जंगलात सापडलेले बाळ पुढे आयुर्वेदाचार्य झाले- dr. Jeevak - Indian history

जंगलात सापडलेले बाळ पुढे आयुर्वेदाचार्य झाले- dr. Jeevak - Indian history

 जंगलात सापडलेले बाळ पुढे आयुर्वेदाचार्य झाले

 आजची छोटी कथा

 आयुर्वेदाचार्य जीवक



    प्राचीन भारतात एक घडलेली गोष्ट आहे. आयुर्वेदाचार्य सुश्रुत यांच्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे पण आणखीन एक आयुर्वेदाचार्य प्राचीन भारतात होऊन गेले. त्यांचे नाव जीवक असे होते त्यांच्याबद्दल विशेष माहिती आढळत नाही. जी माहिती आहे त्याविषयी मतमतांतरे आहेत.

एक मत :- एक संन्यासी सतत भ्रमत असे. ग्रामांतर करत फिरता फिरता त्या साधूला जंगलात एक नवजात अर्भक सापडले.  तो त्या बाळाला त्याच्या पर्नकुटीकेत घेऊन आला.  त्यांनी त्या बाळाचे नाव "जीवक" ठेवले. 

दुसरे मत :- सम्राट बिंबिसाराचा मुलगा अभय कुमार याला जंगलात एक नवजात अर्भक पडलेले दिसले.  त्याला पाहून त्याच्या मनात दया आली.  त्याने बाळाला उचलून घरी आणले.  मुलाचे नाव - जीवक ठेवले त्याने  त्याला खूप शिकवलं.

साधु दुध वगैरे आणून त्या बाळाचे पालन-पोषण करू लागले. जीवक हळुहळु मोठा होऊ लागला. 

त्यांनी जीवकला चांगले शिक्षण व चांगले संस्कार दिले.  तो ८ वर्षाचा झाल्यावर त्याने साधूला विचारले, 'गुरुजी, माझे आई-वडील कोण आहेत?'  जीवकच्या तोंडून हे ऐकून साधूला खूप आश्चर्य वाटले. काय उत्तर द्यावे हे कळेना. 

आपण खरे सांगितले तर याच्या बाळ मनावर काही परिणाम तर होणार नाही ही अशी द्विधा मनस्थिती त्यांची झाली. पण तरीही त्यांनी त्याला खरे सांगायचे ठरवले आणि म्हणाले, 'बेटा, तू मला घनदाट जंगलात एका वृक्षाखाली एका टोपलीत ठेवलेला आढळलास. मी तुला इथे घेऊन आले, मला माहीत नाही तुझे आई-वडील कोण आणि कुठे आहेत?'  

हे ऐकून जीवक अत्यंत खिन्नपणे म्हणाला, 'गुरुजी, असे अनाथपणाचे ओझे घेऊन मी आता कुठे जाऊ? माझे कूल अज्ञात आहे, मला समाज स्वीकारेल का?'  

त्यावर संतांनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, 'बेटा, या गोष्टीचे दु:ख करण्याऐवजी तू विद्येचे महाविद्यापिठ तक्षशिला येथे जाऊन तेथे अभ्यास कर आणि संपूर्ण समाजाला तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून टाक.'  

जीवक अभ्यासासाठी तक्षशिलेला गेला.  तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिथल्या आचार्यांना स्वतःबद्दलची सगळी हकीकत सांगितली.

    आचार्यांनी त्याच्या सत्य आणि स्पष्टपणाने प्रभावित होऊन त्याला विद्यापीठात प्रवेश दिला.  जीवक तिथे खुप कष्ट करत सर्व शास्त्रांचे अध्ययन करू लागला.  तेथे त्यांनी “आयुर्वेदाचार्य” ही पदवी प्राप्त केली.  

पूर्ण शिक्षण झाल्यावर आचार्य एके दिवशी जीवकाला म्हणाले, 'बेटा, आता तू मगधला जाऊन तेथील लोकांची सेवा कर.'  हे ऐकून जीवक अस्वस्थ झाला.  त्याला दुःखी पाहून आचार्य म्हणाले, 'तुला दुःख का होतेय?'  जीवक म्हणाले, 'आचार्य, तुम्हाला आधीच माहित आहे की माझे कोणतेही कुळ आणि गोत्र नाही.  मी जिथे जाईन तिथे लोक माझ्याकडे बोट दाखवतील. कुलहिन म्हणतील. तुम्ही मला तुमच्याजवळच ठेवू शकत नाही का?' 

ते ऐकून आचार्य म्हणाले, 'वत्स.  तुझी प्रतिभा आणि ज्ञान हेच ​​तुझे कुळ-गोत्र आहे.  त्यामुळे तुला आदरच मिळेल. लोकांची सेवा करूनच तू राजमान्य होशील ' 

आचार्यांच्या बोलण्याने जीवकाला नवी दिशा मिळाली आणि तो मगधला आला.  तिथे त्यांनी जिद्दीने खुप मेहनत घेतली. नवीन नवीन औषधे शोधून काढल्या. अनेक वनस्पतींचे मिश्रण व त्यांचे गुणधर्म शोधून काढले त्यावर नवीन औषधे निर्माण केली. लोकांचे महारोग बरे केले. काही दिवसातच ते संपूर्ण मगधभर आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले.

असे म्हणतात की जीवक हे बालरोग तज्ञ होते. शल्यचिकित्सक ही होते. 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post