आत्मविश्वासातून या ९ गोष्टी साधतात
१) अचूक निर्णयक्षमता :- दैनंदिन कामकाज किंवा जोखमीची कामे पार पाडण्यासाठी, निर्णय घेताना आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः च्या निर्णयांवरचा विश्वास अत्यावश्यक ठरतो.
२) विश्वासार्हता जपण्याकरता प्रत्येक वेळी आपण स्वीकारलेली जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडल्याने, कामाचा दर्जाही राखला जातो आणि आपल्या कामाबद्दल इतरांची विश्वासार्हता वाढते.
३) क्षमतांचा पुरेपूर वापर : आत्मविश्वास, क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यास प्रवृत्त करतो आणि अर्थातच याचा सकारात्मक परिणाम आपल्या कामगिरीवर दिसून येतो. स्वतःचा आळस दूर केला, तरच तुम्ही यशस्वी व्हाल
४) कामातील आनंद आणि समाधानः आत्मविश्वासातून योग्य ते काम स्वीकारण्याची आणि स्वीकारलेले काम योग्य तऱ्हेने पार पाडण्याची प्रेरणा मिळते. स्वतःची कृती, निर्णयांबद्दल निःशंक असण्याने कामातून समाधान आणि आनंदही मिळवता येतो.
५) स्वयंप्रेरणा आणि प्रोत्साहन :- व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास हा आनंदी, कार्यक्षम आणि समाधानी मनोवृत्तीसाठी प्रेरक ठरतो.
६) सुसंवाद : प्रगती आणि यशस्वितेसाठी, कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक असलेला सुसंवाद, आपल्यातील आत्म विश्वासामुळेच साध्य होऊ शकतो.
७) एखादा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा त्याला आपल्याला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचे आहे, ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी लागते. परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे याचा विचारच विद्यार्थ्याने केला नाही आणि तो नुसताच करायचा म्हणून अभ्यास करत राहिला तर तो त्याच्या ध्येयापासून रस्ता चुकतो आणि परीक्षेत अनुतीर्ण होतो. यासाठी जीवनात पुढे जायचे असेल किंवा आपला उत्कर्ष साधायचा असेल त्यासाठी एखादे ध्येय ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ध्येयच नसेल तर मनुष्याचा प्रयत्नांना काहीही अर्थ उरत नाही.
८) कोणतेही लक्ष्य समोर नसताना, एखादे ध्येय नसताना, जर कोणी जगत असेल, तर अशा अवस्थेत कोणताही प्रयत्न हा सफल होऊ शकत नाही. जर तुमची काम करायची इच्छाच नसेल, संसारात इतरांची सेवा करायची नसेल तर जीवनात तुम्ही काहीही करू शकणार नाही या ध्येयासोबत नेहमी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की संसारात कोणावरही ओझं बनून राहू नका.
९) कधीतरी सुटीच्या दिवशी काही काम न करणे वेगळे आणि सदा सर्वकाळ निष्क्रिय राहणे वेगळे असते. यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. ध्येय जर असेल तर त्यामुळे दिवसाचे चोवीस तास कसे वापरायचे आहेत याबद्दल माणूस विचार करतो.
मित्रांनो! बाहेरील परिस्थितीनेही आपण आनंदी होऊ शकतो आनंद कोणत्या गोष्टीतून मिळेल याच्या यादीत अनेकदा छोट्या गोष्टी तर अनेकदा मोठ्या गोष्टी असतात, पण हा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कित्येकदात खूप काही सोडावे लागते. आपण आनंदी असाल तर मी आनंदी होईन, हे समीकरण योग्य आहे. जर समजा समोरच्याला पूर्वीपासूनच चिंता आणि तणाव असेल तर तो आनंदी होऊ शकत नाही.
याचा मूलमंत्र हाच आहे की, मी आनंदी राहिलो तर ते आनंदी होतील. किती वेळा आपण म्हणत असतो की, तू मला खूश पाहूच शकत नाहीस. दुसऱ्याच्या मनःस्थितीवर आणि त्याच्या वागण्यावर माझी मनःस्थिती अवलंबून असते हे खरे आहे. सकाळी मी उत्तम मूडमध्ये होतो, पण आपला मूड ठीक नव्हता आणि मी त्रासून गेलो. नंतर मी याचा सारा दोष आपल्याला देईन.
आपल्याला वाटते की, मी हे केले तर मी आनंदी होईन. मुलांना उत्तम मार्क्स पडले तर मी खूश होईन. नोकरी मिळाली, लग्न झाले तर मी खूश होईन. आपण बनवलेला पिझ्झा खाऊन मुले खूश झाली तर ते पाहून मलाही आनंद होईल. त्यांना खूश पाहून आपण आनंदीही झालात आणि त्याच वेळी बॉसचा फोन आला. ते एखाद्या गोष्टीवरून
नाराज असल्यामुळे आपण अचानक दुःखी होता. अशा वेळी आनंद हरवण्यास वेळ लागत नाही. आपले जीवन परिस्थितींवर अवलंबून असते, लोकांच्या मूड, स्वभाव, संस्कारावर माझी मानसिक स्थिती अवलंबून असेल तर आपण आनंदी कसे राहू शकू. या सान्या बाहेरच्या परिस्थिती आहेत.
आता प्रश्न असा उभा राहतो की, बाहेरच्या परिस्थितीत आपल्यात आनंद कसा निर्माण करावा. जेव्हा माझ्या शरीराची रोगप्रतिकार क्षमताच कमी असेल तर मला सर्व प्रकारची इन्फेक्शन्स होतात. जर मी आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेत असेन, प्रतिकारशक्ती मजबूत ठेवत असेन तर कोणताही व्हायरस हल्ला करू शकत नाही. त्याप्रमाणेच जेव्हा मी आपल्या मनाची व्यवस्थित काळजी घेतली तर बाहेरच्या परिस्थितींचा परिणाम माझ्या मनावर होणार नाही.