पुस्तके वाचा जाणते बना!!

पुस्तके वाचा जाणते बना!!

 पुस्तके वाचण्याचे महत्व!! 

पुस्तके संग्रही बख्खळ । परि वाचावया नाही लळ । 

तयासि ज्ञानाचे पाठबळ । कैसे मिळेल ।। 

कपाटामध्ये संग्रही हजारो पुस्तक आहेत पण वाचन करून करण्याची आवडच नाही तर त्याला त्या पुस्तकातल्या ज्ञानाचे पाठबळ कसे मिळेल ते पुस्तकी ज्ञान त्याच्या कधीही उपयोगास जाणार नाही ते पुस्तकी ज्ञान म्हणजे बाजाराला जाताना पैसे घरी विसरण्यासारखे आहे.

३०० - ४०० वर्षांपूर्वी छपाई यंत्राचा शोध लागला. आणि पुढे छपाईचे वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार होत गेला. तसेच 

लिखित साहित्यही वाढत गेले आहे. रोज जगभरातून हजारो पुस्तके प्रकाशित होतात. कविता जगत तर फार विस्तारले आहे. रोज अनेक कवि आपल्या भावनांचे शब्दांकन करून इंटरनेटच्या माध्यमातून कविता imege, text करून प्रसारित होतात. विविध प्रकारचे विषय, विद्या, कलाक्षेत्र, खाद्यपदार्थंवरील पुस्तके आणि विविध विषयांबाबत माहिती देणारे कोश, शब्दकोश हे घराघरातील पुस्तकांच्या कपाटांची शोभा वाढवू लागले आहेत. पण ते फक्त शोभाच वाढवत आहेत. त्या पुस्तकांचे नियमित वाचन होतेच असं नाही. पण हे कोणाला मान्य होणार नाही पण बऱ्याच वेळा ही वस्तुस्थिती आहे. जसे पुराणातले वांगे पुराणातच तसे पुस्तकातले ज्ञान पुस्तकातच पडून राहिले आहे. रोज काहीतरी वाचित जावे, या संतांच्या वाक्यावर कुणीच विचार करत नाही. पुस्तके वाचून त्यातले विचार आत्मसात करून त्यावर चिंतन करणारे लोक फारच थोडे आहेत. 

पुस्तकस्था तु या विद्या ,परहस्तगतं च धनम् । 

कार्यकाले समुत्तपन्ने न सा विद्या न तद् धनम् ।। 

अर्थ :- पुस्तकात असलेली विद्या ज्ञान आणि दुसऱ्याकडे ठेवलेले धन हे संकट काळ प्राप्त झाला असता उपयोगी येत नाही दुसऱ्याकडे गेलेले धन पूर्ण मिळेलच याची शाश्वती नसते आणि पुस्तकात असलेली विद्या ती पुस्तकातच राहते आपण चिंतन-मनन अभ्यास केलेले ज्ञानच आपल्या उपयोगी पडते.

 सुभाषितकारांनी माणसाच्या या संग्रह करण्याच्या मनोवृत्तीवर नेमके बोट ठेवले आहे. कपाटं पुस्तकांनी भरलेली आहेत. पुष्कळ पुस्तके आहेत पुष्कळ कोश आहेत, कॉम्प्युटर मध्ये मोबाईल मध्ये हजारो PDF स्वरूपात उपलब्ध आहेत पण त्यातले आपण वाचतो किती? त्यातले आपल्याला कळते किती? वाचून स्मरणात ठेवतो किती? त्यापैकी समयोचित वेळेवर आठवते किती? आणि आठवले तरी त्याची मुद्देसूद सुयोग्य मांडणी करता येते की नाही? या सर्वांचा विचार केला तर हाती काय येते? शुन्य. 

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि व्यवहारात कौशल्य मिळविण्यासाठी पुस्तके वारंवार वाचून ज्ञान आत्मसात करण्याचा अभ्यास करणे हाच एकमेव उपाय आहे. संत गाडगेबाबा आपल्या किर्तनांमध्ये म्हणत असत. परमेश्वराने निर्माण केलेले हे जग हेही एक पुस्तकच आहे. या जगरूपी पुस्तकात नाना प्रकारचे असंख्यात विषय आहेत. प्रत्येक वस्तुतून काही ना काही गुण घ्यावा. गुणग्राहकता असणे हे फारच महत्वाचे आहे. आपल्या अवतीभवती फिरणार्‍या आपल्या संयोगात येणार्‍या प्रत्येक माणसाचा अभ्यास करणे, त्याच्या ठिकाणी असलेले गुण ग्रहण करणे हेच जगरूपी पुस्तक वाचणे होए. 

रोज काहीतरी वाचन केलेच पाहिजे. सतत अभ्यासाने आणि चिंतनाने अवगत केलेल्या ज्ञानाचा उपयोग ऐनवेळी परीक्षेत, वाद-विवाद प्रसंगी, किंवा सभेमध्ये बोलताना करता येतो.  कपाट पडलेले पुस्तकातले ज्ञान आपल्या काही उपयोगाचे नाही. जी गोष्ट विद्येची, तीच गोष्ट द्रव्याची आपण कष्टाने कमावलेले धन स्वतःजवळ सुरक्षित असेल तरच ते वेळप्रसंगी संकटकाळी गरजेच्या वेळी उपयोगी येते.

पूर्वीच्या काळी ठेवीसाठी SBI बँक, आणि पैसा गुंतवणूकीसाठी Mutual Funds, L.I.C. अशा सारख्या पैसा योजना नव्हत्या. तीर्थयात्रेला जायचे असेल किंवा लांबच्या प्रवासाला जाताना लोकं विश्वासाच्या व्यक्तीकडे असे धन ठेवून जात. पण हाती आलेले धन पाहून चांगल्या चांगल्यांची बुद्धी भ्रष्ट होते म्हणून माणसाची दानत आणि आयुष्य दोन्हींचा भरवसा कसा धरावा? त्यामुळे काहीजण धन पुरून ठेवण्याचा मार्गही अवलंबत असत. ते पुरून ठेवले धन खोदकामात कधीकधी आढळते अशा बऱ्याच बातम्या येतात की सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा मिळाला. आणि कधी कधी अतिरिक्त धन हे ठेव म्हणून कोणाजवळ ठेवले जाते. त्यात व्याजाने होणाऱ्या धनवृद्धीचा लोभही असतोच काही वेळा तर व्याज वृद्धीच्या लोभाने स्वतः काटकसर करूनही धन इतरांकडे ठेवले जाते. पूर्वीच्या काळी सावकार लोक असेच व्याजाने धन देऊन व्यापार करीत असत आणि गरीब शेतकऱ्यांकडून मुबलक व्याज वसुल करीत असत. पण दुसऱ्याकडे धन ठेवणे यामध्ये फसवणूक होण्याचीही शक्यता असते. फसवणुकीचा एखाद्याचा उद्देश नसला तरी हाती आलेला पैसा इतरत्र वापरण्याचा मोह माणसाला आवरता येत नाही. धन हाती आले की लोभही सुटतो. आणि मग गुंतवणुकीपेक्षा गुंतागुंत होत असते नाते संबंध खराब होतात. पुढे चालून वैर निर्माण होऊन वाद विकोपाला जातो. या धोरणाच्या लोभापायी माणूस माणसाचा घात करण्यासही घाबरत नाही वर्तमानपत्रात अशा अनेक घटना येतात. मग एखाद्याला 'आपले चुकले' ही भावना येऊन द्रव्य परत करण्याचे कबूल केलेच तर ते पूर्ण मिळत नाही थोडेफार मिळते तेव्हा आपल्या कष्टाचा पैसा आपला असून नसल्यासारखी गत होते.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post