४ काव्य प्रार्थना - मराठी प्राचिन काव्य रसग्रहण

४ काव्य प्रार्थना - मराठी प्राचिन काव्य रसग्रहण

 

मराठी प्राचिन काव्य रसग्रहण 



संसार नाशिवंत सांगणार्‍या चार कविता 

(कवि :- कृष्णकिंकर) 

कृष्ण किंकर नावाचे कवी त्यांच्या या कवितेत भगवान श्रीकृष्णांचा धावा करतात-

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! 

येइं रे ! वनमाळी ! ॥ ध्रुवपद ॥

हे सावळ्या श्रीकृष्ण देवा परमेश्वरा पुन्हा अवतार घेऊन भक्त जणांचा सांभाळ करा.

श्यामसुंदरा ! जगदोद्धारा ! कृपादृष्टिं न्याहळीं ॥ 

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी ! ॥ १ ॥

हे शाम सुंदरा! जगाच्या उद्धार करणाऱ्या देवा आपल्या कृपादृष्टीने एक वेळ माझ्याकडे पहा.

ठाण पहुडें मुरली अधरीं । वाजवी कदंबातळीं 

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी !  ॥ २ ॥

कदंबाच्या झाडाखाली निजल्या निजल्या मुरली ओठांवर ठेवून मधुर बासरी वाजवणाऱ्या देवा आम्हाला दर्शन द्या आमचे रक्षण करा.

मोर मुगुट शिरीं दिव्य कुंडलें । शोभे टिळक भाळीं ॥

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी !  ॥३॥ 

आपल्या श्रीमुकुटावर मोरपिसांचा दिव्य असा मुकुट आहे तो अत्यंत शोभून दिसत आहे. आपल्या कर्ण युगळामध्ये दिव्य कुंडल आहेत आणि आपल्या भाळ स्थळावर कपाळावर कस्तुरी चंदनाचा गंध शोभून दिसत आहे हे अशा अतिशय मोहक श्रीकृष्ण देवा! आम्हाला दर्शन द्या भक्तांचा सांभाळ करा. 

कामक्रोध मद मत्त कालिया । रगडीं पायांतळीं ॥ भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी !  ॥४॥

विषाने सामर्थ्याने मदोमत्त झालेला असा कालिया नाग त्याला आपण पायातळी रगडले. तशा माझ्या हृदयातल्या काम क्रोध या सर्पांना आपल्या श्रीचरणातळी कुस्करुन टाका. 

आशा मनशा विषयवासना । मोहोजाळ समूळीं ॥

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी ! ॥५॥

माझ्या मनात विषय वासना, निरनिराळ्या आशा, नाना परीच्या मनीषा आहेत मोहजाळ्यात मी गुंतलो आहे ते मोह जाळे तोडून माझे विकार विकल्प हे दोष समूळ नसून मला आपल्या श्रीचरणी ठाव द्या.

गोप गोधनें वनीं चारितां । दध्योदन करकमळीं ॥

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी !  ॥ ६ ॥

गोपगड्यांसह गोधने वृंदावनात विचारणाऱ्या श्रीकृष्ण देवा आपल्या एका श्रीकरामध्ये मुरली तर दुसऱ्या श्रीकरामध्ये दहीभाताचा काला अशी पवित्र क्रीडा करणाऱ्या श्रीकृष्ण देवा आपल्या भक्त जणांचा सांभाळ करा.

पापी अघासुर बकी पिंगला। उद्धरिल्या व्रजबाळी ॥

भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी ! ॥७॥

अघासुर पूतना बकासुर अशा पापी जीवांना उतरणाऱ्या हे श्रीकृष्ण देवा त्या सर्वांहून पापी अशा मला दर्शन द्या माझा उद्धार करा.

कृष्णकिंकरा पाहीं कृपेनें । अभय हस्तें कुरवाळीं ॥ भक्तजना सांभाळी सांवळ्या ! येइं रे ! वनमाळी ! ॥८॥

आपला किंकर दास बाळक आपल्याला वारंवार प्रार्थना करीत आहे हे देवा माझ्याकडे कृपा दृष्टीने पहा आपल्या दृष्टीक्षेपानेच माझे सर्व पापे जळून भस्म होतील हे देवा मला दर्शन द्या माझा उद्धार करा. 

********'**

कविता दुसरी 

अभंग रसास्वाद 

सदर अभंगात कवी पालिमकर महानुभाव देवाला प्रार्थना करत आहेत. 

माझ्या अपराधा साहावे । गुन्हे पोटांत घालावे ॥१॥ 

हे परमेश्वरा माझे सर्व अपराध सहावे माता जशी बालकाच्या सर्व अपराधांची क्षमा करते ते न्याय माझे थोर थोर गुन्हे पोटी घालावे.

मजवरी प्रसन्न रहावे । सर्व नर्क ते चुकवावे ।।२॥ 

माझ्या अपराधा मुळे मी नरकातच जाणार आहे तरी आपण माझ्या सर्व दोषांची क्षमा करून माझ्यावर प्रसन्न होऊन ते सर्व चौर्‍यांशी लक्ष नरकांत पासून मला सोडवावे माझे ते सर्व नर्क चुकवावे. 

आपुली सेवा सन्निधान । द्यावे ते थोर साधन ॥३॥ 

अनंत जन्मांचा पासून मी नाना योनींमध्ये भटकत आहे. आपण मला दर्शन देऊन आपले दुर्लभ असे संविधान देऊन मजा पवित्राला रक्षावे आपले थोर असे साधन प्रेम ते द्यावे. 

तुच व्हावा तुच भेटावा । असि बहू आशा मज देवा ॥४॥ 

मला तुझ्या दुर्लब अशा दर्शना व्यतिरिक्त काही नको मला तूच भावा तूच भेटावा अशी अत्यंत उत्कट इच्छा माझ्या मनामध्ये आहे हे देवा माझी आशा पूर्ण कर

कधि दर्शन देशिल स्वामि । कधि निववीशी हृत्समी ॥५॥

हे परमेश्वरा आपण मज अधमाला कधी दर्शन द्याल? आणि कधी आपले स्नेहमय क्षेमालिंगन द्याल हृदयाशी कवटाळून धराल

दास तुझा पालिमकर । प्रार्थि त्वरी करि उद्धार ॥६॥

आपला तूच्छ असा दास आपल्या श्रीचरणी वारंवार प्रार्थना करीत आहे हे परमेश्वरा! या जन्म-मरण रूप चक्रापासून मला मुक्त करा! माझा उद्धार करा! 

******************

कविता तिसरी 

कवि रामभट्ट यांची मानवाला उद्देशून कविता 

क्षणभंगुर हें खरें । 

मानवा ! रे ! सावध होईं त्वरें ॥ ध्रुवपद ॥

हे मनुष्या तू देवाचे स्मरण सोडून सगळीकडे भटकतोस. आणि संसारातल्या क्षणभंगुर सुखाकडे धावतोस. तू आता तरी सावध हो. कारण हे जीवन क्षणभंगुर आहे. कधी मृत्यूचे बोलावणे येईल हे सांगता येत नाही. म्हणून स्थिर होऊन परमेश्वराच्या स्मरणात स्वतःला गुंतवून ठेव. 

अहंममता लोभेकरुनि । फिरवी देशांतरीं । 

काळ तुला त्वरित ग्रासी । येति गर्भवास रे ! ॥१॥ 

हे माणसा! तूच तुझ्या मनाला अहंकार धारण करायला लावतोस तुझ्या मुळेच माझ्या ठिकाणी ममता लोभ आहेत आणि त्या लोभामुळे तू स्वतःला  देशांतरी फिरवतोस. द्रव्याच्या लोभापायी बराच काळ व्यर्थ गेला आहे आता तो मृत्यू तुला ग्रासलेल्या शिवाय राहणार नाही आणि पुन्हा या जन्माला येण्याच्या फेऱ्यात तुला पाडावे लागेल. 

वासनेच्या छंदें विषय घेसि । तृप्ति तुझि नाहीं रे ! । 

नरतनु दुर्लभ भ्रांति सांडीं । चुकवी जन्मांतरीं ॥ २ ॥ 

भल्या माणसा विषय वासनेच्या आहारी जाऊ नकोस तू अत्यंत आवडीने विषयाचे सेवन करतोस जड चेतन विषयांचा आस्वाद घेतोस तरीही तुझी तृप्ती होत नाही. 

हे मनुष्य! हे मानव शरीर तू असेच विषय भोगांच्या लालसेत वाया घालवले आहेस. आता तरी ते सर्व सोड. कारण हा मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे म्हणून या वासनेच्या भ्रमापासून मुक्त हो आणि त्या परमेश्वराला शरण जाऊन जन्म मरण रूप संसारापासून सुटण्याचा प्रयत्न कर. 

अध्यात्मबोधें वैराग्ययुक्त । हरितें नित्य स्मरीं रे ! ।

मनी देव ध्याउन सतत । निजपदीं स्थिर होई रे ! ॥ ३ ॥

हे मानवा अध्यात्माचा अभ्यास करून स्वतःला ओळख, स्वतःला चा बोध करून घे, आणि वैराग्ययुक्त आचरण करून त्या श्रीकृष्ण देवाचे निरंतर स्मरण कर, मनात त्या देवाचे ध्यान करून त्याच्या नित्य अढळ अचल अशा पदी स्थिर हो.

राम म्हणे शरण साधुसि जावें । अन्य उपाय नाहीं रे! ।

श्यामनाम मुखीं वदुनि श्रीकृष्ण । पदीं लीन होईं रे ! ॥ ४ ॥

शेवटी कवी राम भट्ट म्हणतात परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी आधी साधूंना म्हणजेच गुरुजनांना शरण जावे. त्याशिवाय दुसरा उपाय या जगात नाही. श्रीकृष्ण देवाचे नाम मुखामध्ये जप करून त्यांच्या श्रीचरणी लीन व्हावे.

*************

कविता ४थी

अजुन कां रे ! भ्रमें भुललासी । 

आयुष्य गेलें काळ तुला ग्रासी ॥ ध्रुवपद।। 

हे मनुष्य या संसार भ्रमात का भुलला आहेस तुझ्या डोक्यात भ्रम आहे की ही सुखे सगळी नित्य आहेत. पण आणि त्य शपर अशा सुखांमध्ये तू आपले आयुष्य वाया घालवीत आहेस. 

बाळपण गेलें तारुण्य उभारलें । 

योषितेच्या संगें मन थिजलें । 

आप्तवर्गी स्नेह विस्तारिलें । 

येणें तुझें वय व्यर्थ गेलें ॥ १ ॥

तुझे बालपण खेळण्या-बागडण्यात गेले. आणि तारुण्य आले ते योग्य सीतेच्या म्हणजेच स्त्रीमध्ये अशक्त झाले., भर तारुण्यात इंद्रिय रोगांच्या सुखात तू इतका रमला स्की आप्त वर्गी स्नेही जणांनाही विसरलास. पुढे तुझ्या संसाराचा विस्तार होऊन तू संपूर्ण आयुष्य त्याच खर्ची केले आणि वाया घालवले एकही वेळ देवाचे नाव घेतले नाही. 

लोभसर्पे तुला डंखियलें । 

वासनेनें बहु भुलविलें । 

संसारचक्रीं चित्त लुब्ध जालें । 

तेणें हरिचें स्मरण अंतरलें ॥ २ ॥

लोभ रूपी सर्पाने तुला डंक मारला आहे त्या वासनेमुळे तू बोलला आहेस. या संसार चक्राच्या असत्य खोट्या सुखात तुझे चित्त लुब्ध झाले आहे त्यामुळे त्या श्रीकृष्ण भगवंतांचे स्मरण तुझ्या कडून होत नाही.

आतां तूंचि करीं भवत्याग । 

आत्मबोधें होई अंतरंग । 

विवेकज्ञानें होसी तूं निःसंग । 

तेणें तुझा जाईल भवरोग ॥ ३ ॥

आता तू सावध होऊन भाऊ म्हणजे या संसाराचा त्याग कर परमेश्वर बोधने ज्ञानाने स्वतःचे अंतरंग जाणून घे विवेकाने ज्ञानाने निःसंग होऊन कशातही ममतांना ठेवून त्या परमेश्वराला शरण जा जेणेकरून तुझा हा भव म्हणजे संसाररूप आजार जाईल.

 राम म्हणे सार्थक हेंचि जालें । 

जीव देवा ! शरण ऐसे आले । 

त्यांचें जन्ममरण वाव जालें ! 

प्रेमभावें आनंदें पूर्ण धालें  ॥ ४ ॥

कवी राम भट्ट म्हणतात हे माणसा! जो देवाला शरण जातो त्याचेच जीवन सार्थक होते. त्याचेच जन्म-मरण रूप चक्रा पासून सुटका होते आणि तो परमेश्वराच्या प्रेमाला पात्र होतो.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post