पंथिय विद्वांन श्रीबाळकृष्ण शास्त्रींचा अल्प परिचय

पंथिय विद्वांन श्रीबाळकृष्ण शास्त्रींचा अल्प परिचय

 पंथिय विद्वांन श्रीबाळकृष्ण शास्त्रींचा अल्प #परिचय

        


प. म. श्रीमाहूरकरबाबा उर्फ पंडित श्रीबाळकृष्ण शास्त्री पंथिय विद्वांन रत्नांतील एक अनर्घ्य रत्न होते. त्यांच्या अपूर्व व उत्साहपूर्ण कार्याने महानुभाव पंथाला अनंतकाळपर्यंत ऋणी करून ठेवले. ते संस्कृतचें पंजाब विश्वविद्यालयाचे पदवीधर असून हिंदी व मराठीचे पण जाडे विद्वान होते. त्यांचे कार्य अष्टपैलू हिऱ्याप्रमाणे विविध क्षेत्रांत चमकत असें. मनमिळाऊ वृत्तीस्मितवदननिरंकार वागणूक आदि सद्गुणाने आपण सर्वप्रिय झाले होते. पण त्यातल्यात्यांत लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. विविध ज्ञानविस्तार #वागिश्वरी आदि कितीतरी मराठीच्या प्रसिद्ध नियतकालीकांतून त्यांनी लेख लिहिले. त्यांचे लेख विद्वत्ताप्रचूर व संशोधनपूर्ण होते. महानुभाव पंथाबद्दल जनमनांत वसत असलेल्या व मधून मधून वाचा फुटत असलेल्या अनेक शंका-कुशंकाचे त्यांनी निरसन केले. त्या योगें पंथाबद्दल वसत असलेली द्वेषभावना निवळण्यास साह्य झाले. याप्रकारे समाजसंघटनेचे श्रेयहि पण त्यांच्या पदरी पडले. त्यांच्या तर्कशुद्ध व शास्त्रशुद्ध विचार प्रणालीने घुलेशास्त्र्यांसारख्या विद्वानांना देखील आपल्या चुकांची कोर्टासमोर कबूली द्यावी लागून चुकीची मते टाकावी लागली. त्यांचे सर्व लेख माहितीपूर्ण म्हणून संग्राह्य व वाचनीय असत त्यापैकी काहीचा पुस्तकरुपाने संग्रह पण झाला आहे. त्यांचे महानुभाव पंथ हे पुस्तक तर अत्यंत लोकप्रिय झाले आहे.

        प. म. श्रीमाहूरकरबाबांचे उर्फ पंडित श्रीबाळकृष्ण शास्त्री यांचे अल्पचरित्र

        श्रीमहंतजींचा जन्म १९०० इसवीच्या सुमारास नागपूर येथे उत्तम कुळांत झाला. अतिबालपणी अर्थात दोन वर्षे वयाच्या आंतच मातोश्री निवर्तल्यामुळे आपल्या वडिलांचे परम स्नेही संस्थान देवदेवेश्वरचे निष्ठावंत पुजारी म. शेवनेकर बाबांच्या सल्ल्याने त्यांना तात्कालीन महंतवर्य श्रीलक्षराज माहूरकर महानुभाव यांना अर्पण करण्यांत आले. पण सर्व जबाबदारी श्रीलक्षराज बाबांचे पट्टशिष्य महंत दत्तलक्षराज कवीश्वर यांनीच पार पाडली. त्यांनी दोन वर्षाच्या वयांतच श्रीबाळकृष्ण दादांना पेशावर(पाकिस्तान) येथे महंत श्रीलक्षराजांच्या विधवा भावजईकडे पालन करण्यास ठेवले. त्या बाईने पण पोटाच्या मुलापेक्षाहि अधिक प्रेमानें आपला प्रतीपाल केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पेशावर(पाकिस्तान) येथेच झाले. पुढे १२।१६ वर्षाच्या वयांत महाराष्ट्रांत आणून पंथाच्या विधीप्रमाणे त्यांनी महानुभावपंथाची संन्यास दिक्षा घेतली. दिक्षेनंतर संस्कृत शिक्षणाकरितां अनाथ विद्यार्थी गृहांत पुणे येथे त्यांची व्यवस्था केली. याच सुमारांस अमरावती येथे महानुभावीय विद्यार्थ्याकरितां कै. प. म. श्री विद्वांस बाबांच्या आश्रयाखाली अमरावती येथें संस्कृत विद्यालय उघडण्यात आले व अल्पावधीतच तेथून ते शिरसगांवबंड येथे हलविण्यात आले. १९१६ साली त्यांनी या विद्यालयांत प्रवेश झाला व १९१८ साली त्यांनी या विद्यालयातर्फे पंजाब युनिवर्सिटाच्या प्राज्ञ परीक्षेस बसून पहिला नंबर पटकाविला. प्रथम श्रेणीत प्रथम नंबर मिळविल्यामुळे पंजाब युनिवर्सिटीतर्फे त्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली त्या अन्वये ते ओरीएंटल कॉलेज लाहोर(पाकिस्तान) येथें विशारद श्रेणीत दाखल झाले. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना त्यांना प. म. श्री. कारंजेकर महानुभाव उर्फ श्री बांबासबाबा यांचे दर्शन व सहवास घडला. त्यांच्या खडतर तपश्चर्येचा व वैराग्यवृत्तीचा त्यांच्यावर येवढा प्रभाव पडला की ते कॉलेजचे शिक्षण सोडून ब्रम्हविद्याशास्त्राचे शिक्षण व वितराग वृत्तीने तपश्चर्या करण्याचा निश्चय करुन महाराष्ट्रात आले.

        त्या काळी निस्पृहतावितरागशीलतानिरभिमानतापरोपकारनिष्टताव खडतर तपश्चर्या आदि सद्गुणांत इ. श्री वैरागीबाबा #आराध्य यांचे नांव महानुभाव पंथांत उंच शिखरावर पोहचले होते. म्हणून साक्षात आचाराचे धडे घेण्यासाठी त्यांनी यांच्याच सान्निध्याची निवड केली व श्री. वैरागीबाबांच्या सान्निध्यात येऊन ब्रम्हविद्या शिक्षण व तपश्वर्येस आरंभ केला.

        त्या वेळेचे त्यांचे आचरण यथोक्त असतिपरीप्रमाणे अनुकरणीय असेच होते. त्यांचीही वृत्ति जरी स्वतःचा उद्धार करण्याची व आदरणीय होती. तरीपण त्यांचे गुरुवर्य श्री.दत्तलक्षराजबाबांना वाटायचे की, यांनी संस्कृत चे शिक्षण पूर्ण करावे. ते स्वत:च्या उद्धारकार्यापेक्षां लोकोद्धार कार्यास अधिक महत्व देत. त्यांच्या मनांत शास्त्रीजींना हिन्दीमराठी संस्कृतादि विविध भाषांचे व नानाविध विषयांचे जाडे विद्वान बनून पंथसेवा करून घेण्याची महत्वाकांक्षा होती म्हणून त्यांनी त्यांचे मन वळवून १९२१ साली पुन्हां पंजाबकडे संस्कृत शिक्षणाकरितां रवाना केले. याच सुमारांस हरिपूरहजारा येथे वायव्यसीमा प्रांतांत महानुभावीय विद्यार्थ्यांकरिता संस्कृत महाविद्यालय उघडून कार्यक्षम पण झाले होते. त्यांनीही त्याच विद्यालयांत प्रवेश करून १९२३ साली विशारद व १९२५ साली पंजाब विश्वविद्यालयाची संस्कृतची सर्वोच्चशास्त्री परीक्षा उत्तीर्ण करून डिप्लोमा मिळविला. पुढे या विद्यालयाच्या नियमाप्रमाणे शिक्षण देण्याचा अनुभव मिळावा म्हणून एक वर्षपर्यंत याच विद्यालयांत विनावेतन अध्यापनकार्य केलें.

        त्याच वेळेला महात्मा श्री.मुकुंदराजजी आराध्य यांनी संपादनास आरंभ केलेल्या ब्रम्हविद्या शास्त्राच्या संपादन कार्यास बाळकृष्ण दादांनी अमुल्य सहाय्य केले. १ वर्षभर शिक्षण देण्याचे कार्य आटोपतांच महंत श्री.दत्तराजांनी त्यांना माहूरला बोलावून घेतले व त्यांचा आयुष्यभरात एकात्रित केलेला ग्रंथाचा साठा व संशोधन टिप्पणांचा अमुल्य साठा त्यांच्या स्वाधीन केला. श्रीबाळकृष्णदादांनीही आपल्या विद्येच्या व बुद्धिच्या बलाने व महंत मजकुराच्या या अमुल्य साठ्याच्या व विचाराच्या सहाय्याने पुढील लेखन कार्यास वाहून घेतले. नियतकालीकांत त्यांचे लेख येऊ लागले व महाराष्ट्रात विशेषतः महानुभाव पंथात ते सूर्याप्रमाणे तळपू लागले.

        त्यांनी नियत कालीकातून बरेचसे लेख लिहल्याने महानुभाव पंथाविषयीं कलुषित रूढभावना निवळण्यास बरीच मदत झालीयाप्रमाणे पंथसेवेचे महत्‌कार्य त्यांच्या हातून घडून आले.

. शंका निरस

. श्रीचक्रधर चरित्र  परऐतिहासिक दृष्टि

. पंढरीचा विठोबा

. एकमुखी श्रीदत्तात्रेय

. एक भक्ति

६. त्यांच्या लेखाचा काही संग्रह

 

        या ६ पुस्तकांच्या रुपाने प्रसिद्ध आहेत. याशिवाय चार पांचशे पानांचा #महानुभाव पंथ हा ग्रंथ त्यांनी लिहिला तो निराळाच.

        तसेच त्यांनी डॉ. वि. भि. कोलते यांना महानुभाव तत्वज्ञान व महानुभावांचा आचारधर्म या ग्रंथलेखनास अतिशय सहाय्य केले. सहा सहा महिने त्यांचा मुक्काम डॉ. साहेबांकडे राहिला. त्यांच्या सहाय्याचेच वरील दोन्ही ग्रंथ मधुरफळे होत, त्यांनी जर अंतःकरणापासून व चिकाटीने कोलतेंना सहायता केली नसती तर वरील ग्रंथ कृतीत आले असते किंवा नाही हा संशयच आहे,

        १९४८ साली महंत श्री.दत्तलक्षराजजी संस्थान देवदेवेश्वर हे ईश्वर दर्शनाला गेले. त्यामुळे देवदेवेश्वर संस्थानची धूरा त्यांना वाहावी लागली व संस्थानची भरभराटी करून ते कार्यही त्यांनी अतिउत्तमरीतीने बजावले. असे ते पंथसेवक ष्टपैलू हीरा महानुभाव पंथाचे अमुल्य रत्नाचे देहावसान १५-९-१९५३ नागपूर येथे सकाळी दहा वाजता झाले.

----------

त्यांचे देहावसान झाले तेव्हा प्रेमदास लोणकर यांनी वाहिलेली पुष्पांजलि

(चाल-मंगलमय नाम.)

 (ताल-दादरा )

शेवटची पुष्पांजली । ज्ञान पंडिता ॥

अकस्मात् निधन कसें । जाहलें अतां ॥धृ

ज्ञानदीप पंथाचा । मावळला जन्माचा ॥

मुगुटमणी माहुरचा । हरवला अतां ॥१॥

संशोधक धर्माचे । अभ्यासू शास्त्रांचे ॥

पूज्य अवघ्या पंथाचे । लोपले अता ॥२॥

निरभिमान हृदयांतरि । लौकिकही देशांतरि ।।

शुन्य देवदेवेश्वरि । भासते तां ॥३॥

निदिध्यास सेवेचा । श्रीप्रभुच्या स्थानाचा ॥

उदय-काल प्रगतीचा। खुंटला ता ॥४॥

कष्टविलें जीवासी । सुख नसे शरिरासी ।

ब्रह्मपदी आत्म्यासी । शांतता तां ॥५॥

अखिल साधु संतांना । अनुयायी भक्तांना ।।

हा वियोग साहवे ना । कुणासी तां ॥६॥

गौर वर्ण शरिर दिसे । राजपिंड भासतसे ॥

तरुण मूर्ति शोभतसे । लोपली अतां ॥७॥

रूपवंत रत्न जसें । सौंदर्यहि झळकतसे ॥

प्रेमदास प्रणाम करीत असे । तुम्हांसी अतां ॥८॥

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post