भाग 005 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

भाग 005 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)

 भाग 005 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार) 



देवाने विनंती पत्रिका वाचली. मुद्रीका घेतली व ताबडतोब रथ बोलविला. देव सुदेवासह एकटेच रथात बसून निघाले. सृष्टीची उत्पत्ती, स्थिता, संहार, उद्धरण इ. करणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वरास सैन्य लागत नाही. ते एकटेच सर्वांना पुरुन उरणारे आहेत. सर्व कर्ता असूनही अकर्ता आहे. थोड्याच वेळात देव मूळ महादेवास म्हणजे कौंडीण्यनगरा समीप पातले. आणि विजयी पताका फडकावित स्थिरावले.

इकडे द्वारकेत गोंधळ माजला. देव असले की शांतता असते, देव निघून गेले की गोंधळ गडबड होते. बळिराम, उग्रसेन महाराजांना हेरांनी सांगितले, ''द्वारकाधिश सुदेवासह मूळ महादेवाचे दिशेने मार्गस्थ झाले आहेत." बातमी ऐकून बळीराम दादा म्हणाले. "आता आपण सहपरिवारे, दळभार घेऊन मूळ महादेव करुन, कौंडीण्यपुरास गेले पाहीजे.'' लगेच बळिराम, अर्जुन, उध्दवदेव , उग्रसेन राजा, नंद-वसुदेव, सात्यकी, आक्रूर आणि यशोदा, देवकी, रोहिणी, सुभद्रा भगिनींसह साठ हजार सुवासिनी, कुमारीकांचा ताफा सज्ज झाला. सर्वजण मूळमहादेवास पोहचले. लगेच सुभद्रा देवास म्हणाली, दादा, भावी पत्नीचा हाकारा ऐकून सख्या सहोदरांना सोडून एकटाच निघालास होय रे !' सर्वांच्या चेष्टामस्करींना देवाने हासत खेळत उत्तरे दिली. भेटी झाल्या. क्षेमलिंगने झाली. बळिभद्र म्हणाले, "श्रीकृष्ण हाच रुक्मिणीस योग्य पति असताना, हा शिशुपाळ मधेच कसा उपटलाय ? ते मी बघतोच आता !"


अंमळशाने संध्या संपली. रात्रीचा अंमल सुरु झाला. पहाटे प्रात:विधी आटोपन कौंडीण्य पुराकडे आगेकूच करावयाचे ठरवून, सर्व निद्राधीन झाले. प्रात:काळी सर्व वऱ्हाड तापी नदीच्या तिरी पूर्णासंगमी पोहचले. तेथे देवाने सहपरिवारें स्नान आटोपले. पुढे अलर्कपुरीस पोहचेपर्यंत मध्यान्ह झाली. दिड तासांच्या प्रवासानंतर सर्वजण वैदर्भ देशी आले. अलर्कपुरी पासून कौंडीण्यनगर अवघे एक योजनांवर होते. तत्रस्थानी सुदेव श्रीकृष्णास म्हणाले, " देवाधिदेवा ! मला ताबडतोब रुक्मिणीकडे जाऊन आपल्या आगमनाची सुवार्ता सांगितली पाहीजे. मला आज्ञा द्या.'' सुदेवास महाप्रसाद देऊन रुक्मिणीकडे रवाना केले..!!!

 तिकडे शिशुपाळाने काय केले, सर्व वहाड व सैन्य घेऊन कौंडीण्यपूर नगर गाठले. त्याच्या बाजूने जरासंद, पौंड्रीक, कासेश्वर, बलबलू, काळींग, बाणासुर, मुरुपीहुगुनु, भुमासुर इत्यादी लहान मोठे असंख्यात राजे स्वयंवरास चतुरंग दलभार घेऊन हजर राहीलं होतं. सर्व सैन्य देवाचे विरोधक होते, म्हणून त्यांचे अधिक वर्णन न करणेच बरे.

 त्या दिवशी च्या मध्यरात्री शिशुपाळास स्वप्नात अनेक अपशकुन दिसल. झोपेतच दचकत होता. स्वप्नात त्याने तिघी विधवा नारी रक्तपात्रे घेऊन भाडत असल्याण पाहीले. भांडण्याच्या भरांत त्यांनी ती रक्तपांत्रे फोडन टाकली असल्याचे पाहील. सुंदर देवालय अचानक भंगले आहे. शृंगारवन ऊजाड माळरान बनले आहे. सुदर जलाशया ऐवजी रक्तसाठा दिसतो आहे असे अपशकुन पाहात ओरडतो तर आवा अखेर घाबरा होत शिशुपाळ जागा झाला. अपशकनांनी स्वयंवराचा धसका शिशुपाळाने जरासंदास बोलवून आणले.

 "लग्नघटिका समीप आली. त्वरा करा ! त्वरा करा!'' असा इशारा जरासंदास दिला गेला.

प्रात:विधि घाईघाईने उरकून घोड्यावर बसून, शिशुपाळाची स्वारी निघाली. तोचि ....तोच महाव्दारांत एक नग्नकुमारी शिंकली. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय अडखळला. चैद्य देशांचा हा भावी राजा घोड्यावरुन जमीनीकडे कोसळला. त्याच्या मुगूटाने धरणीची माती मस्तकी लावली. ही मोठी अपमानस्पद घटना असल्याचे त्याला समजले. अखेर त्याने पालखीत जाणे शहाणपणाचे समजले. थोडे पुढे जातो तोंच - त्याचा आवडता हत्ती एकाएकी मेला. महाव्दारातून कसाबसा बाहेर येतोय तो - तिघी विधवा नारी रिकामा जलकुंभ घेऊन, भांडत असल्याचे पाहीले. शिशुपाळास अगोदरच राग आला होता, त्या आगीत हे प्रसंग म्हणजे तेल ओतणारे वाटले. त्याने रागारागाने त्या तिघींचे मृत्तिका जलकुंभ फोडून टाकले. पुढे जात असतांना डाव्या बाजूने पिंगळा पक्षी ओरडत गेला. वाळलेल्या फादीवर बसलेला एक कावळा केकाटला. नको नकोसे वाटणारे सारे घडत होते. इतके सारे अपशकुनांचे काटेरी वन तुडवित शिशुपाळ सर्व सैन्य व व-हाडीयांसह कौंडीण्यपूरास पोहचला. तेथे त्यास जानवसाहि मिळाला.

कोण होता हा शिशुपाळ ? त्याचे पूर्णआयुष्य कसे होते ? ते आपण पाहू या. पूर्व जन्मी महाविष्णूचे जय- विजय हे व्दारपाळ होते. ऋषीशापांतव त्यांना मृत्यूलोकीं तीन मानवी जन्म घ्यावे लागले. त्या जन्मांत त्यांनी विद्यमान देव अवतार राशी विरोध भक्ती करायची तरच ते तिसऱ्या जन्मानंतर शापमुक्त होतील. हेच ते १ला जन्म हिरण्याक्ष + हिरण्यकश्यपु. २ रा रावण + कुंभकर्ण व ३रा शिशुपाळ + वक्रदंत. असा हा शिशुपाळ सर्व वऱ्हाडानिशी कौंडीन्यपुरास जानवस घरी आला असल्याचे रुक्मिणीस समजताच तिची अवस्था दुनावली. झाले ! आतां शिशुपाळ रुपाने आपला अंतकाळ जणूं आपल्या जवळ आला आहे असे तिला वाटू लागले. तिने देवाचा धावा सुरु केला. अखेर स्वत:ला सावरीत तिने भावकळनेचा हात पकडीत उंच अशा माडीवर आली. पश्चिम दिशा अवलोकीत असतानांच विजयाची गुढी घेऊन आनंदाची पताका घेऊन येणारा सुदेव दिसला.

सुदेव जवळ येताच तिने प्रथम त्यांना नम्र अभिवादन केले व विचारले, "आपणास श्रीकृष्ण महाराज कसे भेटले ? काय बोलणी झाली? ते आता कुठे आहेत?" त्यावर आनंदभरीत वक्तव्य करीत सुदेव म्हणाला, - " हा पैल श्रीकृष्णारावो पाहे । जया ध्वजस्तंभावरी गरुड आहे!" ह्या उत्तराने तिच्या ठिकाणची वेधशक्ति पराकोटीची सीमा वार करुन, तिला क्षणैक भास झाला की, देव आपल्या सान्निधि आहेत, त्त्या वेधाच्या भरात ती खाली झेपावणार तोच सुदेवाने तिला सावरले. तिची गोड समजूत काढली. घडलेला इतिवृत्तांत कथन केला.

इकडे जानवस घरी शिशुपाळ जरासंद व रुक्मिया गप्पा गोष्टीत दंग असतांनाच हेरांनी बातमी आणली, -'' गोविंदा आला हो आला!" तिघांना जबरदस्त धक्का बसला. तिकडे भीमकालाहि श्रीकृष्ण महाराज आल्याचे हेरांनी सांगितले. भीमकाला परमहर्ष झाला. तो सुगंधी द्रव्ये, फळे, पुष्पे, रत्ने घेऊन देवास सामोरे जाण्यासाठी निघाला.

कौंडीन्यनगरांतील अबालवृध्द श्रीकृष्ण पाहण्यास धावले. स्त्रियांनी मांडीवरच्या बालकांना तेथेच सोडून त्या धांवत निघाल्या. हातातला चालू असलेला कामधंदा, घरदार, दुकाने सर्व त्यागून जो तो धांवत सुटला. आज पर्यंत श्रीकृष्ण लिलाच फक्त ऐकल्या होत्या. 

त्या लीला करणारा भगवान आज दिसणारा होता केवढा हा वेधाचा अपार माहिमा : नावातच केवळ एव्हढा वेध आहे तर तो प्रत्यक्ष कसा वेधवंत असेल ? ह्या विचार प्रत्येकजण वेडा होऊन धावत होता. किंबहूना, परमेश्वराच्या अपरंपार वेधशक्तिचा हा भूतो न भविष्यति चमत्कार होता !!!

मंडपात प्रवेश करतांना खूप दाटी झाली. सर्वांना आपले सुलभ दर्शन व्हावे, म्हणून देवाने "विश्वतोमुख' असे आपले स्वरुप प्रगट केले. सर्वांना अवर्णनीय आणि अनाकलनीय असा अपूर्व आनंद प्राप्त झाला. नगरवासीयांसह भीमक देवास भेटला.'' आमच्या कन्यच्या विवाहाप्रीत्यर्थ आपण चार दिवस आमचा पाहुणचार घ्यावा. आम्हाला उपकृत कराव. आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे !" देव हंसले, ' ठीक आहे ! पण आम्हास उतरावयास कोणती जागा आहे ? ' ह्या प्रश्नाने भीमक भानावर आला. ''अंबिका भुवन ! त्याचा परीसर केवळ आपल्यासाठीच आहे. कारण आम्ही नित्यदिनी इथे देवीदर्शनास येत असतो, म्हणून ही जागा राखीव आहे. शिवाय आपणांस उतरावयास हीच जागा योग्य आहे !" भीमक


भीमक राजास व नगरवासीयांस उंची वस्त्रे देवांगे देण्यात आली. यथोचित आदर सत्कार स्वीकारुन भीमक राजाने प्रस्थान केले. रुखवताची तयारी झाली. रुखवतांत मांडावयाचे पदार्थव देवासाठी सुंदर स्वच्छ, नीटनेटका उपहार याकडे रुक्मिणीने जातीने लक्ष पुरविले. रुखवत + उपहार वाढविण्यांत आला. सर्वांचे आनंदाने अंगीकार करीत देव उध्दवास म्हणाले, " देवि न चुके उचितासी!" आता रुक्मिणीदेवी खऱ्या अर्थाने आपल्या परमोच्य विषय प्रेमसंचारास सुयोग्य झाली असल्याने देवाने ताडले. देवाचे सहपांति भोजन झाले. मनमोकळे हसत - खेळत सर्वजण जेवले. यथेच्छ तृप्तीचा ढेकर देत, करव, तीक्ष्ण क्षार, आम्ल, कठोर, मधुर अष्टादश पक्वान्ने व अमीत पत्रशाखा असा षड्रस परिपूर्ण समतोल आहार म्हणजे काय बहार असेल नाही?


भोजनोत्तर भावकळनेने मनाजोगती देवाची षोड्षउपचारे यथास्थित पूजा केली. भावकळना सुदैव यांनाहि नंतर पूजा पुरस्कार प्रित्यर्थ दिव्य वस्त्र अलंकार भेट केले गेले. देविरुक्मिणी साठी अनर्घ्य रत्नांचा अनमोल हार दिला गेला तोहि श्रीप्रभूच्या स्वहस्ते!! तो अनर्घ्य रत्नांचा हार, रोम रोम प्रफुल्लित होत रुक्मिणीने आनंदाने, हर्ष उल्लासाने गळ्यांत परीधान केला.


तत्पश्चात देवाची पूजा करावयास गेलेल्या भावकळनादि दासींना खूष होऊन रुक्मिणीने यथोचित दिव्य वस्त्रालंकार दान दक्षिणा देऊन गौरविले. ती म्हणाली, 'हे सख्यांनो जन्म-जिवीत धन्य झाले. तुम्ही थोर भाग्याच्या! त्या प्रभूचे सान्निध्यात लाभाव ह्यासाठी फार मोठे पुण्य पदरी असावे लागते. शिवाय त्यानेच जर कृपा केली तरच हे घडत. तुम्हास कोणते दान देऊन तृप्त करु हेच मला सुचेनासे झाले आहे."


पुढे फलप्रदानाचा महत्त्वाचा विधि उरकला गेला. तत्प्रसंगी भीमक राजा श्रीकृष्णास म्हणाला, "हे देवा ! इथे फार मोठा धोका आहे. आपले विरोधक खुप जमले आहेत. एकत्रीत आले आहेत. त्यात प्रामुख्याने शिशुपाळ, जरासंद, पौंड्रीक, भूमासुर, बाणासुर, मुरुपान काळीगु, बलबलु शिवाय आमचा ज्येष्ठ पुत्र रुक्मिया, इ. आहेत." त्यावर श्रीकृष्ण महाराज हसून म्हणाले, "आपण निर्धास्त असा. इतक्या विरोधकात खरा विरोधक व नष्ट पुरुष आहे 'रुक्मिया.' आपणच खरोखरीचे चांगले आहात. वास्तविक पाहता हा सर्व सुखसोहळा आम्ही आमचाच मानतो.'' इकडे देवाचे फळप्रदान होते न होते तोच तिकडे दमघोषसुत शिशुपाळाचे फळप्रदान कार्य आरंभले गेले. रुक्मिणीस चिंता लागली की, आता फळप्रदानाच्या कार्यक्रमाला शिशुपाळाकडे जावे लागणार. पण चतुर व शहाण्या भावकळनेने तिची ही चिंता लीलया दूर केली. रुक्मिणीसारखी दिसणारी हुबेहूब ब्राम्हण कुमारी आणली. वय, रुप, रंग सर्व बाबतीत ती रुक्मिणी सारखी दिसत होती. तिला रुक्मिणीचा पोषाख चढवून पाठवूनही दिली शिशुपाळाकडे. ही तिची करणी रुक्मिणी, भावकळना व तमाम पारिचारीक वर्गव ही ब्राम्हण कुमारीका यांना फक्त ठाऊक होती. इतरांना त्याचा मागमूसही नव्हता.


दमघोष राजाने रुक्मिणी समजून ह्या ब्राम्हण कुमारीचे पादप्रक्षालन केले. त्यावर मस्तकही ठेवले. ह्या फळदानप्रसंगी कुणीतरी अशुभ शिंकले व पिंगळे अशुभवाणी ओरडत गेले. फळप्रदान आटोपले. ज्योतिषाला ताबडतोब पाचारण करण्यात आले. त्यांना ती अशुभ शिंक व पिंगळे का ओरडत गेले ह्याबद्दल दमघोषराजाने ज्योतिषांना विचारले तर त्यांनी माना खाली घातल्या. राजा चिडला व रागारागाने बोलला, "अहो ब्राम्हण ! जे विधिलिखीत असेल ते तर घडणारच. तेव्हा सत्य अर्थ सांगा. तुम्हाला हे अभयदान दिले आहे." मगच त्यांनी सांगितले, "अंबिकेच्या भुवनातून रुक्मिणीस श्रीकृष्ण पळवून नेतील. तेथे महानिर्वाणीचे महायुद्ध होईल. बरेच राजे अपमानित होतील. हळद लावून, बाशिंग बांधून आणि डाऊकांकण सोडून शिशुपाळास अपयशाची बुंथि घालून हातचोळीत निघून जावे लागेल. युद्धात हार पत्करावी लागेल." दमघोष राजा खट्ट झाला. उदासिन झाला. असो.


इकडे भगवंतांनी सुदेव गुरुंना बोलावून आणले. त्यांचेजवळ रुक्मिणीसाठी खास निरोप पाठविला. "आपण अंबिकेच्या दर्शनास या. आम्ही आपणास जिंकून नेऊ. भीमकराजाचा फार मोठा अपमान होईल. पण ते आमच्या बाजूचे आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. नगरवासियांनाहि युद्धामुळे त्रास सहन करावा लागेल. कदाचित अनेकांची घरे पडतील. एवढा निरोप पोहचवा." सुदेव निरोप घेऊन गेले. निरोप दिला. अंबिका भुवनातून आपणास नेण्यास आम्हाला काहीही कष्ट नाहीत. पण आपल्या भावासहीत अनेकांना अपमान सहन करावा लागेल."


रुकिमणीने सुदेवाचे बोलणे ऐकून घेतले. आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. कारण ज्या गोष्टीची ती चिंता करीत होती ती देवाने लीलया दूर केली म्हणून ती आनंदाने म्हणाली, "हे विप्रदेव ! आपण श्रीकृष्ण चक्रवर्तीना माझा प्रेमपूर्वक शिरसाष्टांग दण्डवत प्रणाम सांगावा. 'माते न विसरावे सरनांगताते. 'चिंता न संडावी." रुक्मिणीचा धावा+दण्डवत पोचता केला गेला. सुदेव श्रीभगवंतांना म्हणाले, "प्रात:समयी देवी अंबिका दर्शनास येईल. त्याचवेळी ती खऱ्या अर्थाने आपणास सर्वभावे शरण येईल."


त्यानंतर तेलवनाचा समारंभ पार पडला. कार्यक्रम संपतो न संपतो तोच जरासंद भीमकास म्हणाला, "हे राजन! ह्या ठिकाणी खूप राजे चतुरंग दळभार घेऊन हजर झाले आहेत. ते सर्व आपणास माननारे आहेत. पण हे बळिराम व कृष्ण म्हणजे कुशंकेचे दुसरे नावकरी. ते नगरावर हल्ला करुन रुक्मिणीस पळवून नेतील. तरी त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये व गाफीलही राहू नये." जरासंदाच्या बोलण्याला मान देऊन राजाने कडक बंदोबस्त ठेवला. इकडे रुक्मिणीने सुदेवांना विचारले, 'गुरूवर्य नगरात लोक काय म्ह पहारा बंदोबस्त कसा काय आहे ?'' सुदेव म्हणाले, “२७ अक्षयोनि सैन्य नगराभोवती आहे. तरीसुद्धा ते विरोधकांचे सैन्य यादव सैन्याला घाबरुन दबार आहेत नगरवासियांना खात्री आहे की काहीही घडले तरी रुक्मिणीदेवी ह्यांना जाऊन मिळणार आहेत. रुक्मिणीचे स्वयंवर असेच घडणार आहे.'' हे ऐकूण थोडे बरे वाटले.


रजनी संपली. प्रात:काळ झाला. देवाची पूजा झाली. मंगलवाचा कौंडीण्यपूर नगर न्हाऊन गेले. भल्या पहाटे काय झाले? उद्धवास देव म्हणाला शिशुपाळाजवळ बरेच सैन्य एकवटले आहे तरी तुम्ही आपल्या सैन्यास सिद्ध राहण्याचा इषारा द्या. आपणहि युद्धाच्या तयारीने सज्ज राहीले पाहीजे बरं.'' त्यानंतर देवाने कृतवास बोलविले व सांगितले, "तुम्ही यादवांची कुटुंबिय मंडळी, वाणी, व्यवसायिक, अचल सैन्य, अशक्त परिवार, सुभद्रा, यशोदा, देवकी, रोहीणीसे ६० हजार यादव पत्नीसह द्वारकेस रखाना व्हावे. सर्व स्त्रियांना पालखीतून न्यावे. त्या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारा आम्हा तुमचेवर सोपवित आहोत. जाता-जाता सायंकाळ झाली तर तापी नदीच्या तीरी तळ ठोकावा. इकडे रुक्मिणी अंबिका दर्शनास आली की, आम्ही तिला जिंकूनच येऊ. युद्ध करण्यासाठी शिशुपाळ आला तर आम्ही महायुद्ध आरंभू. तुम्ही निश्चिंत असावे. तुमच्या बलपराक्रमावर आम्ही खूष आहोत. म्हणूनच आम्ही तुमची खास नेमणूक करुन तुमचेवर फार मोठी व महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे."


देवाचे बोलणे थांबते न थांबते तोच कृतवर्मा बोलू लागला, "हे मेघ:श्यामा ! मी इथे जीवंत असताना तुम्हाला शिशुपाळाशी लढू देणार नाही. उलटपक्षी हा अशक्त परिवार घेऊन आपणच द्वारकेकडे प्रयाण करावे व माझ्या एकट्याचाच पराक्रम काय आहे तो पहावा. यमाचा काळदंड आणून शिशुपाळ सैन्याला वसुंधरेच्या पाट्यावर वरवंट्याने ठेचून वाटून काढीन. तुम्ही फक्त रुक्मिणीलाच पळवून न्यावी. कदाचित तुम्ही भ्याडपणे मला पुढे पाठवित आहात की काय?" देव हसले म्हणाले, "वा कृतवर्मा ! तुझ्यासारखा शूर वीर क्षत्रिय दुसरा कोण आहे बरे! तुझ्या शक्तिसामर्थ्यावर आमचा पूर्ण भरवसा आहे. म्हणूनच केवळ आपणास हे खास काम दिले आहे. आम्ही वाडवेळ न लागताच येऊ तुम्ही निर्धास्त रहावे.''


अखेर कृतवर्माने देवाच्या आज्ञेनुसार सर्व यथास्थित केले. इकडे ठरल्याप्रमाणे प्रधानमंत्री उद्धवदेवांनी सैन्य सज्ज केले. शिशुपाळाचे हेरांनी त्याचा उलटाच अर्थ लावला. ते शिशुपाळास सांगावयास गेले की, "यादव सैन्य घाबरुन परत फिरले. द्वारकेच्या दिशेने ते मार्गस्थ झाले." ते ऐकून शिशुपाळ म्हणाला, "हा श्रीकृष्ण कोणत्या कामसाठी आला आहे? आणि चालला आहे ? तेच समजेनासे झाले आहे.' "सैन्याचा गराडा पाहून कृष्ण घाबरलेला दिसतोय." जरासंद. ही बोलणी तिकडे चालली आहेत. इकडे रुक्मिणास न्हानाची तयारी झाली. रुक्मिणी भावकळनेस म्हणाली. “सखे ! मी अंबिका दर्शनास का जाऊ? तो उपाय ती युक्ती सांग.” भावकळना म्हणाली, "ते मला सांग, अंबिका स्वप्नात आली. तिने विवाहाअगोदर कुळस्वामिनी दर्शनास येण्याचे बजावले आहे."


आणि भावकळनेची नामी युक्ती रुक्मिणीस पटली. तिने आपले स्वप्न सुधामतिस सांगितले

क्रमशः

भाग 01 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/001.html

भाग 02 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/002.html

भाग 03 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/003.html

भाग 04 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/004.html

भाग 05 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/005.html

भाग 06 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/006.html

भाग 07 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/007.html

भाग 08 श्रीकृष्ण लीळा सागर अंतर्गत    (रुक्मिणी स्वयंवर - कथासार)👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/008.html



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post