जबाबदारी... म्हणजे नेमके काय?
आपल्या समाजात चांगल्या गोष्टींचा विरोधात बोलण किंवा त्याविषयी पुढाकाराने बोलण हेही आज कोणी का बोलत नाही किंवा कोणी बोलण्याची कमजोरी यावर प्रकाश टाकणारी आजच्या लेखाची कथा आहे..
मग तुम्ही नक्कीच माझ्या सारख्या अनेकांना कोण कधी जरी चांगल्या विषयीच्या गोष्टींचा विरोधात बोललं तर नक्की का विरोध करतोय हे नक्कीच लक्षात येईल... आत्ताच दीड मिनीटाची "साॅरी" नावाची फिल्म बघितली आणि लिहावंसं वाटलं... त्या कथेत एका पुर्ण भरलेल्या लिफ्टमध्ये अचानक एक युवक घुसतो व लिफ्ट "Overload 1" असा मेसेज येतो...
सर्वजण एकमेकाकडे बघुन कुणी बाहेर जाईल याची वाट पाहात असतात पण कुणीही ज्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला त्याला बोलण्याचे धाडस दाखवत नाही किंवा कुणी बाहेर जावे याचा निर्णय होत नाही...
अशा वेळी लिफ्टमधली एक मुलगी वाट काढुन बाहेर पडताना दाखवलीय व विशेष बाब म्हणजे ती अपंग असते... ती अपंग मुलगी बाहेर येते आणि लिफ्ट बंद झालेली दाखवली, स्टोरी संपली. या दीड मिनीटाच्या कथेने विचार करायला भाग पाडलं...
१. ज्याची चुक आहे त्याला ते सांगण्याचे धाडस समाज दाखवत नाही ही सार्वजनिक शोकांतिका आहे. त्यामुळे समाजामध्ये हम कर सो कायदा ही प्रवृत्ती वाढताना दिसते...
मला काय करायचे?...
मी कशाला पुढाकार घेऊ?...
नसती उठाठेव कशाला?...
उद्या काय अंगलट आलं तर?...
अशा अनेक प्रश्नानी आम्ही स्वत्व हरवत चाललो आहोत... समाजात एखाद्या प्रश्नासाठी पुढाकार
घेण्याची प्रवृत्ती कमी होणं हे दुःखदायक आहे...
२. माझी चुक नसताना मी माझी जागा खाली का करु, कशासाठी मी हुतात्मा व्हायचं हा विचार करुन आम्ही स्वतःला सिध्द करण्याची संधी
सोडतो... शेवटी कांही गोष्टीत समाधान मिळत असताना अशा नफातोट्याचा विचार करता कामा नये...
खरंतर दीड मिनीटाची फिल्म एक प्रकारे आमच्या दुर्बल मानसिकतेचे दर्शन घडवते...
पण
एक अपंग मुलगी ते धाडस दाखवते यावरुन सगळंच संपलं नाही. अशा लोकांमुळे आजही ही समाजरचना टिकुन आहे... म्हणुन जोपर्यंत अशा व्यक्ती समाजात आहेत त्यांचा आदर्श आपण घेऊन समाजाप्रती डोळस व्हायला हवं ऐवढं नक्की आणि जागरुकही... कारण वाईट विचारांवर आज जर कोणीही बोलायला गेला तर त्यास विरोधक समजलं जातं...
त्याची अवस्था विपरीत म्हणून गणली जाते...
त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी केलेला विरोध किंवा एक वाईट अनेक वाईट घडण्यासाठी निमित्त ठरू नये यासाठी घेतलेला पुढाकार हा अतिरेकी समजलं जातं...
अशा ह्या वागण्यास तत्वज्ञानावर बोट ठेवून समाजात पसरत असलेल्या वाईट प्रथावर कळत नकळत एकप्रकारे पांघरूण टाकण्याचे किंवा दुर्गुणाची साथ देण्याचे काम सरर्सपणे होत असण्याचे चित्रं स्पष्टपणे दिसून येत आहे... याचा अर्थच की. चांगलं होण्यासाठी कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. ज्यांनी कुणी घेतली त्यास तस का वागतोय ते जाणून न जाण्याच सोंग पांघरून घेतलं जातं आहे...
हीच अवस्था आज समाजात व आपल्या पंथात देखील आपल्या ला सभोवताली बघायला मिळत आहे... म्हणून च तुम्ही आम्ही जे कुविचारावर बोलण्यासाठी व त्यास विरोधात बोलण्यासाठी मागे होत आहोत किंवा ते बोलण्याची जबाबदारी झटकत आहोत हे योग्य नाही. त्यामुळेच समाजात पंथात तत्वज्ञान हे चुकीच्या पध्दतीने प्रचारात व प्रसारित होताना दिसत आहे...
कर्मकांडाचा विरोधात बोलणारा पंथ हा हळूहळू कर्मकांडाचा पूरस्कर्ता होत असल्याचे चित्रच समाजात सरर्सपणे दिसू लागलं...
तुम्हास विनंती करतो...
सर्वज्ञानी स्वतः आचरणात आणून मग इतरांना मार्गदर्शक व मार्गदर्शन केलेलं हे तत्वज्ञान हे अस पायदळी तुडवण्याचे पाप कोणीही होऊ देऊ नका...
किंवा जो कोणीही त्यावरून चुका करणाऱ्याच्या बाबतीत बोलेल त्यास विरोधक ही ठरवू नका.. कारण चुकीच वागणारा पेक्षा चुकांना पाठीशी घालणारा खरा गुन्हेगार आहे हे लक्षात असू द्या...
ज्यावेळी तुम्ही ह्या तत्वज्ञानाचा प्रचार करताना ते स्वतः योग्य पद्धतीने आचरणातून दाखवून द्याल त्यावेळीच तुमचा प्रवास हा कैवल्याची वाट सर करणारा असेल हे लक्षात असू द्या...
दंडवत माझा देव श्रीचक्रधर...
आपलाच... प से सुरेश डोळसे, नाशिक