दुबळ्याचा देव वाली!!

दुबळ्याचा देव वाली!!

23-10-2021

Motivational चर्चा प्रेरणादायी बोधकथा 



 दुबळ्याचा देव वाली!! 

वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत: । 

स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ।।

मराठी काव्याअनुवाद :- 

अग्नि लागे वनांतु : तेथ समर साह्यभूतू :

तेचि दिपकाते विझवितु : झुळुक वारे ।। 

तैसे समर्थाचिया संकटासी :

धांवती सकळ जनराशी :

परि दुबळेया विपत्तीसि :

कव्हणी न पुसे ।।

वनात पेटलेल्या वणव्यासमोर कालपर्यंत तरी मानव हात टेकत होता. आताच्या काळातही फार मोठ्या प्रमाणात लागलेला वणवा असेल तर तो विजवणे अशक्य होऊन जाते आताच तीन-चार वर्षांपूर्वी घडलेली ऑस्ट्रेलिया येथील लागलेला वणवा त्यापुढे पूर्ण ऑस्ट्रेलियन सरकार हतबल झाले होते फारच प्रयत्नाने तो बनवा विझवण्यात ऑस्ट्रेलियन सरकारला यश आले होते पावसाची ही थोडीफार मदत झाली होती पण तोपर्यंत लाखो प्राणी जीव जंतू त्या त्या वणव्यात भस्मसात झाले होते. आधीच अग्नि त्यात गवत झाडांची दाटी त्या अग्नीला भडकवायला वारा ताबडतोब हजर होतो. किंबहुना तो तिथेच असतोच हजर, वणव्यातली ती आग भडकवणारा तो वारा मात्र इवल्याशा दीपकळीला एका झुळकीने ही विजवण्यासाठी तत्पर असतो. 

 जगाचा हा न्यायच अजब आहे ज्या दुबळ्याला सहाय्याची जास्त आवश्यकता असते. त्या दुबळ्यांना सहाय्य करणारे कोणीच नाही. एखादी दुर्बल गरीब व्यक्ती समोर आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते तुच्छतेने त्याला धुडकावून लावायला, त्याची प्रगती होत असेल तर त्याला मागे खेचायला जो तो तयार असतो. आणि जय श्रीमंत आहेत बलवान आहेत त्यांना मात्र मदतीची गरज नसली तरी लोक धावून धावून मदत करतात त्यांचे मित्र बनतात. त्यांची मर्जी राखण्यासाठी आटापिटा करतात.  मनुष्याची ही वृत्ती मोठी विचित्र आहे, सबळांचा मित्र दूर्बलाचा शत्रु असतो. ही झाली याची एक बाजू 

दुसरे म्हणजे विवाद, भांडणाचे आकर्षण, कुठे काही भांडण-तंटा सुरू असला की तिथे जाऊन उभे राहणे गंमत पाहणे. किंवा चार गुंड वृत्तीचे लोक तोडफोड दगडफेक करत आहेत असे दिसले की हरणाच्या काळजाचा भेकड माणूसही उत्साहाने पुढे होतो. चार दगड फेकून नाही तर कोणाला तरी चार पाच बुक्के हाणून हाताचा कंड शमवून घेतो. आपल्या वैयक्तिक अपयशाचा जीवनातल्या दुःखांचा मनात धुमसणारा राग शांत करून घेतो. शौर्याची हौस भागवून घेतो. आणि आणि आपणही फार मोठा योद्धा पुरुषार्थी असल्याचे समाधान मानत गुपचूप पसार होतो. यालाच वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे असे म्हणतात. 

पण तेच एखादी दुबळी व्यक्ती एकला चलो रे या भावनेने काही विधायक काम करीत असेल दुबळ्या हातांनी का होईना फार थोड्या प्रमाणात का होईना काहीतरी विशेष चांगले करण्यासाठी धडपडत असेल तर त्या एकांड्या शिलेदारांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहायला कोणी तयार नसतो. अंधाराचा नाश करणारा सूर्य तर महानच आहे. पण एवढ्याशा दीपकळीचेही महत्त्व आपल्या ठिकाणी आहेच. कारण सूर्य मावळल्यानंतर ही दीपकळीच आपल्याला प्रकाश देणारी ठरते. मग तिच्या जोडीला आणखी पन्नास दीपज्योती उभ्या राहिल्या तर मात्र जो तो थबकून उभा राहील. तो दीपसोहळा बघत राहील. पण एकट्या दीपकळीला मात्र कोणी किंमत देत नाही हे खरे! 

या ठिकाणी आणखी एक प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे एकटेपणापेक्षा महत्त्वाचा घटक बनला आहे. जेथे जेथे बळ आहे तेथे सर्व आहे. मग ते बळ निश्चयाचे हवे, प्रयत्नांचे हवे, चातुर्याचे हवे आणि शारीरिकही हवे. हिंदुसाम्राज्याचे महान स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजीराजे एकटेच होते. पण सर्व तऱ्हांनी बलवान असल्याने आणि त्यांचा हेतू अति उदात्त असल्यामुळे व त्यांच्या तेजस्वी आकर्षणामुळे सारा मराठा त्यांच्याभोवती गोळा झाला, एकवटला. सारांश जो बलवंत तोच यशवंत. तरीही आपण एकटे आहोत म्हणून माणसाने खचून जाऊ नये प्रयत्न करत राहावा एकटाच लढतोय आयुष्याशी म्हणून तो असफल होईलच असं नाही परमेश्वरावर प्रघात श्रद्धा आणि स्वतःचा प्रयत्न या दोन्ही गोष्टीवर तो यशाचे शिखर गाठू शकतो. 

संकटात असलेला दुबळा मनुष्य आता संपल्यात जमा आहे, तो पुनः कधीही वर डोके काढू शकत नाही, अशी खुळी समजूत या समाजाची असते आणि ते त्या गरीब माणसाचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारत राहतात, व त्याची थट्टा करत राहतात हा मूर्खपणा होय. आज गरिबीत दिसणारा माणूस उद्या आपल्या प्रयत्नाने म्हणा का भाग्याने म्हणा आपल्यापेक्षाही श्रीमंत होऊ शकतो हे त्यांना माहीत नसते. यावर एका मुंगीची व कोशातला किड्याची गोष्ट सांगितली जाते. 

एकदा काही मुंग्या आपले खाद्य शोधत फिरत असतात. फिरता फिरता एके ठिकाणी कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला त्यांना दिसला. ते पाहून मुंग्या थबकल्या. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंग्या हसू लागल्या व तुच्छतेने त्याला म्हणाल्या , “अरेरे, किड्या, काय ही तुझी स्थिती? आम्हाला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व आमच्या स्थितीत फारच अंतर आहे तुझी आणि आमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही.” असं म्हणून मुंग्या तुच्छतेने त्याच्याकडे पाहून निघून गेल्या. यावर किड्याने काहीच उत्तर दिले नाही. 

पुढे काही दिवसांनी ती मुंग्या पुनः तेथे गेल्या असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडलेले दिसले. तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे त्यांना आढळले. त्या इकडे तिकडे फिरत आहेत तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी त्यांना वारा घालत असताना दिसला. तो पतंग तिला म्हणाला, “मुंग्यानो! , त्या दिवशी बंदिवान म्हणून तुम्ही माझी कीव करीत होता, थट्टा करीत होतात. तू आमच्या अजिबात बरोबरीचा नाहीस आमची आणि तुझी कधीच बरोबरी होऊ शकत नाही असं म्हणत होत्या. तो कोशातला किडा मीच आहे आणि आताच सुंदर पतंग झालो आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्ही “ आम्हाला वाटेल तेवढे इकडे तिकडे फिरता येते म्हणून खुशाल बढाया मारा तो पर्यंत मी सहज आकाशात फिरून येतो.” इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला. म्हणून एखाद्याच्या पडत्या काळात वाईट वेळेत त्याची थट्टा उडवू नये त्याला हीन लेखून नये कारण कोणाचे नशीब कधी पलटी मारेल हे सांगता येत नाही. 

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post