चार (4) प्रकारचे नमस्कार आणि साष्टांग नमस्काराचे महत्व knowledge
उत्तमो दिर्घ दंडवतम् च मध्यमो
कर चालनम् । देवासमोर
देवाच्या भक्तांसमोर लोटांगण घालणे हा उत्तम नमस्कार, वंदन होए. आणि दोन्ही हात जोडून
वाकून नमस्कार करणे हा मध्यम दंडवत होए. आणि नुसते हात जोडून दंडवत प्रणाम म्हणणे हा
कनिष्ट दंडवत होए. आणि नुसतेच तोंडाने ‘नमस्कारऽऽ’ किंवा दंडवत प्रणाम म्हणणे, अनुकार
तो काहीच न करणे हा निरर्थक दंडवत होए. त्यामुळे काही इष्ट होत नाही.
महानुभाव पंथात प्रत्येक धार्मिक
वीधीच्या वेळी साष्टांग दंडवत घालावे लागतात. कोणताही धार्मिक विधी असो, साष्टांग दंडवताशीवाय तो पूर्ण होत नाही. भीक्षुकाला भोजनाचे आमंत्रण दोन
साष्टांग दंडवत घालून द्यावे लागते. पंगतीत अन्न दानाचा संकल्प सोडल्यानंतर
साष्टांग दंडवत घालावे लागतात. कोणतेही दान दिल्यानंतर साष्टांग दंडवत घालावे
लागतात. देवपूजा - आरती - पारायण केल्यानंतर पाच साष्टांग दंडवत घालावे लागतात.
पोथी ऐकायला बसायचे असले तरी
साष्टांग दंडवत घालूनच बसावे लागते. पोथी निरोपण करणारे ज्ञानीये सुद्धा पाच
साष्टांग दंडवत घालूनच आसनावर विराजमान होतात व पोथी सांगतात. निरोपण झाल्यावर
साष्टांग दंडवत घालूनच आसनावरून उठतात. शास्त्राचा घोक (धडे) घेण्यासाठी
ज्ञानीयाकडे गेल्यावर त्यांच्या समोर दोन साष्टांग दंडवत घालावे लागतात. साधू
संतांकडून प्रश्न विचारून शंका समाधान करून घ्यायचे झाले तरी दोन साष्टांग दंडवत
घालूनच प्रश्न विचारावे लागतात.
परमेश्वर परायणाच्या आसनाला अथवा
वस्त्राला आपले चुकून पाय लागले तर साष्टांग दंडवत घालून प्रसव मोडावा लागतो. कुणा
ईश्वर भक्ताचे आपल्या बोलण्यामुळे अथवा वागण्यामुळे मन दुखावले असेल तर त्याचे
समोर दोन साष्टांग दंडवत घालून प्रसव मोडावा लागतो. रात्री झोपण्यापूर्वी साष्टांग
दंडवत घालावे लागतात. प्रातःकाळी झोपेतून उठल्यानंतर साष्टांग दंडवत घालावे
लागतात. एवढेच नाही तर या सृष्टीव्यवस्थेतील कीडा मुंगीची, त्रुणाची, सपूर जंतुंची, आगळी पाण्याची आपल्याकडून प्रतीदिनी हिंसा होते. अनेकांचे मन आपल्या कडून
दुखावल्या जाते. त्यामुळे पाप लागते. त्याची परमेश्वराजवळ प्रायश्चित्त घेऊन
आत्मशुद्धी करावी लागते. प्रायश्चित्त घेताना साष्टांग दंडवत घालावे लागतात.
साष्टांग दंडवतामध्ये मनाची
स्थिती व शरीराची स्थिती या ह्या दोन मुख्य बाबी आहेत. साष्टांग दंडवत घालत असताना
आपले मन परमेश्वराशी, परमेश्वराच्या चतुर्वीध साधनाशी जोडायचे असते. जोडणे , विलीन करून टाकणे, तदाकार होणे यालाच योग असे
म्हणतात. या अर्थाने "साष्टांग दंडवत" घालत असताना
आपले मन परमेश्वराशी, परमेश्वराच्या चतुर्वीध साधनाशी जोडायचे असते. म्हणूनच साष्टांग दंडवत हा सर्व श्रेष्ठ योग ठरुन साष्टांग दंडवत घालणारे साधू संत योगी
ठरतात.....
दुसरे दंडवताची कृती ही शरीराची स्थिती आहे. या स्थितीला देहबोली म्हणतात. देहबोली द्वारे
केलेली ती परमेश्वराची प्रार्थना आहे,
हे परमेश्वरा ! 84 लक्ष योणींच्या जन्म - मरणाच्या फेऱ्याने
मी फार थकलो आहे. हे दयाळा, या दुःखातून मला सोडव व आपल्या मोक्षाचा आनंद दे. मी
तुला शरण आलो आहे. माझे रक्षण कर. ही प्रार्थना तल्लीन होऊन दंडवताच्या क्रुतीतून
म्हणजेच देहबोलीतून अभिव्यक्त करायची असते.
भाषेला नियम असतात. व्याकरण
असते. तसे देहबोलीला ही नियम आहेत. व्यवहारात मनुष्य होकार किवा नकार आपली मान
डोलावून सुचवित असतो. होकार देताना जर नकारार्थी मान डोलावली अथवा नकार देताना
होकारार्थी मान डोलावली तर फार मोठा अनर्थ होईल. त्यामुळे देहबोलीची भाषा
जाणीवपूर्वक वापरायची असते.
साष्टांग
दंडवत ही
सुद्धा देहबोली आहे. परमेश्वराशी केलेला तो तनमनाचा संवाद आहे. परमेश्वराशी एकरूप
होणे आहे. वास्तविक एका ठिकाणी बसूनही परमेश्वराशी मन जोडल्या जाईल. मग
दंडवताचे प्रयोजन काय? अशी शंका मनात येणे शक्य आहे. परंतु
खोलवर विचार केला तर अंतःकरणाची भाषा व देहबोली या द्वारे केलेली ती परमेश्वराची
प्रार्थना आहे. वर्षारुतूमध्ये निसर्गाच्या सौंदर्याने आसक्त झालेला मोर आनंदाच्या
अतिरेकाने सुंदर नृत्य करायला लागतो. त्याचा
आनंद नृत्याच्या देहबोली द्वारा अभिव्यक्त होतो.
त्याप्रमाणे अंतःकरणातील श्रद्धा
व भक्तिभाव साष्टांग दंडवताच्या रूपाने प्रकट केला जातो. एका दृष्टीने साष्टांग दंडवत हा श्रद्धेने व भक्तिभावाने परमेश्वरासमोर केलेले नृत्यच होय. परंतु आज काय दिसते? आपल्या पैकी बर्याच
जणांना साष्टांग दंडवताचे महत्व उमगलेले नाही. आपण अनिच्छेनेच साष्टांग दंडवत घालत
असतो. आपण फक्त शारीरिक देखावा दाखवित असतो. तसेच मनाच्या स्थितीकडेही आपले लक्ष
नसते. अंगात उंची व भरजरी वस्त्रे असल्यामुळे ती धुळीने मळतील याची आपल्या मनात
चिंता असते.
शहरात बर्याच ठिकाणी साप्ताहिक
देवपूजाचे, पंचावतार उपहाराचे कार्यक्रम होत असतात. अशा
कार्यक्रमातून साष्टांग दंडवत घालणे आपल्याला आवश्यक वाटत नाही. त्याचे कारण
म्हणजे आपणास साष्टांग दंडवताचे महत्त्व कळलेलेच नाही असे म्हणावे लागेल. गर्दीमुळे,
जागा अपुरी असल्याने आपण साष्टांग दंडवत घालत नाही. जागेच्या
कारणामुळे साष्टांग दंडवतासारख्या महत्वाच्या विधी कडे दुर्लक्ष करणे चूक आहे.
घरात जागा नसेल तर रस्त्यावर साष्टांग दंडवत घालावे. परंतु साष्टांग दंडवत घालणे
चुकवू नये. कारण साष्टांग दंडवत घालणे हा योगा आहे. त्यामध्ये तेज आहे. बळ आहे. त्यामुळे
परमेश्वर प्रसन्न होतात हा अपूर्व लाभ साष्टांग दंडवतामुळे होतो.
पराक्रम आहे. समर्पण आहे. परमेश्वर शरणांगतता आहे.....
आज
योगाचे महत्त्व समाजाला कळायला लागले आहे. लोक योगासनांचा अभ्यास करू लागले आहेत.
योग अभ्यास शिकविणारे शिक्षक जाहीर सभांमधून व्यासपीठावर मोजक्या वस्त्रात योगासने
करून दाखवित आहेत. लाखो लोक त्यांचे अनुकरण करू लागले आहेत. 84 लक्ष
योन्याप्रमाणे योगासनेही 84 लक्ष आहेत. असे असले तरी आज फक्त
84 आसणेच शिल्लक आहेत. अन् त्यातूनही दररोजच्या जीवनात मुख्य
30 ते 40 आसने आहेत. उदा. मयुरासन (मोराप्रमाणे), कुक्कुटासन (कोंबड्याप्रमाणे), भुजंगासन (भुजंगाप्रमाणे), व्रक्षासन (झाडाप्रमाणे), मत्स्यासन (मासळीप्रमाणे), गरूडासन (गरूडाप्रमाणे), शवासन (प्रेताप्रमाणे), वृश्चिकासन (विंचवाप्रमाणे) इत्यादी.....
आमचे पूर्वज आचार्य भास्करभट्ट बोरीकर, केशीराजबास, नागदेवाचार्य, महदंबा, हिराईसा, बाईसा, म्हाईंभट्ट, इत्यादी साधूसंतांना त्यांच्या पूर्वाश्रमात योगासनाचा अभ्यास होता. ते योगासने, प्राणायाम आदी करीत असत. परंतु 84 लक्ष आसने केली तरी 84 लक्ष योन्यातील जन्म मरण चुकणार नाही. शिवाय योगासनाच्या अभ्यासातून होणारा लाभ हा क्षणभंगूर असणार. जिथे हा देहच नाशिवंत आहे. तिथे या देहाचे सौंदर्य, आरोग्य, बळ, तारुण्य हेसुद्धा नाशिवंतच आहे. या नाशिवंत गोष्टींसाठी योगासने करणे त्यांना व्यर्थ वाटले. त्यांना 84 लक्ष योन्यातील जन्म मरण चुकवून मोक्षाचा आनंद हवा होता. म्हणून ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना शरण गेले. प्रभूंची अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली. अनंत जन्मात घडलेल्या पापांची क्षमा मागितली. 84 लक्ष योनींच्या नरक यातनेतून सोडविण्याची प्रभूंना विनंती केली. मोक्षानुभूती देण्याची याचना केली. त्या शरणागत भक्त जणांची प्रार्थना साष्टांग दवडताच्या देहबोलीतून प्रकट झाली. हाच साष्टांग दंडवताचा प्रारंभ होय. येथेच साष्टांग दंडवताचे न्रुत्य जन्माला आले आहे......
साष्टांग दंडवत देहबोलीचा शास्त्रशुद्ध अर्थ.....
साष्टांग
दंडवत घालताना साधक प्रथम....
1) हात जोडून झाडाप्रमाणे उभा राहतो. यातून तो परमेश्वराला प्रार्थना करतो की, हे परमेश्वरा माझे व्रक्ष
योनीतील जन्म मरण चुकवा. परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकून त्याचे व्रक्षाच्या
योनीचे जन्म मरण चुकवितात.
2) जोडलेले दोन्ही हात सोडून ते जमीनीवर टेकविण्यासाठी साधक पक्षाप्रमाणे
खाली झुकतो. यातून तो परमेश्वराला प्रार्थना करतो की, हे दयाळा माझे पक्षी योनीतील
जन्म मरण चुकवा. तो दयाळू कनवाळू परमात्मा त्याचे पक्षी योनीतील जन्म मरण
चुकवितात.....
3) दोन्ही हाताचे तळवे व दोन्ही गुडघे तो पशूप्रमाणे जमीनीवर टेकवितो. यातून तो परमेश्वराला विनवितो की, हे जगदिश्वरा माझे पशू योनीतील
जन्म मरणाचा फेरा चुकवा. तो भक्ताचा सखा
परमात्मा त्याचे पशू योनीतील जन्म मरण चुकवितात....
4) नंतर तो जमिनीवर आठ अंगे टेकवून साष्टांग दंडवत घालतो, त्या द्वारे तो परमेश्वराला विनवितो की हे परमेश्वरा माझे जमिनीवर सरपटणाऱ्या प्राणी वर्गातील जलचर इत्यादीचे जन्म मरण चुकवा. त्या शरणागताची प्रार्थना तो दयाळू परमेश्वर स्वीकार करतो व त्याला सरपटणार्या प्राण्यांच्या जन्म मरणातून व सर्वच दुधापासून सोडवितो. त्याला आपल्या ज्ञानाला व प्रेमाला पात्र बनवितो. त्याला आपला मोक्ष देतो. साष्टांग दंडवत योगामुळे मोक्ष व मुक्ती दोन्ही ही प्राप्त होतात. नागदेवाचार्य, म्हाईंभट्ट, महदाईसा, बाईसा, इत्यादी भक्ती जण साष्टांग दंडवत योगाचा अवलंब करून ते प्रभू कृपेला पात्र झाले.
साष्टांग
दंडवत योग नियमित केल्याने मोक्ष व मुक्तीचा मार्ग तर प्रशस्त होईलच परंतु
त्याचबरोबर 84 लक्ष आसने केल्याने जो काही लाभ मिळतो. तोही लाभ साष्टांग दंडवत योग
केल्याने मिळतो. सूर्य नमस्कारामुळे मिळणारे फायदे, सर्वांगासन, ताडासन, भुजंगासन, प्राणायाम इत्यादीचे फायदेही
साष्टांग दंडवत योग केल्याने मिळतात. दररोज प्रातःकाळी 100/100 -- 200/200 दंडवत घातल्याने स्वास्थ्य उत्तम राहते. आरोग्य लाभते. बळ वाढते. भूक लागते. मलमूत्रादीचे सुलभतेने उत्सर्जन
होते. पोट साफ राहते. अंगी चपळता येते.
आळस दूर होतो. स्नायू बळकट होतात. चरबी
कमी होणे. शरीर हलके हलके होते. साधक मार्ग रूढीचे पालन करायला पात्र बनतो.
स्मृती स्थळातील हिराईसा एकछंदी
प्रज्ञेची होती असे वर्णन आले आहे. तिला ही अचाट स्मरण शक्ती साष्टांग दंडवतामुळेच
प्राप्त झाली होती. भास्कर भट्ट बोरीकर प्रचंड बुद्धीमान होते. ते शीघ्र कवीही होते. साष्टांग दंडवत योगा
मुळेच त्यांना ही प्रतिभा लाभली होती. शेकडो सैनिकांशी एकटे नागदेवाचार्य शौर्याने
लढले. त्यांच्या ठिकाणी हा भीमपराक्रम साष्टांग दंडवत योगामुळेच होता. शुकयोगिंद्र
म्हणून गौरविलेले केशीराजबासांच्या ठाई असलेला हा आत्मसंयम साष्टांग दंडवत योगाचाच
परिणाम होय.
आज साष्टांग दंडवत योगाचे
महत्त्व समाज विसरून गेला आहे. जर हा योग शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वत्र प्रसारित
झाला तर समाज रोगमुक्त होईल. त्याचे तेज, बळ, ऐश्वर्य, पराक्रम, धैर्य, शौर्य वाढेल. त्याचा समाजाला वेध
लागेल. दुर्दैवाने आज शंभरातून दहा लोकांना सुद्धा शास्त्र
शुद्ध साष्टांग दंडवत योगाचे ज्ञान नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी ‘‘मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महा जप यज्ञा’’ द्वारा साष्टांग दंडवत योग प्रचार अभियान हाती
घेण्यात आले आहे. या अभियानातून प्रत्यक्ष क्रुतीद्वारे साष्टांग दंडवत योग
समजावून सांगितला जात आहे.....
साष्टांग दंडवत योग केव्हा करावा....?
प्रातःकाळी
3 ते 6 वाजेपर्यंत हा साष्टांग दंडवत
योगा फायदेशीर आहे. प्रातःकाळी उठल्यावर प्रथम श्रीपंचकृष्णाची
व श्रीगुरूवर्यांची आठवण करावी. नंतर अंथरूणातून बाहेर यावे. देवपूजला वंदन करावे.
भीक्षुक वासनिक दृष्टीस पडले तर त्यांना वंदन करावे. माता
पित्यांना, वडीलधार्यांना
दंडवत करावे. नंतर मलमूत्र विसर्जन करून उत्तराभिमुख हवेशीर जागेवर एकेरी वस्त्र
टाकावे. अंगावर गरजेपुरते वस्त्र ठेवावे व नंतर दंडवताच्या योगाला प्रारंभ करावा. 108 दंडवत घालावेत. दंडवत योगाची देहबोली जाणकारांकडून समजून घ्यावी. 108 दंडवत झाल्यानंतर 10 मिनिटे अंथरुणावर शवासनात पडून
राहावे. त्यानंतर उठून नामस्मरणाचे आसन टाकावे व त्यावर उत्तराभिमुख नामस्मरणाला
बसावे. कमीत कमी 5 गाठ्या नामस्मरण स्थिर चित्ताने
करावे. इतर धार्मिक विधी प्रसंगीही न
चुकता 2 अथवा 5 दंडवत घालावेच...