लोभी मनुष्याची द्रव्य कमावण्याची लालसा व त्याचे होणारे दुष्परिणाम marathi bodhkatha Inspirational story

लोभी मनुष्याची द्रव्य कमावण्याची लालसा व त्याचे होणारे दुष्परिणाम marathi bodhkatha Inspirational story

बोध कथा bodhkatha 

Inspirational story

लोभी मनुष्याची द्रव्य कमावण्याची लालसा व त्याचे होणारे दुष्परिणाम

Side effects of greed 



फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे भोजराजाच्या धारा नगरीत लक्ष्मींधर नावाचा सावकार राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती परंतु तरीही तो सतत रात्रंदिवस माझी संपत्ती कशी वाढेल याचाच विचार करत असायचा. येनकेन प्रकारे आपली संपत्ती वाढली पाहिजे यासाठी सतत काहीना काही प्रयत्न करीत असायचा. त्याला असे वाटत असे की या संपूर्ण जगात माझ्यापेक्षा धनवान कोणीही नसावा एवढी संपत्ती माझ्या जवळ असावी.


एक दिवस एक योगी पुरुष त्याच्या राहत्या गावात आले. आणि भगवान श्रीकृष्णांच्या देवळात त्यांनी वस्ती केली. गावातील लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. तेजपुंज योगी पाहून गावातल्या लोकांनी त्यांना संसारिक कर्मकहाणी दुःखे सांगितली व त्यावर उपायही विचारला. योगी पुरुषाने आपल्या योगसामर्थ्याने त्यांचे बरेचसे दुःख हलके केले बऱ्याच अडचणी सोडवल्या. गावात कीर्ती झाली. अधिकच लोक दर्शनाला येऊ लागले. 


योगी पुरुषाची कीर्ती सावकाराच्या कानावर आली. सावकारही लगेच योगीच्या दर्शनाला आला. नमस्कार करून बसला. साधू दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर करत होता.. आपणही आपला मनोरथ पूर्ण होण्याचा वर मागावा असे त्याच्या मनात आले पण एवढ्या लोकांसमोर कसे मागावे म्हणून तो शांत बसला. 

गर्दी ओसरल्यावर सावकाराने त्या साधूला घरी भोजनासाठी येण्याची विनंती केली. साधूने विनंती मान्य केली व त्याच्या घरी भोजनाला आले. त्याचे आदरतिथ्य पाहून साधू प्रसन्नझाला व त्या सावकाराला म्हणाला, “यजमान हो सांगा तुमची काय इच्छा आहे?”

यावर शेठ म्हणाला महाराज माझी एकच इच्छा आहे की, “ज्या वस्तूला मी हात लावेन ते वस्तू सोन्याची व्हावे”

साधूला सावकाराचा लालचीपणा लक्षात आला. एवढे धन असूनही हा धनलोलुप मनुष्य लोभाच्या भरात येऊन भलतेच काहीतरी मागत आहे, याच्या डोळ्यावरचा लोभाचा पडदा दूर केला पाहिजे असा विचार करून साधूने त्याला “तथास्तु” म्हणून वर देऊन पुन्हा याच्याकडे यावेच लागेल असा विचार करून साधू निघून गेला. 


'हात लावशील त्या वस्तुचे सोने होईल' असा वर मिळाल्यामुळे सावकाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दुसऱ्या दिवशी प्राप्त काळ झाल्याबरोबर सावकार आपल्या फुलांच्या बागेत आला आणि फुलांना स्पर्श करताच ती फूलं सोन्याची झाली. शेठला अधिकच आनंद झाला 'जगात असा मी एकमेव असेल त्याच्या बागेत सोन्याची फुले आहेत.' आनंदाच्या भरात तो लोभी सावकार दिसेल त्या फुलझाडाला हात लावत सुटला. 

बागेत आंब्याची झाडे होती त्याने आंब्याच्या झाडाला हात लावला झाडही सोन्याचे झाले आणि आंबेही सोन्याचे झाले. 


सोन्याची फुलं आणि सोन्याची फळ घेऊन शेठ घरी आला मुलांना पत्नीला ते दाखवले पत्नीही खूप आनंदित झाली. मुलंही आश्चर्यचकित, हे सर्व पहिल्यांदाच पहात होते. 

त्या आनंदातच दुपारच्या जेवणाची वेळ झाली. धर्मपत्नी समोर ताट आणले. समोरच्या पोरीला हात लावताच पोरी सोन्याची झाली लाडू ला हात लावताच लाडू ही सोन्याचा झाला फिरायला हात लावताच शिराही सोन्याचा झाला. सगळे पदार्थ सोन्याचे झाले. ताटही सोन्याचे झाले. आता तर उपाशी राहण्याची वेळ. सावकार चिंतित झाला आता कसे करावे. अविचाराने मागितलेल्या वरदानाचा दुष्परिणाम सुरु झाला. 


तेवढ्यात समोरून त्याची मुले पप्पा पप्पा करत त्याला येऊन बिलगली. शेटने त्यांना हाताने बाजूला करायला गेला आणि त्यांना स्पर्श करताच मुले ही सोन्याची मूर्ती झाली. 

सकाळपासून घरात सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होते. पण आता मात्र रडारड सुरू झाली सावकाराची पत्नी सावकारावर उलटली शिव्या द्यायला लागली “तुमच्या लोभीपणामुळे माझे मुलं सोन्याचे झाले, आता मी काय करू कुठे जाऊ? तुमच्या लालचीपणामुळे हा सर्वनाश झाला आहे” 


आतातर सावकारही रडायला लागला आपल्या मुर्खपणाची त्याला जाणीव झाली. 'तो साधू पुन्हा यावा आणि त्याने वर परत घ्यावा' असे त्याला वाटू लागले. साधू हे सर्व पहिलेच जाणून होता तो तिथे अकस्मात प्रकट झाला आणि म्हणाला, “बोला यजमान आता काय दुःख आहे तुम्ही सगळे का रडत आहात?” 

सावकार साधूला पाहून खुश झाला व साधूच्या पायावर लोटांगण घालीत म्हणाला, “महाराज करून हा आपला दिलेला वर परत घ्या, वरामुळे माझ्यावर संकट कोसळले आहे, ज्याही वस्तूला मी हात लावतो ती सोन्याची होत आहे. माझ्या अविवेकीपणामुळे मी माझे दोन्ही मुलं गमावून बसलो आहे. माझ्यावरही उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे अन्नाला हात लावला तर तेही सुवर्णाचे झालेय. ही सिद्धी मला नकोय आपण परत घ्या.” 

साधू किंचीत हास्य करीत तथास्तु म्हणाला. आणि सर्व पूर्ववत झाले. सावकाराने आपल्या लोभीपणाची साधूकडे क्षमा मागितली. आणि पुन्हा साधूला भोजनाची विनंती करून आपणही त्याच्याबरोबर भोजन केले. 


मित्रांनो ही कथा आपण अनेक वेळा वाचली असेल, लोभीपणाचे दुष्परिणाम किती भयंकर होतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. द्रव्याच्या राज्याच्या लोभामुळे दुर्योधनाचा सर्वनाश झाला. संपूर्ण कुळच नष्ट झाले. कौरवकुळासह संपूर्ण अखंड भारतातले कित्तेक लाखो क्षत्रिय त्या युद्धात मारले गेले. हा सर्व लोभाचाच दुष्परिणाम.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post