महाभारत वाचायला वेळ नाही? तर मग वाचा महाभारताची दहासूत्रे mahabharat 10 sutra

महाभारत वाचायला वेळ नाही? तर मग वाचा महाभारताची दहासूत्रे mahabharat 10 sutra

महाभारत वाचायला वेळ नाही? तर मग वाचा महाभारताची दहासूत्रे  

mahabharat 10 sutra



महाभारत वाचायला वेळ नसला तरी त्याचे  अमूर्त सूत्र आपल्या जीवनात उपयुक्त ठरू शकते:-


१) कौरवांच्या वर्तनावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, मुलांच्या चुकीच्या मागण्या आणि हट्टीपणा वेळीच आवरला नाही तर शेवटी तुम्ही लाचार आणि हतबल व्हाल. 


२) कर्मदरिद्री अशा सुतपूत्र कर्णाच्या जीवनावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल तुम्ही कितीही बलवान असाल, पण जर तुम्ही अधार्मिक असाल, आणि अधर्माचे समर्थन करत असाल तर तुमचे ज्ञान, शस्त्रे, शक्ती आणि वरदान सर्व निष्फळ होतील. 


  ३) द्रोण पूत्र अश्वत्थाम्याचे वर्तन पाहता आपल्या लक्षात येते की, आपल्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते आपल्या ज्ञानाचा गैरवापर करून ते स्वतःच्याच सर्वनाशाला आमंत्रण देतील. 


 ४) महाभारतातील सगळ्यात असहाय पात्र म्हणजे गंगापूत्र भीष्म, त्याच्या एकूण कारकिर्दीत त्याने गरजेच्या वेळी मौन धरले,(द्रौपदी वस्त्रहरण) आणि दुर्योधनाच्या अधर्माला बळी पडून धर्माविरुद्ध शस्त्र उचलले. म्हणून अधर्माला शरण जावे लागेल असे वचन कोणालाही देऊ नका हे भीष्माच्या जीवनावरून आपल्या लक्षात येईल. 


 ५) दुरात्मा दुर्योधनाच्या जीवनावरून संपत्ती, सत्ता आणि सत्तेचा दुरुपयोग आणि दुष्कर्म अवाजवी महत्वाकांक्षा, अहंकार, अतिमानता या सर्व आसुरी संपत्तीचे दर्शन घडते. धार्मिक व्यक्तींविरुद्ध पाताळयंत्री राजकारण करणाऱ्यांचे संगनमत शेवटी आत्मनाशाचे दर्शन घडवते. 


६) धृतराष्ट्र म्हणजे अंध व्यक्ती, अंधत्व म्हणजे पैसा, दारू, अज्ञान, आसक्ती आणि वासना, पुत्रमोहाने ग्रासलेला डोळ्यांनीच नव्हे तर मनानेही आंधळा असलेला धृतराष्ट्राने जन्मभर फक्त मुलाच्या अवाजवी अहंकार  पोखण्याचे काम केले. तात्पर्य अयोग्य व अजिबात ज्ञान नसलेल्या किंवा ज्ञान असून जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या आंधळ्याच्या हातातील सत्ता विनाशाकडे नेणारी ठरते. 


  ७) देवाचा आवडता भक्त ऋजू अंतःकरणाच्या अर्जुनाचे जीवन पूर्णतः धर्माचरणात गेले. शत्रुशीही कधीच कपट न करणाऱ्या या महान योद्ध्याच्या जीवन चरित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, एखाद्या व्यक्तीचे ज्ञान विवेकबुद्धीशी जोडलेले असेल तर विजयश्री त्याच्या पायाशी नेहमीच लोळण घेते. आणि साक्षात भगवंत त्याला साह्यभूत होतो. 


 ८) पाताळयंत्री कपटी शकुणीकडे पाहून आपल्या लक्षात येईल की, प्रत्येक कामात कपट करून, षडयंत्र रचून खोड्या निर्माण करून तुम्ही नेहमी यशस्वी होऊ शकत नाही. 


 ९) जर तुम्ही नीती, सत्यवचन, धर्म आणि कर्माचे यशस्वीपणे पालन केले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही हे धर्मराज युधिष्ठिराकडे पाहून आपल्याला जाणवते. 


१०) द्रौपदीवर बाका प्रसंग ओढवला तेव्हा तिने पितामह भीष्म, द्रोण कृप या सर्व नरकगामी जीवांकडे साह्य मागितले पण कुणीही आले नाही शेवटी श्रीकृष्ण भगवंतांचे स्मरण करताच भक्तांचा कैवारी धावून आला व द्रौपदीची लाज राखली म्हणून कितीही मोठे संकट आले तर फक्त देवाकडेच साह्य मागा. हे शोच्य जीव स्वतः असहाय आहेत ते आपल्याला काय सहाय्य करतील. 


 या सर्व सूत्रांमधून जीवनात धडा घेतला नाही, तर जीवनात महाभारत घडणे शक्य आहे.


 


 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post