श्रीकृष्णभगवंतांनी नारदमुनींचे गर्वहरण केले

श्रीकृष्णभगवंतांनी नारदमुनींचे गर्वहरण केले

  

श्रीकृष्णभगवंतांनी नारदमुनींचे गर्वहरण केले

 


        नारद ऋषि श्रीकृष्णभगवंतांशी गर्वाने वागले. त्यांचा गर्व हरण कसा केला ते या कथेत आपल्याला वाचायला मिळेल.

नारदे तुजशी धरिला अभिमान । म्हणे मी ब्रम्ह तुजसमान ।

तुझें एकचि ज्ञान । भिन्न भेद दिसेना ।।

तूं सर्व भोगूनि अलिप्त । मीही पापपुण्यातित ।

सोळासहस्र अंतःपुरात । मज समर्पि एक भार्या ।।

   एकदा नारदमुनी तिन्ही लोकी भ्रमत भ्रमत द्वारकेत आले. तेथे श्रीकृष्ण भगवंतांना भेटून जरा गर्वानेच म्हणाले, ‘‘हे श्रीकृष्ण भगवंता!तू ब्रह्म आहेस हे खरे ; पण मी सुद्धा ब्रह्मच आहे. आपल्या दोघांत तसा काही जास्त फरक नाही. तुझे आणि माझे ज्ञान सारखेच आहे. तू सर्व सुखांचा उपभोग घेऊनही अलिप्त आहेस. मीसुद्धा पाप-पुण्याच्या पलीकडे गेलो आहे. तुझ्या अंतःपुरात तुझ्या सोळा हजार बायका आहेत. मला मात्र एकही बायको नाही. म्हणून म्हणतोतुझ्या इतक्या बायकांपैकी एक बायको मला दे. म्हणजे मीसुद्धा अष्टभोगांनी सुखी होईन.’’ नारदाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णभगवंतांना हसू आले. त्यांनी नारदाची चांगलीच फजिती करण्याचे ठरविले. श्रीकृष्णभगवंत म्हणाले,  ‘‘नारदाया सोळा हजार राण्यांच्या महालातज्या महालात मी नसेन त्या महालातील माझी पत्नी तू खुशाल घेऊन जा.’’ श्रीकृष्णभगवंतांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेले नारदमुनी उड्या मारू लागले. नाचू लागले. तो स्वतःशीच म्हणाले, ‘आता या चिपळ्या आणि वीणा हवी कशाला?’ असा विचार करून त्यांनी चिपळ्या आणि वीणा फेकून दिली.’’ भगवी वस्त्रे टाकून भरजरी पीतांबर धारण केला. शरीरावर सोन्याचे अलंकार घातले. मग तो मोठ्या आनंदाने श्रीकृष्णभगवंतांच्या प्रासादाकडे निघाले. आता श्रीकृष्णाची एक सुंदर बायको घ्यायचीद्वारकेच्या बाहेर वनात जायचे व मौजमजा करायची असे मनोराज्य करीत करीत ते श्रीकृष्णभगवंतांच्या प्रासादात शिरले. तेथे रुक्मिणीमाता श्रीकृष्णभगवंतांना विडा देत होती. ते पाहून नारद तसेच परत फिरले. व सत्यभामेच्या प्रासादात गेले. पाहतात तर कायतेथे श्रीकृष्णभगवंत मयुरादी पक्ष्यांशी खेळत होते. बिचारे नारद अगदी निराश झाले. मग ते तिसऱ्या राणीच्या महालात गेले. तेथेही तेच. प्रत्येक घरात श्रीकृष्णभगवंत. कुठे झोपला होतेकुठे सरीपाट खेळत होतेतर कुठे आपल्या पत्नीशी हास्यविनोद करीत होतेकुठे स्नान मादने सुरु होते. प्रत्येक घरात श्रीकृष्णभगवंत! मग नारद आणखी एका प्रासादात गेले. तेथे श्रीकृष्णभगवंतांची एक सुंदर राणी त्यांना दिसली. नारदाला वाटलेयेथे श्रीकृष्णभगवंत कुठे दिसत नाहीत. बरे झालेआता या सुंदरीला घेऊन जावे. असा विचार करून नारद तिच्याजवळ गेले. आणि तिला हात लावणार तोच पलीकडे श्रीकृष्णभगवंत मंचकावर पहुडलेले दिसले.

 श्रीकृष्णभगवंतांची राणी भयंकर संतापली. ती नारदमुनींना रागाने म्हणाली,

जळो तुमची विरक्ती । काइसेया वाढविली महती ।

एवढी वासनेची फजिती । तरी कां जाहला संन्यासी ।।

‘‘मुनिवर्य! तुम्हाला काही लाजलज्जाआम्ही एकांतात असताना येथे कशाला आलातआग लागो तुमच्या विरक्तीला!

नाही आवरीला कामक्रोध । तरी कां डोईस लावितां भस्म ।

ऋषिवेष धरूनियां उत्तम । पूजा घेतसां विश्वाची ।।

स्वतःला मोठे विरागी समजता ; पण कामक्रोधाला काही आवर घालता येत नाहीस्वतःला हरिदास म्हणविताकपाळाला भस्म लावतालोकांच्याकडून स्वतःची पूजा करवून घेता. मनात मात्र परस्त्रीचा विचार! हे ढोंग कशासाठी?’’

        हे तिचे शब्द ऐकताच नारदाला अतिशय लाज वाटली. त्यांना मरून पाणी झाल्यासारखे वाटले : तिचे शब्द त्याला फार झोंबले. ते तसेच मौन धरूनएक शब्दही न बोलता तो द्वारकेतून बाहेर पडले. भर दुपार झाली होती. उन्हाने त्यांना चांगले घामाघूम केले होतेचालून चालून तो खूप दमले. स्नान करावे म्हणून तो नदीवर गेले. तेथे एकांतस्थळ पाहून त्याने नदीच्या पाण्यात बुडी मारली. त्याचवेळी श्रीकृष्णभगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रयोग केला. नारदमुनी बुडी मारून पाण्यातून बाहेर आलेनाकाला स्पर्श करताच त्यांना जाणवले कीनाकाला नथ आहे असे. डोक्याला स्पर्श केला तेव्हा लांबसडक केस त्याच्या हाताला लागले.

        हातांत बांगड्याकपाळावर कुंकूछातीवर मोठे पुष्ट स्तनअशा प्रकारे आपल्याला स्त्रीदेह प्राप्त झाला आहे असे त्याच्या लक्षात आले. ते पाण्यातून बाहेर आले. आपल्यात झालेला हा बदल पाहून नारदाला मोठे आश्चर्य वाटले. नारदाची नारदी झाली होती. ते घाबरले आता काय करावेत्यांना समजेना. आता अशा अवस्थेत वैकुंठाला कसे जायचेआणि कुठे जायचेकाहीच सुचेना. आता त्यांना स्त्रीसारख्या भावना उत्पन्न होऊ लागल्या. सलज्जभाव आला. पुरुषत्व गेले. पौष महिना असल्याने त्याला थंडी वाजू लागली.

        आता ती नारदी निवाऱ्यासाठी जागा शोधू लागली. वनात फिरता फिरता तिला एक पर्णकुटी दिसली. त्या पर्णकुटीत एक धष्टपुष्ट तरुण ब्राह्मण योगी राहत होता. ती नारदी आश्रयाला त्या पर्णकुटीकडे गेली. तिने आत डोकावून पाहिले तर तिथे तो योगी बसलेला होता. त्या योग्याने तिच्याकडे निरखून पाहिले. त्याने तिला विचारले, ‘‘हे सुंदरीतू कोण आहेस ? कोणी राक्षसीदेवांगना की अप्सरा?’’ त्या योग्याने असे विचारले असता ती मृगनयना नारदी हसून म्हणाली, ‘‘मी गंधर्वाची बहीण आहे. मी देवलोकातली असले तरी मनुष्यकोटीतील पुरुषाबद्दल प्रेम आहे. म्हणून मी पृथ्वीवर आले आहे. आता मी तुमची पत्नी होऊन तुमची सर्वप्रकारे सेवा करीन.’’ योगी म्हणाला, ‘‘तू मोठी अज्ञानी आहेस. मी ब्रह्मचारी ब्राह्मण आहे. तू म्हणतेस त्याला मी तयार नाही.’’ त्या दोघांचे असे बोलणे चालू असताना दिवस मावळला. रात्र सुरू झाली. ती नारदी तशीच तेथे झोपली. थंडी पडू लागली. त्या नारदीला पांघरायला काहीही नव्हते. त्या योग्याला तिची दया आली. त्याने तिला पांघरूण दिले व तोही झोपला. मग ती दुसऱ्या दिवसापासून नारदी त्या योग्याची सेवा करू लागली. हळुहळु त्या योग्याला तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले. मग व्हायचे तेच झाले. दोघांनी हास्यविनोद करीत रात्रभर आनंदाची लयलूट केली. योग्याचे ब्रम्हचर्य भंगले. शेवटी दोघांनी लग्न करून संसार थाटला. दिवस लोटता लोटता त्यांना साठ मुले झाली. त्या साठही मुलांचा सांभाळ करता करता नारदीच्या नाकी दम आला. खाणारी साठ तोडं आणि ते दोघे असे ६२ जीव त्या झोपडीत राहत होते. संसाराला पुरेल इतके अन्नवस्त्रनिवारा या मुलभुत गरजाही पूर्ण होत नव्हत्या. नव्याचे नऊ दिवस सरले. आता दोघांच्या संसारात कटकटी सुरू झाल्या. सारखी भांडणे होऊ जागली. त्या योग्याला पश्चात्ताप होऊ लागला. एक दिवस तो नारदीला रागाने म्हणाला.

‘‘ क्रोधे भरुनियां ब्राम्हण । म्हणे कोठून आलीसि पापीण ।

माझे भंगले अनुष्ठाण । भ्रष्ट झालो तुझ्या संगे ।।

‘‘तू कुठली कोण आलीसमाझा मुर्खपणा झालातुला मी थारा दिला. माझे ब्रम्हचर्य भंगले. माझी सगळी तपश्चर्या वाया गेली. स्त्रीच्या संगतीने भल्याभल्यांची पुरी फजिती झाली.’’

तेव्हा ती नारदीही त्याला म्हणाली,

ते म्हणे लज्जा नाही तुम्हासी । भोगितां सुरवाडला रतीसी ।

आतां कांटांळेनि होळिसी । क्रियानिष्ठा पापिष्ठा ।।’’

‘‘हे पापिष्ट ब्राम्हणा ! आता तुला शहाणपण सुचते आहे काजेव्हा कामांध होऊन भोग घेतला तेव्हा तू तर खुप उतावळा होतास! आता तुला कंटाळा आला म्हणून आता असं म्हणतोस.’’

    त्यावर तो ब्राम्हण म्हणतो, ‘‘पापिणी तू येऊन माझ्या गळ्यात पडलीस आणि मला कलंक लावला. मेनकेच्या संगतीने जसा विश्वामित्राचा तपोभंग झाला. पराशर ऋषी एका कोळ्याच्या मुलीवर लुब्ध झाला. सीतेच्या मोहामुळे रावणाचा नाश झाला. पार्वतीची अभिलाषा धरलेला भस्मासूर स्वतःच भस्म झाला. स्त्रीची संगत घातक हेच खरे आहे! म्हणून हे उद्धट स्त्रीये आताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर जा’’ असे बोलून त्याने तिला घराबाहेर घालवून दिले. मग ती नारदी तेथून नदीवर गेली. तिला आता जगणेही नकोसे झाले. पश्चात्ताप झालेली ती स्वतःशीच म्हणाली, ‘‘आता जगण्यात काय अर्थमाझी सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली. देवसुद्धा मला वंदन करीत होते. मला आता ही हीन दशा प्राप्त झाली. हे श्रीकृष्णामाझे रक्षण कर. माझी अतिशय वाईट अवस्था झाली आहे. तुझ्याशी बरोबरी केली आणि माझी पुरी फजिती झाली.’’ असा विचार करून तिने देहत्याग करण्यासाठी नदीच्या पाण्यात बुडी मारली. त्याचक्षणी तिचे स्त्रीरूप गेले आणि ते पूर्वीसारखेच नारद होऊन बाहेर आले. आपण स्वप्नात आहोत की जागे आहोत,  हे त्यांना समजेना. त्याचवेळी श्रीकृष्णभगवंत तेथे प्रकट झाले. ते नारदाला पाहून हसत हसत म्हणाले, ‘‘काय मुनिवर्यसंसार काय म्हणतोस्त्रीसुख कसे आहे कळले ना?’’ श्रीकृष्णभगवंत असे म्हणालेअसता नारदमुनी श्रीकृष्णभगवंतांच्या श्रीचरणाला नमस्कार करून म्हणाले, ‘‘भगवंतामाझी चांगलीच फजिती केलीस! परमेश्वरा! मी आपल्या स्त्रियांची अभिलाषा धरली मला क्षमा करा. मला ते सुख आता मुळीच नकोय. आपणच सर्व सृष्टीचा कर्ते आहात. आपल्याशी बरोबरी करून मीच स्वतःची फजिती करून घेतली. दुष्ट वासनेच्या आहारी गेल्याने माझी अशी पूर्ण विटंबना झाली. आपली माया अगाध आहे.असे म्हणून नारदमुनी श्रीकृष्णभगवंतांची स्तुती करीत स्वर्गलोकाला गेला.

        वाचक हो! देवाची लीळा अगाध आहे. जे नारदमुनी हरिहरांना बुद्धी शिकवीत होतेव्यास वाल्मीकि ज्याचे शिष्य होते त्या नारदाची सुद्धा कामवासनेने फजिती झाली तेथे मानवाची काय कथा! म्हणून अनंतशक्ती असलेल्या देवाशी बरोबरी करू नये. शर्करा म्हणून विष खाणारा चिरंजीव कसा होईलवेताळाची भक्ती करून मोक्ष कसा मिळणारवंध्येच्या पुत्राने सिंहाला मारलेआजन्म ब्रम्हचारी असलेल्याविवाहच न करणाऱ्या भीष्माने जावई केला हे कधी कोणी खरे मानील कात्या प्रमाणे देवता व जीव हे परमेश्वरापुढे अत्यंत क्षुद्र आहेत.

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post