21-10-2021
टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही!!
जगात समाजात घरी-दारी लहान मोठ्या प्रमाणावर होणारे संघर्ष पाहिले तर काय दिसते? सर्व संघर्षाच्या मुळाशी खोलवर जाऊन पाहिले तर काय असते? कारण या संघर्षांचे हे कारण बहुशः असते ते म्हणजे श्रेष्ठत्वाची आस. श्रेष्ठत्वाची आस ही माणसा मधली एक नैसर्गिक प्रेरणाच आहे. लोकांमध्ये माझी प्रसिद्धी व्हावी कीर्ती व्हावी हे मिळवण्यासाठी समाजात अनेक जण धडपडत असतात. पण हे श्रेष्ठत्व मात्र आपोआप कधीच मिळत नाही तर कष्टपूर्वक जन्मजात गुणांचा विकास घडवून आणून ते मिळवावे लागते. सर्वांची मने राखावी लागतात. माणसं जोडावी लागतात. आणि समाजात अनेक कसोट्यांना उतरून हे श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागते आज आपण अशी अनेक माणसे पाहतो की जी हुजरेगिरी करत करतच राजसिंहासनावर जाऊन बसलेली असतात पण तिथे ती मात्र शोभत नाहीत वेळ प्रसंगाने ते उघडे पडतात ती गोष्ट वेगळी.
कष्ट करण्याची तयारी फारच थोड्या लोकांजवळ असते काही विशेष गुण आधी अंगी असावे लागतात, ते जोपासावे लागतात. बऱ्याच लोकांना याची जाणीवही नसते कि आपल्यामध्ये कोणते गुण आहेत आणि ते काय प्रतीचे आहेत याबद्दलची स्पष्ट जाणीव प्रांजळपणा आणि प्रामाणिकपणा हे देखील सर्वत्र दिसून येत नाही. पण जे काही थोडे गुण निसर्गतः असतील ते न जोपासतात त्याबद्दल आस्था बाळगणारे मात्र अनेक असतात समाजात अशी माणसे आपले ते तथाकथित श्रेष्ठत्व सर्वांच्या नजरेस पडावे म्हणून खटपट करतात उच्चस्थानी योग्यता नसताना जाऊन बसतात अशा व्यक्तींना सुभाषित कारणे या ठिकाणी प्रसाद शिखरावर जाऊन बसणाऱ्या कावळ्याची उपमा दिली आहे.
गुणैः उत्तुंगतां याति नोत्तपंगेनासनेन वा ।
प्रासादशिखरस्थोSपि काको न गरुडायते ।।
गुणांमुळेच माणसाचे श्रेष्ठत्व ठरते पदामुळे नाही. एखादी गुणहिन व्यक्तीही मोठ्या पदावर असू शकते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की गाढवावर वाघाचे कातडे टाकले असते. म्हणजे एखाद्या मोठ्या उच्च पदावर गुन्हे व्यक्ती किंबहुना दुर्गुणांनी संपन्न असा व्यक्ती बसलेला असतो पण तरीही तो श्रेष्ठत्व प्राप्त करू शकत नाही. यावर सुभाषित कार उदाहरण देतात की एखादा कावळा राजमहालाच्या उच्च टोकावर जाऊन बसला तरी त्याला गरुडासारखं लोक मानत नाहीत कावळा तो कावळाच!!
तसे राजा सिंहासनावर आरूढ झाला म्हणून मुजऱ्याला मुजरा याचा लाभ होणार नाही मुजरा चा लाभ होतो तो राजालाच आणि ते देखील त्या राजाच्या अंगी शौर्य धैर्य बुद्धिमत्ता इत्यादी गुण असतील तरच नाही तर त्या राजाचे ही राजेपण क्षणाचे ठरते. याची साक्ष इतिहास देतो पौराणिक काळातील राजे-महाराजे सम्राट हे अरण्यवासी आश्रमवासी ऋषी म्हणून पुढे नतमस्तक होत असत. वेळोवेळी त्यांच्या पायाशी बसून त्यांचे मार्गदर्शन घेत. प्रत्येक राजाच्या दरबारात एक ऋषी राजगुरू म्हणून वास्तव्याला असत आणि ते वेळोवेळी त्या राजाला योग्य ते मार्गदर्शन करीत.
यात देखील गुणांमुळे येणाऱ्या उत्तुंगतेचाच प्रत्यय येतो. तसेच आपणही आई-वडिलांचा गुरुजनांचा सल्ला घ्यावा. त्यांच्यासमोर आपले विचार आपल्या अडचणी मांडाव्यात आणि ते जो सल्ला देतील त्याप्रमाणे कार्य केल्यास आपले काम फत्ते होईल म्हणून पैशाने श्रेष्ठत्व मिळत नाही तर ते कष्टाने मिळते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही गुणा सर्वत्र पुज्यन्ते। दोनच सर्वत्र पूज्य मानले जातात. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांना आपलेसे करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वाणी. आपल्या वाणी जर मधुर असेल तर लोकही आपले बोलणे ऐकण्यासाठी सादर होतात. बोलणे कसे असावे यावर संत कबीर म्हणतात
बानी ऐसी बोलिये मन का आपा खोये ।
औरत को शितल करे आप हू शितल होय ।।
आपले मधुर बोलणे इतरांना त्यांचे दुःख विसरायला लावणारे असावे. इत्यादी पूर्वोक्त सांगितलेले गुंजाच्या ठिकाणी असतील तोच श्रीमान या जगी यश कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करू शकतो.
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!
आपल्या प्रतिक्रिया कळवा