महाभारत कें सुभाषित हिंदी मराठी अर्थ
अतीवरूपसम्पन्नो न कंचिदवमन्यते ।
अतीव जल्पन् दुर्वाचो भवतीह विहेठकः ॥
हिंदी अर्थ :- जो अत्यन्त रूपवान है, वह किसी दूसरे का अपमान नही करता; परंतु जो रूपवान न होकर भी अपने रूप की प्रशंसा में अधिक बातें बनाता है, वह मुख से झुठे वचन कहता है, और दूसरों को पीडित करता है ।
मराठी अर्थ :- जो अत्यंत रूपवान आहे तो कोणाचाही कधीही अपमान करीत नाही. परंतु जो रुपवान नसून ही स्वतःच्या रूपा संबंधी बढाया मारत असतो, तो आपल्या मुखाने असत्य वचन बोलत असतो, आणि इतरांना पीडा देत असतो.
महाभारत कें सुभाषित
मूर्खो हि जल्पतां पुसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सुकरः ॥
हिंदी अर्थ :- मूर्ख मनुष्य परस्पर वार्तालाप करने वाले दूसरे लोगों की भली-बुरी बातें सुनकर उनमें से बुरी बातों को ही ग्रहण करता है; ठीक वैसे ही जैसे सूअर अन्य वस्तुओं के रहते हुए भी विष्ठा को ही अपना भोजन बनाता है।
मराठी अर्थ :- मूर्ख मनुष्य परस्पर वार्तालाप करणाऱ्या अन्य लोकांच्या भल्याबुऱ्या गोष्टी ऐकून त्यांतल्या फक्त वाईट गोष्टींचेच ग्रहण करतांत; जसे एखादा डुक्कर अन्य वस्तु असतांना सुद्धा विष्ठेलाच स्वतःचे भोजन बनवित असतो.
महाभारत कें सुभाषित
प्राज्ञस्तु जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
गुणवत् वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवाम्भसः ॥
हिंदी अर्थ :- परंतु विद्वान् पुरुष दूसरे वक्ताओं के शुभाशुभ वचन को सुनकर उनमें से गुणयुक्त बातों को ही अपनाता है; ठीक उसी तरह, जैसे हंस पानी को छोडकर केवल दूध ग्रहण कर लेता है।
मराठी अर्थ :- परंतु विद्वान समंजस पुरुष दुसऱ्या वक्त्यांचे शुभाशुभ वचन ऐकुन त्यातून गुणयुक्त गोष्टींचाच स्वीकार करतात, जसे हंस पाणी सोडून फक्त दूध ग्रहण करीत असतो.
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्।
महाभारत - वनपर्व अ. ३१३
मराठी अर्थ:- आपण धर्माची हत्या केली तर धर्म पण आपली हत्या करतो. आपण धर्माचे संरक्षण केले तर धर्मही आपले संरक्षण करतो. त्यामुळे मी धर्म(सदाचरण) सोडणार नाही आणि धर्माची हत्या करून धर्माने आम्हास मारावे अशी परिस्थिती मी निर्माण होऊ देणार नाही.
कथा:- वनवासात असताना एकदा पांडवांना तहान लागली. तिथे जवळपास कुठेही पाणी नव्हते. तेव्हा युधिष्ठिराने सहदेवास पाणी शोधण्यास पाठवले. सहदेवास एक पाण्याचे सरोवर दिसले. तेथून तो पाणी घेणार तोच तेथील रक्षक असलेल्या यक्षाने त्याला सांगितले की त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मगच पाणी प्यावे. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सहदेव पाणी पिऊ लागला. त्याच क्षणी तो मरून पडला.
क्रमाक्रमाने आलेल्या पांडवांची हीच अवस्था झाली. शेवटी युधिष्ठिर तिथे आला. त्याने यक्षांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा प्रसन्न झालेल्या यक्षाने कोणत्याही एका भावाला जीवंत करता येईल असे सांगितले. त्यावर युधिष्ठिराने 'नकुल' जीवंत व्हावा असे सांगितले. भीम, अर्जुन यांचे जीवनदान न मागता नकुलबाबत सांगितल्याने यक्ष आश्चर्यचकित झाला. त्याने युधिष्ठिरास त्याचे कारण विचारले. त्यावेळी युधिष्ठिराने ह्या प्रमाणे उत्तर दिले.
कुंती आणि माद्री या महाराज पंडुच्या राण्या. त्यातील माद्री ही कुंतीप्रमाणेच माझी आई असून तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून तिचा एक पुत्र जीवंत राहवा अशी मागणी करून मी धर्माचे पालन केले आहे असे युधिष्ठिर म्हणाला. आपण जर धर्माने वागलो तर धर्मही आपले रक्षण करतो. यक्षाने प्रसन्न होऊन सर्व पांडवांनाच जीवंत केले. धर्म म्हणजे नेमून दिलेले कर्त्तव्य व सदाचरण. त्यायोगेच धर्माची व पर्यायाने व्यक्तीची वृद्धि होत असते.
स्रोत :- कथा सुभाषितांच्या - डाॅ. मंगला मिरासदार
महाभारत कें सुभाषित
अभिवाद्य यथा वृद्धान् सन्तो गच्छन्ति निर्वृतिम् ।
एवं सज्जनमाक्रुश्य मूर्खो भवति निर्वृतः ॥
सुखं जीवन्त्यदोषज्ञा मूर्खा दोषानुदर्शिनः ।
यत्र वाच्याः परैः सन्तः परानाहुस्तथाविधान् ॥
हिंदी अर्थ :- जैसे साधु पुरुष बड़े-बूढ़ोंको प्रणाम करके बड़े प्रसन्न होते हैं, वैसे ही मूर्ख मानव साधु पुरुषों- की निन्दा करके संतोष का अनुभव करते हैं। साधु पुरुष दूसरों के दोष न देखते हुए सुखसे जीवन बिताते हैं, किंतु मूर्ख मनुष्य सदा दूसरों के दोष ही देखा करते हैं। जिन दोषों के कारण दुष्टात्मा मनुष्य साधु पुरुषों द्वारा निन्दा के योग्य समझे जाते हैं, दुष्ट लोग वैसे ही दोषों का साधु पुरुषों पर आरोप कर के उनकी निन्दा करते हैं ।
मराठी अर्थ :- जसे साधु पुरुष (सज्जन व्यक्ति) मोठ्या लोकांना आणि वृद्ध लोकांना नमस्कार करून संतुष्ट होतात, त्याचप्रमाणे मूर्ख मानव सज्जन पुरुषांची निंदा करून आनंदाचा अनुभव घेत असतात. साधु पुरुष अन्यांचे दोष न बघता सुखनैव जीवन जगत असतात, तर मूर्ख मनुष्य तर सदैव इतरांचे दोषच बघत असतो. ज्या दोषांमुळे दुष्टात्मा मनुष्य सज्जन पुरुषांद्वारे निंदा करण्यायोग्य समजले जातात, दुष्ट लोक त्याच प्रकारे सज्जन पुरुषांवर लांछन लाऊन त्यांची निंदा करीत असतात.
महाभारत कें सुभाषित
अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विद्यते ।
यत्र दुर्जनमित्याह दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥
हिंदी अर्थ :- संसार में इससे बढकर हँसीकी दूसरी कोई बात नहीं हो सकती की, जो दुर्जन है, वें स्वयं ही सज्जन पुरुष को दुर्जन कहते हैं।
मराठी अर्थ :- जगात याहून ही हास्यास्पद गोष्ट दुसरी काय असू शकते की, जे दुर्जन आहेत ते स्वतःच सज्जन पुरुषांना दुर्जन म्हणतात.