जीवनातील १८ कटू सत्ये!
ही सत्ये जाणून घेतल्यास तुम्ही ९७ टक्के व्यक्तींच्या सात वर्षे पुढे राहाल...
१) प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक व्यक्तीला पर्याय असतो. अगदी तुम्हाला देखील.
२) सात्यत्यपूर्ण सराव आणि प्रयत्नांखेरीज तुमच्या
गुणवत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा काहीही उपयोग नसतो.
३) जेव्हा तुम्ही मृत्युशय्येवर असता तेव्हा तुमचे यश आणि तुमची कामगिरी याला काहीही अर्थ नसतो.
४) काही व्यक्ती आणि परिस्थिती अतिशय घातक असते. त्यांच्यापासून दूर जाण्यातच शहाणपण असते.
५) आनंदाच्या शोधासाठी तुमची जी घालमेल चालू असते तीच तुम्हाला आनंदाच्या क्षणांपासून दूर ठेवत असते.
६) सगळेजण हवेत उडत असतात आणि कुणालाच माहीत नसते की, ते कशासाठी उडत आहेत.
७) तुमच्या बोलण्यापेक्षा कृतीचा परिणाम अधिक होत असतो. स्वयंशिस्त आणि जबाबदारी घेण्यातूनच तुमचे व्यक्तिमत्त्व दिसत असते.
८) तुम्ही कधीच परिपूर्ण होऊ शकणार नसता आणि अव्यवहार्य मानांकनापर्यंत स्वतःला पोचवण्याचा प्रयत्न करत राहणे म्हणजे स्वतःला त्रास देण्यासारखे असते.
९) तुमचे आयुष्य किती कष्टदायक आहे याचे कुणालाही काही घेणेदेणे नसते.
१०) तुमच्याकडील भौतिक संपत्तीमुळे तुम्ही अधिक चांगली व्यक्ती किंवा आनंदी व्यक्ती होऊ शकत नाही.
११) फक्त तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता. ती अपेक्षा अन्य कुणाकडून ठेवू नका.
१२) ९९ टक्के लोकांना दुसऱ्याचे फक्त यश दिसते. त्यासाठीची मेहनत, कठोर संघर्ष, जागवलेल्या रात्री हे कुणालाच दिसत नाही.
१३) जगात नेहमीच तुमच्यापेक्षा सरस कामगिरी करणारा कुणीतरी असतोच.
१४) तुमच्या जवळच्या प्रत्येकापेक्षा जास्त कष्ट करण्यामुळे तुम्ही आजूबाजूचे काही मित्र गमावण्याची शक्यता असते.
१५) तुम्हाला जितके चांगले वाटत असते, तितकी कुठलीही गोष्ट किंवा व्यक्ती चांगली असतेच असे नाही.
१६) बहुतेक लोक आनंदी नसतात. कारण अधिक मिळण्याची हाव धरून त्यामागे धावण्याच्या सापळ्यात ते अडकलेले असतात.
१७) तुमच्याकडील वेळ दिवसेंदिवस कमी होत असतो. त्यामुळे लवकर, लगेच कृती करा.
१८) आयुष्यातील बहुतेक गोष्टी या लक्ष विचलित करणाऱ्या असतात.
तुम्हाला शिक्षित व्हायचंय की सुशिक्षित ?
तुम्ही ठरवायला हवं की, तुम्हाला जीवनात नेमकं काय व्हायचंय ? केवळ पैसा मिळवणं, चांगली नोकरी मिळवणं हेच महत्त्वाचे नाही, तर तुम्ही माणूस म्हणून चांगले कसे व्हाल हे महत्त्वाचं आहे. तुमचा एक व्यक्ती म्हणून चांगला विकास व्हायला हवा. त्यामुळे फक्त शिक्षण घेऊन मोठे होणे, या व्यतिरिक्तही तुम्ही तुमचा विकास करायला हवा.
कुठल्याही वाईट घटनांचा मनावर परिणाम होऊ देऊ नका, नाहीतर मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्हांला काय व्हायचंय, काय करायचंय. हे आधी ठरवा. त्यानुसार तसं शिक्षण घ्या.
तुमचे सर्व प्रयत्न तुमच्या ध्येयाच्या दिशेनेच वळवा. ध्येय सतत डोळ्यांसम ओर ठेवा. तुम्हाला कुठलीही अडचण ही अडचण वाटणार नाही. पुस्तकामुळे विचार करण्याची क्षमता वाढते, आपलं व्यक्तिमत्त्व विकसित होतं. त्यामुळे पुस्तक हे वाचायलाच हवं, परंतु तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचता, हेही महत्त्वाचं आहे.
तुम्हाला घडवणारी, जगण्यासाठी प्रेरणा देणारी पुस्तकं तुम्ही वाचायला हवीत. तुमची मानसिक जडणघडण योग्यरीत्या होईल अशी चांगली पुस्तकं तुम्ही वाचायला हवीत. नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीत राहायला हवे. चुकीच्या संगतीत राहिलात तर तुमचे विचार, तुमची कृती चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. जीवनात पुढे जायचे असेल तर दुसऱ्यांशी स्पर्धा करू नये, स्वतःशी स्पर्धा करावी. अजून चांगले होण्याचा प्रयत्न करावा, आधी केलेल्या कामापेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करावा.