आत्मतीर्थ कसे निर्माण झाले? पांचाळेश्वर

आत्मतीर्थ कसे निर्माण झाले? पांचाळेश्वर

 

महातीर्थ - आत्मतीर्थ

 

पांचाळेश्वरी गौतमी तट तिरीमाध्यान्हकाळी प्रभू ।

नित्याने करी भोजन सुरपतीत्या आत्मतीर्थी विभू ॥

सायंकाळ प्रवर्तता गत करी मातापुरी पहुड हो ।

ऐसा खेळ करी सह्याद्रि शिखरी सृष्ट्यांतरी नित्य हो ।।

        परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीदत्तात्रेय प्रभूश्रीचक्रधरप्रभू व श्रीगोविंदप्रभू या तिन्हीं पंचकृष्णाच्या श्रीचरणस्पर्शाने पुनीत झालेले महातीर्थक्षेत्र 'पांचाळेश्वर'.

        आत्मऋषीच्या विनंतीला मान देऊन श्रीदत्तात्रेय प्रभू महाराज येथे रोज भोजनासाठी येत असतात. औरंगाबाद व बीड जिल्ह्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या तीरावर श्री क्षेत्र पांचाळेश्वरहे गांव आहे. पांचाळेश्वर तसे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गांव. येथे फार पूर्वी 'पांचाळ' नांवाचा राजा रहात होता. पांचाळेश्वराच्या जवळंच असलेल्या 'राक्षसभूवनयेथे पुलस्त ऋषीचे शुंभ व निशुंभ असे दोन पुत्र रहात होते. ऋषीवंशात दोघांचा जन्म झाला असला तरी घोर तप करून त्यांनी असूरी शक्ती प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे शक्तिने उन्मत्त होऊन त्यांनी त्या परिसरात सर्वत्र हैदोस घातला होता. अनेकांच्या धार्मिक कार्यात विघ्न करून त्यांचा छळ करणेहे त्यांचे नित्यांचेच झाले होते. कोणीही त्यांना आवर घालू शकत नव्हता. म्हणून एके दिवशी आत्मऋषीसह सर्व ऋषींनी पांचाळराजाकडे शुंभ-निशुंभाची तक्रार केली. असूरांचा बंदोबस्त कारणाचे राजाने ऋषीमुनिंना अभिवचन देऊन निश्चिंत असण्याचे त्यांना सांगितले.

        एके दिवशी पांचाळ राजाने राक्षसभूवनला येऊन दोन्ही असूरांना ठार केले. सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ऋषीमुनिनी राजाचा जय जयकार केला. त्याला आशिर्वाद दिले.

        शुंभ-निशुंभ दोघेही वृत्तीने राक्षस असले तरी जन्माने मात्र ते ऋषी पुत्र होते. ब्रह्म्याच्या वंशातले होते. पांचाळ राजाला ब्रह्महत्तेचे पातक घडले होते. त्यामुळे राजा आत्मऋषीला शरण गेला व त्यांना विनंती केलीहे महामुनि! मला ब्रह्महत्तेचे पातक घडले. ह्या पातकापासून कृपया मला मुक्त करा. आपण जे सांगालजे प्रायश्चित द्याल ते मी करायला तयार आहे.पातकापासून मुक्त होण्यासाठी परब्रह्म परमेश्वर चहुयुगी चिरायु परात्पर अवतार श्रीदत्तात्रेयप्रभूंची आराधना करण्यास आत्मऋषींनी राजा पांचाळला सांगितले. ऋषींच्या आज्ञेनुसार राजा आराधना करू लागला. आत्मऋषीपण प्रभूंची आराधना करू लागले.

        श्रीदत्तात्रेयप्रभूंचे स्मरण करीत नित्य दोघांच्याही भक्तिने प्रसन्न होऊन एके दिवशी श्रीदत्तात्रेयप्रभू आत्मऋषींच्या आश्रमी आले. प्रभूंचे दर्शन होताच दोघेही गद्गद झाले. दोघांनीही धाऊन प्रभूंचे श्रीचरण धरले. प्रभूंची महापूजा केली. भक्तिभावे प्रभूंचे स्तुतीस्तोत्र सर्व ऋषीमुनिंनी गाईले. श्रीदत्तात्रेयप्रभूंचे भोजन झाले. सर्वांनी प्रभूंचा प्रसाद ग्रहण केला. श्रीदत्तात्रेयप्रभूंची महापूजा करून पांचाळ राजाने प्रभूंना प्रार्थना करून ब्रह्महत्तेच्या पातकापासून स्वतःला मुक्त करण्याची विनंती केली. 'हे प्रभो ! मी तुम्हाला अनन्यभावे शरण आलो आहे. या पातकापासून तुम्ही मला मुक्त करा. आपणाशिवाय मुक्त करणारा अन्य कोणी नाही.राजाच्या प्रार्थनेने प्रभू प्रसन्न झाले. पांचाळराजाला भूमित बाण मारून पाताळगंगेचे पाणी वर आणण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे राजाने बाण मारताच पाताळगंगेचे पाणी वर आले. श्रीदत्तात्रेय प्रभूंनी त्या पाण्यात श्रीचरण प्रक्षाळण केले आणि अशा पवित्र चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थात राजाला स्नान करण्यास सांगितले. तीर्थस्नानाने राजाचा ब्रह्महत्तेचा कलंक पुसून निघाला. प्रभूंच्या आशिर्वादाने त्याचे पातक नष्ट झाले. यानंतर आत्मऋषी व राजासह. सर्व ऋषींनी श्रीदत्तात्रेयप्रभूंची महापूजा केली. प्रभूंनी सर्वांसह आरोगणा केली. सर्वांच्या भक्तिने प्रसन्न झालेल्या प्रभूंनी आत्मऋषींना सांगितलेहे ऋषीवर्य! हे पवित्र तीर्थ 'आत्मतीर्थम्हणून आमच्या भेटीची साक्ष आहे. यामुळे तुम्हा सर्वांना आमचे संतत स्मरण होईल.यावर आत्मऋषी प्रभूंना म्हणालेहे प्रभो ! आम्हाला आपला वियोग सहन होणार नाही. आपण दररोज येथे भोजनासाठी यावे अशी आमची सर्वांची प्रार्थना आहे.यावर दररोज भोजनासाठी येण्याची विनंती स्विकार करून सर्वांना आशिर्वाद देऊन प्रभू बद्रिकाश्रमाकडे निघाले. तेंव्हापासून श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज पांचाळेश्वराला भोजनासाठी येत असतात. आत्मऋषींच्या कोळी "आत्मतीर्था'चे स्वरूप तळ्याच्या आकाराचे होते. राजा पांचाळाने हे तळे बांधले असावेपण कलांतराने तळे नष्ट होऊन. गोदावरीचा प्रवाह बदलून तेथून वाहू लागला असावा. कारण सध्या आत्मतीर्थ हे स्थान गोदावरीच्या मध्यात आहे.

        आत्मऋषींनी श्रीदत्तात्रेयप्रभूंची आराधना केलेली जागा हीच होय. आत्मतीर्थ स्थानाच्या नैऋतेस श्रीदत्तात्रेय प्रभुंचे विश्रांती स्थान आहे. ते आज गुंफास्थान म्हणून ओळखले जाते.

 आत्माळे तळे पांचाळे निर्मिते ।

 तेथ माध्यान्ह काळ पर्यंते ।

 श्रीदत्त सदा जळ केळी  खेळत : तिथे पै ॥२०॥

 ध्वंसले आत्माळे तळे । तरी श्रीदत्त प्रभू राऊळे ।

 तेथ सर्वदा माध्यान्ह काळे ।

 क्रीडा करिताती ॥ २३॥

 जया आत्मतीर्थी स्नान घडे ।

 तरी बहुजन्मार्जित पाप संग बिघडे ।

 पुण्यरूप जन्म होय रोकडे । जन्मामाजी ॥४०॥ (आत्मतीर्थ महात्म्य)

        पांचाळेश्वर श्रीदत्तात्रेयप्रभू प्रमाणेच श्रीचक्रधरस्वामी व श्री गोविंदप्रभू यांच्याही श्रीचरण स्पर्शाने पुनीत झाले आहे. मेरुवाळा तळ्यावर स्नान, काहींच्या मते काशीला स्नान कोल्हापूरी, गंगातीरची भिक्षा पांचाळेश्वरी भोजनमाहूरी निद्रा असा श्रीदत्तात्रेयप्रभूंची दैनिक क्रिडा आहे.

अनेक भाग्यवान जीवांना त्यांच्या भावभक्तीनुरूप श्रीदत्तात्रेयप्रभू महाराज दर्शन ही देतात. 

तिन्ही परमेश्वर अवतारांच्या चरणाने पवित्र झालेल्या महातीर्थ पांचाळेश्वरी एकदा तरी गेले पाहिजे. डोळाभरून स्थान दर्शन घेतले पाहिजे.

                                                                                - संकलन

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post