पाप ते पापच असतं, त्यात लहान मोठं असं काही नसतं!!

पाप ते पापच असतं, त्यात लहान मोठं असं काही नसतं!!

पाप ते पापच असतं, त्यात लहान मोठं असं काही नसतं!! 


मित्रांनो! मनुष्य आपल्याकडून लहान-मोठ्या घडणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि इतकं तर चालते असं म्हणून ते विसरूनही जातो पण केलेल्या दुष्कर्मांची भोग कधीही सुटत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे

शांतिअरण्य नावाचे एक जंगल होते. त्या अरण्यात एक साधू तप करत होता. साधूच्या तपामुळे त्या अरण्यात सर्वत्र शांतता नांदत होती लोक साधूंच्या शांत वृत्तीची कीर्ती ऐकून दूरवरून त्यांना भेटायला येत असत आणि त्यांचे दर्शन घेऊन जात. एकदा एका साधुंजवळ दोन तरुण आलेत. त्यापैकी एक खुप दुःखी होता, खूप उद्विग्न आणि मानसिक दुःखाने त्रस्त होता. त्याच्या मनाला अजिबात शांती नव्हती आणि दुसरा तरुण उद्विग्न तर नव्हता, परंतु मित्रासोबत सहज म्हणून आला होता. 

पहिला म्हणाला, 'आम्ही खूप वैतागत आहोत. आमच्या हातून खूप भयंकर पापं झाली आहेत. कृपया यातून सुटकेचा व प्रायश्चिताचा एखादा मार्ग सांगा. तेव्हा ते साधु बाबा म्हणाले की, 'आधी तुझ्या पापासंबंधांत तू काही बोल, तर तो म्हणाला, “मी जास्त पापं केली नाही पण एक मोठाच अपराध केला आहे. अन त्याचं ओझं दगडासारखं माझ्या छातीवर आहे. कसं तरी माझं हे ओझं उतरून जावं. मला पश्चाताप झाला आहे. चूक झाली पण आता काय करू ? जे झालं, ते झालं तो रडू लागला.” 

त्याच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागली. त्या साधुने दुसऱ्या तरुणाला म्हटलं की, “तुझं कोणतं पाप आहे?” दुसरा हसत हसत म्हणाला, “तसं काही फारसं नाही. मी कुठली मोठी पापं केलेली नाही. मित्र येणार होता म्हणून मीही बरोबर आलो. अन् जर याची मोठ्या पापापासून सुटका होऊ शकते तर मला देखील माझ्या छोट्या छोट्या पापापासून सुटका व्हावी असा शिर्वाद द्या.” 

तो साधु म्हणाला, असं करा, तुम्ही दोघे बाहेर जा त्या पहिल्या तरुणाला तो म्हणाला की, “तू आपल्याच पापाच्या हिशोबात तितक्याच वजनाचा एक दगड उचलून आणं. दुसऱ्याला म्हटलं की, तू देखील जी छोटी छोटी पापं केली आहेस त्याच हिशोबात, त्याच संख्येने दगड-धोंडे भरून आण.” 

पहिला तर एक मोठा दगड घेऊन आला घामात भिजून गेला तो आणणेही अवघड होतं. धापा टाकू लागला. दुसऱ्याने झोळी करून, दगड धोंडे गोळा करून आणले. जेव्हा ते आत आले तेव्हा तो साधु म्हणाला, “आता तुम्ही एक काम करा ज्या जागेवरून तू मोठा . दगड आणला आहेस तिथेच ठेऊन दे. अन् दुसऱ्यालाही म्हणाला की, तू हे जे छोटे छोटे दगड धोंडे वेचून आणले आहेस, जिथून जिथून उचलले आहेत, तिथे तिथे माघारी ठेवून ये.” 

तो म्हणाला की, हा तर वैतागच झाला. हे कसं शक्य आहे? ज्यानं मोठं पाप केलं त्याने मोठा दगड आणलाय तो तर ठेवून येईल, ठीक आहे. पण मी कुठे ठेवायला जाईन? आता तर मला आठवणही नाही की कुठला दगड मी कुठून उचलला होता. शेकडो दगड-धोंडे मी उचलून आणले आहेत.

तो फकीर म्हणाला, “भल्या माणसा! हेच तर मला तुला समजून सांगायचे आहे की, पाप मोठंही असेल पण त्याची व्यथा असेल, आपल्या पाप कर्मांचे दुःख असेल प्रायश्चित करण्याची इच्छा असेल तर प्रायश्चिताचा मार्ग आहेच. आणि पाप छोटंही असेल अन् त्याची व्यथा नसेल, केलेल्या कर्मांचे काहीच दुःख नसेल तर प्रायश्चिताला मार्ग नाही. कारण तू कधीच प्रायश्चित करणार नाही. 

आणि जी तुमच्या दगडांबाबत तुमची स्थिती आहे. तीच तुमच्या पापासंबंधात तुमची स्थिती आहे. ज्यांच्या अंतःकरणात पश्चात्तापाचा दिवा उजळला आहे तो मोठंही पाप करत नाही किंवा छोटंही पाप करत नाही. ज्याचा दिवाच उजळला नाही ते मोठं पाप करायला घाबरतही असतील. पण छोटी छोटी पापं अगदी आरामात करत राहतात. छोट्या छोट्या पापाचा तर ठावच कुठे लागतो? तुम्ही कुणा माणसाशी थोडसं खोटं बोललात. 

कित्येकदा तर तुम्ही असं खोटं बोलता की, तुम्हाला कळतच नाही की तुम्ही खोटंही बोलतात! कित्येकदा तर तुम्हाला जीवनात पुन्हा त्याची आठवणही होत नाही. किंवा खोटे बोलणे जणूकाही आपला धर्मच आहे असा अविचार करून खोटे बोलता आणि स्वतःचा फायदा करून घेतात. पण ते सगळं गोळा होत जातं. आपल्या पापांचा घडा भरत जातो. छोटे छोटे दगड एकत्र येवून मोठ्या खडकाहून जास्त बोजड होऊ शकतात. खरा प्रश्न छोट्या मोठ्याचा नाही. आत्म्याच्या जागृतीचा आहे. 

एका माणसानं दोन पैशाची चोरी केली हे पाप छोटं आहे. अन् एका माणसानं दोन लाखाची चोरी केली हे मोठं पाप आहे का? थोडा विचार केला तर वाटते की, चोरी, चोरीच आहे दोन पैशाची देखील तितकीच चोरी आहे जितकी दोन लाखाची, चोर असणं सारखं आहे. दोन लाखात जास्त नाही होत, दोन पैशात कमी नाही होत. चोर बनण्याची भाव दशा आहे चोरी करण्याच्या प्रक्रियेत काहीच फरक पडत नाही. दोन पैशाचा अन दोन लाखाचा फरक बाजारात आहे. पण दोन लाखाच्या अन् दोन पैशाच्या चोरीचा भेद धर्मात नाही असू शकत. चोरी म्हणजे चोरी. चोरी करणे किंवा पाप करणे हे छोटे मोठ नसतचं! 

दिवसभरात आपण आपल्या वागण्याने बोलण्याने चालण्याने कित्येकांची अंतःकरणात दुखवत असतो त्यात आणि त्याचं आपल्याला किंचितही दुःख नसते पण ते सुटत नाही त्या कर्मांचा भोग भोगावाच लागतो. ते सर्व संचित होत जाते आणि एक दिवस असा येतो की आपल्याला पश्चाताप शिवाय काहीच उपाय नसतो आणि तो दुःख भोगावा लागतो. म्हणून कोणतेही लहान मोठे पाप करताना परमेश्वर आपल्याकडे पाहात आहे हाच विचार मनात असावा. पण मनुष्य हा असा विचित्र प्राणी आहे की, तो प्रार्थना करतो तेव्हा असं निश्चित मानतो की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत आहे आणि तो आपल्याला सहाय्य करीलच. पण पाप कर्म करताना आपल्याला कोणीच पाहत नाही असा विचार करतो. त्यामुळेच हा जीव जन्म-मरणाच्या चक्रातून अडकलेला आहे.

माणसाच्या हातून अनेक कारणांनी पापकर्मे घडतात.

१) समाजात थोडीशी मान्यता झाली मान सन्मान होऊ लागला कि हा मनुष्य गर्व अहंकाराने फुगून जातो व आपल्यापेक्षा कमी कुवत असलेल्यांची वाईट वागायला लागतो. मग त्या अहंकाराच्या वर्तनात सहाजिकच त्याच्याकडून अनेकांची मने दुखावले जातात हे ही एक पाप कर्म आहे.

२) एखाद्या माणसाजवळ थोडेसे जरी द्रव्य आले आणि त्यांची परिस्थिती सुधारली तर तो लगेच अहंकारी बनतो आणि आपल्या नातेवाईकांना हिंडतो गरीब लोकांकडे तुच्छ दृष्टीने पाहतो आणि अनेकांचे मन दुखावतो आणि पापाचा भागीदार बनतो.

३) एखाद्या माणसाने थोडेसे उच्चशिक्षण घेतले आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले की तो लगेच इतरांना शिकवायला लागतो आणि त्या शिकवण्यात त्यांना अज्ञानी म्हणून मी नव्हतो आणि त्यांचे मन दुखावतो स्वतःला विद्वान समजतो आणि पापांचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन घेतो.

४) एखाद्याने व्यापारात व्यवसायात यश मिळवले की तो इतर जे यशासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांच्यावर हसायला लागतो.

५) थोडीशी सत्ता प्राप्त झाली की इतरांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि सत्तांध इतरांवर अत्याचार करतो इतरांची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो.

अशी असंख्य कारणे पाप जोडण्याची सापडतील आला प्रकाराने मनुष्य पाप जोडतो संत म्हणतात, सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे पण हा विचार करत नाही की ते दुःख पर्वताएवढे का आहे? ते दुःख आपल्या पापकर्म मुळेच पर्वताएवढे झालेले आहे आणि सुख कमी आपले पुण्यकर्म कमी असल्यामुळेच कमी मिळते. हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

जो मनुष्य समाधानी वृत्तीत जगण्यासाठी तयार असतो त्याच्या अंगी आपोआपच सत्य आचरण बांधते आणि त्याच्या कडून कडून पाप करणे कमी घडतात. म्हणून माणसाने सदैव समाधानी असावे अन्यायाने मिळवलेले द्रव्य फक्त दहा वर्ष पर्यंत साथ देते अकराव्या वर्षी मात्र आपली समुलं च विनश्यति झाल्याशिवाय राहत नाही.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post