...म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी फक्त अर्जुनालाच गीता सांगितली

...म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी फक्त अर्जुनालाच गीता सांगितली

म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी फक्त अर्जुनालाच गीता सांगितली 

परमेश्वराचे ज्ञान ऐकण्यासाठी खरोखर पात्र कोण याविषयीचा विचार या श्लोकात मांडण्यात आला आहे मूळ श्लोक भर्तृहरी नाथाचा असून त्याचे मराठी भाषांतर वामन पंडित वल. गो. विंझे यांनी केलेले आहे. 

भर्तुहरी मुळ श्लोक :-

छंद :- अनुष्ठुभ

बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदूषिताः ॥

अबोधोपहताश्चान्ये जीर्णमंगे सुभाषितम् ॥२॥ 

वामनपंडित मराठी अनुवाद :-

छंद भुजंगप्रयात

अभिज्ञांस तो ग्रासिले मत्सराने । 

धनाढ्या प्रभू व्यापिलें दुर्मदाने ॥ 

शिरी थोर मूर्खास अज्ञान ओझे । 

जिराले निजांगीच पांडित्य माझे ॥२॥ 

ल. गो. विंझे :-

जाणते मत्सरग्रस्त, राजे, श्रीमंत भर्वित ।

दुजे कांहीं न जाणीत, जिरे अंगी सुभाषित ।।२।। 

मराठी अर्थ :- जाणते ज्ञाते मत्सराने ग्रस्त झाले आहेत. त्यांना हेवा वाटतो. श्रीमंतजन, राजे, धनिक, गर्वाने भरलेले आहे. आणि इतर लोक तर अज्ञानाने नष्ट झालेले. त्यांना स्त्रीपुत्रांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. हाय! हाय! त्यामुळे माझे पाण्डित्य, माझे ज्ञान हृदयातल्या हृदयातच जिरण्याची वेळ आली आहे. म्हणून मी कवित्व करीत नाही, ।।२।।

जाणते मत्सरग्रस्त म्हणजे जे उच्चविद्याविभूषित स्वतःला विद्वान समजणारे व लोकांमध्ये तथाकथित मान्यताप्राप्त असे लोक ते बहुदा मत्सर याने ग्रासलेले असतात इतर विद्वानांची स्तुती त्यांच्यासमोर केलेली त्यांना अजिबात चालत नाही. इतर विद्वानाचा त्यांच्या पेक्षा जास्त सन्मान झाला तर ते सभात्याग करायलाही कमी करत नाही. अशा मस्तर ग्रस्त विद्वानांमध्ये वेळप्रसंगी बऱ्याच वेळा तू तू मै मै होते. 

जाणते मत्सरग्रस्त असतात याविषयी एक पौराणिक घटना आलेली आहे ऋषिंमध्ये श्रेष्ठ असे वशिष्ठ ऋषी दंडकारण्यात तप करीत असत. ब्राह्मण कुळात जन्म झाल्यामुळे त्यांची ब्रह्म ऋषी अशी प्रसिद्धी होती आणि त्यांच्या समकालीन ऋषी विश्वामित्र त्यांचा जन्म क्षत्रिय कुळात झाल्यामुळे त्यांची राज ऋषी अशी प्रसिद्धी होती पण आपल्याला लोकांनी राज ऋषि म्हणावं हे विश्वामित्राला अजिबात मान्य नव्हते सर्वांनी मला ब्रह्म ऋषीच म्हणावं असे त्यांना वाटत असे. 

एके दिवशी विश्वामित्र त्यांना भेटायला आले वशिष्ठ ऋषींनी त्यांच्याकडे पाहून म्हटले “या राजऋषी या” या गोष्टीचा विश्वामित्राला खूप राग आला त्याला असे वाटत होते कि “यांनी मला ब्रह्म ऋषी म्हणावे” पण वैशिष्ट जितक्या वेळा विश्वामित्र भेटायला येत तितक्या वेळा त्यांना “राजऋषि या” म्हणूनच संबोधित असत याचा विश्वामित्राला खूप राग यायचा. आणि त्या रागाच्या भरात विश्वामित्र वसिष्ठ ऋषींचा एका पुत्राचा वध करायचे असे करत करत वशिष्ट ऋषींचे शंभरही पुत्र विश्वामित्राने मारले. पण वशिष्ठ ऋषींनी त्यांना 'राजऋषि' म्हणायचे काही सोडले नाही.

त्यामुळे त्यांना विश्वामित्राविषयी अत्यंत द्वेष होता आणि क्रोधाच्या भरात त्यांनी एके दिवशी ठरवले की आज वशिष्टाचाच घात करावा. असे मनात विचार करून ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. त्या दिवशी पौर्णिमा होती. चंद्राचे शुभ्र चांदणे पडले होते वशिष्ट ऋषींची भार्या आणि वशिष्ठ ऋषी दोघेही पर्णकुटीकेच्या अंगणात चंद्राच्या शुभ्रधवल चांदण्यात बसून काही वार्तालाप करीत होते. 

तेवढ्यात वशिष्ठ ऋषींची पत्नी त्यांना म्हणाली “चांदणे किती शुभ्र आणि शुद्ध पडलेले आहे” यावर वशिष्ठ ऋषी म्हणाले “हो खूपच शुभ्र आहे जसे विश्वामित्राचे ते जसे शुद्ध तसे चांदणी शुद्ध आहे.” हे त्यांचे बोलणे झाडाआड लपलेल्या विश्वामित्रांनी ऐकले आणि त्यांना अत्यंत पश्चाताप झाला. आपण किती मोठा मूर्खपणा केला हे लक्षात आले आणि त्यांनी समोर येऊन वशिष्ट ऋषींना साष्टांग दंडवत घातले. आपल्या केलेल्या अपराधांची क्षमा मागितली तात्पर्य जाणत्या विद्वानांमध्ये ही मात्सर्य हे असतेच. 

राजे लोक धनवान लोक श्रीमंत लोक त्यांच्या ठिकाणी गर्व असतो हे तर आपल्याला प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात सहजच अनुभवाला येते. माणसाच्या ठिकाणी अहंकार आपेक्षा स्वाभिमान असावा स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात झाले तर माणसाची अधोगती ही ठरलेलीच असते आणि पैशामुळे अहंकार येणे ही तर सगळ्यात हीन अवस्था म्हणावी लागेल. कारण लक्ष्मी ही काही कायम 

राहणारी वस्तू नाही पैसा येणार जाणार पण त्या पैशाचा माझ्यामुळे आपण जी माणसे गमावतो ती मात्र पुन्हा आपले जिवलग कधीच होत नाहीत म्हणून पैशाचा अहंकार अजिबात नसावा आपल्या श्रीमंतीचा अहंकार करणारा मनुष्य 'मला कधीच मरण येणार नाही' असा अज्ञानमूलक विचार करीत असतो. आणि हा पैसा मी माझ्या मेहनतीने कमावला आहे असा निरर्थक भ्रष्ट विचार विचारांनी त्यांच्या अंतःकरणात घर केलेले असते. पत्नी पुत्र घर बंगला जमीन हे सगळं पुर्व जन्माच्या सत्कर्मामुळे मिळते हे त्या अज्ञानाला अजिबात कळत नाही. व आपल्याला एक दिवस हे सर्व सोडून जायचे आहे हा विचारही त्याचा मनात कधीच डोकावत नाही व त्याबद्दल काही विचार करावा अशी त्याला आवश्यकताही वाटत नाही, इतका तो श्रीमंतीत गढलेला असतो. इतकी त्याची अधोगती झालेली असते.

संत कबीर म्हणतात

कबीर गर्व ना कीजिए, ऊंचा देख निवास ।

काल परों भुईं लेटना, ऊपर जमेगी घास ।।

आपला उंच बंगला पाहून कधीही गर्व करू नये कारण एक ना एक दिवस तुम्हाला लोक लाकडाच्या सरणावर झोपवून वर गवत टाकून जाणार आहेत. 

शिरी थोर मुर्खास अज्ञान ओझे आणि मूर्खांच्या डोक्यावर अज्ञानाची ओझे आहे मग ते अज्ञान कोणते? लिहिता-वाचता न येणे हे अज्ञान येथे अभिप्रेत नाही. तर अज्ञान म्हणजे मी कोण? कुठून आलो? मला कोठे जावयाचे आहे? मला मनुष्य जन्मात काय करायचं आहे? मला मनुष्य जन्म कशासाठी मिळाला? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत नाही तो मूर्तिमंत व ज्ञानाचा पुतळा होय. 

असा मनुष्य स्वतःला शहाणा समजतो व मला कुणाच्या ज्ञानाची गरज नाही असे त्याला वाटते. जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला अशी त्याची अवस्था असते. अशा व्यक्तीचा संपूर्ण जन्मात स्त्री पुत्रांचे भरण-पोषण करण्यातच जातो या इहलोकात ही त्याला कधीच सुख नसते आणि परलोकी सुख मिळण्याचा तर काही प्रश्नच नाही कारण त्याने पुण्य बुद्धीने एकही कर्म केलेले नसते मग त्याचे फळ कुठून मिळणार!

म्हणून पुढे कवी म्हणतात की असे तिनही कॅटेगिरीतले लोक अपात्र असल्यामुळे मला माझे ज्ञान माझ्या हृदयातच जिरवावे लागले. कारण यांना ज्ञान सांगून काही उपयोग नाही. आणि त्या ज्ञानाचा काहीही उपयोगही होणार नाही. उलट हे लोक मलाच वेड्यात काढतील. 

तात्पर्य :- हे परमेश्वराचे ज्ञान कोणालाही सांगता येत नाही. अध्यात्मिक ज्ञान ऐकण्यासाठी पात्रता असावी लागते कुरुक्षेत्रावर अठरा अक्षौहिणी सेना जमलेली होती. पण इतक्या लोकांमध्ये फक्त अर्जुन गीता ऐकण्यास पात्र होते. आणि देवाने त्यांनाच गीता सांगितली. कारण इतर सगळे अपात्र होते. देवाने जरी त्यांना गीता ज्ञान सांगितले असते तरी त्यांनी देवाचे म्हणणे मान्य न करता उलट देवावरच बोल लावला असता. 

अध्यात्मिक ज्ञान इतरांना सांगितले तर त्या ज्ञानाचा उपयोग कमी आणि अनादरच जास्त होतो. म्हणून घेते च्या शेवटी अर्जुनाला भगवंतांनी सूचना केलेली आहे की तू हे ज्ञान कोणाला सांगू नको.

इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन। जो अतपस्क आहे म्हणजे काहीही तप करत नाही, विषयभोगांचा त्याग करत नाही आणि त्याग करण्याची इच्छाही नाही. कशाला हे रहस्यमय गीता ज्ञान सांगू नकोस कारण तो त्या ज्ञानाची खिल्ली करेल त्यामुळे तुलाच पाप लागेल आणि जो माझा भक्त नाही त्याला हे ज्ञान सांगू नकोस असे नियम भगवंतांनी अर्जुनाला लावून दिले होते. 

आणि आता आपण पाहतो की व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमाने ब्रह्मविद्येचे रहस्यमय विज्ञान सर्वांसमोर मांडले जात आहे. हे ब्रह्मविद्या शास्त्र संमत आहे की नाही याचा विचार जाणत्यांनी करावा. धर्माविषयी माहिती पोस्ट करणे योग्य नाही पण धर्माचे रहस्यमय ज्ञान अशाप्रकारे प्रसारित करणे हे शास्त्राच्या दृष्टीने फार चुकीचे आहे. असो! हा विचार आपण पंथातील ज्ञानी जणांवर सोडून देऊ.

पण आपण प्रत्येकाने ही दक्षता घेतली पाहिजे की परमेश्वराचे रहस्यमय ब्रह्मविद्या शास्त्र हे कुणालाही विचारल्याशिवाय सांगता कामा नये. कारण व्हाट्सअप फेसबुकद्वारे प्रसारीत केलेले शास्त्र वाचक पायात चपला बूट असताना वाचत असतो. तो आदराने श्रद्धापूर्वक वाचत नाही. त्यामुळे ते ज्ञान पोस्ट करणाऱ्यांना काहीही श्रेय होत नाही. उलट त्यांना कथन दोषामुळे पापच लागते हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

श्रीमद्भगवतगीतेवरील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा👇

श्रीमद्भगवद्गीता की १६ बाते 👇अवश्य पढे

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/06/16-things-from-shrimad-bhagavad-gita.html

हेही वाचा 👇

श्रीमद्भगवद्गीता का सिद्धांत

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post