ओळख परमेश्वराची
दंडवत...
आज या विज्ञानाच्या युगात वावरताना अनेकांना परमेश्वराने हे निर्माण केलं याच गोष्टींवर विश्वास बसत नाही... तसं अभ्यासकाना वाटण साहजिकच आहे... पण ज्यावेळी परमेश्वराने स्वतः आचरण करून नंतर आपल्या सारख्या जीवांना ते वेळोवेळी प्रसंगानुरूप सांगितलं त्यावेळी त्या साधन दाता परमेश्वराने कोणतीच अशी गोष्ट आहे की त्याबद्दल ची माहिती दिली नाही त्याबद्दल च तत्वज्ञान सांगितलं नाही... त्यावेळी मात्र नक्कीच तिथं हे विज्ञान देखील निर्मित असून मात्र सृष्टी ही परमेश्वर निर्मित आहे...
‘विश्वविधात्याचे आपल्याशी असलेले नाते’ साध्या, सोप्या, सरळ पद्धतीने जमेल त्या शब्दांत मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न…. आणि अशा नात्याचा स्विकार करुन विधात्याला नतमस्तक होणारे जगात अगणित लोक असावेत असे मला ठामपणे वाटते... विश्वातील कोणत्याही गोष्टिची निर्मिती ही कारणाशिवाय झालेली नाही. अर्थातच…. कारण म्हणजे स्वयंचलित, निरंतर, आणि कल्पनातीत अशी ही विश्वशक्ती. ह्या विश्वशक्तिची जागा जगात कोणीही घेवु शकत नाही, हे आधी ध्यानात घ्या...
(सूरुवातीस तरी जगाशी, निसर्गाशी आणि समाजाशी ह्या शक्तिची सांगड घालु नका.)
प्रथम आपण आणि ही शक्ती याचाच विचार करा. जीवनात आनंद आहे म्हणुन आपण जगतो. अर्थात, माणुस जीवन कसा जगतो त्यानुसार त्याचा आनंद असतो. असो… आपण जरी आपल्या जीवनाचे शिल्पकार असलो तरी आपण वापरतो त्या देहाची निर्मिती कुणाची? निसर्गाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाचा मेंदु, आपल्याला मिळालेल्या भावना आणि संवेदनां, की ज्यांच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील भावनीक आणि संवेदनशील सुख-दुःखांचं पान देखिल हालत नाही, अखिल जीवसृष्टीसाठी विपुल साधन संपत्तीने वैभवसंपन्न, नयनरम्य अशी ही निसर्ग निर्मिती, ह्या सगळयांचा कर्ता करविता कोण?
मात्र मानवासाठी हा विषय येथेच संपत नाही. आपली उत्पत्ती अणु-रेणु इतकी जरी असली तरी आपल्याला पृथ्विवर रानगव्यासारखे अगदीच मोकाट न सोडता ह्या शक्तिने अखिल मानवजातीसाठी खास अशी मेख मारली आहे... माणसाच्या जीवनातील निख्खळ आनंद हा या विश्वशक्तिची निर्मिती आहे, आणि ह्या निख्खळ आनंदाचा ऱ्हास करणारी षड्रिपुं ही मानवाची निर्मिती.
सोप्या भाषेत… मेहनतीने मिळवीलेली संपत्ती आणि चोरी करुन मिळवीलेली संपत्ती ह्या दोघांपासुन मिळालेला आनंद हा सारखा कसा असू शकेल? म्हणजेच ही शक्ती दिसत जरी नसली तरी तुमच्या निख्खळ आनंदाची दोरी तिच्या हातात आहे... जसे... सोन्यामध्ये जितकी भेसळ कराल तितके ते अशुद्ध होत जाते. अगदी तसेच जीवनात तुम्ही जितके षड्रिपुं अंगीकाराल तितका तुमचा निख्खळ आनंद हा अधोगतीस जातो, आणि याचा तुमच्या मनावर, मानसिक स्वास्थ्यावर शंभर टक्के परिणाम होतोच, यात दुमत नसावे. ही शिक्षेची तरतुद कुणाची? तरी देखिल षड्रिपुंवर ताबा मिळवुन निख्खळ आनंद निर्माण करण्याची ताकद ह्या शक्तिने तुम्हाला दिलेली आहे...
दैनंदिन जीवन जगतांना माणसामध्ये हुशारी, विवेक, शहाणपण आलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी ह्या गुणांचा देखिल षड्रिपुंशीच थेट संबध आहे. तुम्ही षड्रिपुं कंट्रोल करा, हे सर्व गुण आपोआपच अंगात रुजतात यात शंका नसावी...
मग मला सांगा ह्या रंग, रूप, आकार नसलेल्या शक्तिला परमेश्वर म्हणण्यात अडचण कसली? ह्या निराकार परमेश्वराला आणि त्याच्या नियमांना विनम्रपणे समर्पित होऊन त्याचे अस्तित्व मान्य करण्यातच आपलं हित आहे...
मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ह्या निराकार परमेश्वराजवळ काहीही मागण्याचा वेडेपणा करु नका, काहीही मिळणार नाही. उलटपक्षी ह्या परमेश्वराची निस्वार्थभाव ठेऊन क्षणभर जरी आठवण केली तरी तुमच्या मनातील वाईट विचार आणि वाईट कृतींविरुद्ध लढण्यास लागणारी मनशांती आणि धैर्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
जीवन प्रवासातील सर्वात बलशाली आयुधं असतील तर ती फक्त मनशांती आणि धैर्य... (पण जे जाणीवपूर्वक षड्रिपूंचा अंगीकार करुन आपले जीवन जगतात, ते ह्या निख्खळ आनंदापासुन कैक किलोमीटर लांब. त्यांना ह्या आनंदाचा विचार करण्याची मुळात इच्छाही नसते आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही... म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय? आपल्याला त्यांच्या गुळाशीही काही देणंघेणं नाही, मात्र त्यांच्या सानिध्यात आलेल्यांना, कुटुंबाला आणि समाजाला कोणत्यातरी मार्गाने त्यांचा उपद्रव होतोच हे नक्की.)
महत्वाच्या मुद्दयाकड़े वळू या…
पूर्वी कुणालाही लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणुन ते सर्वच रानटी, बेईमान, नीतीशून्य होते का? म्हणजेच कोणतंही तत्वज्ञान न ऐकता, न वाचता, देखिल ते सदाचार नीतीची जपणूक करितच होते की हो... किती शिकलेल्यांनी तत्वज्ञान वाचलेलं आहे? आणि ज्यांनी वाचलेलं असेल ते सदाचारी, नीतीमान झालेच असतील याची ग्यारंटी कोण देणार...? याचाच अर्थ, चांगल्या वाईटाचं, खऱ्याखोट्याचं ज्ञान हे आपल्याला जन्माबरोबर आपोआपच मिळतं, कुठं शिकायला जावं लागत नाही. सदाचार, नीती शोधण्यासाठी सर्व जग जरी धुंडाळलं तरी मिळणार नाही, ती तूमच्यातच असावी लागते...
धर्माची सोपी, सुटसूटीत आणि सर्वांना समजणारी व्याख्या … “सदाचार नीतीचे अनुसरण करुन आपल्याद्वारे दूसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता जीवन जगणं”... म्हणजेच …. दैनंदिन जीवन जगत असताना सदाचार नीती ही कमवावी लागते. हो अर्थाचत त्या नितिमूल्याचे पालन करत आपण त्या परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करत राहिल्यावर आपण प्रवास हा कैवल्याची प्राप्तीचा मार्ग आहे हे लक्षात ठेवा...
आज नाशिक जिल्हा परिसरातील ढोर्या डोंगराच्या कुशीत जे प्रायश्चित विधीचा कार्यक्रम होतोय ना त्या कार्यक्रम जागेच्या परिसरात कितीतरी महान विभूतींना आपला देह त्या साधनदात्यानी जीवनाचे सोनं होण्यासाठी सांगितलेली नीतिमूल्ये जपली व त्या साधन दाता परमेश्वराने सांगून दिलेल्या कैवल्याची प्राप्तीचे दिशेने जाण्यासाठी आवश्यक असलेले अचरणाशी कटिबद्ध असल्याने त्या ठिकाणी येऊन इतिहासात अमर झाले... आपण देखील हा संसाराच्या व जन्ममृत्यू च्या रहाट गाडग्यातून बाहेर पडण्यासाठी तो साधन दाता ओळखा त्यांची नीतिमूल्ये जपा व त्यानुसार आपलं जीवन मार्गक्रमण करा... तुम्हास त्या नीतिमूल्ये ओळखले गेल्यावर देवदर्शन झाल्याचा अनुभव होईल...
दंडवत ... माझा देव श्रीचक्रधर... sd
आपलाच... प से सुरेश डोळसे,नाशिक