बुद्धिमान व्यक्तीची १५ लक्षणे!!
१) एक लाख कमावणारा बुद्धिमान माणूस कधीही वीस हजाराचा फोन सोबत ठेवत नाही.
२) बुद्धिमान माणूस कर्जावर कार, घर, बाईक असल्या चैनीच्या वस्तु घेत नाही. होईल तेवढे काटकसरीने पण समाधानी जीवन जगतो.
३) बुद्धिमान माणूस फेसबुक, ट्विटर , व्हास्अँप, नेटफ्लिक्सवर वेळ घालवणार नाही. तो चित्रपटही पाहत नाही. रिकाम्या वेळात तो पुस्तके वाचन करीत असतो.
४) बुद्धिमान व्यक्ती सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर कोणाशीही वाद घालणार नाही.
५) बुद्धिमान माणूस कधीही कमाईच्या एका साधनावर अवलंबून नसतो. त्याचा काहीना काही साईड बिझनेस असतोच.
६) बुद्धिमान माणूस महागडे कपडे, महागडी कार, महागडी घड्याळ आणि महागड्या वस्तूंवर पैसे वाया न घालवता ते पैसे गुंतवतो.
७) बुद्धिमान माणूस आपल्या घरातील वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करत नाही.
८) बुद्धिमान लोक खूप वक्तशीर वेळेचे नियोजन करण्यात पटाईत असतात. वेळ वाया घालवणे त्यांना अजिबात आवडत नाही.
९) बुद्धिमान माणूस आपल्या आरोग्याची काळजी घेतो.
१०) आयुष्यात ठेच लागल्यावर अनेक प्रकारच्या चुका घडल्यावरच माणूस शहाणा बुद्धिमान बनतो आणि बुद्धिमान मनुष्य कधीही दोनदा तीच चूक करत नाही.
११) बुद्धिमान मनुष्य अतिआवश्यक त्याच वस्तू विकत घेतो अनावश्यक वस्तूंवर खर्च करत नाही.
१२) बुद्धिमान मनुष्य आस्तिक असतो कमी प्रमाणात का होईना त्यांची देवावर श्रद्धा असते.
१३) बुद्धिमान मनुष्य कधीच साधुसंतांची निंदा करीत नाही.
१४) बुद्धिमान मनुष्य कोणतेही कार्य करत असताना मात्यापित्यांच्या केव्हा गुरुचा सल्ला घेतो त्यांच्याशी विचार विमर्श करतो मगच ते कार्य करतो.
१५) बुद्धिमान मनुष्याच्या आचारा विचारात शुद्धता असते तो कधीही अधर्माचरण करीत नाही.
१६) बुद्धिमान लोक कमी बोलतात. आणि जास्त विचार करतात. मूर्ख लोक विचार कमी करतातआणि बोलतात जास्त.