आठ (8) प्रकारचे मद -
8 prakarache mad
हिंदू वैदिक सुभाषितांमध्ये आठ प्रकारचे मद आलेले आहेत. कर्णहंस या ग्रंथात आठ प्रकारचे मद सांगितलेले आहेत. त्यांची गणना यापेक्षा थोडी वेगळी केलेली आहे. ते सुभाषित पुढीलप्रमाणे:-
अष्ट मद : कुलं छलं धनं चैव रूपं यौवनमेव च ।
विद्या राज्यं तपश्चैव एते चाष्टमदाः स्मृताः ।।२।। (कर्णहंस)
१. कुल :- कुळा विषयी मद असणे
२. दुष्टपणा :- मी कुणाचाही छळ करू शकतो असा दुष्टपणाचा मद असणे. हा दुष्टपणाचा मद महाभारतात शकुनीच्या ठिकाणी होता.
३. धन :- श्रीमंतीचा गर्व असणे.
४. रूप :- सौंदर्याचा गर्व असणे.
५. यौवन :- तारूण्याचा गर्व असणे
६. विद्या :- ज्ञानाचा विद्येचा गर्व असणे.
७. अधिकार :- सत्तेचा गर्व असणे
८. तपस्या :- तपाचा गर्व असणे. विश्वामित्राच्या ठिकाणी तपाचा गर्व होता तपो बळाने मी दुसरी सृष्टी निर्माण करू शकतो असा प्रकारचा गर्व विश्वामित्रांच्या ठिकाणी होता. त्यांनी आपल्या तपोबळाने त्रिशंकूसाठी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यास प्रारंभ केला होता अशी कथा पुराणात येते.
जिनागम या जैन धर्मातील ग्रंथात आठ (8) प्रकारचे मद सांगितलेले आहेत. मद म्हणजे माज, उर्मी, गर्व, मधामुळे मनुष्य लहान मोठ्याला जुमानत नाही:-
ज्ञानं पूजां कुलं जातिं, बलमृद्धिं तपो वपुः ।
अष्ठावाश्रित्य मानित्वं, स्मयमा दुर्गतस्मया: ।।
१ - ज्ञानामुळे येणारा मद गर्व. थोडेफार ज्ञान अभ्यासले की स्वतःला फार मोठा ज्ञानी समजणे. मला सगळे कळते अशा अविर्भावात समाजात वावरणे. इतर लोक सगळे अज्ञान आहेत इतर लोकांना ज्ञान नाहीच असे वागणे बोलणे मनातही तोच विचार करणे हे ज्याच्या ठिकाणी असते त्याला ज्ञानाचा मद आलेला आहे असे समजावे. मध शब्दाचा अर्थ आजच्या मराठीत माज असाही करता येईल.
२ - पूजा/प्रतिष्ठा/ऐश्वर्याचा मद एखाद्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त असते त्याचा समाजात दबदबा म्हणजेच ऐश्वर्य असते. हा ही एक मध आहे मी सर्वांना पूज्य आहे सर्व लोक माझी पूजा करतात मला समाजात प्रतिष्ठा प्राप्त आहे माझ्यासमोर कुणाचे काही एक चालत नाही इत्यादी प्रकारचे विचार ज्या माणसाच्या डोक्यात शिरले तो मधून मत झालेला आहे असे समजावे.
३ - कुळाचा मद :- माझा जन्म थोर कुळात झालेला आहे, माझे कुळ सर्वांपेक्षा थोर आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, आमचे कुळ पवित्र आहे, इतरांसारखे भ्रष्टलेले नाही. असा कुळा विषयी निरर्थक अभिमान असणे. याला कुळाचा मद असे म्हणावे.
४ - जातिचा मद :- आमची जात श्रेष्ठ आहे असा जातीविषयी अहंकार असणे.
५ - बळाचा मद :- आपल्या ठिकाणी असलेल्या बळाचा मध, माज असणे, “माझ्यासारखा बलवान पहिलवान अख्ख्या तालुक्यात नाही” असे बोलणे, गरज नसताना नको तिथे बाळाचा प्रयोग करणे.
६ - ऋद्धि का मद :- श्रीमंती विषयीचा गर्व माझ्याकडे खूप पैसे आहेत अख्या गावात माझ्यासारखा श्रीमंत नाही मी सरकारलाही कर्ज देऊ शकतो मला कोणापुढे झुकण्याची गरज नाही. “मी पैशाने काहीही विकत घेऊ शकतो हा ऋद्धीचा मद, “दीडशे एकर वावर आहे आपल्याकडे, ऊस लावला आहे शंभर एकर मध्ये” असे बरेच लोक बोलताना दिसतात नेहमी आपल्या श्रीमंती विषयी सांगत असतात.
७ - तपाचा मद :- “माझ्यासारखा तपस्वी वैरागी कुणी नाही माझ्यासारखे तप कोणीही करत नाही असा तपाचा गर्व असणे मी तपो बाळाने काहीही करू शकतो” इत्यादी तपाचा गर्व संन्याशी लोकांच्या ठिकाणी खास करून असतो किंवा ब्राह्मणांच्या ठिकाणी असु शकतो. पण खरोखर जाणता ज्ञानी संन्याशी किंवा ब्राह्मण असेल तर त्याच्या ठिकाणी असला गर्व असणे शक्य नाही.
८ - शरीर/रूपाचा मद :- “मी रूपसंपन्न आहे, माझ्यासारखी बॉडी कोणाचीच नाही, सर्व गावात तालुक्यात मी सुंदर देखणा आहे.” असा आपल्या रूपाविषयी गर्व असणे आपल्या रूपाचा गर्व स्त्रियांच्या ठिकाणी असतो आणि पुरुषांच्याही ठिकाणी असतो. जैन शास्त्रामध्ये हे आठ प्रकारचे मद सांगितलेले आहेत.
स्वतःला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ समजण्याची खोटी भावना, ज्याचा परिणाम म्हणून एखादी व्यक्ती दारू पिलेल्या माणसासारखी बुद्धी भ्रष्ट होऊन गोंधळून जाते, म्हणजेच तो संवेदना गमावतो किंवा स्वतःमध्ये राहत नाही. त्याला बोली भाषेत घमेंड असेही म्हणतात.
प्रत्यक्षात मन कषाय आहे ते आपल्या आत्म्याचा खरा चारित्र्य गुण प्रकट होऊ देत नाही. आठ प्रकारे तुलना करून, आपण स्वतःला दुसऱ्यापेक्षा वरचे किंवा श्रेष्ठ समजत गर्व करतो. जसे:
१) मी उच्च कुळातील म्हणजे समोरच्यापेक्षा उच्च कुळातील आहे.
२) माझी जात यापेक्षा वरची आहे.
३) मी खूप सुंदर आहे जो माझ्या समोर आहे तो कुरूप आहे.
४) मी खूप बलवान आहे.म्हणजे समोरचा माझ्यापेक्षा कमजोर आहे.
५) मी खूप श्रीमंत आहे समोरचा माझ्यासमोर खूप गरीब आहे.
६) माझ्याकडे मोठा अधिकार आहे. सर्वत्र माझे वर्चस्व आहे. जो समोर आहे तो माझा अधीनस्थ किंवा गुलाम आहे.
७) मी खूप जाणकार आहे. समोरची व्यक्ती माझ्यासमोर मूर्ख किंवा अडाणी आहे.
८) मी एक महान तपस्वी आहे. समोरचा माणूस जे करतो ते प्रायश्चित्त नसून दिखावा आहे.
या आठ प्रकारच्या विचारांनी प्रभावित होऊन जे वर्तन केले जाते, त्याला आठ प्रकारचे मद म्हणतात, जैन धर्मग्रंथांमध्ये त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. इत्यादी प्रकारचे हे आठ मद शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत मद म्हणजे गर्व, माज. प्रत्येकाला माहित असते की आपल्या ठिकाणी असलेले गुण किंवा संपत्ती हे शाश्वत नाहीत मृत्यू समयी हे सगळे सोडून जायचे आहे, तरीही मनुष्य जन्मभर अहंकाराने गर्वाने वागतो. इतरांना तुच्छ लेखतो, श्रीमंत मनुष्य गरिबांना तुच्छ लेखतो,
ज्ञानी मनुष्य अज्ञानाला तुच्छ लेखतो रूप संपन्न मनुष्य कुरूप माणसाला तुच्छ लेखतो ज्याच्याजवळ सत्ता आहे तो गरीब लोकांचा छळ करतो ज्याच्या ठिकाणी तारुण्य आहे तो म्हाताऱ्यांना अपमानित करतो ज्याच्या ठिकाणी बळ आहे तो दुर्बळाला त्रास देतो इत्यादी हे सर्व दोष मनुष्य जन्मभर आचरतो. शहाण्या माणसाने इत्यादी आठ मदां पासून दूर राहावे.