या कवितेचे रसग्रहण करा
जुनं ते सोनं
महानुभाव-पंथिय-कविता-रसग्रहण
जुने म्हणुन सोडू नका करा आपलेपणाचा कड
तोच होईल वयोवृध्द विचारांचा आधार वड ||
जुन्या मुळांना खत पाणी घाला वेळेवर
जोपासण्यासाठी अन्नपाणी नव्हते हो धड
आधाराच्या सावलीसाठी जो लावेल झाड
तोच होईल वयोवृध्द विचारांचा आधारवड ||
ह्रदयपरीवर्तनासाठी खूप केले कष्ट
जाणत्या पुरूषांनी रोवली ज्ञानाची मुहूर्तमेढ
तेव्हा कुठे समाजाला लागेल त्याची ओढ
तोच होईल वयोवृध्द विचारांचा आधारवड ||
जो कृष्ण विवेक विचाराने स्वयंभू खडा
तेंव्हा तोच आदर्श पानांचा उचलेल विडा
त्यांच्या मार्गात येणार नाही कसलीच नड
तोच होईल वयोवृध्द विचारांचा आधार वड||
देवाचा साधक जेंव्हा ढो-याडोंगरात उभा
अभिमानाने फडकतो बघा ध्वज नभा
धर्म रक्षणासाठी त्यानी पाडले आडवे आपले धड
तोच आहे वयोवृध्द विचारांचा आधारवड ||
मी आणि माझे मी पण ठेवूनी बाजूला
जुमानत नाही अन्यायाच्या ओझ्याला
भ्रष्टाचाराची संपवून टाकतो रडा-रड
तोच आहे वयोवृध्द विचारांचा आधारवड
एका सूत्रामध्ये ओवतो विखुरलेले मोती
तोच पेटवतो समाजात दिव्यातील वाती
सारुनी बाजूला कुजकट विचारांची पड
तोच होईल वयोवृध्द विचारांचा आधारवड ||
कवयित्री :- सुमन ताई जामोदेकर