रंगशिळा इतिहास (फलटण) - घोड्याची यात्रा

रंगशिळा इतिहास (फलटण) - घोड्याची यात्रा

 रंगशिळा इतिहास (फलटण)

        श्रीचक्रपाणि महाराजांनी अवतार घेतला तेव्हा रंगनाथ मंदिराच्या सभामंडपात सुमारे तीन हात लांबी दोन हात रुंदीतिच्या वर गोलपैलू आकार असलेली अशी एक मोठी पाषाणाची कोरीव कांडारिव शीळा होतीया शिळेवर बाळपणी परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रपाणी महाराज रांगले खेळलेव किशोर अवस्थेत तिच्यावर बसून वेद पठण केले. जनकनायकाचे पिता वेद मंत्र म्हणायचे आणि त्यांच्या पाठोपाठ श्रीचक्रपाणि महाराज अवलीळा, लीलया सहज वेदमंत्र म्हणायचे. रुपनायकांना आश्चर्य वाटायचे. त्या परमेश्वराच्या श्रीचरणस्पर्शानी पावन झालेली शीळा तिलाच रंगशीळा हे नाव आहे. शीळा शब्द स्त्रीलिंगी म्हणून तिला रंगशीळा किंवा रंगुबाई असे भक्त लोक भावार्थाने म्हणु लागलेअशी परंपरेने हकिकत चालत आलेली आहे.

        काळाच्या ओघात पुढे रंगनाथाचे मंदिर पडके झाले. पुढे तिथल्या राजाने त्या मंदिराचा जिणोद्धार केला व रंगशीळा फलटण संस्थानचे राजे निंबाळकर यांनी आपल्या राजवाड्याच्या दरवाजावर बसविली होतीहे तिहासिक सत्य आहेछत्रपती शिवाजीराजे यांच्या सैन्यात हसूजी नावाचे एक गृहस्थ होतेत्यांच्या पराक्रम पाहून हंबीरराव मोहिते हा किताब देऊन त्यांना राजांनी दिला होता. छत्रपती शिवाजीराजांना इ. 1674 ला छत्रपती राज्याभिषेक झाल्यावर अष्ट प्रधानांची नेमणूक झालीत्यात हंबीरराव मोहित्यांना सरसेनापती म्हणून नेमण्यात आलेहे पूर्वी महानुभावांचे अनुयायी म्हणजे उपदेशी होतेत्यांना महानुभाव तत्वज्ञानाचा चांगला अभ्यास होताम्हणून ते मद्यपानअभक्षअहिंसाअन्यभक्ति वगैरे नियम अगदी काटेकोरपणे पाळून श्रीकृष्ण भक्तिमध्ये तल्लीन असत.

        एकदा ते सातारा जिल्ह्यात मोहिमेवर असतांना त्यांना असा दृष्टांत झाला(स्वप्न पडले) की, मला यातून काढपण याचा अर्थबोध काही त्यांना होईनापुनः काही दिवसांनी त्यांना दृष्टांत झालाकी फलटणच्या राजवाड्याच्या दरवाजावर मी आहेतेथून मला काढ.’ तेव्हा त्यांना अर्थबोध झाला व लगेच फलटणला आलेत्यावेळी फलटण संस्थावर अधिपती असलेले श्रीमंत बजाजीराजे नाईक निंबाळकर यांना भेटून राजवाड्याच्या दरवाजावरील स्वप्नात दिसलेली शिळा पाहून राजाला तिची मागणी केलीमग दरवाजासमोर जाऊन त्यांनी

        जमिनीवर खाली वस्त्र अंथरले. त्यावर पूजासाहित्य अपूर्ण उदबत्ती लावलीआणि परमेश्वरास प्रार्थना केली की, ‘‘तुम्ही प्रगट व्हा.’’ असे म्हटल्याबरोबर काय आश्चर्यशीळा आपोआप खाली पडली व तिचे पाच भाग झाले हा चमत्कार पाहून राजे निंबाळकर म्हणाले, ‘‘यातला काही भाग आम्हाला द्या.’’ त्याप्रमाणे राजांना दोन भाग दिलेते त्यांनी आपल्या राजवाड्यासमोरील मोकळ्या जागेत एक देऊळ बांधले व त्या दोन भाग रंगशिळेची स्थापना करून तिच्या दिवाबत्ती करिता काही इनाम जमीन दिलीइकडे हंबीरराव मोहित्यांनी बाकीचे तीन भाग घेऊन एक भाग रंगनाथ मंदिरात पूर्वीच्या जागी ठेवून दुसरा भाग आबासाहेबाच्या देवळासमोर मांडलाव राहिलेला तिसरा भाग बरोबर घेऊन गेले.

        छत्रपती शिवाजीराजे यांनी पूर्वी आश्‍वासन दिल्याप्रमाणे इनाम देण्याची वेळ आली तेव्हा छत्रपती म्हणाले सरदार हंबीरराव मोहिते तुमचा देव श्रीकृष्ण त्याची मूर्ती श्रूंगारलेल्या हत्तीच्या अंबारीत बसवून आणात्या प्रमाणे छत्रपती शिवाजी राजांनी परळी भागात जाहिरनामा सोडला कीआमचा हत्ती त्या भागात फिरेल त्याच्या आतील जमीन बक्षीस दिली जाईलजाहिरनाम्याप्रमाणे त्याच्या फिरण्याच्या भागामधील पोगरवाडी गावाजवळचा सर्व भाग शिवाजीराजांनी सरदार हंबीरराव मोहिते यांच्या देवस्थानाला अर्पण केलातेथे हंबीररावानी श्रीकृष्ण उर्फ सोबत आणलेल्या रंग शिळेचे देळ बांधून स्थापना केलीया ठिकाणाला आज मोहितेवाडी किंवा रंगुबाईवाडी असे म्हणतातया देवस्थानाची पूजा अर्चा वगैरे कारभार करण्याची नोंद महानुभावाकडेच आहे. 1675 ते 1676 या दरम्यान ही घटना घडलीअसे मोहित्यांच्या इतिहासावरून कळतेहंबीरराव मोहित्यांच्या मृत्यू इ. 1688 मध्ये झाला.

 नोंद :- हा इतिहास परंपरेने आलेल्या आख्यायिकेवरून घेतला आहे.

 ==========================

घोड्याची यात्रा निघण्याची पद्धत कधीपासून ?

        फलटण येथील श्रीचक्रपाणी चरणांकित महातीर्थाची यात्रा आज नव्हे तर प्राचीन काळापासून चैत्र महिन्यात वद्य पंचमीला श्रीकृष्णाची मूर्ती पालखीत बसवून थाटामाटाने महंत आणि भक्त समुदायासह व संस्थानिक अधीपतीनी पाठविलेल्या हत्तीघोडेवाद्यलवाजम्यासह मिरवणूक छबीना निघण्याची परंपरा पुर्वी पासुन आहेनंतर काही वर्षानी भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी अशी एक लीला केली की मागेराळ्याच्या घाटाने खोली उतरून जेजुरीच्या चैत्र पोर्णिमेच्या यात्रेला चालेली खंडोंबाची भाविक भक्त मंडळी फलटण येथील बाबासाहेब मंदिराचे पाठीमागे बाणगंगेच्या वाळवंटात मुक्कामास राहिली

तेव्हा त्याच्या बरोबर खंडोबाच्या नवसाचा दीड फुट लांब आणि एक फुट उंच असा पितळेचा घोडा होतादुसरे दिवशी सकाळी सर्व मंडळी जेजुरीस जाण्यासाठी निघालीपरंतु त्या घोड्याला डोक्यावर घेऊन चालणार्‍या माणसास तो घोडा उचलेनातो उचलण्याचा सर्वांनी प्रयत्न केलापण काही इलाज चालेनामग गावातील मंडळी जमलीत्या पैकी एक म्हणाला येथील श्रीकृष्ण भगवंतांची घोड्यावर मर्जी फिरली आहेम्हणून देवाचा अंगारा आणून घोड्याला लावाआणि जयघोष करून उचलायाप्रमाणे करताच केवळ एका मुलानेच तो सहज उचलून श्रीबाबासाहेब श्रीकृष्ण मंदिरात आणून देवापुढे ठेवलातेव्हा ते यात्रेकरु म्हणाले आम्हाला खंडोबा येथेच भेटला असे म्हणून ते परत गेलेफलटणकरांनाही नवल वाटले.

        वरील चमत्कारी घटनेनंतर हा घोडा यात्रेच्यावेळी मिरवणूकीत पालखीसमोर डोक्यावर घेऊन चालण्याची प्रथा चालू झालीम्हणून फलटणच्या आसपासचे लोक घोड्याची यात्रा म्हणू लागले.

 हेही मौखिक आलेल्या आख्यायिकेवरून -


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post