अक्रत्वङ्गमतस्तक्रं न शतक्रतुना हुतम् - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

अक्रत्वङ्गमतस्तक्रं न शतक्रतुना हुतम् - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

 सुभाषित 

अक्रत्वङ्गमतस्तक्रं न शतक्रतुना हुतम् ।

नादत्तमिति वाक्यार्थात् तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥ 

हिंदी अर्थ :- छाछ यज्ञ का अंग नही है, इसलिये सौ यज्ञ करने वाले राजाओं ने यज्ञ में छाछ की आहूती नही दी। उसके बाद जब उन्होंने इंद्रपद प्राप्त किया, तब ‘उनको छाछ मिलना दुर्लभ हो गया।’ क्योंकि, ‘नादत्तमुपतिष्ठते-’ दिये बिना कुछ मिलता नही. इस न्याय से उनको छाछ नही मिला। 

मराठी अर्थ :- ताक हे यज्ञाचे अंग नाही. त्यामुळे शंभर यज्ञ करणाऱ्या राजे लोकांनी ताकाची आहूति दिली नाही. त्यानंतर जेंव्हा त्यांना इंद्रपद प्राप्त झाले, तेंव्हा त्यांना ‘ताक मिळणे दुर्लभ झाले.’ कारण की, ‘नादत्तमुपतिष्ठते-’ दिल्याशिवाय काही मिळत नाही, ह्या न्यायाने त्यांना ताक मिळत नाही. 

सज्जनस्य हृदयं नवनीतं 

यद्वदन्ति कवयस्तदलीकम्!

अन्यदेहविलसत्परितापात् 

सज्जनो द्रवति नो नवनीतम् ।।

सज्जनस्य (चांगल्या माणसाचं) हदयं (मन) नवनीतं  (लोण्याप्रमाणे असतं)  यद् (असं जे)  कवय: (कवी) वदन्ति (म्हणतात) तत् ( ते ) अलीकम् (खोटं आहे). अन्य (दुसऱ्याच्या) देहविलसत् (देहाला  झालेल्या) परितापात् (पीडेमुळे) सज्जनः (सज्जन) द्रवति (विरघळतो); (पण) नवनीतं (लोणी) न (नाही).

सद्गुणांचा प्रचार हा सुभाषितांचा मुख्य उद्देश. म्हणूनच सद्गुणांची खाण असलेल्या सज्जनांची प्रशंसा करणारी अनेक सुभाषिते आहेत. अनेक सुभाषितकार हे उत्तम कवी होते; परंतु, अनाम होते. प्रस्तुत सुभाषित ज्याने रचले तो ही उत्तम कवी असावा. म्हणूनच इतकी सुंदर कल्पना या श्लोकात दिसते. 

सज्जनाच्या मनाला लोण्याची उपमा सगळेच कवी देतात.नवनीत म्हणजे लोणी. दही घुसळल्यामुळे जे नव्यानं आणलं जातं ते नवनीत. सज्जनाचं अंत:करण लोण्यासारखं मऊ आहे असं जे अनेक कवी म्हणतात ते (अलीक) खोटं आहे. कारण, लोण्याला स्वत:लाच आच लागली तर ते वितळतं. पण सज्जनाचं तसं नाही. दुसऱ्याला दु:ख झालं तरी त्यांना दु:ख होतं. दुसऱ्याला आच लागली तरी ते वितळतं.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)

भीष्मग्रीष्मर्तुसन्तप्त शून्यरथ्यान्तरस्थयोः ।

अन्योन्यालापसुखिनोः यूनोश्चन्द्रायते रविः ॥ 

हिंदी अर्थ :- चिलचिलाती गर्मी से झुलसे और सुनसान शहर की गलियों से गुजरते हुए, दो युवक और युवती एक-दूसरे से बात कर रहे थे, तब ऐसी खुशी का अनुभव कर रहे थे कि, सूरज भी उन्हें चाँद की तरह शीतल लग रहा था। 

मराठी अर्थ :- कडाक्याच्या उन्हाने उजाड झालेल्या आणि निर्जन झालेल्या शहरातील रस्त्यांवरून चालताना दोन तरुण-तरुणी एकमेकांशी बोलत होते, त्यावेळी त्यांना असा आनंद वाटत होता की सूर्यही त्यांना चंद्रासारखा शीतल वाटत होता.

मन्दं निक्षिपते पदानि परित: शब्दं समुद्वीक्षते!

नानार्थाहरणं च कांक्षति मुदालंकारमाकर्षति!

आदत्ते सकलं सुवर्णनिचयं धत्ते रसान्तर्गतम्!

दोषान्वेषणतत्परो विजयते चौरोपम: सत्कवि: ।।

( स:) (तो)   

मन्दं (हळुवार) 

पदानि ( १. पावलं २. शब्द )  

निक्षिपते‌ ( नि + क्षिप्= ठेवणे)  

परित: ( आजूबाजूला) 

शब्दं (आवाज )

समुद्वीक्षते (सम्+ उद्+ वि + ईक्ष्= सगळीकडे बारकाईनं पहाणे) 

(नाना + अर्थ + आहरणम्= १. विविध वस्तू घेणे २. विविध अर्थ स्वीकारणे) 

कांक्षति ( इच्छा धरतो);

 मुदा ( आनंदानं) 

अलंकारम् (१. दागिना २. काव्यातले अलंकार ) 

आकर्षति ( खेचून घेतो.) 

सकलं  ( संपूर्ण) 

सुवर्णनिचयम् (१. सुवर्णाचा साठा २. भाषेतले चांगले वर्ण)   

आदत्ते ( घेतो). 

रसान्तर्गतं  (रसा = पृथ्वी, १. जमिनीत लपवून ठेवलेली संपत्ती, २. नऊ रसांचं सार) 

धत्ते ( धारण करतो ). 

चौरोपम: ( चौर = चोर उपम: = सारखा) 

सत्कवि: ( चांगला कवी) 

दोषान्वेषणतत्पर: - दोषा = रात्र अन्वेषण = शोध १. रात्री संपत्तीचा शोध घेण्यात तत्पर असलेला २. काव्यदोष शोधण्यात तत्पर असलेला ) श्रेष्ठ कवी नेहमीच विजयी होतो. 

चांगला कवी आणि चोर यांचं वर्णन सारख्याच विशेषणांनी करणारा हा श्लोक श्लेषालंकाराचं उत्तम आणि गमतिदार उदाहरण आहे.पद, शब्द, अर्थ, अलंकार, सुवर्ण, रस आणि दोष या शब्दांवर श्लेष साधला आहे. चोर हळूच पावलं टाकत येतो तर कवी हळुवार शब्दरचना करतो. जरासा जरी  शब्द म्हणजे आवाज झाला की चोर कान टवकारतो; कवीचंही लक्ष शब्दांकडे असतंच. 

चोर निरनिराळ्या अर्थांची उचलेगिरी करतो तर कवी शब्दांमधल्या निरनिराळ्या अर्थच्छटांच्या शोधात असतो. चोर दागिने ओढून घेतो तर कवीला शब्दालंकार आणि अर्थालंकारांचं आकर्षण असतं. चोर सुवर्णाच्या शोधात तर कवी चांगल्या वर्णांच्या. चोर जमिनीत लपवून ठेवलेली संपत्ती शोधून काढतो तर कवी रसपरिपोष कसा होईल याची दखल घेतो. चोर रात्री संपत्ती शोधायला निघतो तर कवी काव्यातले दोष शोधून दूर करायला तयार असतो.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया।

चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।

  गुरूगीता 34 (स्कंदपुराण उत्तरखंड)

अर्थ :- अज्ञानरूपी 'तिमिर' रोगाने अंध झालेल्या शिष्याचे डोळे ज्यांनी ज्ञानरूपी अंजनाच्या शलाकेने (काडीने) उघडले त्या श्रीगुरूला वंदन असो.

कथा :- भारतीय संस्कृती व परंपरा यांत सद्गुरूंचे महत्व खूप मोठे आहे. ज्ञान मिळवले तरी गुरूच्या उपदेशावाचून ते परिपूर्ण होत नाही इतका त्याचा महिमा मोठा आहे. छांदोग्योपनिषदात सत्यकाम जाबालाच्या कथेतून हीच गोष्ट स्पष्ट होते.

'सत्यकाम' या लहान मुलांस गुरूकुलातील बटू विद्याभ्यास शिकत आहेत हे पाहून ज्ञानाची आवड निर्माण झाली. त्याने आपल्या मातेस आपले 'गोत्र' विचारले. तिने 'जबालेचा पुत्र तो जाबाल' असे त्यांस सांगितले. तो गुरूंकडे गेला. त्याला गुरूंनी चारशे रोडक्या गायी सांभाळण्यासाठी दिल्या. त्या घेऊन तो रानात गेला व त्याने त्या गायींना सांभाळले. त्यांची संख्या बरीच वाढल्यावर तो गुरूंकडे येण्यास निघाला त्यावेळी वायू, अग्नी इत्यादी देवतांनी बैल, पाणकोंबडा, हंस यांची रूपे घेऊन त्याला ब्रह्माच्या एकेका पदाचे ज्ञान दिले. त्या ज्ञानाने तो परिपूर्ण झाला. ज्ञानाचे तेज त्याच्या मुखावर दिसू लागले. ते पाहून गुरू म्हणाले - 'तू आता ज्ञानाने परिपूर्ण झाला आहेस!'. त्यावर सत्यकामाने उत्तर दिले - 'आचार्यांकडून(गुरूमुखातून) आलेली विद्या अतिशय कल्याणकारक असते!'

   तेव्हा पांडित्य मिळवले तरी योग्य गुरूकडे जाऊन नम्रपणे त्यांचा उपदेश घेतल्याशिवाय विद्या परिपूर्ण होत नाही. भगवद्गीतेतही म्हटले आहे की 'ज्ञान हे गुरूकडून प्रणिपात, प्रश्न व सेवा या मार्गांनेच मिळू शकते.'

आषाढी कार्तिकी माघी वचा शुण्ठी हरीतकी।

गयायां पिण्डदानेन पुण्या श्लेष्महरानृणी॥

हिंदी अर्थ :- १) आषाढ, कार्तिकी और माघ माह की एकादशी कैसी है? (पुण्यदायिनी)

२) घोडावच, सुंठ और हिरडे क्या है? (कफनाशक, श्लेष्महरा)

३) गया में पिंडदान से क्या होता है? (अनृणी, ऋणमुक्ति)

तीनों के जबाब में आखरी चरण ‘पुण्या श्लेष्महरानृणी’

मराठी अर्थ :- 1) आषाढ, कार्तिकी आणि माघ महिन्याची एकादशी कशी आहे? (पुण्यदायिनी)

2) वेखंड, सुंठ आणि हिरडे काय आहेत ? (कफनाशक, श्लेष्महर)

3) गया येथे पिंडदान केल्याने काय होते ? (अनृणी, ऋणमुक्ति) तिघांचे एकत्र उत्तर- ‘पुण्या श्लेष्महरानृणी’

किं जल्पसि मुग्धतया हन्त ममाङ्गं सुवर्णवर्णमिति!

तद्यदि पतति हुताशे तदा हताशे तुलां  तवारोहेत्!!

भामिनीविलास, पंडितराज जगन्नाथ

हन्त, मम अङ्गं सुवर्णवर्णमिति मुग्धतया किं जल्पसि? (पहा, माझी कांती कशी सोन्यासारखी आहे’ अशा वल्गना भोळेपणानं का करतेस? ) हताशे (अगं निराश झालेल्या मुली),  तत् ( ते सोनं) यदि ( जर) हुताशे ( अग्नीमध्ये) पतति (पडले तर ) तव तुलाम् आरोहेत् (तुझ्या पारडीत बसेल, तुझी बरोबरी करू शकेल.)

   हा श्लोक पंडितराज जगन्नाथाने लिहिला आहे. विलक्षण कल्पनाशक्ती हा या कवीचा विशेष गुण. उत्तम अंगकांतीला सोन्याची उपमा सगळेच देतात. जगन्नाथ पंडित नेहमीच्या उपमेमध्ये बदल करतो. प्रस्तुत श्लोकातली कल्पना आहे _ “मी कशी सोन्यासारखी गोरी’ असा अभिमान एका मुलीला आहे.  कवी तिला म्हणतो अशा वल्गना उगाचच का करते आहेस? हा उद्गार ऐकून साहजिकच तिला धास्ती वाटणं स्वाभाविक आहे. एक तर आपली कांती सोन्यासारखी नाही किंवा आपल्याहून गोरी कुणी तरी दुसरी मुलगी असेल अशा शंका कवीच्या वक्तव्यानंतर तिच्या मनात येऊन ती हताश झाली असेल. 

संस्कृतमध्ये (आणि इतर भारतीय भाषांमध्येही) हताश आणि निराश असे दोन शब्द आढळतात.  मराठीत आपण हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतो. परंतु, संस्कृतमध्ये मात्र या दोन शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. ज्याच्या/जिच्या आशेवर आघात झाला आहे तो/ती हताश. परंतु, ज्याच्या आशा-आकांक्षा सहजपणे निघून गेलेल्या आहेत तो निराश. निराश व्यक्ती दु:खी होत नाही; पण आशेवर घाला पडलेली व्यक्ती मात्र दु:खी होते. प्रस्तुत श्लोकातली मुलगी अशीच हताश झाली आहे हे तिला जाणवून देऊन कवी पुढे तिची निराशा दूर करतो. तो तिला म्हणतो, तुझी आणि सोन्याची बरोबरी कशी होईल? तू नेहमीच झळाळणारी. सोन्याला तुझ्यासारखी झळाळी यायला अग्नीत शिरावं लागतं. 

या श्लोकात आणखिन् एक शब्दांची गंमत आहे. हताशे आणि हुताशे असे फक्त एका स्वरामुळे अर्थबदल झालेले दोन शब्द इथे वापरले आहेत. हुताश ( हुत= आहुतीद्रव्य अश= भक्षण करणारा) म्हणजे अग्नी.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)

----------------------

जम्बूफलानि पक्वानि पतन्ति विमले जले ।

 कपिकम्पितशाखाभ्यो गुलुगुग्गुलुगुग्गुलू ॥ 

हिंदी अर्थ :- बंदरोंने पेड के डाली से हिलाये हुए पके हुए जामून के फल निचे रहे हुए निर्मल जल में पडने लगे । तब जल में आवाज आने लगी ‘गुलगुग्गुलगुग्गुल’ (यहाँपर कई जगह पर ‘जल मध्ये डुबुक् डुबुक्’ ऐसा भी चौथा चरण है।) 

मराठी अर्थ :- माकडांनी झाडाच्या हलविलेल्या फांद्यांवरून पिकलेले जांभूळ खाली असलेल्या निर्मळ जलांत पडू लागले आणि पाण्याचा आवाज होऊ लागला, ‘गुलगुग्गुलगुग्गुल’ (येथे काही ठिकाणी ‘जल मध्ये डुबुक् डुबुक्’ असे ही चौथे चरण आहे.) 

महाभारत सुभाषित-

अऽवमन्यात्मनाऽत्मानम् अन्यथा प्रतिपद्यते ।

न तस्य देवाः श्रेयांसो यस्यात्मापि न कारणम् ॥06॥

हिंदी अर्थ :- जो स्वयं अपने आत्मा का तिरस्कार करके कुछ- का- कुछ समझता है उसका आत्मा भी उसके हित का साधन नहीं कर सकता। किन्तु ईश्वर भी उसके हित का साधन नही कर सकता।

सर्वास्संपत्तयस्तस्य संतुष्टं यस्य मानसम् ।

उपानद्गूढपादस्य ननु चर्मावृतेव भू: ।।

यस्य (ज्याचं) मानसं (मन) संतुष्टं (तृप्त) तस्य ( त्याच्याजवळ ) सर्वाः संपत्तयः (सर्व प्रकारची संपत्ती आहे असं त्याला वाटतं). उपानद् (पादत्राणे) गूढ (लपलेले) (ज्याचे पाय पादत्राणामध्ये लपलेले आहेत अशा व्यक्तीला (ज्याच्या पायात पादत्राणे असतात त्याला) भू: (संपूर्ण पृथ्वी) चर्म + आवृता(चामड्याने आच्छादलेली आहे असं वाटतं.) 

संतोष हा मनाचा फार मोठा गुण. साधारणतः सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये कमी गरजा असाव्यात असं मनावर ठसवलं जायचं. भारतीय संस्कृतीमध्येही 'तृष्णा’ किंवा 'तण्हा’ वाईट असं सांगितलं आहे. ओघानेच तृष्णेचा विरुद्ध गुण असलेल्या संतोषाची प्रशंसा आलीच.

उपमा देण्यात संस्कृत कवी पटाईत असतातच. किती समर्पक उपमा दिली आहे? ज्याच्या पायात पादत्राण आहे, त्याला खडे टोचत नाहीत. त्याला संपूर्ण जमिनीवर कातडं अंथरलंय असं वाटतं. त्यामुळे, ज्याचं मन संतुष्ट तो श्रीमंत. 

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)

संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते!

मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते!

स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते!

प्रायेणाधममध्यमोत्तमदशा संसर्गतो जायते ।।

संतप्त- अयसि (तापलेल्या लोखंडावर) संस्थितस्य ( राहिलेल्या, असलेल्या) पयस: (पाण्याचे)  नामापि (नाव देखिल) न ज्ञायते (जाणले जाते नाही) (नामोनिशाणही शिल्लक उरत नाही). तदेव (तेच पाणी) नलिनीपत्रस्थितम् (नलिनी- कमळाच्या वेलीच्या, पत्र- पानावर स्थित- असलेले) (कमळाच्या पानावर राहिले)(तर) मुक्ताकारतया ( मोत्यांचा आकार घेऊन) राजते ( शोभते). 

स्वाती (नक्षत्रावर) तेच पाणी जर समुद्रातल्या शिंपल्यात पडले तर त्याचा उत्तम मोती तयार होतो.  बहुधा अधम (नीच), मध्यम, आणि उत्तम स्थिती ही संगतीमुळे प्राप्त होते.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी

(पुणे)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post