संत कबीर आणि 'लागा चुनरी मे दाग'

संत कबीर आणि 'लागा चुनरी मे दाग'

 संत कबीर आणि 'लागा चुनरी मे दाग' 



एक आध्यात्मिक प्रकारातील हे गीत...

लागा चुनरी मे दाग, छुपाऊँ कैसे...

हे गाणे 'दिल ही तो है' या सिनेमातील आहे. गीतकार आहेत साहीर लुधियानवी...

हे गाणे ऐकल्यावर प्रथमदर्शनी गाण्याचा अर्थ साधा व सरळ वाटतो... पण प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक प्रकारचे गाणे आहे... 

साहिरने हे गीत संत कबीर यांच्या 'मोरी चुनरीमे पड गयो दाग पिया...' या निर्गुण भजनावर आधारित लिहिले आहे...

या गाण्यातील व संत कबीर यांच्या भजनातील काही शब्दांचे अर्थ... 

चुनरी = शरीर 

दाग = पाप

पिया / साहिब / बाबुल  = भगवान(परमेश्वर)

मायका = कैवल्य धाम (परमेश्वराचे घर)

ससुराल = पृथ्वी

पांच तत्त्व = पंचमहाभूते

सोरा से बंध = सोळा संस्काराने बांधलेले

'चुनरी' हे शरीराचे रूपक म्हणून वापरले आहे. परमेश्वराचे घर हे आपले मूळ स्थान. ते आपले माहेर आणि पृथ्वी म्हणजे सासर...

खरं तर पृथ्वीवर आपण पर्यटकासारखे आहोत...

              जास्तीत जास्त शंभर एक वर्षे इथे काढायची, सुख-दु:ख उपभोगायची, जीवनाचा आनंद घ्यायचा, त्रास सहन करायचा आणि एक दिवस आपल्या मूळ स्थानी परत जायचे...!

या गाण्यात साहीर म्हणतो...

 लागा चुनरी में दाग छुपाऊँ कैसे?...

(माझ्या उपरण्याला / ओढणीला डाग पडलेत... हे लपवू कसे?)

हे शरीर पवित्र होते पण अनेक पापं करून मी ते भ्रष्ट करून टाकले आहे...

               आता परमेश्वराच्या दारी मी कसा जाऊ...?

 परमेश्वराच्या घरून पृथ्वीवर येताना मी वचन दिले होते की, मी या शरीराचे पावित्र्य राखीन;... 

                पण पृथ्वीवर आल्यानंतर मी हे पार विसरून गेलो...

               आता परमेश्वराला तोंड कसं दाखवू...! 

               आत्मा पवित्र आहे पण त्यावर मायेचे आवरण पडले आहे... (मैल है मायाजाल) ते जग माझे माहेर आहे आणि हे पृथ्वीवरील जग हे सासर आहे...

                आता माहेरी जाऊन वडिलांना (परमेश्वराला) काय सांगू...!

                कबीराचे मूळ भजन असे आहे...

मेरी चुनरी में पर गयो दाग पिया...

पांच तत्त्व की बनी चुनरिया...

सोरह से बंध लागे पिया...

ये चुनरी मोरे मायके से आयी...

ससुरे मे मनवा खोये दिया...

मल मल धोये दाग ना छुटे...

ग्यान का साबून लाये पिया...

कहत कबीर, दाग तब छुटी है...

जब साहिब अपनाये लिया...

- संत कबीर

कबीर म्हणतात...

               परमेश्वराच्या घरून येताना मी हे पंचमहाभूतांनी बनलेली ओढणी / उपरणे (शरीर) घेऊन आलो...

         त्यावर सोळा संस्कारांचे विणकाम केले. मूलत: हे उपरणे पवित्र होते...

पण...

                मोहाला बळी पडून मी अनेक पापं केली आणि ते उपरणे पार मलीन करून टाकले... 

                 जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी रगडून रगडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. (पुण्य केले) पण काहीच उपयोग झाला नाही...

म्हणूनच ... 

कबीर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की...

हे पापाचे डाग धुवून काढण्यासाठी ज्ञानाचा साबण दे...

कबीराला माहित होते की याचा फारसा उपयोग होणार नाही. 

यावर एकमेव उपाय म्हणजे ... परमेश्वराला शरण जाणे...

जेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारेल तेव्हाच हे डाग जातील...

म्हणूनच ...

               साधनदाता परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू म्हणतात... मलाच एकट्याला शरण या...

                आचरण करा...

     आचरण कराल तरच तुम्हास माझी प्राप्ती होईल...

                अनुसरण करा...

                अनुसरण कराल तरच तेव्हाच तुम्ही माझ्या जवळ येण्यासाठी योग्यतेचे होणार...

                या पृथ्वीवर मनुष्य देहयाचे शरीर धारण करण्यासाठी योग्य ज्या माध्यमातून झालेले आहात...

                त्याच शरीराचा उपयोग देखील परमेश्वर प्राप्तीसाठी होण्यासाठी... परमेश्वराने वाडोवाडी फिरून जे ज्ञान दिलं... त्या ज्ञानाचा झरा आपल्या पर्यत पूर्वजांनी आणून ठेवला व आजही जी साधन्वंत देत आहेत त्याचे कडून मिळणारी अनमोल अशी भेट स्वीकार करून ती अनमोल भेट अर्थातच परमेश्वराने ८०० वर्षांपूर्वी दिलेलं ज्ञान ब्रम्हविद्या सार ते योग्य पद्धतीने आत्मसात करून त्याचे पालन करत करत हा देह कैवल्य गडी घेऊन चला...

            त्यासाठी खूपच काही नाही करायचं बरं... 

            नांमस्मरण व परमेश्वराने दिलेलं आचार विचाराच आचरण बस...

            मग बघा...

             कैवल्याचा गड नक्कीच दूर वाटणार नाही...

            म्हणून च प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतला की आपल्या ला त्यातलं गूढ समजायला उशीर लागणार ... 

            ज्यावेळी आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात करू... प्रत्येक लीळा ही मान्य असेल व राहील नाहक अक्कल हुशारी दाखवण्याची रुची नसेल...

            आपली विद्वाता ही दोषारोप करण्यासाठी नक्कीच करा... परंतु ते दोष कोणती व आपण काय करतोय हे नक्कीच लक्षात असू द्या...

लागा चुनरी मे दाग, छुपाऊँ कैसे...

हे गाणे या अर्थानेच ऐकायला हवे. 

तरच ते आनंददायी आहे!

---------------

लेखक :- सुरेश भाऊ डोळसे

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post