sindhutai sapkal
अशी ही एक भेट....
अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी
अखेरचा श्वास घेतला. अश्या आशयाची बातमी काल रात्रीपासून सर्वच माध्यमातून तसेच सोशयल
मिडियाद्वारे सुरू असलेल्या त्याच्या विषयीच्या आदरभाव तुन सुरू आहे...
परंतु मला त्याही पलीकडे
जाऊन सांगायला आवडेल सिंधुताई सपकाळ ह्या ज्या माध्यमातून घडल्या व त्याच्या वर ज्या
विचारांचे संस्कार झाले व त्यातून त्या घडल्या हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे...
सिंधुताई उर्फ माई यांचा
शुभजन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात झाला होता. माई
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. बालविवाह झालेल्या सपकाळ
यांनी नवऱ्याने केलेल्या अत्याचारांनंतर घर सोडलं...
हे जरी खरं असलं तरी माई
वर आलेल्या परिस्थिती दरम्यान त्याना मिळालेला आसरा व त्यातून घडलेली माई म्हणजे च
खरी जगाची अनाथांची माई झाली...
कारण ही तसेच आहे...
ज्यावेळी कुटुंबातील त्रासाला
व दिलेल्या वागणुकीतून घरा बाहेर रस्त्यावर आली त्यावेळी कोणताही समाज स्वीकारायला
तयार नव्हता. मोठं झाल्यानंतर कोणीही जवळ करत आपले म्हणतात तो तर प्रसिद्धी चा भाग
होईल...
ही मावली पोटाच्या लेकरांच्या
व स्वतःच्या टीचभर पोटास अन्न मिळावं यासाठी जेव्हा खान्देश च्या सीमारेषेवर फिरत होती
त्यावेळी तिच्यावर असलेली आमच्या साधन दाता परब्रम्ह परमेश्वराने टाकलेली नजर तिच्या
प्रगतीची दिशा ठरली...
हो अगदी तेच घडलं व त्या
मावलीला तिने ज्या पूजनीय बाबाजीच्या माध्यमातून पंथीय शास्त्र जाणून घेतले त्याच्या
कडून बाळकडू घेतलं त्या फैजपूर निवासी बाबाजीच्या परधर्माच्या विषयीच्या संस्कार व
आचार विचारांनी...
अनाथ असलेल्या सिंधूताई महानुभाव
साधकांच्या संपर्कात आल्या, फैजपुर येथील बाबांनी व मावशींनी सिंधूताई व मुलगी ममताचा बरेच दिवस सांभाळ केला...
बाबानी निवळ सांभाळून
सोडलं नाही तर त्या मावलीच्या जीवनाला खरा आकार देण्यासाठी सर्वज्ञानी सांगितलेली बिजाची
लागवड ताईच्या ह्दयात अशी कोरली की...
तुम्ही अच्युतगोत्रीय
किंगा तुम्हास परस्परे परम प्रीती असावी हे वचन ताईंच्या जीवनाला ख-या अर्थाने आकार
देऊन गेले. त्या मावलीला खरा संस्काराचा आसरा दिला तो माहानुभाव पंथानेच...
त्याही पुढे चालून महानुभाव
पंथाच्या अनन्य उपासक बनल्या. स्वामींच सुत्र संजीवनी आपल्या जीवनात उतरवून,
पडलेल्याला आधार देण्याच कार्य
करायला लागल्या, त्यानंतर त्यानी अत्यंत अनाथांचा सांभाळ करणं हे त्यांनी आयुष्याचं ध्येय बनवलं.
माईनी वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथे भव्य असे महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर
उभारून श्रीकृष्ण मुर्ती व श्रीचक्रधर स्वामींच्या विशेषाची स्थापना करुन सर्वां साठी
खुल करुण दिल. यातुन त्यांनी महानुभाव पंथीय अनन्य भक्तीचा दिव्य संदेशच जनु समजाला
खऱ्या अर्थाने दिला...
अनाथांची मावली सिंधुताई
सपकाळ यांनी १९९४ साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. अनाथ
(ज्यांना कुणीच नाही) अशा मुलींसाठी आणि मुलांसाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशभरात सिंधुताई या 'अनाथांची माय' म्हणून चिर परिचित प्रतिष्ठीत झाल्या...
परंतु त्या खऱ्या चाहत्या
झाल्या त्या सर्वज्ञाच्या सन्निधानी संस्कारित झालेल्या आऊसा नामक तपस्विनी च्या...
कारण ही तसच होत त्या मावलीच्या विषयीचे संस्कार
येण्याची...
पूजनीय औवसा ह्या कधी जरी थोडंही चुकलं तर त्या
जगनाथाची माफी मागण्यास तयार असायची अर्थात च त्या पूजनीय आऊसा चा त्याचा मनात झालेली
जागा त्यांनी त्याच्या आयुष्यभर जपली...
माई ह्या पंथीय असल्याने निवळ स्वतः पुरत्या मर्यादित
राहिल्या नाहीत तर त्यांनी प्रभूच्या मुखातील वचनाची शिकवण आपल्या प्रत्येक मिळत गेलेल्या
भाषणाच्या संधीच्या वेळी इतरांनाही देण्याचं कार्य थांबवलं नाही...
त्याची प्रत्येक भाषण
ही एक सत्संग होता. कारण त्यातून त्यांनी कधीच पोटासाठी नव्हे तर आपल्या सारखं जिन्न
जगण्याची वेळ यायला नको म्हणून माणसातील माणूस बाहेर काढण्यासाठी केलं. जीवनाच आत्मकल्यान
कश्याने होणार यासाठी केलं...
अश्या ह्या मावलीची भेट
माझी नाशिक येथे एकदा त्या व जाळीचा देव निवासी मोठे बाबा अर्थातच कै आंबेकर बाबा यांच्या
एकत्रित असलेल्या कार्यक्रमात झाली...
तो प्रसंग त्यांची पंथीय
विचाराशी व अच्युतगोत्रीय प्रेमाची नाळ जपत असल्याचा पुरावा देत असल्याचे स्पष्टपणे
दाखवून देत होती...
त्याच भाषण संपल्यावर ज्यावेळी
मी आपुलकीने त्या मावलीच्या जवळ जाऊन भेटण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांनी दूर वरून
दिलेला ओ दादा इकडे या... हा या या आवाज मला रात्रीच्या बातमीत पुन्हा ऐकायला मिळाला
व डोळ्यात अश्रूंना बांध फुटला...
कारण आपण ज्या व्यक्तीच फक्त नाव ऐकून आहोत त्या
पंथीय। आहेत की नाही याची ओळख ही नाही त्या मावलीने मला दिलेला तो आवाज हा त्या वीस
वर्षा पूर्वीच्या भेटीचा खूप मोठा भाग होता...
माईच्या जवळ गेल्यावर त्यांनी
मला जवळ घेऊन कुठली चौकशी करावी हे फार उत्सुकता होती...
त्यांनी मला जवळ गेल्या
बरोबर माझ्या हाताला पकडत दंडवत असा आवाज दिला व तू ही पंथीय आहेत का? मी त्या प्रश्नांचे उत्तर तर
दिल परंतु मला ही उत्सुकता वाढली ती त्यांचं मत जाणून घेण्याची ते असं की ...
तुम्हास या विषयीची काही माहित आहे का असा भाबडा प्रश्न करून मी त्यांचे बरोबर बोलता झालो
व माई तुम्हाला कसं कळलं तर...
त्या मावलीने जो हात पकडून मला जवळ केलं होतं त्याच
हातातील मनगठी पकडत म्हणे हीच तर तुझी ओळख आहे...
अक्षरशः त्या माइचे जवळ पाच दहा मिनिटं त्यांचे पंथीय
प्रेम जाणून घेण्याची संधी मिळाली...
मी काय होतो काय नाही
पण मी पंथीय होतो हे त्यावेळी मला खूप अभिमानाने मान उंच करणारे वाटले...
अशी ही थोर तपस्वी आज
आपल्या तुन निघून गेली पण त्यांच्या स्मृती ह्या कायमस्वरूपी स्मरणीय राहतील...
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू त्यांना आपले कैवल्य पद प्रदान करो...
ही प्रभू चरणी प्रार्थना...
दंडवत माझा देव श्रीचक्रधर...
आपलाच... प से सुरेश डोळसे, नाशिक
भावपूर्ण श्रद्धांजली
सिंधुताई सपकाळ
मातृत्वाचं सृजनत्व...!
नकोशीचे नामकरण...
चिंधी असे झाले...।
संघर्षमय जीवन सिंधुच्या
नशिबी आले ...।।१।।
अजाणत्या त्या वयात..
सप्तपदी पाऊल उचलले ।
मातृत्वाचे क्षण झेलताना ,
सासरच्यांनी झिडकारले ।।२।।
अनाथांची ही माऊली
देते आयुष्याला नवी दिशा ।
सांभाळून पोरक्या मुलांना
घालवते जीवनातली निशा ।।३।।
वेदनांना गुलाम करत..
भाळी संवेदनाचं कुंकू लावलं ।
अन्यायाविरुद्ध लढा देताना...
नियतीला हिमतीने वाकवलं ।।४।।
आयुष्याला आकार देणारी...
संस्कार शिदोरी माईने जमवली ।
रात्रीच्या अंधाराला न घाबरता...
नव्या दिशेची वाट दाखवली ।।५।।
मातृत्वाचं सृजनत्व...
वात्सल्यसिंधु नी पेललं ।
यशाच्या वाटा धुंडाळताना
संकटांना अलवार झेललं ।।६।।
सौ राजश्री भावार्थी
पुणे
===================================
श्रद्धांजली
साधा पेहराव । काळजात
भाव ।
अनाथांचे गाव । सिंधुताई
।।१।।
संघर्षात उभा जन्म
त्यांचा गेला ।
संघर्षचि आला । शेवटाला
।।२।।
बनुनी यशोदा । सर्वां
दिली माया ।
वंचितांची छाया । सदोदीत
।।३।।
लढण्याचे बळ । कृतीतून
दिले ।
मूर्तिमंत झाले । जगणे
हे ।।४।।
पदरात घेई । आभाळ होऊनि
।
घेई सांभाळुनि । चुकभुल
।।५।।
अशी आई होणं । ज्यात
देवपण ।
माई तुझे ऋण । कसे
फेडू ।।६।।
कवी म.ना. दे