भाग 008 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 008 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 008 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार) 


 अंतिम भाग 

विवाहानंतरची शोभायात्रा 

छत्रे चवऱ्या, मोठे बंबाळ दिवे, नगाऱ्यांच्या गर्जनेंत सर्वांचे स्वागत झाले. वधूवरांना पाहण्यासाठी, माडोमाडी खणोखणी सुंदरी गर्दी करुन, उभ्या होत्या. त्यावेळी शंख निशान भेरी, मंगलवाद्ये वाजूं लागली. ऋषि, ब्राह्मण, भाट हे देवाचे चरित्र गाऊं लागले. सर्वांत पुढे अप्सरांचे नृत्य चालू होते. नारद तुंबर सरस्वती गंधर्व लोक धवली- लग्नाची गाणी गात होते ! सर्वांना सामोरे जाण्यासाठी उग्रसेन महाराज आले. भावपूर्ण अश्रुपूर्व नयनांनी ते देवास भेटले. वऱ्हाडाचे सन्मानाने स्वागत केले.

सर्व वर्‍हाडांचे करिता चंदनाचे टिळे विडे दिले गेले. भीमकाचे कुटुंबिय त्यांत प्रमुख सुधामति राणीस विशेष आदर सत्कार दिला गेला. पत्र, पुष्प फळ, तांबोळी, दिव्य वस्त्र, अलंकार, भूषण, कापुर, कस्तुरी अत्तरांची ओवाळणी झाली. त्यानंतर नाना अलंकार भूषणांनी वधूवरांना शृंगारण्यात आले. आरती उतरली गेली. त्यांचे वरुन निबंलोण करुन, सुवासिनी श्रीचरणी नतमस्तक झाल्या. ती सजविलेली श्रीमूर्ति शब्दातीत होती.

अशाप्रकारे श्रृंगार करुन, खास सजविलेल्या तुंरगमावर भगवान श्रीकृष्ण आरुढले. पुढे रुक्मिणी देवी सुभद्रा करवली मिरवित होती. देवावर मेघडंबरी म्हणजे छत्री धरली. विजणवारे घालण्याचे काम चालू होते. दोन्ही बाजूंना कनदंडांची मिरवणी चालली होती. देवाचे डाव्या बाजूला उग्रसेन भीमक राजा, उजवीकडे नंद- वसुदेव. मागील बाजूस बळिराम सर्व - सैन्यास घेऊन रुबाबांत दिमाखांत चालले होते तर पुढील बाजूस उध्दवदेव निघाले होते. ब्रम्हादिकांचा जयजयकार, समग्र देवांची पुष्प वृष्टि विप्रांचे मंत्रोच्चार ऋषिश्वरांची स्तुतिसुमने, त्यांचे पुढे अष्ट अप्सरांनेच गाणे, गंधर्वाचे धवळी गाणे भाटांचे कीर्तीसुमने, देवाची बिरुदावली चालू होती. स्तुति सुमनांचा जयजयकारांचा जल्लोष होत होता. ढोल ढिमढमा बोल काढीत वाजत होता. दमामे नगारे जोरजोरांत वाजत होते. शंखांच्या फेरी झाडाव्यात तशा शंखानादांनी त्रिभुवन व्यापून गेले होतें. अशा प्रकारच्या वरातीसंह येणारी वधूवरांची जोडी पाहण्यासाठी, नगरवासियांनी खूपच दाटी केली होती. वधूवरांना पाहून, त्या सर्वांना खूपच आनंद आणि प्रचंड वेध लागला होता.

छत्तीस योजनांची ही व्दारावती नगरी. तीन हजार लहान मोठ्या बाजारपेठा, अठरा राजवाडे, तेवढेच राजरस्ते माणसांनी फूलून गेले. अबालवृध्द एकमेकांना एकलीत वधूवरांना पाहण्यासाठी आसुसले होते. सर्वांना एकाचवेळी सुलभतेने दर्शन व्हावे म्हणून, देव स्वत: बहुरूपे धरता झाला. किंबहूना 'विश्वतोमुख' 'सर्वात्मक' हे दैवी भाव इच्छुकांसाठी दर्शनेच्छु साठी देवाने व्यक्त केले. देव सर्वांना आपल्या जवळ दिसू लागले. अठरा राजरस्त्यांवरून अठरा प्रकारें एकच वरात चालल्याने अनुभवास आले. लोक आनंद सागरात न्हाऊन गेले. अशाप्रकारे देव भीमकीसह सर्वव्यापक झाला.

इकडे आकाशमण्डलांतील तारे- नक्षत्रे क्षणकाल स्थिरावली. सुधाकराला प्रचंड वेध संचारला. तोहि अमंळ स्थिरावला. वधू वरांचा हा अपूर्व सोहळा पाहून, तोहि समाधान पावला. आकाशांत देवांनी दाटी केली. विमानी बसुनी पुष्पे ऊधळली. 'व्यापक परमेश्वर' स्वरुप पाहून अशी समावेशक व्यापक सर्वात्मक शक्ती कुठेहि पाहण्यास लाभणार नाही असे प्रत्येक देवतेस वाटत होते. देवाच्या त्या कर्तुम अन्यथा कर्तुम अकर्तुम शक्तिस देवादिकांनी नमन केले. मान्य केले, त्यांनाहि आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव झाली. अशा प्रकारे मनुष्य वेष धारण करुन, मायावेषाने क्रिडणारे परमेश्वर अवतार, जीवांना ज्ञानशक्ति प्रदान करुन परमानंदाचे कैवल्यपद देतात. त्या परमेश्वराचे सान्निधान लागण्यासाठी फार मोठे पुण्य पदरी असावे लागते. किंवा त्याची कृपा जीवांवर झाली तरच त्याचे सन्निधान लाभते. व जन्ममरणाच्या फेर्‍यातून कायमचे मुक्त होता येते म्हणजेच मोक्षगति मिळते. थोडयाच वेळांत वरात मुख्य मंडपाचे व्दारी आली. देवांगनांनी वधूवरांस असे ओवाळले, स्वर्णासह सुगंधि द्रव्ये घेऊन, तबकांचे मधोमध रत्नांचे दिप ऊजळले गेले, त्यांनी वधू वरांवरून आरति उतरण्यांत आली. निजमंदिरात रुक्मिणीसह प्रवेश करतेवेळी सुभद्रा भगिनीने दार उघडले म्हणाली, "लेकासि लेकी देई आन मि तुज न मागे कांहि देवो म्हणे “रुक्मीणी देवी काइ: द्याल इसि” रुक्मिणी म्हणे, “साता धारी: होईल जी कुमारी। तरि देई जे अवतारी हे अन्यथा नव्हे” 


" सात मुलांनंतर होणारी आठवे कन्या आम्ही तुम्हांस देऊं" असे रुक्मिणीने म्हणतांच व्दार खुले झाले आणि देव देवि निजमंदिरी महाली प्रवेशले. "रुक्मिणी पावली श्रीकृष्ण देवो. जाति मनोर्थु सीध्दि!" देविस सुवर्णाचे रासीवर बसवून तिला आजपासून व्दारकेची मालकीण बनविले गेले. आता ऋषिमुनी देवासहितु आरोगणा करील श्रीकृष्ण नाथु" तो आरोगणेचा दिव्य सोहळा पाहण्याकरितां तेथे आपण जाऊं या. 

भोजनासाठी खास सजविलेल्या, ऊभारलेल्या भव्य मंडपांत दिव्य अशा सिंहासनावर रुक्मिणीसहित श्री सारंगपाणी उपविष्ट झाले. विप्रांनी वेदमंत्रोच्चार केले सुवासिनींना वधूवरांना ओवाळले. गंधर्वांनी धवळी गायली. मंगलवाद्ये, शंख निशान भेरींची हजेरी लागली. ब्रम्हादिक , रुषिश्वरांनी देवाचे स्तवनव जयजयकार केले. तो पर्यंत वाढपी तयार झाले. पंति बसल्या. देवास विनंती करुन पंतिस येण्याचे आमंत्रण दिले. वधू वर आले. पंक्तिमध्ये ब्रम्हादिक देवगण, ऋषि मुनी, योगी, तापसी, ५६ कोटी यादव सैन्य, ब्राम्हणवर्ग, भाट, बदीजन, आदि सह परिवारे सर्वजण देवाचे पंगतित विराजमान झाले.

श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या जवळ बसण्यास चार प्रमुखांना सांगितले. त्यात प्रमुख भीमकराजा, वसुदेव, पिताश्री नंदराज व चौथे उग्रसेन महाराज हे होते. समोरच्या दुसऱ्या पंक्तित प्रामुख्याने बळिरामदादा, प्रधानमंत्री उध्दवदेव, धनुर्धारी अजुर्न व इतर राजे आपुला श्रेष्ठत्वाचा क्रम पाहून उपविष्ट झाले. तेथील अन्नाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील जणूं अष्टमहासिध्दि ह्याच ज्याच्या स्वयंपाकिनी होत्या व अन्नपूर्णादेवींच स्वतः षड्रसपरिपूर्ण पदार्थ होऊन आल्या होत्या त्यामुळे ते अवर्णनीय झाले होते !!

शाक- पाकांची अधिष्टत्रीदेवी विग्रहवंती होऊन स्वतःच देवाच्या भाणवस घरांत (स्वयंपाका घरात) पाकनिष्पती करीत होती. तिथे काय कमी पडणार होतं. त्रिभुवनांत गाजलेली अन्नदाची कामधेनु तिच्या अन्नापेक्षाही सरस अन्ने पाहून स्वार (वाढपी) जणू कामधेनुला 'शेवटी पशू पशुच' असे म्हणून उपहासाने हसत होते.

बुध्दि, अधिष्ठाता, नारायण, देव स्वतःच जिथे अवघा क्षीरसागर दुग्धसागर घेऊन पाक निष्पतीस हजर राहिला आहे. त्या ठिकाणी कांही कमी पडेल कां ? बत्तिस आडवाट्यांसह वाढलेले पान, पानाजवळ प्रकाशासाठी ठिकठिकाणी रत्नें ठेवलेली होती. 

देवापुढेहि अशाच प्रकारची रत्न प्रकाशाची व्यवस्था केली होती. मधें कस्तुरीची वाटी, ताटा भोवती इतर वाट्यांमधून पत्रशाखांची अने तिही विचित्र प्रकारची अशा विस्तरली होती. त्यांची नांवे सांगणे अवघड जात होतं. कारण त्यांची मूळस्थिति बदलेली होती. जगात अमृताची थोरवी गातात. पण इथे देवाचे पंगतित मात्र अमृत हे हात धुण्यासाठी पिण्यासाठी पाण्यासारखे वापरले जात होते. तया अन्नपदार्था असावी सीमा मग तयास द्यावी उपमा, 

तांदळांचे भातांचे प्रकार पहा. रायेभोग, गरुड, रामकेळी, श्रीमंत आंबेघड, जिरेसाळी, सुत्रसाळी, कमोद, देसवळि, इत्यादि साळींचे प्रकार असे पांढरेशुभ्र भात पानांवर वाढले होते. साकरमंडि यांचे घडी करुन, पानांत एका बाजूला ठेवले होते. पंचधारा त्यावर सोडून मांडेपुरीया वाढल्या होत्या. चंद्रमंडळांपेक्षाहि उजळ अशा क्षीरधारिया साकरपुरीया गुळोरीया ताटाची - पानांची शोभा वाढवित होत्या. साकर लपाडू, करंज्या कडवण्या, तीळवे, खाने, साकरघोलिये जिव्हेवर ठेवताच विरघळत होते. अमृतफळे, आंबवडे, चिंचचडे, दहीवडे, गुळवडे कांही चिंचेच्या पाण्यांत भिजवलेले तर काही कोरडे तर कांही आंब्याने भरलेले कांही अर्धि कोरे अर्धि भिजलेले असे वाढले होते. ह्या पदार्थांना दृष्टीचा मळ तर लागणार नाहींना अशी शंका येत होती.

नखवली, गहुलि, खेमालतिया, मोगरदेठ आणि श्रवळे यांच्या विचित्र प्रकारच्या खिरी दुधांत आटविलेल्या वाढल्या होत्या. जणूं अमृतांत धुतलेले शिजविलेली चोखट तांदूळांची खीर, क्षीरसागरीच्या दुधांत तयार केलेली ही खीर ताटांत वाढली होती. बारीक पातळ तारेच्या साखरेत घोळलेल्या, सुकुमार सेवया ताटांत दिसत होत्या. नाना प्रकारची भाज्यांची कालवणे सांभारे कीं. ज्यांना खायच्या कापराचा वास दिला होता. त्या ताटांत वाट्यांमधें भरभरुन वाढल्या होत्या. आटवलेले दूध सोनेरी वाटीत मधोमध ठेवून, त्यावर पंचधारा घालून विस्तारले होते. कुकुमवर्णाचा आंब्याचा रस एका वाटीत तर दुसरीत सुंदर निवडलेली कर्दळीफळें चूर्ण करुन ताटांत मांडली होती. दही, ताक, घुसळून, आंबट, चिंबट गुळवणी, चिरलेल्या तळलेल्या चनक वड्या, नाना प्रकारच्या कोथिंबीरी, निंबे, सुरण, आवळे, भंवरसाल, बोले, कोवळ्या वाळुकांत खारलेले आंबे, कोवळ्या काकड्या मिरी, पिंपळी, द्राक्षघड, करवंदे, कुंकमाड, टेंटु सिळकंदे, सेडगे, मुळे सांडेया, कुरपंडीया कोहळवडे तळिव पापड, मीरगोंडे - अशा प्रकारचे लहिये पहिये पन्ही कालणे पदार्थ की, ज्यांची नांवे सांगता - सांगता विस्तार वाढत जाईल.

उदबत्ती, धूपांचे ठाव प्रत्येक ताटाजवळ मांडले होते. रत्नांचे दीवे उज्जळले होते. काही दासी चवरे ढाळीत तर कांही विझंणवारे घालीत ताटा भोवती ऊभ्या होत्या. कापराच्या उदकांनी भरलेल्या झाऱ्या घेऊन सेवक ऊभे होते. वाढवी अन्न पदार्थांची भांडी घेऊन ऊभे होते जे जयास रुचेल ते तयास वाढले जात होते. अशा प्रकारची आगळी वेगळी जगावेगळी पंगत पाहून भीमक राजा संतोष पावला होता.

जे देवाचे चतुर सेवक होते, त्यांना कसे जेवावे हे ठाऊक होते. इतरांना कोणत्या भाजी बरोबर कोणता पदार्थ खावा, कोणत्या पदार्थाची चव कशी आहे हे समजत नव्हते. ते एकमेकांच्या तोडांकडे टकमक पाहात होते. कसे जेवावे हेचं त्यांना सुचेना ते पाहून यादववीर हंसत होते. ऋषिवर्यांना जरी त्रिकाळ ज्ञान असले तरी जेवावे कसे ह्याचे ज्ञान नव्हते ते म्हणत देवाच्या विश्वा मोहिनीने जाणू मोहिनी घातली आम्हावर. आतां कसे बरे जेवावे ? हा प्रश्न सर्वांना सतावित होता. भगवान श्रीकृष्णांनी हे ओळखले. कृपादृष्टीने सर्वांना निरखिले भोजनाचे ज्ञान दिले. मग सर्वजण जेवू लागले..

हे भोजन आम्ही भोके ह्यांची त्यांना जाणीव झाली. मग आपपर भाव विसरुन सर्वजण आनंदाने जेवले. ही देवाने सर्वांना ' भोज्यशकि' प्रदान केली होती. काही जण म्हणत होते, "डोक्यावर जर तोंड दिले असते तर आणखी चार घास रीचवले असते. दीडवीतिच्या पोटांत काय काय भरणार ?" अशा प्रकारे आकंठ प्रमाण सर्व जेवले. खाली भूमीकडे पाहतां येईना म्हणून ते वरच पाहात श्वासोच्छवास करीत होते. आज खऱ्या अर्थाने पोटाचे पारणे फिटले. आणि तहानभूक शमली. असो! रुक्मिणीसहित देवाची आरोगणा झाली. कर्पुरोदके गुळला झाला. विडे तांबोळ सर्वनाना पोहोचले. उद्धव देवास बोलावून वस्त्रे वाटण्यात आली. व्दारकापुरी नगर वासियांना भीमक सैन्याला वस्त्रअलंकार दिले गेले.

भीमक राजास देव म्हणाले, "हे राजा! तुमची तिकडे कौंडीन्यनगरी वाट पाहात असतिल तरी आपण निघावे!" यावर भीमक उत्तरला "हे श्री चक्रपाणी महाराजा ! माझे कौंडीण्याचे राज्यहि आपणच सांभाळावे. मला फक्त आपले सान्निधान घ्यावे मी आपल्या राजवाड्याचा व्दारपाळ म्हणून राहीन पण माझा असा अव्हेर करु नका !" देव हंसले म्हणाले, "हे राजनं ! तेथेच शोभतां ! आम्ही सदैव आपणा जवळच आहोत ही देवकीची आण समजा!"

राजा संतोष पावला. क्षेमालिंगन देऊन श्रीचरणी नम्र झाला. देव त्यांना अनुवर्जित निघाले. तेव्हा भीमक म्हणाला, "आपण सदैव सिंहासनारूढ होऊन मजसेवकाकडे प्रसन्न नयनांनी पाहावे व पुनर्दरुशन द्यावे !"

भीमकासहित सर्व सैन्याला इथून हालवेचना. पाय जड झाले. जणूं पायी शिसे भरले आहे कां काय ? ही अपूर्व बेधशक्ति देवाने आकर्षून घेतली.

भीमकास पाठवनी देऊन, देव राजवाड्याकडे परतले. त्यांचे राजमंदिर राजमहाल म्हणजे केवळ दिव्यत्वाचा अविष्कार असावा प्रकाशाचा चमत्कार असावा असाच खास सजविला होता. रुक्मिणीस वामांगी बसवून, व्दारकेची अनभिषिक सम्राज्ञी केली. रुक्मिणी अर्पिता झाली.

चित्त- वित्त-काया श्रीकृष्णार्पणमस्तु !!

संवत्सर येथील कुंकुमठाण गांवी, भीलमठांत गुरुवार शुध्द फाल्गुन व्दितीया श्रीनगरांत हा ग्रंथ पूर्ण झाला. ३२०३ ओव्या २५ अध्यायांचा हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ कवि संतोषमुनी कृष्णदास यांनी पूर्ण केला. त्याचेहि मनोरथ देवाने पूर्ण केले. पढतेया वाचतेया ऐकतेयांचे हि मनोर्थ सिध्दिस जावोत! हीच शुभकामना !!


श्रीकृष्णर्पणमस्तु !!


अनुवादक- गोपाळ देगांवकर 

भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html


भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html



भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html


भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html



भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html


भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html


भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html



भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html



भजन

हे दयाघना !

हे दयाघना देवकी नंदना करी कृपा आम्हावरी कान्हा ॥ 

बहु शिणविले स्वामीया मी तुजला आता करीत असे याचना ॥ धृo।। 

जीव उद्धरण्यासाठी तुम्ही येता जगजेठी ॥ 

सांगुनी ज्ञानाची महती देऊनी जीवाला प्रिती ॥ 

लाविसी माया मुरली मोहना ॥ १ ॥ 


 तुम्ही युगायुगी अवतरले। जिवासी ज्ञान दिधले ॥ 

याने न कधी घेतले। अत्यंत नरक जोडले ॥ 

परी क्षमा केली तुम्ही दयाघना ॥ २ ॥ करी कृपा....


जीव त्रसला संसारासी गुंतूनी माया जाळासी ॥ 

येऊ पाहतो तव चरणासी । कोणी ना सोडवी यासी ॥

 तुम्ही कृपा करा हे जगजिवना ॥ ४ ॥ करी कृपा.......

 

क्षमा करावी हे जगदीशा । पुरी करावी माझी आशा ॥ 

कर जोडोनी मागतो भिक्षा । न्यावे या पामरा मोक्षा ॥

मज थारा द्या तुमच्या हो चरणा ॥ ५ ॥ करी कृपा......


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post