शब्दांचे महत्त्व व शब्दांचे दुष्परिणाम महत्वाच्या तीन गोष्टी चिंतन लेखसंग्रह

शब्दांचे महत्त्व व शब्दांचे दुष्परिणाम महत्वाच्या तीन गोष्टी चिंतन लेखसंग्रह

 शब्दांचे महत्त्व व शब्दांचे दुष्परिणाम

आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या चुकांबद्दल सांगणाऱ्या या तीन गोष्टी अवश्य वाचा

गोष्ट पहिली :- 

एका स्त्रीला मुलगा झाला. तिला पाहण्यासाठी तिची जीवलग मैत्रीण आली.  त्या मैत्रिणीने तिला विचारले:- मुलगा झाल्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय स्पेशल गिफ्ट दिले? मैत्रीण म्हणाली - काहीच नाही!

 पहिल्या मैत्रीणीने प्रश्नार्थक नजरेने विचारले, “ही चांगली गोष्ट आहे का? त्याने तुला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे होते. माझ्या नवऱ्याने मला छान गीफ्ट दिले होते. ” तुझ्या नवऱ्याच्या नजरेत तुझी काहीच किंमत नाही का?” बस्स झाले ! शब्दांचा आणि संशयाचा हा विषारी बॉम्ब टाकून तो मैत्रीण आपल्या मैत्रीणीला विनाकारण निरर्थक काळजीत टाकून निघून गेली.

 सायंकाळी काही वेळानंतर पती घरी आला असता पत्नी चेहरा पाडून घरातील कामं करते आहे असे त्याला दिसले. नंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले. एकमेकांना शिव्या शाप दिले गेले, एकमेकांचे उणे-दुणे काढले गेले. पुढे ते भांडण विकोपाला गेलेआणि शेवटी पती-पत्नीचा घटस्फोट झाला. 

प्रॉब्लेम कोठून सुरू झाला हे तुम्हाला माहिती आहे का?  तिची विचारपूस करायला आलेल्या तिच्या मैत्रिणीने तो फालतू विषय तिच्या डोक्यात घातला होता.

दुसरी गोष्ट :- 

रवीने त्याचा जिवलग मित्र पवनला विचारले :- तू कुठे काम करतोस? पवन म्हणाला - “एका शॉपिंग मॉल मध्ये.”  

रवी - “ते तुला किती पगार देतात?” 

पवन-18 हजार.

 रवी-18000 रुपयेच!! एवढ्याशा पैशात तुझे कसे भागते? दैनंदिन गरजा कशा पूर्ण होतात. 

पवन - (एक दीर्घ श्वास घेत) - मित्रा! कसं सांगू तुला!! 

आणि दोघांची बैठक संपली, काही दिवसांनी पवनला त्याच्या कामात कंटाळा वाटू लागला. आपल्या कामापेक्षा आपल्याला पगार कमी आहे असे वाटू लागले आणि पगार वाढवण्याची मागणी केली. मालकाने रद्द केली. आणि पवन नोकरी सोडून बेरोजगार झाला.  आधी त्याच्याकडे काम होतं, आता काम नाही. आधी थोडेफार तरी पैसे येत होते आता काही येत नाही.

तिसरी गोष्ट :- 

एक गृहस्थाने आपल्या मुलापासून वेगळे राहणाऱ्या एका माणसाला म्हणाले.  तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला क्वचितच येतो.  त्याचे तुमच्यावर प्रेम नाही का?

तो माणूस म्हणाला, माझा मुलगा खूप व्यस्त आहे, त्याचे कामाचे वेळापत्रक खूप स्ट्रीक आहे.  त्याला पत्नी आणि मुले आहेत, त्याला खूप कमी वेळ मिळतो. तो मोठ्या कंपनीत कामाला आहे. 

पहिला माणूस म्हणाला - व्वा!!  मग काय झालं, तुम्ही त्याचं पालन पोषण केलं, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, आता म्हातारपणात त्याला तुम्हाला भेटायला वेळ मिळत नाही व्यस्ततेमुळे!! भेट न होण्याचे हे केवळ निमित्त आहे? हे काही सबळ कारण नाही असे मला वाटते. 

या संवादानंतर त्या वडिलांच्या मनात मुलाबद्दल संशय निर्माण झाला.  मुलगा जेव्हा भेटायला यायचा तेव्हा वडिलांना वाटायचे की याच्याकडे माझ्याशिवाय सगळ्यांसाठी वेळ आहे. तेव्हापासून तो माणूस नेहमी चिंतेत राहायला लागला. आणि आपल्या आनंदी जीवनाचे तीन तेरा केले. 

 या तिन्ही गोष्टींचे तात्पर्य असे की, मित्रांनो!! लक्षात ठेवा आपल्या जिभेतून निघालेले शब्द इतरांवर खोलवर परिणाम करतात. अर्थात काही लोकांच्या जिभेतून शैतानी शब्द बाहेर पडतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न आपल्याला अगदी निरागस वाटतात. पण ते इतरांच्या मनावर खोलवर परिणाम करतात.

जसे की-

 तुम्ही ते का विकत घेतले नाही?

 हे तुमच्याकडे का नाही का? 

 तुम्ही या व्यक्तीसोबत आयुष्यभर कसे राहू शकता? 

 तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवू शकता? 

 इत्यादि इत्यादि असे निरर्थक निरर्थक प्रश्न आपण नकळत किंवा कोणताही हेतू नसताना इतरांना विचारत राहतो. पण आपण हे विसरतो की आपले प्रश्न पुढच्याच्या हृदयात प्रेम किंवा द्वेषाचे कोणते बीज पेरत असतात?

 आजच्या युगात, समाजात आपल्या आजूबाजूला, किंवा घरांमध्ये, कुटुंबामध्ये तणाव वाढत चाललेले आहेत. त्या घट्ट होत चाललेल्या तणावाच्या मुळाशी गेलो तर अनेकदा त्यामागे दुसऱ्याचाच हात असतो. आपल्याला माहित नसते की अज्ञानाने किंवा जाणूनबुजून बोललेले शब्द एखाद्याचे जीवन नष्ट करू शकतात. म्हणून असे द्वेषाचे वारे पसरवणारा आपण कधीही बनू नये.

लोगों के घरों में अंधे बनकर जाओ और वहां से गूंगे बनकर निकलो / लोकांच्या घरी आंधळे बनून जा आणि मुके म्हणून निघून या. 

(सर्वांनी एकदा मनापासून विचार करावा)

दुसरी कोणतेही चांगले काम करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, कोणतेही मोठे काम आपल्याकडून एकाएकी घडत नाही. मोठ्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी लहानच असते तुमच्याकडून काहीतरी मोठं काम घडतंय हे सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाही, कारण कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानशीच असते. आपण या वर्षाला निरोप देत असतो त्याचवेळी आपल्या एका नव्या वाटचालीची सुरुवातही करत असतो.

वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या मनात एखाद्या संकल्पनेचं बीज पेरलं गेलं असेल, त्याचा वृक्ष झाला की, फक्त रोपच राहिलं, की ते बीज अंकुरण्याआधीच कोमेजून गेलं, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन त्यावर विचार करावा.

सुरुवातीला एखादा विचार मनात येऊन त्याला कितीतरी फांद्या फुटल्या असतील त्या मोजा. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात, त्याने खचायचे नसते. आभाळ ढगांनी दाटून येतं; पण ते कधीतरी मोकळं होणारच असतं, ती स्थिती कायम राहणार नसते, आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्यात कितीतरी अडचणी येतात, त्यातून आपण बाहेरही पडतो.

आपण चालतो तेव्हा एक पाय पुढे असतो आणि एक पाय मागे; पण त्या वेळी मागच्या पायाला पुढच्याचा हेवा वाटत नाही किंवा आपण मागे आहोत म्हणून तो खचूनही जात नाही, कारण त्याला माहीत असतं की, आता आपण पुढे

जाणार आणि तो पाय मागे येणार त्यामुळे दोन्ही पाय एकाच लयीत चालतात. खरं तर जीवनाच्या प्रवासात मागे वळून बघू नये, पुढे पुढे चालत राहावे; पण तुम्ही जर निराश होत असाल तर एक क्षण मागे वळून बघा, तुम्ही कुठे होता आणि आता कुठवर आलात, तुम्ही फार पुढे आलात है तुमच्या लक्षात येईल. कुठल्याही गोष्टीला फार उशीर झाला असं म्हणू नये, तुम्हाला जिथे जाग येते, तिथूनच सुरुवात करायची असते. त्यामुळे मनाशी ठरवलेल्या ज्या गोष्टी राहून गेल्या त्याची सुरुवात नव्याने उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने करा.

कुठल्याही गोष्टीसाठी जोवर स्वतःहून मनाचा निर्धार होत नाही, तोवर तुमच्याकडून काहीही साध्य होऊ शकत नाही. तुम्हाला कोणी कितीही सल्ला दिला तरी त्याचा खरंतर काहीच उपयोग होत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःच्या मनाला खंबीर करणं, हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post