मन: सत्येन शुद्धति - सत्य बोलण्याने वाणी आणि मन शुद्ध होते.

मन: सत्येन शुद्धति - सत्य बोलण्याने वाणी आणि मन शुद्ध होते.

मन: सत्येन शुद्धति - सत्य बोलण्याने वाणी आणि मन शुद्ध होते. 


महाभारताच्या शांतिपर्वात शंख व लिखित या दोन बंधूची एक कथा आलेली आहे. हे दोघेही बंधू विद्वान असतात. दोन अलग अलग आश्रम स्थापून शिष्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतात. एकदा लिखित शंखाच्या आश्रमात त्याला भेटण्यास जातो. आश्रमाबाहेरील मोकळ्या पटांगणाला लागून जंगल असते. तेथे एक आंब्यांचा वृक्ष असतो. त्याला आंबे लागले असतात. आंबे पाहून लिखित त्यामधील एक आंबा तोडतो. आणि खायला लागतो. तेवढ्यात शंख समोरून येतो. तेव्हा आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी लिखित शंखाला विचारतो, 'हा जो आंब्याचा वृक्ष आहे तो शंखाच्या मालकीचा की जंगलातील?' तेव्हा तो शंखाच्या मालकीचा असल्याचे लिखिताच्या लक्षात येते आणि आपण, आपला भाऊ झाला म्हणून काय झाले. त्यांच्या मालकीच्या वृक्षांचा आंबा तोडून खाल्ला हे नैतिक दृष्ट्या चांगले झाले नाही. आपले हातून पाप घडले हे लिखितास वाटू लागते. हे असे वाटणे म्हणजेच आत्मगत विवेकाची परमोच्च आदर्श-वादी धारणा आहे. असे समजण्यास हरकत नाही.

लिखित म्हणतो माझ्या हातून घडलेल्या ह्या प्रमादाबद्दल जे काही प्रायश्चित किंवा दंड आहे तो मला मिळावा. शंख त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांचे समाधान होत नाही. लिखित राजाकडे जातो आणि राजाला माझ्या हातून घडलेल्या हया कर्माबद्दल जी काही शिक्षा असेल ती मला करा अशी विनवणी करतो. राजा म्हणतो जो पर्यंत माझ्याकडे तुझ्या विरोधात तक्रार येत नाही तोपर्यंत तुला शिक्षा करता येणार नाही. तेव्हा लिखित विचारतो की, अशा कर्मासाठी काय शिक्षा आहे. तेव्हा राजा म्हणतो, ज्या हाताने आंबा तोडला तो हात शरीरापासून वेगळा करणे. त्याप्रमाणे आपला हात तोडण्यास भाग पाडतो. ही कथा माणसाच्या अतिमानविय मूल्यांचे द्योतक ठरते. जो स्वतःहून शिक्षा भोगण्यास प्रेरित झाला आहे. त्याला दुसरा काय शिक्षा करणार, यालाच सत्य भाषण म्हणावे. 

आजचे युग कलियुग अनेक कला, आविष्कार विज्ञान, आणि अन्य सर्व क्षेत्रात आम्ही अती प्रगत झालो असे मानणारे, प्रगत झालो असे समजणारे, तसेच मानवी मूल्यांच्या दृष्टीने आम्ही किती मागे गेलो हयावर चिंतन करावयास भाग पाडणारे, समाजात वाढीस लागलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचारापोटी घडून येणारी फसवणूक, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला नागवून त्यांच्या उध्वस्त जिवनाकडे पाहून होणारे समाधान, आपण प्रशस्त झाल्याचे सुख लबाडी करून आणि दुसऱ्याच्या माना मोडून मिळविलेला पैसा, लाचलुचपत घेवून आणि अधिकाराचा गैरवापर करून केलेली अवैध कामे, स्वतःच्या फायद्यासाठी केलेली असत्याब्धिष्ठीत दलाली, रोजच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या बलात्काराच्या वाढत्या बातम्या, रोज मरणारे हुंडाबळी, बारोमास राब राब राबून निसर्ग आणि शासन यांनी शेतकऱ्यास लावलेले गळफास आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या. हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यावरील गोळीबार. आत्मदहनाच्या घटना आणि संसदेपर्यंत येऊन पोहचलेला आतंकवाद हे सारे माणूस सत्य विसरला ह्याचेच द्योतक नाही काय? कलियुगाने स्विकारलेला हा कलह केवळ स्वार्थापोटी स्विकारला आहे. स्वार्थाच्या असत्याकडे झुकणाऱ्या मापाने मानवी नैतिक मूल्यांचे मापदंड पार झुगारून टाकले आहेत. माणूस दिवसें दिवस असत्याकडे जातो. सत्य सुटू पाहत आहे. सत्याचा लोप होणे म्हणजे मानवाने स्वताहून दैवी कोप ओढवून घेणे आहे. कारण माणूस, कर्तव्य काय किंवा अकर्तव्य काय, या विवेकी भावनेपासून दूर गेला की त्याचे हातून अनुचित घडणार उचिताचे त्याला भान राहत नाही. अनिष्ठात त्याला स्वतःची प्रतिष्ठा दिसत असेल तो तर इष्टापासून दूर जातो. अविधितून सुविधा प्राप्त होत असतील तर तो विधिला कालबाह्य समजून माणूसकी विसरतो. सर्वज्ञ स्वामी श्रीचक्रधर, भगवान श्रीदत्तात्रेय महाराज, श्रीकृष्ण भगवंत अशा अनेक परमेश्वर अवतारांनी आणि श्रीनागदेवाचार्य, श्रीकेशराजबाज, इत्यादी ८०० वर्षांत होऊन गेलेल्या महान संत महंतांनी आपल्या लिखानातून मार्गदर्शनातून आणि समाज प्रबोधनातून ज्ञानामृताचे पोषण देऊन या समाजाची अधोगति होण्यापासून थांबवले. . पण माणसाने आपल्या स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचे शोषण सोडले नाही. पाशवी वर्तनातून त्याने त्यांचे झालेले अधःपतन पर्यायाने मान्य केले आहे. जिवाचा जगधिश, नराचा नारायण आणि कृमिते ब्रह्म होण्याची क्षमता परमेश्वराने माणसाला कर्म स्वातंत्र्य देऊन बहाल केली आहे. त्याने त्यातून वैफल्य कि कैवल्य अधोगती की सद्गती केवळ स्वार्थच की परमार्थ, आस्तिकत्वातून ईश्वरत्व की नास्तिकत्वातून नश्वरत्व, नीती की प्रवृत्ती हे ज्यांचं त्यांनीच ठरवायचं असते.

महानुभाव पंथाचे संस्थापक परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात. महात्मेनि सत्यार्जवा व्हावे, महात्मेनि प्रिय वक्तेया होआवे. कारण सत्याचरणाशिवाय माणूस महात्मा कसा होणार, सत्य आणि महात्मा याचा संबंध अतूट आहे. किंबहुना महात्मा म्हणजेच सत्य महात्म्याचे ठाई सत्यच वसते म्हणूनच तो महात्मा या संज्ञेस पात्र ठरतो.

स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जिव घेणारा सर्वसामान्य जीव आणि समस्त मानव जाती करिता विश्व मांगल्याचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर हिच महात्म्याची सर्वोच्चता नव्हे काय? पारधी मागे लागल्या ने जिवाच्या आकांताने पळत येणारा ससा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या मांडिखाली येऊन दडतो. त्याला अभय प्राप्त होते, तेव्हा स्वामी म्हणतात, आम्हाला शरण आलेल्याला मरण नाही. आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात सर्व धर्मान्परित्यज्य मामेकम् शरणम् व्रज: तसा माणूस जोपर्यंत विनम्र भावाने, आर्त वृत्तीने परमेश्वरास शरण जात नाही, म्हणजेच परमेश्वरा प्रतीची शरणागती आणि त्यानुरुप त्याची परमोच्च जबाबदारी माणसाने माणसाप्रमाणे वागावे हे जो पर्यंत त्याला जिवनात साधता येत नाही, तो पर्यंत तो खऱ्या अर्थाने परमेश्वराचा भक्त आहे, असे म्हणवून घेण्यास पात्र होत नाही.

दुसऱ्याचे भले करता आले नाही तरी काही हरकत नाही. परंतु स्वतःचे अकल्याण होता कामा नये. या करिता समाजात वावरणाऱ्या समाज मार्गदर्शक, समाज प्रबोधन करणाऱ्या तत्वांनी सत्यवक्ता होणे, प्रियवक्ता होणे, प्रिय बोलणे ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता आहे. आठशे वर्षापूर्वी स्वामी श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या सूत्रातून सांगितलेले विचारशास्त्र, अन्वयार्थाने आजच्या आतंक आणि विध्वंस यांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विनाशाला आवर घालण्यासाठी निश्चितच अति आवश्यक आहे. स्वामी म्हणतात परस्पर स्नेह भावना हाच मानवी संस्कृतीचा आत्मा आहे आणि माणूस सत्यवक्ता प्रियवक्ता झाल्याशिवाय माणसाचा महात्मा होणार नाही किमान तो माणसाचा चांगला माणूस व्हावा हीच आजची आवश्यकता आहे.

जागतिक महायुध्दातील हिरोसिमा, नागासाकीचा विध्वंस हा मानवतेला काळीमा फासणारा ठरला. अनेक थोर संत महात्मे समाजाला, समाजप्रबोधन करून गेले. पण माणसाने आपली आतंकवृत्ती सोडली नाही. आध्यात्माचा अंकुश असल्याशिवाय आतंक आटोक्यात येणे दुरापास्त आहे. अशक्य आहे. हे माणसाने आता जाणले पाहिजे. अध्यात्म वृत्तीतून सदाचारी सद्वर्तनी आणि पापाला भिणारा माणूस जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत माणसाचे अपूर्णत्व मानव जाती करिता लाजीरवाने ठरणार आहे. सत्य हे समन्वयक असते. सत्य समाजात स्नेह फुलवते. सत्य सहिष्णुता निर्माण करते, सत्यामुळे शालीनता येते. सत्य हे मानवी संस्कृतीचा मानबिंदू आहे. सत्य हे अध्यात्माचे अधिष्ठान आहे. विज्ञानासारख्या विशेष ज्ञानाला अध्यात्म मान्य नाही म्हणून मनः सत्येन शुद्धति त्रिकाळाबाधीत सत्य आहे.

========

अभंगावली

(१)

गीता गंगेचीया तीरी । वास करी क्षणभरी । 

तेणे चुके येर झारी । ग्रंथ वाचा गीता खरी

शत्रु मीत्राते समान । हेची गीतेची शिकवण । 

ज्ञान रत्नाची जननी । कवी शिवबा वदे वानी ॥१॥


(२)

चित्त शुध्द चिंतनाने । मुख शुध्द नामस्मरणे । 

कर्ण कथा श्रवणाने । चरण शुध्द तिर्थाटने । 

कर शुध्द देता दाने। नेत्र श्रीकृष्णदर्शने । 

ऐस्यारिती शुध्द होसी । शिवबा वंदितो पदासी ॥२॥


(३)


गीता गंगेच्या जीवनी । स्नान करी जो नित्यांनी

आत्मशुध्दी होय तेने । करिता एक आवतरने ॥ 

चित्ती आठवा ज्ञान गंगा । तेणे होये पाप भंगा । 

ऐसा गीतेचा महिमा | भक्त शिवबा सांगे तुम्हा ।।३।।

(४)

दुःखामुळे होय ईश्वराचे ध्यान ।

 तेणे हे जीवन सफल होये । 

स्वामीचक्रेशाचा ऐकावा सिध्दांत । 

तेणे जीवमुक्त शिवबा म्हणे ।।४।।


(५)

 कोण्याही प्राण्याची नको करू हिंसा । 

तेणे जगदिशा आवडेना ।। 


हिंसेचीया पायी जीवनरका जाई। 

चक्रेशाची ग्वाही । ऐक आता ।। 


आधी सान हिंसा घडताची जान । 

पुढे ती महान होत जाय । जीवन मात्रावरती दाखवावी दया । 

आवडे देवराया शिवबा म्हणे ॥५॥


(६) 

नको वश होऊ विषय सुखासी । जोडी ईश्वरासी नाते तुझे । 

येणे तुझे हित होईल अपार । जासी भवपार तरुनीया । 

एकच प्रहर प्रभु तो समोर । ध्यायी विश्वांबर प्रेमभावे भक्त ।।

शिवबासी देई एक वर। करी मन स्थीर स्तुती गाया ॥६॥


(७)

श्रीदत्त नाम घेता हरे भव चींता । 

नको गुंतु आता मोहपाशी । 

अमोल ही काया नको घालु वाया। 

स्मरा देवराया आवडीने । 


सोडुनीया देई दंभाभीमान । 

तेणे तो भगवान प्राप्त नव्हे ।।


दास शिवबाही आठवी प्रभुला। 

सुबुध्दी दे मला प्रभुराया ॥७॥


(८)

पावेना तो देव सुख साधनानी । 

दुःखाचीया वणी देव भेटे । 

रात्र संपल्यावी ण सुर्य तो दिसेना । 

तैसे दुःखा वीणा सुख नोहे।

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post