ज्ञानसूर्य म्हाईंभट संक्षिप्त चरित्र
म्हाइंभट आता खूपच अशक्त झाले होते. आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस प्रभू श्रीचक्रधराच्या स्मरण, मनन, चिंतनात घालवावे आणि स्वामींच्या आज्ञेने पालन करून असन्निधान धर्माचे आचरण करावे या उदात्त हेतूने आचार्य श्री नागदेवांना व आश्रमाला सोडून ते अटन, विजन, भिक्षा, भोजन या नित्य विधीचे आचरण करीत करीत खूप लांब प्रदेशात निघून आले होते. कुणीतरी परमार्गातील भिक्षु भेटावा आणि त्याच्या मदतीने पुन्हा आश्रमांत जावे असे त्यांना वाटू लागले होते. अशा विचारांत असतांनाच उमाईसा ही आचार्याचीच शिष्या परमार्गातील एक महान तपस्विनी धर्माचरण करीत करीत नित्यविधीचे पालन करीत. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या आदेशाप्रमाणे अटनानुक्रमे म्हाइभटांना भेटली आणि म्हाइंभटांना अपार आनंद झाला. असा परमेश्वर भेटलेयाचा आनंद दोघांनाही झाला.
म्हाइभंट शरिराने खूपच क्षीण झाले होते. जणू त्यांना आपल्या मृत्युचीच चाहुल लागली होती. म्हणून अत्यंत आर्जवी स्वरात ते उमाईसास म्हणतात, उमाई ! तूं कसेही करून मला आता रिद्धीपूरला घेवून चाल. शेवट परमार्गातच व्हावा ! परमेश्वरपूरातच व्हावा! अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी अतिशय अशक्त झालो, थोडेही चालण्याचे त्राण माझ्यांत उरले नाही, तू कसेही करून रिद्धिपूरला पोहचविण्याची माझी व्यवस्था कर.
उमाईसाला अति दुःख झाले. परमार्गाचे आधार स्तंभ प्रकांड पंडित, षड्शास्त्र संपन्न तेजस्वी विद्वान स्वामींनी ज्यांची प्रशंसा केली असे थोर महात्मे श्री म्हाइंभट ! ज्यांनी स्वामींचे ‘'लीळाचरित्र' अत्यंत कष्ट घेवून, संशोधन करून, परमार्गासाठी, परमार्ग अव्याहत सुरू रहावा ह्यासाठी स्वामींची प्रवृत्ती जाणून लिहून काढले !! तेच हे श्री म्हाइंभट आज अशा विकल अवस्थेत आपणासमोर विनंती करतात ! उमाईसेला कससेच वाटले. त्यांची कशी सेवा करावी? रिद्धिपूर तर अत्यंत दूर आहे. कसे पोहचवावे? अशा विचारांत ती पडते; तोच आपल्या जवळ असलेल्या अंगठीची तिला आठवण होते. ऐन संकट काळी परमेश्वर धावून आला, असे समाधान उमाईच्या चेहऱ्यावर पसरते आणि अशक्ताची तेही एका थोर महापुरूषाची आपणाकडून सेवा होवू शकते ! प्रेमाचा उपाय एवढ्या सहजासहजी आपणास घडतो. या आनंदात ती आपली अंगठी गहाण ठेवते व भाड्याच्या पालखीत म्हाइंभटांना बसवून रिद्धीपूराकडे ती घेवून येते. श्री गोविंद प्रभुंच्या सव्वाशे वर्षाच्या वास्तव्याने पुनीत झालेले श्री रिद्धीपूर नगर म्हणजे स्वामी श्रीचक्रधर प्रभुंनी संबोधिलेले परमेश्वरपूर दिसले.
श्रीचक्रधर प्रभुंनी उत्तरापंथे प्रयाण केले. श्री नागदेवांना आचार्य करून संपूर्ण भक्तिजनांना श्री गोविंद प्रभूकडे निरोविले. श्री गोविंद प्रभूही आपले अवतार कार्य संपवून निजधामाला गेले होते. आचार्य श्री नागदेव आपल्या सातशे गुरूकुळासह रिद्धिपूरलाच होते. म्हाइंभट येत आहे असे समजताच त्यांना अत्यंत आनंद झाला. सर्व गुरूकुळासह आचार्य त्यांना सामोरे गेले. आचार्यांना पाहताच म्हाइंभटांना तर आनंदावेगामुळे चालणेच अशक्य झाले. आचार्य जवळ येताच अतिशय प्रेमवेगामुळे त्यांनी आचार्यांचे चरण आपल्या हातांनी कवळले. अत्यंत हृदयंगम असा तो दोन महापुरूषांचा श्रध्देय पुरूषांचा भेट सोहळा पाहून आणि म्हाइंभटांची विकळ अवस्था पाहून सारे गुरूकुल हेलावून गेले. सर्वांचे डोळे आनंद मिश्रीत दुःखाश्रुंनी पाणावल्या गेले. आचार्यांनी आपले चरण कसेतरी म्हाइंभटाचे हातून सोडवून घेतले. म्हाइंभट अत्यंत दुःखावेगाने म्हणाले, “भटो निढळावरी पावो ठेवा” . “आचार्यवर ! आपले पवित्र चरण माझ्या पामराच्या मस्तकावर ठेवा.” आचार्य सद्गदीत झाले व म्हणाले, “भटो ! निढळावरी श्री चरणु तो गोसावीयांचा की” असे म्हणून आचार्यांनी आपले पाय म्हाइंभटाचे हातून कसेतरी सोडवून घेतले आणि अत्यंत स्नेहाने आपला हात म्हाइंभटाचे मस्तकावर ठेवला.
म्हाइंभटांनाही आता खूप समाधान वाटू लागले. आपल्या प्रकृतीची क्षीणता ते विसरू लागले. परमेश्वराच्या स्मरणात लक्ष केंद्रित करू लागले. पण मन मात्र भूतकाळाच्या अवकाशातून फेरफटका मारूनच येई आणि आपल्या गत आयुष्याचा एक स्मृति पटच मनःचक्षु समोर साकार करी. “आपण खुप दोषी आहोत ! अपराधी आहोत ! अति गर्विष्ठपणे - प्रत्यक्ष स्वामीशी वागलो ! अहंकाराने परमार्गाशी वागलो ! ही खंत त्यांना सतत बोचत होती. आपणास आता देव नेईल की नाही? तो स्वामी श्रीचक्रधर प्रभू आपल्या सर्व दोषांची क्षमा करून पदरात घेईल की नाही? म्हणून म्हाइंभट दुःखपूर्वक प्रायश्चित करू लागले. जीवनातील एकेक घटना त्यांचे समोर साकार ठ होऊ लागली. आपल्या गत आयुष्याचा एक विविध रंगीत पट ते एका त्रयस्थाच्या भूमिकेने निरखू लागले.
दक्षिण देशाच्या पृष्ठभागावर संथगतीने वाहणाऱ्या पवित्र गोदावरीच्या चे दक्षिण तीरावर एक छोटेश सराला नावाचे गांव आहे. सरालेकार पंडितांची री परंपरा दक्षिणेकडे खूपच गाजत होती. त्याच गावांत, त्याच परंपरेत एक संपन्न न्टो व सुविज्ञ ब्राम्हण कुळांत म्हाइंभटाचा जन्म झाला होता. विद्वानांच्या संपर्कात या आणि गर्भ श्रीमंतीतच म्हाइंभटाचे बालपण जात होते. जात्याच तीव्र बुध्दीच्या श्री 'म्हाइया' पाहता पाहता वेद, वेदाङगादी दर्शन शास्त्रांत प्राविण्य मिळवीत होता चे आणि म्हणूनच विशेष विद्या विद्याध्ययनासाठी त्याला आपल्या पाठविण्यात आले.
गणपती आपयो हे विद्वान पंडित होते. षड्शास्त्र संपन्न असून देवगिरीच्या रामदेव राजाच्या राज दरबारी त्यांच्या बहुमान होता. आपला भाचा अल्पवयातच ज्ञान ग्रहण करू लागलेला पाहून गणपती आपयोंना आनंद वाटत होता. आपले सर्व कौशल्य पणास लावून त्यांनी म्हाइंभटास सकल शास्त्र संपन्न केले होते. म्हाइंभट एक विद्वान पंडित झाले होते. उणीव होती ती केवळ 'प्रभाकर' दर्शनाची (मिमांसा दर्शनाची) त्या काळी महाराष्ट्रात 'प्रभाकर' शास्त्र कोणीच शिकवीत नसे. कारण त्या अभ्यासाने अंगात कोड फुटते किंवा निर्वंश होतो अशी समजूत प्रचलित होती. त्यामुळे म्हाइंभट प्रभाकर शास्त्राविना अपूर्ण आहेत; अशी खंत गणपती आपयोंना बोचत होती आणि म्हाइंभटास सकल विद्या, सकल दर्शने अवगत व्हावीत ही महत्त्वाकांक्षा ही वाढत होती.
महाराष्ट्रांत प्रभाकर शास्त्र शिकविता येत नाही म्हणून काय झाले ? त्या शास्त्रांत त्याला कां अज्ञान ठेवायचे? पृथ्वीतलावरील सकल दर्शन शास्त्रे संपूर्ण विद्या आणि सर्व कला मध्ये त्याला निष्णात केलेच पाहिजे. त्यासाठी त्याला महाराष्ट्राबाहेर विद्याध्ययनासाठी विद्यानगरीला पाठवायचेच. असा निर्णय गणपती आपयोंनी घेतला. मामांच्या त्या उदात्त विचाराने म्हाइंभटास हर्ष झाला. खूप खूप शिकावे. सृष्टीच्या अंतीम सत्याचे आत्म्याचे परमात्माचे सारे सारे ज्ञान प्राप्त करावे, अज्ञान असे राहूच नये. सूर्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रखर तेजाने तळपत राहावे. अशी म्हाइंभटाचीही महत्त्वाकांक्षा वाढत होती. त्याचे ते स्वप्न साकारतही होते.
गणपती आपयोंनी म्हाइंभटांना ज्ञानदान करून विद्वान पंडित बनवले ना होते. विशेष विद्याध्ययनासाठी त्याला तेलंग देशातील विद्यानगरीला पाठविणार च होते. त्यांच्या तीव्र बुद्धीचा विश्वास गणपती आपयोंना असल्यामुळे म्हाइंभट ने सर्व श्रेष्ठ पंडित बनून येईल असा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण झाला 7. होता आणि त्यातच 'अशा लक्ष्मी नी सरस्वती अलंकृत असलेल्या पंडिताला मी आपल्याच भाच्याला शिष्यही असलेल्या म्हाइंभटासच आपली मुलगी 'देमाईसा' त देवून मुक्त का होवू नये? असा सुदूरदर्शी विचार गणपती आपयोंच्या चाणाक्ष त बुद्धीला स्पर्शन गेला. सर्वास विश्वासांत घेवून आपला मनोदयही त्यांनी स्पष्ट त केला आणि एका सुयोग्य शुभमुहूर्तावर म्हाइंभटाचे शुभलग्न देमाईसा बरोबर ने लावून दिले. प्रभाकर शास्त्राच्या अध्ययनासाठीच हा लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळ्याचे आनंदाचे दिवस पार पडत नाही तोच म्हाइंभटाचे प्रस्थान प्रभाकर शास्त्राच्या अध्यायनासाठी तेलंग देशाकडे झाले.
तेलंग देशातील विद्यानगरी म्हणजे प्रकांड पंडितांचे विद्वद्जनांचेच वस्ती स्थान. नावाप्रमाणेच विद्यानगरी हे सकल विद्यांचे माहेर घर. पण अशा ह्या य विद्यानगरीत सामान्य माणसांना प्रवेश मिळणे कठीण होते. अनाधिकारी व्यक्तीस विद्येचा गंधही मिळत नसे. विद्याध्ययनास आलेल्यास कठीणतम कसोटीतून जावे लागे. अत्यंत कठोरपणे तेथे नवागतांची परीक्षा घेण्यात येई. तो अधिकारी आहे किंवा नाही हे पाहण्यात येई. या पूर्व परिक्षेत तो उत्तीर्ण झाला तरच पुढे कुठे नही विद्याभ्यासास सुरवात होई.
विद्यानगरीतील विद्याध्ययनास आवश्यक असलेल्या सर्व कसोटीतून म्हाइंभट निर्विवादपणे उत्तीर्ण झाले होते. शेवटी विद्याध्ययनास सुरवात करायची म्हणून त्यांचे हाती विडा देण्यात आला. मंदिरात जाऊन देवतेस विडा वाहायचा होता. मंदिरात अंधकार दाटलेला होता. लहान अशा ठेंगण्या दरवाज्यातून मोठ्या बुद्धी कौशल्याने प्रवेश करून विडा ठेवावा लागे. तो विडा त्या दाट अंधारात जर व्यवस्थित ठेवला गेला नाही तर ? किंवा विडा ठेवतांना देवतेवर लोंबकळत असलेला घंटा वाजला तर? तरी ही विद्याध्ययनाची द्वारे बंद.
अशी ही शेवटीची कसोटी! आणि कुशाग्र बुद्धीच्या म्हाइंभटांनी तीही पूर्ण केली. यथा योग्य विडा चढवून अत्यंत विनयाने व आदराने गुरूजनांना वंदन करून एकदाचे विद्याध्ययनास बसले. गुरूजनांनाही म्हाइंभटाच्या बुद्धीमत्तेचं खुपच कौतुक वाटत होतं. एक विद्वान, कुशाग्र बुद्धीचा शिष्य आपणास मिळाला म्हणून त्यांनी म्हाइंभटास अगदी अवंचकपणे विद्यादान करण्यास प्रारंभ केला. तीव्र बुद्धीच्या म्हाइंभटाच्या प्रज्ञेचे कौतुक करीत करीत गुरूजनांनीही त्याला प्रभाकर शास्त्रा बरोबरच अनेक विद्यामध्ये अल्पावधीतच निष्णांत केले. म्हाइंभट आता सकलशास्त्र वेदविद्या पारंगत झाले होते. स्वत:चे मनन चिंतन वाढले होते. वादविवादांत ते आपल्या गुरुजनांनाही हरवू लागले होते. त्यामुळे म्हाइंभटा समोर कोण्या विद्वानाची चर्चा करावयाची हिम्मत होत नव्हती आणि सहाजिक म्हाइंभट विद्याबलाने अनेकांना पराजीत करीत करीत मायदेशी परतले ते मात्र विद्या-गर्व घेवूनच.
महाराष्ट्रातील गोदातीर म्हणजे विद्वानांचे वस्तीस्थान. एकापेक्षा एक विद्वान या गोदेच्या उभय तीरावर निवास करीत असत. उत्तरेला काशी तर दक्षिणेला पैठण हे विद्येचे पीठ मानण्यात येई. थोर थोर विद्वानांच्या परंपरा ह्या गोदेच्या कुशीत वाढत होत्या आणि त्यातच आता भर पडली ती म्हाइंभटाची किंवा अशाच एका सर्व श्रेष्ठ विद्वानाची गोदातीराला उणीव होती. म्हाइंभटाच्या आगमनाबरोबरच विद्येच्या उन्मादाने स्वत:ला श्रेष्ठ समजणारे पंडित अधिकच द्वेषाने जळफळत होते. चर्चा करण्याच्या निमित्ताने आता म्हाइंभटास आमंत्रणे येवू लागली. वेगवेगळ्या पंडितांच्या विद्यापिठांत म्हाइंभटास आवाहन केल्या जात होते. आपल्या आगाध तर्काने कुशाग्र बुद्धीने म्हाइंभट पंडितांना लिलया हरवून विजय संपादन करून येत असत. अशा प्रकारे पंडित वर्गामध्ये अजिंक्य होवून ते खूपच गर्वोन्नत झाले होते. स्वत:चे गुरू, मामा, सासरे असलेल्या गणपती आपयो बद्दलही ते तुच्छतेने पाहू लागले होते. स्वतःला पृथ्वीतलावरील ज्ञान सूर्य भासविण्यासाठी दिवसा मशाल घेवून आणि गोदावरीच्या उभयतीरावरील पंडित जणू माझे पुढे तृणवत आहेत, म्हणून पायांत गवताचे तोडे घालून ते विश्व विजयी वीराप्रमाणे फिरू लागले होते. आकाशी तो एक सूर्य आणि पृथ्वीतलावरील मी एक ज्ञानसूर्य आहे असे आवाहन त्यांनी दिले होते.
हे आव्हान ने स्वीकारण्याची प्रज्ञा मात्र कोणाची होत नव्हती.
गणपती आपयो एक विद्वान पंडित होतेच पण त्याच बरोबर देवगिरीच्या यादव नरेश रामदेव राजाच्या दरबारात एका मोठ्या हुद्यावर असलेले ते राजकारणी पुरूष होते. महाराष्ट्रात धर्म संस्थापना करणाऱ्या प्रभु श्रीचक्रधरांचे ते निष्ठावंत उपासक होते. नात्याने भाचा असून शिष्य असलेल्या म्हाइंभटाचा विद्या गर्व पाहून त्यांना त्यांचे बद्दलची एक विशेष प्रकारची काळजी निर्माण झाली होती.
कदाचित विद्या गर्वाहंकारामुळे म्हाइंया आपले सर्वस्व हरवून न बसो? याच्या विद्याभ्यासाचे सार्थक होईल. त्याला रूप येईल असा कोणतातरी उपाय शोधला पाहिजे. असा विचार करीत असताच प्रभु श्रीचक्रधर स्वामींची आठवण होते. मनोमन ठरवितात की, कसेही करून याला स्वामीकडे पाठविले पाहिजे, त्यांच्या अपार वेधकत्वाने आणि अमृत वर्षीणी वाणीने महिंद्राच्या ठिकाणी नम्रता येईल. विद्यागर्व नाहीसा होईल. स्वामीच्या परावाणीच्या स्पर्शानं याच्या विद्येचे सोने होईल. अशा विचारातच ते म्हाइंभटाकडे येतात.
एकदा त्यांची गणपत आपयोंशी चर्चा झाली. मग म्हटले, “गंगा नदीच्या दोन्ही काठांवर फक्त गणपत आपयोलाच थोडा फार शास्त्रांचा अभ्यास आहे.”
मग गणपति आपयो म्हाइंभटाच्या विद्वतेची प्रशंसा करून अत्यंत आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या स्वरांत म्हणतात.
भटो आपण खुप प्रगती केली आहे. जगातील पंडितांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. पण जर आपण डोमेग्राम निवासी स्वामी श्रीचक्रधर प्रभूंची भेट घ्याल तर आपल्या या संपूर्ण विद्वतेला एक वेगळेच रूप येईल. आपण केलेल्या विद्याभ्यासाचे सार्थक होईल.
म्हाइंभटांनी विचारले, “ते विद्वान आहेत का ?” “नाही ते महात्मे.” म्हाइंभटांनी विचारले, “काही शास्त्र जाणतात काय ?” गणपत आपयोंनी म्हटले, “शास्त्र जाणतात की नाही ते माहीत नाही, परंतु ते मराठी फारच सुंदर व उच्च प्रतीची बोलतात.” म्हाइंभटांनी मनाशीच म्हटले, “ते महात्मे. शिवाय मराठी बोलतात. तर माझ्याशी बोलतील काय? ते जर मराठीत बोलतील तर मी संस्कृतमध्ये बोलेन.” मग गणपत आपयोला विचारले, “तुम्ही ज्यावेळी त्यांच्या दर्शनाला जाल त्यावेळी मला घेऊन जाल का?” “हो घेऊन जाईन.”
मग एके दिवशी गणपत आपयो सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले. मग म्हाइंभटालाही बोलवून सोबत नेले. रस्त्यात म्हाइंभटांनी सर्व प्रकरणे मनन केलीत, ते असे बोलतील तर मी असा बोलेन,' असा विचार करीत भामाठाणाला आले, गणपत आपयो काही कामानिमित्त गावात गेले. तेव्हा पिंपळे वामनभटांची भेट झाली. त्यांना विचारले, “तुम्ही कुठे जात आहा?” “मी सर्वज्ञांच्या दर्शनाला जात आहे.” “तर मग म्हाइंभटाला सोबत घेऊन जा, मला काही काम आहे.” त्यांनी “हो” म्हटले. मग पिंपळे वामनभट व म्हाइंभट सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर होऊन आतील ओट्यावरील आसनावर बसलेले होते. सर्वज्ञांच्या श्रीकंठी फुलांचा गळदंडा (माळ), श्रीमुखी पानाचा विडा, कपाळावर आडवे चंदन लावलेले असे म्हाइंभटाने पाहिले. पिंपळे वामनभटाने सर्वज्ञांना दंडवत घातले. श्रीचरणा लागले. म्हाइंभटांनी फक्त आपला हात आपल्या उराला जोडून नमस्कार केला. मग दोघे सर्वज्ञांजवळ बसले. म्हाइंभटाने सर्वज्ञांना पाहिले आणि मागील सर्व विसरले, पिंपळे वामनभट थोड्या वेळानंतर सर्वज्ञांना दंडवत घालून निघाले. ते म्हाइंभटांना म्हणाले, “चला जाऊ.” पण ते गप्पच होते. सर्वज्ञांनी वामनभटांना सांगितले, "तुम्ही पुढे चला. यांना आवडेल तोपर्यंत येथे असू द्या; मग हे येतील." पिंपळे वामनभट निघाले.
मग सर्वज्ञांनी म्हाइंभटांना विचारले, "जीवात्मा जन्ममृत्यूच्या बंधनापासून कायमचा सुटतो, अशी काही प्रतिती आहे का ?" म्हाइंभटांनी म्हटले, “आहे; पण एवढेही आपल्याला अजून माहीत झालेले नाही. मग आतापर्यंत आपण कोण्या कामात अडकले होते ?" तेव्हा बाइसांनी म्हटले, "याची बाबांवर बुद्धी (श्रद्धा) नाही." असे म्हणून रागावू लागल्या. तेव्हा सर्वज्ञांनी तिला श्रीकरा ने, श्रीमुखाने, श्रीमुगुटाने मनाई केली. "बाई रागावू नका. जीव स्वरूपी अनंता जन्मांतील अपात्रता आलेली आहे. ती सहजासहजी लवकर फिटत नाही, तुम्ही तरी पूर्वी आमच्याशी कसे वर्तन केले होते?"
मग सर्वज्ञांनी म्हाइंभटांना विचारले, “कशी प्रतिती आहे ?" म्हाइंभटांनी उत्तर दिले, “कर्म करावे, कर्म केल्याने अंतःकरण शुद्ध होते, शुद्ध अंतःकरणामुळे वैराग्य उत्पन्न होते, वैराग्यामुळे ज्ञान उत्पन्न होते, ज्ञानाने मोक्ष होतो." यावर सर्वज्ञांनी सांगितले “कर्मापैकी नित्य व नैमित्तिक कर्मे ती प्रतिदिनाचा चरितार्थ चालवताना जी हिंसा होते तिच्या प्रतिवायाच्या दुःखाच्या परिहारा गेली, कामिक कर्मे ती ज्या कामनेने केली त्याप्रमाणे फळे झाली, मग कोणते कर्म उरले? मग अंतःकरण कसे शुद्ध होईल? व वैराग् कसे उत्पन्न होईल? मग ज्ञान कसे होईल आणि मोक्ष कसा मिळेल? हे सर्वच खोटे आहे. अविद्यायुक्त जीवाला स्वतःहून ज्ञान होन नाही." म्हाइंभटांनी विचारले, "का होत नाही? का होते?" यावर चर्चा सुरू झाली. मग म्हाइंभटांनी मनाशी म्हटले, 'खरेच गणप आपयोनी म्हटल्याप्रमाणे हे अत्यंत सुंदर व उच्च प्रतिची मराठी भाषा बोलतात, आता संस्कृत भाषेत चर्चा करू.' मग संस्कृत भाषे चर्चा सुरू केली, तेव्हा सर्वज्ञ संस्कृत सहज सुलभतेने बोलू लागले. जे अर्थ सांगितले ते म्हाइंभटांनी कधी ऐकलेले नव्हते. अशी संस्कृ भाषेत तास दीडतास चर्चा झाली. सर्वज्ञांनी त्यांना संस्कृत भाषेतील चर्चेतसुद्धा निरुत्तर केले. म्हाइंभट गप्पच राहिले.
मग सर्वज्ञांनी आपणहूनच म्हाईंभटांना ब्रम्हविद्येचे निरूपण केले. तीन तासपर्यंत चर्चा सुरू होती. म्हाईभटांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सर्वज्ञ परमेश्वर अवलीळा देत होते.
शेवटी म्हाईभटांच्या सर्व शंकांचे निरसन झाले होते. सर्वज्ञांविषयी श्रद्धा निर्माण झाली. सर्व अहंकार गळून पडला होता. ते पुर्णपणे श्रीचक्रधर प्रभुंना शरण आले. मग सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी त्यांना ब्रह्मविद्येचे निरूपण केले. आणि त्यांना परमेश्वराचे यथार्थज्ञान झाले. पुढे म्हाइंभटानी संन्यासही घेतला आणि आद्य मराठी ग्रंथराज लीळाचरित्राचे लेखन केले. त्यांचे ते कर्तृत्व अमर आहे.
अशा महान विद्वानाला शिरसाष्टांग दंडवत प्रणाम