भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राचे वैशिष्ठ्य
असे म्हणतात की सुदर्शन चक्र हे असे अद्भुत शस्त्र होते की ते सोडल्यानंतर ते लक्ष्याचा पाठलाग करत होते आणि आपले कार्य पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा आपल्या ठिकाणी येत होते. हे चक्र विष्णू देवतेच्या तर्जनीमध्ये फिरत असल्याचे म्हटले जाते. नंतर विष्णू देवतेने परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण भगवंतांना हे चक्र धारण करण्याची विनंती केली होती. तेव्हापासून हे चक्र श्रीकृष्ण भगवंतांकडे होते.
या चक्राद्वारा भगवंतांनी नरकासुर शिशुपाल अशा अनेक दैत्यांचा संहार केला.
पुराणकाळात चक्र हे शस्त्र केवळ देवतांकडेच असायचे. मग देवतांना प्रसन्न करून काही मानव ते चक्र प्राप्त करून घ्यायचे. पण मानवाने चक्र हे शस्त्र चालवण्याचा फारसा उल्लेख पुराणांमध्ये आढळत नाही.
पुराणानुसार वेगवेगळ्या देवतांजवळ स्वतःची चक्रे असायची. सर्व चक्रांमध्ये भिन्न क्षमता होती आणि सर्व चक्रांना त्यांची नावे देखील होती. भगवान श्रीकृष्णांकडे सुदर्शन होते. हे सुदर्शन चक्र कोठून आले आणि चक्रांचा प्रवर्तक कोण होता? सुदर्शन चक्र शंकराने निर्माण केले होते नंतर विष्णूची परीक्षा घेऊन महादेवाने ते विष्णुला सोपवले.
चक्र हे सर्वात लहान शस्त्र असायचे, परंतु सर्वात अचूक शस्त्र मानले जात असे. सर्व देवतांची वेगवेगळी चक्रे होती. त्या सर्वांची नावे वेगवेगळी होती. शंकराचे चक्र भवरेंदू, आणि देवीचे चक्र मृत्यु मंजरी म्हणून ओळखले जात असे. पैकी सुदर्शन चक्राला भगवान श्रीकृष्णांमुळे प्रसिद्धी मिळाली. सुदर्शन चक्राचे नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावाशी अतूटपणे जोडलेले आहे.
सुदर्शन चक्र हे ब्रह्मास्त्रासारखे अचुक होते. पण ते ब्रह्मास्त्रासारखे विध्वंसक नव्हते, तरीही जेव्हा ते आवश्यक असेल तेव्हाच ते वापरले जायचे, कारण ते एकदा सोडले तरच ते शत्रूला मारल्याशिवाय परत येत नसे.
या अस्त्राचे वैशिष्ट्य असे होते की ते हाताने वेगाने फिरवताना हवेच्या प्रवाहाशी संयोग होऊन प्रचंड वेगाने आग प्रज्वलित करून शत्रूला भस्मसात करायचे. ते अतिशय सुंदर, जलद गतीने चालणारे, त्वरीत चालवणारे भयंकर शस्त्र होते.
अणुबॉम्बप्रमाणेच सुदर्शन चक्राचे विज्ञानही अत्यंत गुप्त ठेवले आहे. या अगम्य शस्त्राची माहिती देवांशिवाय इतरांपर्यंत पोहोचू नये म्हणून गुप्तता पाळली गेली असावी, अन्यथा असुरी वृत्तीच्या अपात्र आणि बेजबाबदार लोकांकडून त्याचा गैरवापर होऊ शकला असता.
हे चक्र मानवांना चालवणे तर दूरच पण साधे उचलताही येत नव्हते. असे ते लहान असूनही इतके दिव्य होते एकदा अश्वत्थामा श्रीकृष्ण भगवंतांना भेटायला द्वार केला गेला आणि त्याने भगवान श्रीकृष्ण जवळ सुदर्शन चक्र ची मागणी केली भगवान श्रीकृष्णांनी त्याला नेण्याची परवानगी दिली “तुला उचलेल तर घेऊन जा” परवानगी मिळताच. त्याने ते चक्र उचलण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला ते उचलले गेले नाही तो तसाच खजिल होऊन परत हस्तिनापुरास आला.
सुदर्शन चक्रात किती आरे आहेत याबद्दल मतभेद आहेत कोणी म्हणते सुदर्शन चक्रात हजार अरे आहेत. हरीवंश पुराणानुसार सुदर्शन चक्रामध्ये 108 आरे आहेत.
विष्णु पुराणानुसार सुदर्शन चक्रात १२ आरे आहेत.
असे हे सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णांच्या श्री खरात शोभून दिसत होते या चक्राने असंख्य दैत्यांचा संहार केला असंख्य त्यांना मुक्ती मिळाली असे हे सुदर्शन चक्र भगवंतांच्या श्रीकराच्या स्पर्शानेपवित्र झाले होते.
सुदर्शन चक्र दूरदृष्टी आणि दृढ संकल्पाचे प्रतीक मानले जाते.
सुदर्शन चक्र अत्यंत प्रकाशमान होते श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुनाला क्षीराब्धीला जाताना भुयारी मार्ग लागला गडद अंधार असल्यामुळे अर्जुनाला काही दिसत नव्हते तेव्हा सुदर्शन चक्राचा प्रकाशाने पुढील मार्गक्रमण झाले. भगवंतांनी ते सुदर्शन चक्र समोर अधांतरी चालत होते. पण त्याचा प्रकाश इतका तीव्र होता की अर्जुनाला त्याचे तेज सहन होईना मग नंतर भगवंतांनी ते सुदर्शन चक्र मागे ठेवले.
हरवलेली वस्तू शोधण्यासाठी सुद्धा सुदर्शन चक्राचा उपयोग होत होता असे म्हणतात.