असमाने समानत्वं भविता कलहे मम इति मत्वा ध्रुवं मानी मृगात् सिंह: पलायते - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit hindimarathi arth

असमाने समानत्वं भविता कलहे मम इति मत्वा ध्रुवं मानी मृगात् सिंह: पलायते - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit hindimarathi arth

 संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit hindi marathi arth

आहूतेषु विहङ्गमेषु मशको नायान्पुरो वार्यते

मध्येवारिधि वा वसंस्तृणमणिर्धत्ते मणीनां रुचम्।

खद्योतोऽपि न कम्पते प्रविचलन्मध्येऽपि तेजस्विनां

 धिक्सामान्यमचेतसं प्रभुमिवानामृष्टतत्त्वान्तरम्॥

हिंदी अर्थ :- जब पक्षियों को बुलाया जाता है तब अगर सबसे आगे मच्छर आते हैं तो उन्हे कोई रोकता नही, इसी प्रकार समुद्र में अगर चमकने वाला तिनका भी खुद मोती की कान्ती धारण कर ली है ऐसा मानता है तो उसको कोई ना कहने जाता नही, तेजस्वी ग्रह-नक्षत्र-चाँद इ. रहने वाले आकाश में चलने वाले जुगनू ने खुद को भी बेधडकता से आकाश को प्रकाशमान करने वाला मानने लगा तो उसका कोई निषेध नही करता, जिसने खुद से जादा महान तत्त्व का कभी विचार किया नही, ऐसे किसी तत्त्व को जाना नही-अनुभव किया नही और जो खुद को ही श्रेष्ठ और समर्थ मान कर वर्तन कर रहा है ऐसे जड प्राणी का धिक्कार है।

मराठी अर्थ :- जेंव्हा पक्ष्यांना बोलावले जाते तेंव्हा जर सर्वप्रथम मच्छर येत असतील तर त्यांना कोणीही अडवू शकत नाही, त्याच प्रमाणे जर समुद्रांत चमकणारे गवताचे पाते पण मोत्याची कान्ति धारण केली आहे असे मानू लागला तर त्याला कोणी नाही म्हणण्यासाठी जात नाही, तेजस्वी ग्रह-नक्षत्र-चंद्र इ. असणाऱ्या आकाशांत उडणारा काजवा जर स्वतःला बेधडकपणे आकाशाला प्रकाशमान करणारा मानू लागला तर त्याचा कोणीही निषेध करीत नाही, ज्याने स्वतःपेक्षा महान तत्त्वाचा कधीही विचार केला नाही, अशा कोणत्याच तत्त्वाला जाणून घेतले नाही- अनुभव घेतला नाही आणि स्वतःलाच श्रेष्ठ आणि समर्थ मानून वर्तन करू लागला तर अशा जड प्राण्याचा धिक्कार आहे.

मूर्खोऽशान्तस्तपस्वी क्षितिपतिरलसो मत्सरो धर्मशीलो

दुःस्थो मानी गृहस्थः प्रभुरतिकृपणः शास्त्रभृद्धर्महीनः।

आज्ञाहीनो नरेन्द्रः शुचिरपि सततं यः परान्नोपभोजी

वृद्धो रोगी दरिद्रः स च युवतिपतिर्धिग्विडम्बप्रकारान्॥

हिंदी अर्थ :- तपस्वी इन्सान का मूर्ख-चंचल होना, राजा का आलसी होना, खुद के धर्म का आचरण करने वाले इन्सान का इर्षालु-द्वेषी होना, अमानी गृहस्थ का बुरी अवस्था में होना, सेठ का अत्यंत कृपण-कंजूस होना, शास्त्र का ज्ञाता धर्महीन होना, राजा का सेवकों को आज्ञा नही दे पाना, पवित्र इन्सान हमेंशा पराया अन्न ग्रहण करता रहना, वृद्ध हो, रोगी हो और दरिद्रि हो और फिर भी तरूण स्त्री का पति होना यह सब विटम्बनाओं के प्रकार है जिसका धिक्कार है।

मराठी अर्थ :- तपस्वी व्यक्तिचे मूर्ख-चंचल असणे, राजाचे आळशी असणे, स्वतःच्या धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तिचे ईर्षाळू-द्वेषी असणे, अमानी व्यक्तिचे वाईट अवस्थेत असणे, शेठचे अत्यंत कृपण (कंजूस) असणे, शास्त्राचा जाणकार धर्महीन असणे, राजाची सेवकांना आज्ञा देऊ न शकणे, पवित्र व्यक्ति ला नेहमी परान्न सेवन करावे लागणे, वृद्ध आहे, दरिद्रि आहे, रोगी आहे तरीही तरुण स्त्री चा पति असणे हे सर्व विटम्बनेचे प्रकार आहे ज्याचा धिक्कार आहे.

प्राणाघातान्निवृत्तिः परधनहरणे संयमः सत्यवाक्यं

काले शक्त्या प्रदानं युवतिजनकथामूकभावः परेषाम्।

तृष्णास्रोतो विभङ्गो गुरुषु च विनयः सर्वभूतानुकम्पा

सामान्यः सर्वशास्त्रेष्वनुपहतविधिः श्रेयसामेष पन्थाः॥

हिंदी अर्थ :- किसी की प्राणहत्या करने से या किसी के प्राणों को आघात पहुँचाने से निवृत्त रहना, दुसरों का धन हरण करने में संयम, सत्य वाणी बोलना, समयसर यथाशक्ति दान देना, परस्त्रियों की बाते चलती हो तो गुँगा रहना, चित्त में रहे हुए तृष्णा के प्रवाह को तोडना, वडिलों प्रति विनय और प्राणियों प्रति दयाभाव इतनी बातों में आचरण का विधान सामान्यतः तमाम शास्त्रों में किया गया है। एक भी शास्त्र ऐसा नही है जिसने यह विधान नही किया है। ऐसा यह कल्याण का मार्ग है।

मराठी अर्थ :- कोणाची प्राणहत्या करून किंवा जीवाला दुखापत करण्यापासून निवृत्त असणे, दुसऱ्यांचे धन हरण करण्यांत संयम, सत्य वचन बोलणे, योग्य वेळी यथाशक्ति दान देणे, परस्त्रियांची चर्चा सुरु असतांना मौनी बनणे, चित्तात वसलेला तृष्णेचा प्रवाह खंडीत करणे, जेष्ठांप्रति विनय आणि प्राण्यांप्रति दयाभाव असणे इतक्या गोष्टींत आचरणांचे नियम साधारणतः सर्वच शास्त्रांत सांगितले आहे. एक पण शास्त्र असे नाही, ज्याने असे नियम सांगितले नाहीत. असा हा कल्याणकारी मार्ग आहे.

आविर्भूतानुरागाः क्षणमुदयगिरेरुज्जिहानस्य भानोः

पत्रच्छायैः पुरस्तादुपवनतरवो दूरमाश्वेव गत्वा।

एते तस्मिन्निवृत्ताः पुनरितरककुप्प्रान्तपर्यस्तबिम्बे

प्रायो भृत्यास्त्यजन्ति प्रचलितविभवं स्वामिनं सेवमानाः॥

हिंदी अर्थ :- सूरज का उदयगिरी के ऊपर उदय हो रहा होता है उस समय वन-उपवन के तरू खुदके पत्तों की छाया से सूर्य के प्रति अनुराग प्रकट करते हैं। (खुद की छाया सूर्य से दूर है फिर भी सूरज का सत्कार करने हेतू उसकी तरफ उसके नजदिक भेजकर अनुराग प्रकट करते हैं।) लेकिन यही सूरज जब अन्य दिशा में अस्तांचल को जाने वाले बिम्ब वाला हो जाता है, तब तरू तुरन्त (सूरज की तरफ भेजी हुई छाया को विरुद्ध दिशा को भेजकर) मानो अनुराग न जताते हुए सत्कार की क्रियासे निवृत्त हो जाते हैं। सच में स्वामी की सेवा करने वाले सेवक भी जब स्वामी का वैभव जाने लगता है, तब बडे पैमाने पर उसका त्याग कर देते हैं।

मराठी अर्थ :- सूर्याचा उदयगिरीच्या वर जेंव्हा उदय होतो त्यावेळी वन-उपवनांतले तरु स्वतःच्या पर्णांच्या छायेने सूर्याप्रति अनुराग प्रकट करीत असतात. (सूर्याची सावली सूर्यापासून लांब असून ही सूर्याचा सत्कार करण्याच्या हेतूने त्याच्या समीप पाठवून (मोठी करून) अनुराग प्रकट करतात.) परंतु हाच सूर्य जेंव्हा अन्य दिशेला अस्तांचलला जाणाऱ्या बिंबासारखा होतो, तेंव्हा तरू लगेच (सूर्याकडे केलेली सावली विरुद्ध दिशेला पाठवून) जणू अनुराग न दाखविता सत्काराच्या क्रियेतून निवृत्त होतात. खरेंच स्वामीची सेवा करणारे सेवक पण जेंव्हा स्वामीचे वैभव जाऊ लागते तेंव्हा मोठ्याप्रमाणांत त्याचा त्यागच करतात.

मणिना वलयं वलयेन मणिर्मणिना वलयेन विभाति करः

कविना च विभुर्विभुना च कविः कविना विभुना च विभाति सभा।

शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः

पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः॥

हिंदी अर्थ :- मणी से कंकण और कंकण से मणी की शोभा बढती है, और मणि और कंकण से हाथों की शोभा बढती है। कवि से राजा और राजा से कवि की शोभा बढती है, और राजा और कवि से सभा की शोभा बढती है। चाँद से रात्री और रात्री से चाँद की शोभा बढती है और चाँद और रात्री से आकाश की शोभा बढती है। पानी से कमल और कमल से पानी की शोभा बढती है और कमल और पानी से सरोवर की शोभा बढती है।

मराठी अर्थ :- मणी मुळे कंकणाची आणि कंकणामुळे मणीची शोभा वाढते, आणि मणि आणि कंकणाने हातांची शोभा वाढते. कवी मुळे राजाची आणि राजा मुळे कवीची शोभा वाढते, तसेच राजा आणि कवी मुळे सभेची शोभा वाढते. चंद्रामुळे रात्रीची आणि रात्रीमुळे चंद्राची शोभा वाढते, तसेच रात्र आणि चंद्रामुळे आकाशाची शोभा वाढते. पाण्याने कमळाची आणि कमळामुळे पाण्याची शोभा वाढते, तसेच कमळ आणि पाण्यामुळे सरोवराची शोभा वाढते.

असमाने समानत्वं भविता कलहे मम ।

इति मत्वा ध्रुवं मानी मृगात् सिंह: पलायते ।।

हिंदी अर्थ :- (मृग-हिरण को देखकर सिंह क्यों भाग गया? ऐसी यह एक चरण समस्या है ।) एकबार जंगल से जाते हुए योगानुयोग से सिंह के सामने मृग आ जाता है। सच में तो सिंह ने उसकी शिकार करनी चाहिये। लेकिन अचानक वह सोचता है कि, युद्ध तो समान शक्ति वालों के साथ ही होता है। और इस क्षुद्र हिरण से युद्ध छेडकर उसको बराबरी का सन्मान दिये जैसा होगा, इसलिये वह चुपचाप वहाँसे निकल जाता है।

मराठी अर्थ :- (हरणाला पाहून सिंह का बरं पळाला असेल? अशी ही समस्या चरण आहे.) एकदा जंगलातून जाताना योगायोगाने सिंहासमोर हरीण येते. खरे तर सिंहाने त्याच्यावर झडपच घालायची, पण अचानक त्याच्या मनात विचार येतो; युद्ध तर फक्त समानशक्ती असणाऱ्यांबरोबर केले जाते. उगीच या क्षुद्र हरणाशी कलह करुन याला बरोबरीचा मान दिल्यासारखे होइल, म्हणून अवघडून सिंहाने तिथून पळ काढला.

 

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post