श्रीदामोदर पंडितांची काव्यसृष्टी - वछाहरण (प्राचिन मराठी कविता रसग्रहण)

श्रीदामोदर पंडितांची काव्यसृष्टी - वछाहरण (प्राचिन मराठी कविता रसग्रहण)

 

प्राचिन मराठी कविता रसग्रहण

        श्रीदामोदर पंडितांची काव्यसृष्टी!

वछाहरण

श्रीभास्करभटांनी भागवताच्या एकादशस्कंधावर श्रीउद्धवगीता लीहिली. याच शांत रसाच्या भक्तिपूर्ण ग्रंथमालेत श्रीदामोदर पंडितानी वछाहरण गुंफले, ते भागवत दशमस्कंधाच्या आधारावर. श्रीनरेंद्रबासांचे ऋक्मिणीस्वयंवर देखील याच स्कंधावर आरुढले आहे.

        शांतरसांत देखील श्रीकवीश्वरबासांनी साहित्य रत्नांच्या खाणी उघडल्या. तसेच दामोदर पंडितांचे वछाहरण हा कलात्मकतेचा एक उत्तम नमुना आहे यात शंका नाही.

दामोदर पंडितांची नम्रता या काव्यात ओथंबून वाहते.

जो चंद्रु चकोराचे जीवन । अमृते निववी त्रिभुवन ।

तोही गुणे एके निरांजन । मानी कलावतु ॥

अर्थ :- चकोराचे जीवन असा चंद्र त्रिभवनाला अमृताने निववितो. पण येवढा कलावान चंद्रमा देखील कापडाची एक दशी दिल्याने संतोषतो. आपल्या या सामान्य अशा चिमुकल्या काव्याने संतजन संतोषतील हा आत्मविश्वास मोठ्या मृदुपणाने व्यक्त झाला आहे. दामोदर पंडितांचे सारेच काव्य असे मदुमधुर.

        जे श्रवणासी अमृत पान । धर्माचे जन्मस्थान अथवा जे जिवाते चोखाळिती । कानामनाते निवविती । भक्ति भावाते पोखिती । अशी कथा त्यांना निवडावयाची होती. वछाहरणाची कथा पद्मपुराण नि ब्रह्मवैवर्तपुराण यात आली असली तरी, पंडितांनी ती भागवतातूनच घेतली हे कथाक्रमावरून तुलनेने दिसून येते. शिवाय स्वतः कवीने तसा उल्लेखही केलेला आहेच. असंख्यात कवि श्रीकृष्णकथा गात आले, तेव्हा हा प्रयास कशाला? या प्रश्नाचे उत्तर देतांना म्हटले आहे की, ‘‘जैसे अमृत नव जने । उरगेना साडे पन्हरे सोने’’ अमृत अथवा सोने कधी जुने होते काय? त्याप्रमाणेच ही भागवती कथा नित्य नूतन मधुर आहे!

रचना-कौशल्य

        पंडितांनी भागवतातील आख्यान घेतले खरे. पण आख्यानकवि या नात्याने त्यांची योग्यता काय? वछाहरणाचे रचना कौशल्य कोणते? हे प्रश्नहि महत्वाचे आहेत. भागवतातून कथा घेतली असली तरी हे काव्य म्हणजे मूळ कथेचे शब्दशः भाषांतर वा रूपांतर नव्हे. संस्कृत कथा आधारास घेऊन पंडितांनी आपल्या कथेचा स्वतंत्रच संसार थाटला आहे. हा यातील पहिला विशेष. यात कवीचे स्वातंत्र्य अनेक रूपांनी व्यक्त झाले आहे.

        वच्छाहरण कथा सामान्यतः तीच नि तशीच असली तरी तिचा काही ठिकाणी संक्षेप तर काही ठिकाणी विस्तार पंडितांनी केला आहे. नखावर ताजमहाल रेखाटावा तसा संस्कृत श्लोकांचा भावार्थ त्यांनी कधी एक दोन ओव्यांत आणला आहे, तर कधी एका श्लोकावर अनेक ओव्या लिहिल्या आहेत. श्रीकृष्णमूर्ति वर्णन करतांना एका श्लोकावर २७ ओव्या लिहिलेल्या आढळतात.

        वच्छाहरण काव्यात सुरूवातीला प्रास्ताविक ७८ ओव्या अगदीच स्वतंत्रनिर्मिती आहे. त्यात त्यांची प्रतिभा ओसंडून  वाहते.

        काव्यातले वृंदावन वर्णन आणि यमुना वर्णन ही प्रकरणेही जवळ जवळ पूर्णच स्वतंत्र आहेत.

        भागवतात वा पद्मपुराण वगैरेत नसलेला एक नवाच प्रसंग वछाहरणात पंडितांनी गुंफला आहे. ग्रंथामध्ये ब्रह्मदेवाचे मायापटल नारदाच्या मध्यस्थीने दूर केले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता हे काव्य एक स्वतंत्र काव्य मानायला काही हरकत नाही. हा त्यांच्या रचना कौशल्याचाच एक विशेष होय.

        आख्यान कवीचे यश प्रामुख्याने वर्णन कौशल्यावर अवलंबून असते. एरवी १५-२० ओळीत सांगता येण्यासारखी वछाहरणांची कथा ५०० ओव्यात साकार करणे आणि तीहि रटाळपणे नव्हे तर रसाळपणे हाच कवीचा अत्यंत महात्वाचा विशेष. प्रसंग यथातथ्यपणे श्रोत्यांच्यासमोर उभा करावयाचा, त्यात श्रोत्यांना समरस करुन सोडणारा रस भरायचा, यालाच खरे वर्णन-कौशल्य म्हणतात.

        श्रीमूर्तिवर्णन, यमुना वर्णन, वृंदावन वर्णन, गोपवत्साचे रूप घेऊन गोकुळात वावरणाच्या कृष्णाचे वर्णन, वासरांना भेटणाऱ्या गोधनाचे वर्णन, ब्रह्मदेवाच्या भ्रम निरासाचे प्रसंग-वर्णन इ. वर्णनामधून श्रीदामोदरपंडितांचे वर्णन-कौशल्य उत्कृष्टपणे व्यक्त झाले आहे. या सर्वच ठायीं त्यांची कल्पकता आणि कलात्मकता दिसून येते.

        त्याबरोबरच नारदाचा उपयोग करुन घेण्यात त्यांच्या प्रयोजकतेचाहि प्रत्यय येतो.

निसर्ग-वर्णन

        रचना स्वातंत्र्य आणि वर्णन कौशल्य यांच्या जोडीला या काव्याचा तिसरा विशेष दिसतो तो निसर्गवर्णनाचा. हे निसर्गवर्णन मोठे काव्यमय आहे. त्यातील कल्पना विलास अतिशय रमणीय आहे. यादृष्टीने यमुनावर्णनातील काव्यसौंदर्य पाहण्यासारखे आहे. त्यांच्या वंदावनात साल’, ‘ताळ’, ‘तमालआदि वृक्षांबरोबर गगनचुंबिता नारियेळी’ आहेत जुर पोफळीआंदोत आहेत इतकेच नव्हे तर आनंदे फलपुष्प स्त्रवत पृथ्वी साद्रव होऊनि गळतअसा फलपुष्परस थबथबत आहे.

वर्षत रसांचे वडप तैसे निबिडतर द्राक्ष मंडप

उघडले माणिकांचे मोप तैसे पक्व डाळिंब ।।

अशी रसभरीत द्राक्षांचे घोस असलेल्या द्राक्षमंडपांची निबिड सावली आणि माणकांच्या करंडकासारखी पिकलेली डाळिंबे पाहून मन सुखावते. णिमंडितअशी चंद्र मंडलाकार सरोवरेतर त्याहूनहि वैभवशाली आहेत.

‘‘कनककमले विकासती । भ्रमराचिया झाका वरी पडती ।

तेथ राजहंस चारे वाटिती । अमृतकंदाचे ।।

सोनेरी कमळांचे ताटवे, निळसर समराचे थवे, अमत कंद वाटणारे राजहंस यांच्या जोडीला पंचभालाप घेत आपल्या प्रियांना बोलविणारे कोकिळ देखील वृंदावनात आहेत.

        विच्या करस्पर्शाने मातीचे देखील सोने होते म्हणतात, ते काही खोटे नाही. यमनावर्णनातील यमुनेचे घाट नि वाळवंट सुद्धा किती वैभवशाली झाली आहेत पहा

सोमकांती बांधले घाट । जेथ हिरेलग वाळवंट

मुक्तिगर्भ सूक्तिसंपुट । दिसताति ।।

        चंद्रकांत-मण्यांनी बांधलेले घाट, ‘रत्न कुटाचिये मवाळयाप्रमाणे हिन्यांचे मऊ कण मिसळलेले वाळवंट आणि चमकदार मोती शिंपले हे केवढे मनोहर दृष्य ! श्रीकृष्णकांति प्रतिबिंबलीम्हणून सुनिळ’ झालेली आणि आपल्या असंख्य तरंग भुजांनी श्रीकृष्णराजाला आलिंगू पाहणारी यमुना नदी तरी किती सुंदर ! तिच्या दोन्ही तिरांवर विहंगवंद, ‘ऐकांगुष्ठ तपिये बक’, ‘ऐज दिक्षित तैसे चक्रवाकक्षिरनिराचा निवाडा करणारे राजहंस, यांच्या मार्मिक वर्णनाबरोबरच जलचरांचे वर्णन पहा

श्रीकृष्णाचे रुप सावळ । जलाभीतरी प्रतिबिंबले ।

ते उताविळेपणे आलिंगिले । सकळी मच्छादिकी ।

अर्थात श्रीकृष्ण भगवंतर यमुना काठी आले की, त्यांच्या पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला वेधून सर्व जलचरे वर येत. ही लीळा त्यांनी भावपूर्वक गुंफलेली आहे. त्या वृंदावनात स्वयं परमेश्वर क्रिडा करत असल्यामुळे तिथले वन्य प्राणि देखिल आपसातले वैर विसरून निर्भय विचरण करतात. हत्ती सिंहाशी खेळतात, मग वाघांना कुरवाळतात आणि मोराचा पाखवा विसंवत फणिक देखा मोराच्या पंखाखाली नाग विसावतात.

        निर्वैर भुतेझाल्याचे जे उल्लेख पंडितांनी वृंदावनातील मणिमंडित सरोवराच्या नि यमुनेच्याहि वर्णनात केले आहेत तो त्यांच्या अंतरंगाचाच प्रकाश आहे; त्यांच्या हृदयाचाच काव्यमय विशेष होय. एका पायावर तप करणारे गळे, नासाग्री दृष्टी ठेवणारे ढोक पक्षी नि यज्ञ करणाऱ्या दिक्षितांप्रमाणे-पंडिताप्रमाणे स्त्रियांना न विसंवणारे चक्रवाक असल्या उपहासाच्या कोपरखळ्या क्वचित पंडितांनी अन्यबुवा ब्राह्मणांना दिल्या असल्या तरी, मूलत: त्यांचा स्वभावच निर्वैर आहे. म्हणूनच त्यांनी यमुनेकाठी नित्य नैमित्तिक कार्य करणाऱ्या ब्रह्मचारी-गृहस्थ आदि आश्रमियाचे आदराने वर्णन केले आहे. सरोवराकाठी स्फटिक शिलांवर ध्यानस्थ बसलेले योगी, समाधि-मग्न-मुनी, सुखसंवादी रमलेले भक्त, षड्चक्र भेदक अमृतशरीरी, इ. विभिन्नी पंथांच्या साधकांचे त्यांनी प्रेमपूर्वक वर्णन केले आहे. त्यावरून परधर्म सहिष्णूतेची अमोल दृष्टी कळून येते.

एकजीव परमात्मा ऐक्य भावित एक सेव्य-सेवकभावे उपासिक

एक भेदाभेद-विजित राहिले निरालंबी ।।’

        अशा द्वैती अद्वैती सर्वांकडेच ते आदराने पाहतात. भक्तिहीन कर्मजड यांना त्यांनी चिमटे काढले असले तरी ते त्यांच्या हिताच्या कळवळ्यानेच.

        एरव्ही मायामग्न पतिताविषयी सुद्धा पंडितांच्या हृदयी दुर्मिळ सहानुभूतीच दिसून येते. ते म्हणतात. - हा अपराधु नाही जना । प्रवृत्ति निवृत्ति तोचि कारण ।।

श्रीमूति वर्णन

यमुनावर्णन आणि वृंदावन वर्णन यांच्या प्रमाणेच श्रीमूर्तीवर्णनाचे काव्य सौंदर्य अप्रतिम आहे. सूर्याचा प्रकाश मेघांनी झाकोळलेला असला तरी त्याच्या प्रभावाने कमलिनी प्रफुल्लीत होतातच त्या प्रमाणे सामान्य गोपवेषात दडलेला श्रीकृष्ण पाहुन देखील ‘‘लतातरु रोमांच दाटती । पसु चरों विसरती ।’’ असा तरु लतांना नि पशुपक्षांना त्याचा वेध लागायचा कारण वनमालाधारी तो श्रीकृष्ण ‘‘सौंदरांचा सौंदरु’’ होता. ‘‘गणलावण्याचे निधान । जो कमनीयु त्रिभुवन ।’’ अशा त्या त्रिभुवन-सुंदर श्रीकृष्णाचे मुख सदोदित सुप्रसन्न होते. त्याला चंद्राची उपमा काय द्यायची ? ‘‘तयाचे इंदु लाहता पाईके पण । तरी कलंकिया नव्हता ।’’ चंद्र त्याचा दास असता तर कलंकीत होऊ शकला नसता. या मार्मिक शब्दांनी कवीने चंद्राची उपमा अगदीच खालच्या दर्जाची ठरविली आहे. श्रीकृष्णभगवंतांच्या मधुर हास्याला उपमा दिली आहे. ‘‘सानुराग, सुनिर्मल ब्रह्मविद्येची ।’’ सहज लीलेने सृष्टीच्या उत्पत्ती संहार घडविणाऱ्या त्या धनुष्याकार भुवया, ते सुनिल कुरळे केश, ती सुकुमार चरणकमळे, ती चंद्रदीप्तीची नखे, ते वीरश्रीयेने वरिलेले भुजदंड, ते ‘‘घणी पिटिले तैसे जानुविभाग’’ सारेच काही मनोज्ञ दिव्य ! तेजाच्या सूताने विणलेला नि सूवर्णाच्या रंगाने रंगविलेला पीतांबर सूनि गगनीविजेप्रमाणे सावळ्या शरीरावर मिरविणारा दुशेला आणि, ‘‘नादब्रह्माचा घडला । कि सांभव वेधु मूर्तिसी आला’’ असा जादू करणारा सुमधुर वेणु इ. वस्तूंचे सौंदर्य तरी किती वेधक ! किती काव्यमय !

‘‘इंद्रानोलाची दीप्ती : नीळोप्तलाची कांति

एकवटली तैसी सावळी श्रीमर्ती मिरवत असे ।।

निले कमल आणि निळे रत्न यांच्या संमिलीत तेजाने शोभायमान झालेल्या त्या श्रीमूर्तीचे सालंकृत वर्णन मूळातूनच अभ्यासण्याजोगे आहे.

प्रभावी स्वभावदर्शन

निसर्ग वर्णन नि रूपवर्णनाप्रमाणेच स्वभावर्णनाच्या छटा देखील मोठ्या हृदयंगम उतरल्या आहेत. गोपबालांची ही क्रिडाप्रवृत्ति पहा

एक विहंगमाचि करिती कुजने । एक वानरांची उप्तवने ।

एक तगराचे जुझणे दाविताती ।।

पक्षांप्रमाणे चिवचिवणे, वानरांप्रमाणे हुंदडणे, नि सप्रिमाणे झुंजणे असले खेळ खेळतांना त्यांना जेव्हा अंतराळासारख्या विस्तीर्ण मुखाचा दीर्घ पर्वताकारशरीराचा अवाढव्य अघासूर दिसतो त्यावेळी त्या सर्पाला पर्वत समजन बालगोपाल बोलतो । आरे पर्वत देखा सर्पाकृतीअरे हा सापासारखा दिसणारा पर्वत तर पहा यात बालस्वभावाचे दर्शन कवीने मार्मिकपणे दर्शविले आहे.

भावनांची उत्कटता

        भावनांची उत्कटता हाहि दामोदर पंडितांचा एक विशेष आहे. श्रीमूर्ती वर्णनात याचा चांगलाच प्रत्यय यतो. प्रास्ताविकातदेखील भावनोत्कटतेचा स्पर्श जाणवतो. श्रीदामोदर पंडित बरेचदा वर्ण्य विषय विसरून भक्तिभावाने देवाशी स्वतःच संवाद करायला लागतात.

असे महा कवि महानुभाव पंथात होऊन गेले.

आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा! 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post