलिंगन देकर प्यार करता है, फिर भी वह जुई भ्रमर के प्रति प्रीति रखती है; उसकी यह कुटिलता देखकर भी आम्र उसका त्याग
नही करता और इस कृत्य की जुई को लज्जा भी नही आती। सच में हीन कुल में जन्म लेने
वालों को उच्च कुल का अभिमान कहाँ से होगा?
मराठी अर्थ :- जुईच्या वेलरुपी
सुंदरीला रसराज आंबा आलिंगन देऊन प्रेम करतो,
तरीही
ती जुई भ्रमराच्या प्रेमांत पडते;
तिची
ही कुटिलता बघून ही आंबा तिचा त्याग करीत नाही, परंतु ह्या कृत्याचा जुई ला पश्चात्ताप पण होत नाही. खरेच
हीन कुळांत जन्मलेल्या व्यक्तिला उच्च कुळाचा अभिमान कसा असणार?
कालक्रमेण
परिणामवशादनव्या
भावा भवन्ति
खलु पूर्वमतीव तुच्छाः।
मुक्तामणिर्जलदतोयकणोऽप्यणीयान्
सम्पद्यते च
चिरकीचकरन्ध्रमध्ये॥
हिंदी अर्थ :- नविन स्वरुप को
प्राप्त न कर पाए कितने ही पदार्थ पहले तो अत्यंत तुच्छ स्थिति में होते हैं। बाँस
के छिद्र में गया हुआ मेघ का जलबिंदु पहले तो काफी छोटा और तुच्छ होता है, लेकिन कालक्रममें कभी कभी उसमें ऐसा
परिवर्तन होता है, की जिससे वह
सुंदर मोती बन जाता है।
मराठी अर्थ :- नविन स्वरूप न प्राप्त
झालेले अनेक पदार्थ प्रथमतः अत्यंत क्षुल्लक क्षुद्र अवस्थेत असतात. बांबूच्या
छिद्रांत गेलेल्या ढगाचा पाण्याचा बिंदू सुरुवातीला खूप लहान आणि क्षुल्लक असतो, परंतु काही काळाने त्यांत कालानुक्रमाने
इतके परिवर्तन होते की, ज्यामुळे तो एक
सुंदर मोती बनतो.
यच्चिन्तितं
तदिह दूरतरं प्रयाति
यच्चेतसापि न कृतं तदिहाभ्युपैति।
इत्थं
विधेर्विधिविपर्ययमाकलय्य
सन्तः सदा सुरसरित्तटमाश्रयन्ति॥
हिंदी अर्थ :- इस जगत में
जिसकी झंखना (बार बार याद करना) या चिंतन करा होगा, वह दूर दूर चला जाता है, और जिसका कभी चित्त में विचार भी नही किया होगा, वह सामने आकर खडा हो जाता है। इस प्रकार
विधी (नियती) के विपरित विधान (घटना) देखकर सत्पुरुष हमेशा गंगा के तटपर आकर रहते
हैं। (सब कामनाओं को छोड देते हैं।)
मराठी अर्थ :- या जगात ज्याची वारंवार आठवण केली आहे किंवा चिंतन झाले आहे, तो दूर दूर निघून जातो आणि ज्याचा मनात कधी विचारही केला नाही, तो समोर येऊन उभा राहतो. अशा प्रकारे नियमा (नियति) च्या विपरीत विधान (घटना) पाहून सत्पुरुष नेहमी गंगेच्या तीरावर येऊन राहतात. (सर्व इच्छा/कामनांचा त्याग करतांत.)
अन्तःप्रतप्तमरुसैकतदह्यमानमूलस्य
चम्पकतरोः क्व विकासचिन्ता।
प्रायो भवत्यनुचितस्थितिदेशभाजां
श्रेयः स्वजीवपरिपालनमात्रमेव॥
हिंदी अर्थ :- मरुभूमि
(रेगिस्तान) में उगे हुए चंपक वृक्ष के मूल रेती में तपकर जो जल जाते हैं, ऐसा वृक्ष विकास पाने का/खिलने का विचार
कहाँ से कर सकता है? सच में अयोग्य
स्थान में जिस सयाने व्यक्ति पर रहने की दशा प्राप्त हो ऐसे सयाने इन्सान ने खुद
का श्रेय इतने में ही समझ लेना चाहिये कि,
जिससे
वहाँपर खुदका जीवन बना रहे। (उसके लिये इससे जादा श्रेय या जादा विकास का संभव इस
जगह पर नही है।)
मराठी अर्थ :- मरुभूमीत (वाळवंटात )
उगलेले चंपक वृक्षाचे मूळ रेतीत तापून जळून जाते , असा वृक्ष विकासाचा ,
फुलण्याचा
विचार कुठुन /कसा करेल ? खरंच , अयोग्य स्थानात ज्या शहाण्या व्यक्तीवर
राहण्याची दशा प्राप्त होत असेल तर त्या शहाण्या माणसाने स्वतःचे श्रेय इतकेच
समजायला हवे की ज्यामुळे तिथे तो आपले जीवन जगू शकेल. ( कारण त्याचेसाठी त्या
जागेवर त्याचा विकास/ उत्कर्ष संभवत नाही वा त्यास श्रेय मिळत नाही )
उचितमनुचितं
वा कुर्वता कार्यजातं
परिणतिरवधार्या
यत्नतः पण्डितेन।
अतिरभसकृतानां
कर्मणामाविपत्तेः
भवति
हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः॥
हिंदी अर्थ :- योग्य या अयोग्य
कोई भी कार्य करने से पहले बुद्धिशाली इन्सान ने उसके परिणाम का विचार कर लेना
चाहिये। वहुत जल्दबाजी में किये गये कार्यों की वजह से ही विपत्ती आती है। उनके
परिणाम हृदय में धसे हुए या हृदय को जलाने वाले शल्य जैसे होते हैं।
मराठी अर्थ :- योग्य किंवा अयोग्य असे
कोणतेही काम करण्याआधी सुज्ञ व्यक्तीने त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.
खुप घाईघाईने केलेल्या कृतीमुळेच संकटे येतात. त्यांचे परिणाम हृदयाला छिद्र
पाडण्याऱ्या किंवा हृदयाला जाळणाऱ्या शल्यासारखे असतात.
व्यतिषजति
पदार्थानान्तरः कोऽपि हेतुः
न खलु
बहिरुपाधीन्प्रीतयः संश्रयन्ते।
विकसति हि
पतङ्गस्योदये पुण्डरीकं
द्रवति च
हिमरश्मावुद्गते चन्द्रकान्तः॥
हिंदी अर्थ :- कोई अंतरिक हेतु
ही पदार्थों को एक दुसरे से जोडकर रखता है। सच में ऐसे आंतरिक कारणों से बनी हुई
प्रीति बाहर के कारणों का आश्रय नही लेती है। क्योंकि सूर्योदय होते ही कमल खिलते
हैं, और चंद्रोदय होते ही
चंद्रकांत मणी द्रवित होते हैं,
(सुधा
प्रकाश बरसाते हैं।) इसमें इनका आंतरिक हेतू ही कारण होता है।
मराठी अर्थ :- कोणता तरी अंतर्गत हेतू
मुळेच पदार्थ एकमेकांशी जोडलेले राहतात. किंबहुना अशा आंतरिक कारणांनी निर्माण
झालेले प्रेम बाह्य कारणांचा आश्रय घेत नाही. कारण सूर्योदय होताच कमळ फुलतांत आणि
चंद्र उगवताच चंद्रकांत मणी द्रवित होतात. (सुधा प्रकाशाची वर्षा करतांत) ह्या
क्रियेंत त्यांचा आंतरिक हेतूच कारणीभूत असतो.
भवति हृदयहारी कोऽपि कस्यापि हेतुः
न खलु गुणविशेषः प्रेमबन्धप्रयोगे।
किसलयितवनान्ते कोकिलारावरम्ये
विकसति न वसन्ते मालती कोऽत्र हेतुः॥
हिंदी अर्थ :- किसी भी व्यक्ति का किसी भी व्यक्ति के साथ
स्नेह संबंध जुडे जाने के लिये हृदय को हर लेने वाला कोई खास गुण कारण रुप होता है; क्योंकि, वसंत ऋतु में संपूर्ण वन जब नवपल्लव और कोकिल की टहूकार से
रम्य बना रहता है, तब ऐसे समय में
मालति को फूल नही आते, इसमें इसके सिवा
अन्य कौनसा हेतू हो सकता है?
मराठी अर्थ :- कोणत्याही व्यक्तिचे
कोणत्याही व्यक्तिसोबत स्नेहसंबंध जोडून ठेवण्यासाठी हृदयाला हरणारा एखादा खास गुण
कारणीभूत असतो; कारण की, वसंत ऋतु मध्ये जेंव्हा संपूर्ण वन नवपल्लव
आणि कोकिळच्या कूजनाने रम्य बनलेले असते,
तेंव्हा
त्या वेळी मालति फूलत नाही, त्यात अन्य
कोणता हेतू असू शकतो?