नाथ भाषा चौपदी-उमाइसाने गाईलेली nath bhasha chaupadi

नाथ भाषा चौपदी-उमाइसाने गाईलेली nath bhasha chaupadi

 नाथ भाषा चौपदी-उमाइसाने गाईलेली

नगर द्वार द्वार भीक्षा हो मागों हाटचोहटे पडि रहे:

 तृषा लागे नदी उदक पियों: आपें महासुखें रहूं: ।।धृ०।। 

 बापू रे मोरी अवस्था लो: जहाँ जाऊं तहां आपुसरिसा कोइ न करे मोरी चिंता: ।। 01 ।। 

पडी सही विदिचिंधी हो घेवो: सहज स्वभावे कंथा सिवों: सद्गुरू तुष्टले शांती भयली: तेणें कामक्रोध माया तोडों: ।।02।।

सद्गुरू तुष्टले शांती मठी दिखीजो: तेणे आम्ही लिंपोनासिंपो: भीक्षा मागि मागि रोटी भातु भुंजो सुन्य निरालंबी रहूं: ।। 03 ।।

जिहा वीचिया समादि भयेली तिहां करों अनादि स्तुति: अदिनाथ नाथीं मछिंद्रपुतें: गोरक्षे गाइली जोग जुगुति:।। 04।।

चौपदीचा अर्थ :- मी एक जोगीण आहे. गावामध्ये दारो दारी भिक्षा मागावी. हाट चोहाटामध्ये विश्रांतीला पडावे. तहान लागली तर नदीला जाऊन पाणी प्यावे.  असे महासुखाने स्वच्छंद जीवन जगावे. देवा (बापा) माझी अवस्था पहा, कोटेही गेले तरी आपल्या सारखी माझी चिंता कोणी करत नाही.  वस्त्र जर लागले तर रस्ता, गल्लीमध्ये पडलेली फाटकी-तुटकी चिंधी घ्यावी.  सहज स्वभावाला लागले ते खावे, नेसावे. असं आमचं जीवन आहे. असं आमचं आचरण पाहून सद्गुरू जर संतुष्ट झाले तर सर्वार्थाने आमच्या ठिकाणी मनःशांती होऊन जाईल. त्या स्वस्थतेमुळे काम, क्रोध व माया आम्ही सहज तोडून टाकू. आमचे सद्गुरू जर संतुष्ट झाले तर मठामध्ये शांतता आणि स्वास्थ्य निर्माण होईल. त्या स्वस्थतेमुळे आम्ही कशातही लिंपायमान होणार नाही. भीक्षान्न मागून रोटी, भात खाऊ मा अत्यंतिक निरालंबी आम्ही राहू. ज्या स्थितीमध्ये आम्हाला आत्मिक स्थिरता लाभते ते ध्यान आम्ही करू. त्याचीच चिरंतन स्तुती करू, नाथ जो मुख्य आहे मच्छिंद्र त्याच्या पुत्राने म्हणजे गोरक्षनाथाने ही जोग्यांची जुगुती म्हणजे आचरणाची युक्ती गाइली आहे.*


      

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post