संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि चोराला भगवंतांचे दर्शन!!

संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि चोराला भगवंतांचे दर्शन!!

  25-10-2021

संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि चोराला भगवंतांचे दर्शन!! 



नकळता पद अग्निवरी पडे ।  न करी दाह असे न कधी घडे । 

धगधगत्या विस्तवावर नकळत जरी पाय पडला तरी चटका लागणार नाही असे नाही, चटका लागेलच. तसे परमेश्वराचे नाम नकळत जरी घेतले तरी फार मोठा फायदा होतो नामाचे महत्त्व सांगणारी स्मरणाची महती वाखानणारी एक श्रीकृष्ण भगवंतांची कथा सांगितली जाते. 

 एक अतिशय प्रसिद्ध चोर होता. चोर्‍या लुटमार करणे, दरोडे घालणे यात तो पटाईत होता. एकदा तो एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी गेला. त्या दिवशी एक संत पुरुष तेथे भागवत कथा वाचनासाठी आले होते. ते भगवंतांच्या लीळांचे भावपूर्वक पठण करीत होते. घरातील मंडळी मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होते. चोर मागच्या दारातून बंगल्यात शिरला त्याने पाहिले सर्व भागवत ऐकण्यात गुंग आहेत. त्यावेळेस संत श्रीकृष्णांच्या श्रीमुर्तिचे वर्णन करीत होते. ते वर्णन असे सुरू होते की यशोदा माता आणि रोहिणी माता दररोज श्रीकृष्ण आणि बलरामांना सोन्याचे अलंकार घालत असत. आणि दोघेही दही भात लोणी जेवण करून शिदोरी घेऊन वासरे चारायला जात असत.


संत श्रीकृष्णभगवंतांच्या रत्नाच्या हाराचे व अलंकारांचे ते ते किती अनमोल आहेत, मृत्युलोकात तसे अमूल्य अलंकार कुठेच नाहीत अशा भक्ती भावनेने वर्णन करीत होते. चोराने कानोसा घेतला त्या अलंकारांचे वर्णन ऐकून चोराचे लक्ष चोरीवरून निघाले आणि तो विचार करू लागला की, इतके अमुल्य अलंकार रत्न ज्यांच्याकडे आहेत त्या दोन्ही भावांचा पत्ता या साधूला मी विचारतो. श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम हे दोन्ही भाऊ गाय चारायला कोणत्या ठिकाणी जातात? हे विचारू आणि त्यांचे अलंकार रत्नांच्या माळा हिसकावून घेऊ. इतकं द्रव्य आल्यावर आपण खूप श्रीमंत होऊन जाऊ चोरी करण्याची गरजच पडणार नाही असा विचार करून तो घरातून बाहेर पडला व बंगल्याच्या थोडं दूर जाऊन साधूंचे प्रवचन संपण्याची वाट पाहू लागला. 

 श्रीकृष्ण भगवंतांची लीळा पहा, त्या चोराने भागवत आणि भक्तीचे प्रसंग याआधी कधीच ऐकलेले नव्हते. कारण चोर तो चोरच! तो दुर्व्यसनी लोकांच्या संगतीत राहणार त्याला संत समागम माहीतच नव्हता. चोरी करणे लुटणाऱ्या करने दरोडे घालने डाका टाकणे हेच माहित होते.


 आता तो चोर सुनसान रस्त्यावर उभा राहून साधू येण्याची वाट पाहू लागला. आणि कधी कधी तो साधु येईल आणि मी त्या दोन्ही भावांचा पत्ता विचारेन. असे त्याला झाले. 

तिकडे प्रवचन संपले साधू बंगल्यातून बाहेर आले व त्याच रस्त्याने आपल्या पर्णकुटीत जायला निघाले साधू समोरून येत असल्याचे पाहून चोराने चाकू काढला आणि साधू समोर जाऊन उभा राहिला चाकूचा धाक दाखवत साधुला विचारले की “तुम्ही ज्या दोन भावांबद्दल बंगल्यात सांगत होते, त्यांचा पत्ता मला सांगा, नाहीतर यमलोकी जायला तयार व्हा” साधूला भय वाटले. पण त्यांनी उत्तर दिले की अरे भाऊ मी भागवत कथा सांगत होतो.” 

चोर म्हणाला “मला फसवू नका, त्या दोन्ही भावांच्या दागिन्यांची किंमत खूप आहे ते अमूल्य रत्नांनी बनलेले आहेत असं तुम्ही सांगत होता मला त्यांचा पत्ता द्या” 


संत त्या त्या चोराला समजावून सांगू इच्छित होते, पण तो ऐकेना. मग संताने विचार केला की, या द्रव्यलुब्ध अविवेकी मुर्ख माणसाला ज्ञानाच्या या गोष्टी कळणार नाहीत. याच्या मनात फक्त अलंकाराचा सोनेनाणे पैसे टाक याचा विचार आहे आणि साधूंना त्या चाकूचे ही भय वाटत होते म्हणून 

 आपला जीव वाचवण्यासाठी संत म्हणाले की, वृंदावनात जा, तिथे दोन्ही भाऊ सकाळी सकाळी गाई चारायला येतात. तिथेच तुला ते भेटतील.” एवढे बोलून साधणे काढता पाय घेतला. जाता जाता चोराने त्यांना म्हटले की “त्या दागिन्यांचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन.” पण साधूने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि जलद गतीने निघाले. 


चोर वृंदावना कडे जायला निघाला भराभर चालत त्याने वृंदावन गाठले संध्याकाळच्या सुमारास तो पोहोचला होता त्याने तेथील ग्रामस्थ लोकांना विचारले की कृष्ण आणि बलराम गाई चारण्यासाठी कुठे येतात लोकांनीही अगदी निर्मळ मनाने भक्तिभावनेने ती जागा दाखवली.

चोर तिथे वृंदावनात गेला व एका झाडावर जाऊन बसला मनात फक्त श्रीकृष्ण भगवंतांचा विचार होता नकळत का होईना रात्रभर श्रीकृष्ण नामाचा मानस जाप सुरू होता. त्याला रात्रभर झोप येत आली नाही. पुर्ण रात्रभर त्याला भूक-तहान कशाचीच पर्वा नव्हती. त्याच्या मनात एकच उत्सुकता होती, कधी त्या दोन्ही भावांचे दागिने अलंकार प्रयत्न घेईन. 

तो मोठ्या उत्कंठेने सूर्योदय होण्याची वाट पाहत होता. झाडावर चढायचा पुन्हा खाली उतरून भगवंत कधी येतील, रस्त्याकडे पाहायचा. नकळत श्रीकृष्ण श्रीकृष्ण या मधुर नामाचा ध्वनी त्याच्या मुखून उच्चारला जात होता मनातहि तेच नाम जपले जात होते. 


 अरुणोदय झाला चोराची उत्सुकता आणखीनच वाढली. थोड्याच वेळात त्याने एक अलौकिक असा प्रकाश समोरून येताना पाहिला लक्षपूर्वक निरखून पाहिल्यावर दोन मुले येताना दिसली. तू त्या मुलांना एकटक पाहू लागला याआधी इतके सुंदर मनमोहक रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. तो मी कोण काय इथे कशासाठी आलो हे सर्व विसरला. श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम जवळ आल्यावर त्याला आठवले की, 'अरे आपण तर चोर आहोत आणि या दोघेही भावांचे दागिने अलंकार घेण्यासाठी येथे आलेलो आहोत या दोघांच्या मूर्ती वरचे दागिनेही अत्यंत तेजस्वी आणि असली हिरे यांनी रत्नजडित आहेत साधूनही यातला हिस्सा द्यायचा आहे' अशी विचारांची विद्युल्लता त्याच्या मनात चमकली. 

 आणि त्याने श्रीकृष्ण भगवंत बलरामाला धमक व्हायला सुरुवात केली सर्व दागिने काढून द्या आणि स्वतः पुढे होऊन सर्व दागिने काढायला लागला भगवंतांनी ही स्मित हास्य करुन त्याला दागिने नेण्यास परवानगी दिली. चोराला परमेश्वराचा तो अलौकिक स्पर्श अतिशय अथांग आघात सुखावह वाटला. अलंकार घेऊन तो लगेचच तिथून पसार झाला आणि त्या श्रीमंत माणसाच्या बंगल्या जवळ येऊन साधू येण्याची वाट पाहू लागला साधू समोरून येताच त्याने म्हटले “त्या दोन्ही भावांचे दागिने मी आणले आहेत तुम्ही आपला वाटा घ्या” 


 साधू खूप अस्वस्थ झाले आणि त्याला विचारले भाऊ तू कोणत्या मुलांचे दागिने आणले? आणि त्या मुलांना काय केले? 

चोर म्हणाला “विसरलास का मी तुम्हाला बलराम आणि श्रीकृष्ण यांचा पत्ता विचारला होता. तुम्ही म्हटले वृंदावनात अचा ते तिथे येतात मी गेलो आणि 

मी त्यांना त्यांचे नावही विचारले तर त्यांनी श्रीकृष्ण आणि बलराम हेच नाव सांगितले. त्यांच्याकडून हे दागिने आणले. ” 

 संत खूप आश्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले मला नाही त्या मुलांना भेटायचे आहे तू मला तिथे घेऊन चल म्हणू लागले की मलाही त्या मुलांना भेटायचे आहे. चोर म्हणाला चला दोघेही वृंदावनात पोहोचले. ज्या जागी ते दोन्ही भाऊ भेटले होते. तेथे चोराने चोराने साधूला नेले. श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम तेथेच एका वृक्षाखाली बसलेले दिसले चोर म्हणाला ते बघा तिकडे आहेत पण साधूला काहीच दिसेना. फक्त चोरालाच दर्शन होत होते साधूला आणखीन आश्चर्य वाटले आणि दुःख ही वाटले. 

चोर श्रीकृष्ण भगवंत आणि बाळारामाला म्हणाला की तुम्ही या साधला का दिसत नाहीये? तुम्ही त्यालाही दिसा, नाहीतर तो मल लबाड समजेल. त्या चोर भक्ताच्या हट्टामुळे साधूलाही भगवंताचे दर्शन झाले.


साधूच्या डोळ्यातून अश्रू आले, तो रडायला लागला व म्हणाला की, “हे भगवंता मी अनेक वर्षांपासून भागवत कथा करतो आहे, 

संत म्हणू लागले की भगवंत, मी अनेक वर्षांपासून भागवत कथा करतो. जन्मभर मी आपलेच स्मरण करत आले. पण अशी कृपा माझ्यावर आपण केलीच नाही. या चोराला तर आपले अलंकार पाहिजे होते. याला आपल्या ईश्वरत्वाबद्दल काहीच माहिती नव्हते. मग आपण याला का दर्शन दिले? भगवंत म्हणाले, कारण तू मला त्या उत्कंठेने उत्कट भावनेने कधीही बोलावले नाहीस म्हणून.” 

साधू रडायला लागला. 

 पुढे भगवंत सांगू लागले की, नकळत का होईना त्यांचा संतांच्या शब्दांवर दृढ विश्वास होता. भलेही त्याला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हते, मला शोधण्याची उत्कंठा त्याच्या अंतःकरणात होती रात्रभर तो फक्त माझेच स्मरण करीत होता झाडावर चढताना उतरताना फक्त माझ्या नावाचा जात्याचा मुखातुन बाहेर पडत होता. म्हणून मी त्याला दर्शन दिले तशी उत्कंठा तुझ्या अंतःकरणात कधीही नव्हती आताही तुला त्याच्या हट्टामुळे चे दर्शन होत आहे. संताच्या संगतीचे हे फळ आहे.


ते सर्व दृश्य पाहून चोराचे हे मन परिवर्तन झाले त्याला परमेश्वराबद्दल आस्था होतीच आणि आता आपल्याला साक्षात परमेश्वराने दर्शन दिले म्हणून तो खूप आनंदित झाला व त्या संताच्या सहवासात श्रीकृष्णांचा परम भक्त झाला. पुढचे पूर्ण आयुष्य त्याने श्रीकृष्ण भक्तीत घालवले. 

म्हणून सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवावा. या संसार रूप सागरातून तरून जाण्यासाठी सद्गुरूंचे शब्द हीच नाव आहे. 

 

 


 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post