महानुभाव पंथिय अभंग शतक

महानुभाव पंथिय अभंग शतक

 

वि :- म. श्रीगोविंदराज बाबा त्कर्ण महानुभावकृत

महानुभाव पंथिय अभंग शतक 


भारत भूमीवर निवास करणाऱ्या महानुभाव पंथाने प्राचीन काळापासुन आता पर्यंत ज्ञानभक्तीवैराग्य साधनांत आपले नैपुण्य संपादन केले आहे. हे सर्वतोपरी प्रसिद्ध आहे. आजपर्यंत या समाजाने आपलें तत्वज्ञान गुप्त ठेविले होते. परंतु आता तें अलिकडे उघडकीस येवू लागले आहे. तरी सर्व साधारण लोकांस त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून साध्या व सरळ भाषेतून महानुभावीयतत्वज्ञानाचा व भक्तीचा रस चाखता यावा या उद्देशाला स्मरून 'अभंग-शतकावलीकान्याचे प्रकाशन झाले आहे. या काव्यात ऋद्धिपूर माहात्म्यनाममहत्वरूपवर्णनउपदेश अनन्यताआदि सद्गुण विलसत आहेत. तसेच रस अलंकार व भावना उद्बोधक वठल्या आहेत. कवीचे नाव म. श्रीगोविंदराज महंत जत्कर्ण आहे. परंतु 'दासहे टोपण नांव धारण करून है काव्य रचलं आहे. 

अभंग


१)

जय श्रीदत्ता अवधूता । जयजय दत्ता अवधूता ।।।।

जय श्रीकृष्णा मधुसुदना । जय जय कृष्णा मधुसुदना ।।।।

चक्रपाणि श्रीगोविंदा । जय श्रीहंसा गोविंदा ।।।।

जय हरिपाला चक्रधरा जय हरिपाला चक्रधरा ।।४।।


२)

रुप पाहू प्रेमे डोळा । सर्व सुखाचा सोहळा ।।१।।

तो हा श्रीदत्तराज गावू । भक्तीभावे फुले वाहू ।।२।।

रुप स्वयंभू निर्गुण । अज्ञ म्हणे त्या त्रीगुण ।।३।।

दास म्हणे दिगांरा । चरणी ठाव देई पुत्रा ।। ४।।


३)

रुप पहा श्रीप्रभूचे । सुख घ्यावे आनंदाचे ।।१।।

हू पुण्य साठवले । म्हणुनी नाम आठवले ।।२।।

परमेश्वर प्रेमे गावू । श्रीचक्रेशा आठवू ।।३।।

दास म्हणे प्रभुरायास । तव चरणी आहे आस ।।४।।


४)

अत्रि अनुसया पोटी । आवतरे जगजेठी ।।१।।

येई येई दत्तराया । माझे दंडवत पाया ।।२।।

युगायुगी अवतार । परब्रम्ह पराप्तर ।।३।।

दास म्हणे हाची देव । वाकी संशयाचा ठाव ।।४।।


५)

जटाजूट छाटीवेष्टुनिया टी । श्वान वेद पाठी धावा घेती ।।

कमंडलू पाणी हातीधरी दंड । श्रीदत्त अखंड प्रवासीतो ।।

अमोघ दर्शन जडीत पादुका । काय मी कौतुका वाणू त्याच्या ।।

दास म्हणे देवा द्यावी एक भेट । करावा शेवट पामराचा ।।४।।


६)

ब्रह्मचर्यव्रत परा ज्याची वाणी । आनंदाची खाणी श्रीदत्त माझा ।।१।।

मातापुरीनिद्रा काशी ज्याचे स्नान । द्रिके पुराण उपदेशी ।।२।।  

कोल्हापुरी भिक्षा मागे नित्यनेम सदैवाचे धाम अंगीकरी ।।३।।

नित्यदिनी पुरवी वासना भक्ताची । पुरभजनाची पंचस्थानें ।।४।।

पांचाळेश्वरासी गंगोदरी जाणा । कैवल्याचा राणा भोजनासी ।।५।।

दास म्हणे आता केव्हां पाहू डोळा । ब्रह्मीचा सोहळा मागू त्यासी ।।६।।


७)

कृती हंस परमेश्वर । बोधी ब्रम्ह्याचे कूमर ।।१।।

ऐसे ज्ञान जीवा बोधी । प्रेम कैवल्याते साधी ।।२।।

संत आचार्य वर्णिले । पाही सद्ग्रंथी दाखले ।।३।।

दास म्हणे सत्य देव । तोडीतसे अहंभाव ।।४।।


८)

अवधूत वेषें परमानंद नाम । दिले निजधाम विश्वता ।।१।।

तोचि अवतार हंस जिवन्मुक्त । वेष अवधुत आठवावा ।।२।।

यदु बोधुनिया दिले निजधाम । धन्य तो विश्राम कैवल्याचा ।।३।।

दास म्हणे आधी शोधा ब्रम्हज्ञान । सोडी बा अज्ञान रुढीमार्ग ।।४।।

त्रेती दत्तात्रेय यदुराजा बोधीला । अंगिरा वेधिला प्रेमरुपे ५।।

दास म्हणे दत्त दुजा परमानंद । तोडी भवबंध अनादीचा ।।।।


९)

श्रीकृष्ण श्रीत्तात्रेय हंस श्रीचक्रधर । पर अवतार श्रीगोविंद हा ।।१।।

नरनारायण प्रवर प्रशांत । ऋष अनंत विदेही ते ।।२।।

जीव उद्धरेणा देवावीण कोणी । उगा ताणा-ताणी करु नका ।।३।।

दास म्हणे आतां करु एकवळ । निश्चय केवळ गोविंदाचा ।।४।।


 १०)

अच्युता श्री प्रेमानंदा । कैवल्याचा तुझा धंदा ।।१।।

जीवोद्धाराचि कारण । येई ऋक्मिणीरमण ।।२।।

द्वापराच्या सेवटास । त्यागीलासी माया वे ।।३।।

दास म्हणे ऋद्धिपुरी । तोचि अवतार धरी ।।४।।

११)

नागदेवा देई वर । तोच माझा श्रीचक्रधर ।।१।।

कलियुगी श्रीचक्रर । विद्यमानी अवतार ।।२।।

श्रीचक्रधर श्रीचक्रधर । श्रीचक्रधर श्रीचक्रधर ।।३।।

करा नामाचा गजर । दास जोडी दोन्ही कर ।।४।।

 

१२)

पूर्व योग्यतेची जोड । त्यासी वाटे नाम गोड ।।१।।

वाचे नाम देती घेती । तेचि संताची संपत्ती ।।२।।

नाम घेत बोले चाले । त्याची वंदावी पाऊलें ।।३।।

दास म्हणे तेचि संत । ज्याचें जिव्हाग्री अच्युत ।।४।।

१३)

नाम विघ्नहरी नाम भवतारी । त्यासी कोण मारी पाहू आतां ।।१।।

लिळा तुझी वाचूं प्रेमानंदे नाचू । नित्यपद याचू भगवंता ।।२।।

रायांगणी तुझ्या घेऊ लोटांगण । चरणी शरण घेई माझा ।।३।।

वाहिली ती गंगा राहीले ते तीर्थ । दासा परमार्थ देई देवा ।।४।।

१४)

करु टाळीचा गजर । एक नामाचा जागर ।।१।।

प्रेमानंदे गाव लिळा । विजयाचा लेवूं टिळा ।।२।।

श्रीपरमेश्वर वो वंदा । भक्तिभावे श्री गोविंदा ।।३।।

दास म्हणे या वेगा । बाकी भ्रमाचा भोपळा ।।४।।

१५)

हेचि दान देगा देवा । घडो नित्य तुझी सेवा ।।१।।

प्रेमानंद तुज गावू । बुद्धी तुझे पायीं राहू ।।२।।

नका येराचा विटाळ पुरवावी माझी आळ ।।३।।

तुझ्या द्वारीचा मी श्वान । नको जगी माझा मान ।।४।।

दास-गोविंदासी देई । ठाव तुझ्या प्रेमळ पायीं ।।५।।

१६)

म्हा नाही भीड चाड । एक नामावीण गोड ।।१।।

शास्त्रे पहाता जन्म गेला । किर्ती लाभाने तो मेला ।।२।।

नाही कीर्तनाचे ज्ञान । रिक्त ओरडे तो जाण ।।३।।

दास म्हणे ऐसे जन । त्याचे उपडावे कान ।।४।।

१७)

आत्मज्ञान एक मुख्यचि साधन  यावीण वमन जाण बापा ।।१।।

एक नाम तारी जन्मासी हे वारी । करा सारासारी याचि देही ।।२।।

दास म्हणे उठा करावा निर्धार  या पुढे विचार कामा नये ।।३।।

१८)

शुद्ध बीजाचे अंकूर । फळे रसाळ सुंदर ।।१।।

तेवी जगी नारी नर । शुद्ध करोनी अंतर ।।२।।

भक्ती बळे सर्वेश्वर । रू एकाचा पदर ।।३।।

दास म्हणे हेचि करा । नका विचार दुसरा ।।४।।

१९)

फार योग्यतेची जोडी । म्हणुनी अवधूत गोडी ।।१।।

सद्गुणाचा अवतार । सर्व सुखाचे माहेर ।।२।।

दत्त त्रीगुण बोलता शोध पुरा न करितां ।।३।।

दास म्हणे देव द्रोही । त्यासी ईशपद नाही ।।४।।

२०)

काया दारा धन दोन्ही । सोडविता नाही कोणी ।।१।।

हरी नाम घ्यावे मुखी । त्याचे वीण नाहीं सुखी ।।२।।

नेम धर्म ठेवा आधी । दोष नये तया कधी ।।३।।

धरावी ती आत्म सोय । नाहीं यावीण उपाय ।।४।।

दास विनवी संत जना । सांगा अंतरीच्या खुणा ।।५।।

२१

तुम्ही साधूसंत जगी भाग्यवंत । तुझा भगवंत अनकूळ ।।१।।

तरी दाद माझी सांगा भगवंता पावन पतीता करी स्वामी ।।२।।

बोल फोल माझे भासू नये मनी । अव्हेर न धनी करी माझा ।।३।।

चहू ज्ञानियासी ठा भक्तीजना । दुजिया कळेना बोल माझे ।।४।।

दास म्हणे एक पहाता अनेक । दोहीचा विवेक तो विज्ञानी ।।५।।

 

२२)

संत साधू त्यासी म्हणा । ज्याने नेमिल्या वासना ।।१।।

हेम लोह मांनी मादी । नाही त्यासी कूळ जाती ।।२।।

वाचे ईश्वराचे नाम । ज्याने साधीले ते धाम ।।३।।

ऐशा संताचा हा दास । सांगे निथुनी तुझास ।।४।।

२३)

गुरु एक ब्रह्मज्ञानी । करी संशयाची हानी ।।१।।

बोले जैसे तैसे चाले । दर्शनेचि मन घाले ।।२।।

गुरु दर्शनाचा लाभ । दैव वंतासी सुलभ ।।३।।

दास म्हणे ऐसे गुरु  पाय आधीत्याचे धरूं ।।४।।

२४)

ईश्वराच्या सांगे खुणा । सद्गुरु रे त्यासीं म्हणा ।।१।।

देव देवी सुरगण । जीव प्रपंचाची खुण ।।२।।

मांगे जो का विवरुण  तेचि सद्गुरु लक्षण ।।३।।

दासपणे त्या सद्गुरु  पाय त्याचे आधी धरुं ।।४।।

२५)

रज-तम गेले । तोचि साधु-संत । मानू नये खंत । मनी काहीं ।।१।।

सत्याचा तो शोध विरक्त भजावा । नित्यानी पुजावा ज्ञानिया ते ।।२।।

संदेह निवृत्ती करी तोचि ज्ञानी । त्याचा श्रीचक्रपाणी पाठी राखा ।।३।।

परमेश्वर ज्ञानी कोणी असो संत । मानावा महंत दास म्हणे ।।४।।

 

२६)

मायेसी मारीतो पापासी तारीतो । पाय जो वंदीतो बा एकाचे ।।१।।

स्वदेशासी सोडी घरदार मोडी । सोयरा तो जोडी अवधूत ।।२।।

माय बाप बंधू धन कण दारा । मायेचा पसारा आवघा रे ।।३।।

सहा चार तीन पांच दहा सात । याने केली मात दास म्हणे ।।४।।

 

२७)

द्रव्य दारा दोन्ही संसाराचे मूळ । बुडवी समूळ परमार्था ।।१।।

सोईरे धाईरे दिल्या घेतल्याचे । कोणी न कोणाचे सेवटासी ।।२।।

पाप पुण्य झाडा यमलोकी घेती । सांगाती न येती कोणी त्याचे ।।३।।

दास गोविंदाची पुरवी वासना तुझीया साधना लावी देवा ।।४।।

 

२८)

जन्मोनीया प्राणी सुख-दुःख जोडी । साधनासि सोडी देवराया ।।१।।

प्रपंचाच्या खोळे राहे नवमास । घाण गर्भवास भोगीली ।।२।।

र्भ यातनेचे कष्ट फार भोगी । सदा देह रोगी काय सांगू ।।३।।

दास म्हणे देवा जन्म नको बापा । वाहीयेल्या खेपा अंत नाही ।।४।।

 

२९)

पुत्र कलत्र हे संसार साधन । म्हणवी आपण धन्य झालो ।।१।।

जन कीर्तन पुराण श्रवण । म्हणे मी पावन झालो देवा ।।२।।

टाळ मृदंगाने ताल सुरे नाचे । येईना ते वाचे खरे नाम ।।३।।

दास म्हणे हा तो तमाशा म्हणावा । श्रीकृष्ण आठवावा एकांतासी ।।४।।

 

३०)

अंतरासी ध्यान वाचेने स्मरण । लय लक्षगूण योगीयाचे ।।१।।

नासीकाग्री दृष्टी स्वभाव नेमुनी । पाहो श्रीचक्रपाणी तुझा तूची ।।२।।

ओरडे चरक सरकोण घेतो । पीणार तो पीतो इक्षु रस ।।३।।

दास गोविंदाने शोधन ते केले । भुंकूनीया गेले जन सारे ।।४।।

 

३१)

ब्रह्म निरोपण ताटी । शांतिरस बोने वाटो ।।१।।

तोच पुरोडांश घेईन । प्रसादाची पा ही खुण ।।२।।

तत्व बोधाचे गृहण । तेचि संताचे भोजन ।।३।।

दाम म्हणे देई सीत । तेथे लागे माझे चित ।।४।।


३२)

रें तेचि माना रें । तोचि ऐशा वेळी तरे ।।१।।

ऋषी मताच्या गप्पा । सत्य मानू नका बापा ।।२।।

धरी गुरु सत्य पाय । करी परमार्थाची सोय ।।३।।

दास म्हणे री ध्यानी हेच माझी वीनवणी ।। ४ ।।

 

३३)

मुख्य नाम संता तारी । व्यर्थ करु नये वारी ।।१।।

माळ कंठाचे भूण । साक्ष यासी जगन्मोहण ।।२।।

दास देवा हात जोडी । लागो तुझ्या नामी गोडी ।।३।।

 

३४)

चहू युगाचे साधन । एक नामाचे पावन ।।१।।

साधु संताचे पालन । स्वल्प मोक्षाचे साधन ।।२।।

दास म्हणे हेचि देवा तुझा विसर न व्हावा ।। ३ ।।

 

३५)

सोडुनिया चक्रपाणी । किती घालू पाला पाणी ।।१।।

शत स्नान तिर्थी केले । नाहीं मन ओले झाले ।।२।।

मास पक्षा केली वारी । चुके ना दे जन्म फेरी ।।३।।

दास म्हणे काय करु । आता पाय तुझे धरू ।।४।।

 

३६)

खऱ्या देवासी विटावे । काय पाषाणा भेटावे ।।१।।

टाकोनीया धान्य रास । काय उफणावे भूस ।।२।।

दास म्हणे ऐशा देवा । नका करुं त्याची सेवा ।।३।।

३७)

माया अंशाचे त्रीगूण । शिव विष्णु ब्रह्मा जाण ।।१।।

क्षिराब्धीचा नारायण । लक्ष्मी स्त्री शेषशयन ।।२।।

हाच पुराणीचा शेष । नाहीं परा वाणी बोध ।।३।।

दास म्हणे काय केले । शोधावीण वाया गेले ।। ४।।

 

३८)

स्वर्गी इंद्र चंद्र देव । तेथे मानवाचा माव ।।१।।

चित्रांगद गणपती । आवघ्याची एक रीती ।।२।।

ज्याचे काम त्याने केले । तेच त्यांचे देव झाले ।।३।।

दास म्हणे ऐशा देवा । काय करुनीया सेवा ।।४।।

 

३९)

क्षिसागरीचे द्वारपाळ जा । केले ते पतन सनकाने ।

लौकीक मुक्तीचे होतसे पतन । पाहे पा शोधनी पुराणे ती ।।

दास म्हणे देवा पर तेचि संत । पवित्र महंत ब्रम्हज्ञानी ।।३।।

 

४०)

ढे पुजनीया समाधीसी देव । म्हणे मज पाव देवराया ।

जन कीर्तन पुराण श्रवण । पुण्य तिथी मान करी त्याचा ।।

भीक मागे लोका धान्य करी गोळा । होवोनी सोहळा प्रत पूजी ।।

दास म्हणे त्याची अंधश्रद्धा जाणा । शिक्षक शहाणा कोण मानी ।। ४ ।।

 

४१)

कोणी पूजीती अन । कोणी म्हणे पूजा जळ ।।

कोणी पूजिती पिंपळ । कोणी पूजी रवि मंडळ ।।

कोणी पूजी मेले मढे । कोणी पूजी धोंडे खडे ।।

दास म्हणे हिंदूजना । सत्य ओळखावे मना ।। ४ ।।

 

४२)

नाशीवंत देवावरी । भाव ठेवी नानापरी ।।

देव फाटेना फुटेना । देव जळेना मोडेना ।।

देव आटेना वाहेना । देव जन्मेना मरेना ।।

दास म्हणे देव खरा । राहीला वा तो दूसरा ।।४।।

 

४३)

गुरु सांगे पूजा घोंडा । कण नका घ्यारे कोंडा ।।

गुरु पदी भाव धरा । गुरु दावील देव खरा ।।

अनादी जीवासी अविद्या बंधन । जन्मासी कारण शोध पाही 

जीव देव दोन्ही एक किवा भिन्न । हेचि निवडून घोकी आधी ।।

धी जन्म मूळ पहावे शोधूनी । वृथा निरूपण करूं नये ।।

दास म्हणे त्यासी नित्य जा शरण अज्ञान हरण होय जेणें ।।४।।


४४)

ज्ञानी होय आत्मशुद्धि । गीता माय ऐसें बोधी ।।

झान मोक्षासी कारण । बुद्धियोगें करी धारण ।।

ज्ञानेविण नाही धर्म धर्मविण नाही कर्म ।।

म्हणुनी ज्ञान अभ्यासावे । दास म्हणे हृदयीं भावें ।।४।।

 

४५)

प्रेम जिव्हाळ्याची थोरी । भक्त जाणे तो अंतरीं ।।

भक्ती बाई साने केली । परब्रह्मीं लीन झाली ।।

कैसें श्रीचक्रधरे केलें । संत साधू भूलवीले ।।

दा ह्मणे करी तैसे । जेणे लागे तुझे पिसे ।।४।।

 

४६)

आणिक तो देव नाही मी जाणिला । हृदयीं ठसावला श्रीचक्रधर ।।

म्हणूनी तूं देई दासासी जवळीक । नेणे ते आणिक सुख जगी 

प्राणाचा संकल्प केला ऐशापरी । तुजवीण संसारीं नाहीं कांहीं ।।

दास ह्मणे नको दुराव सेवका । पावसी भाविका ब्रीद तुझें ।।४।।

*********************************************

आरती.

जय देव जय देव जय स्वामी माझा ।

ओवाळी आरती दास हा तुझा ।।।।

युगायुगी माझा स्वामी वतरे ।।

ज्ञान प्रेम देवूनी जीवा उद्धरी रे ।।।।

गौरचांपे मूर्ती मुनी वेश घेई ।।

कैवल्याचा दानी कर्म भूमी येई ।।।।

ऐशा संसारातुनी तूंच मज तारी ।।

माझी ही विनंती तूंच अवधारी ।।।।

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post