आरोग्याची १० दहा सुत्रे -
Arogyachi 10 daha sutre - Health knowledge
१) स्वच्छता :-
शरीर
नेहमी स्वच्छ ठेवणे, रोज स्नान करणे, आपण राहतो ती जागा, तो परिसर स्वच्छ ठेवणे, आपल्या
मुलांना स्वच्छतेचे धडे देणे. जेवण करण्याआधी स्वच्छ हात धुणे. बाहेरून आल्यावर हात
पाय स्वच्छ धुणे. निरामय आरोग्यासाठी या गोष्टी आपण नियमित केल्या पाहिजे.
२)
सकाळ
संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जाणे आणि सकाळी कोवळ्या उन्हास बसून सुर्यप्रकाश घेणे.
या मुळे निरोगी शरीर राखण्यासाठी बरीच मदत होते.
३)
नियमितपणे व्यायाम करणे, सकाळी जॉगिंगला जाणे, सायकल चालविणे, पोहणे, साष्टांग
नमस्कार घालणे, कसरत करणे.
४) आहार -
निरोगी
शरीर राहण्यासाठी शुद्ध आणि सात्विक आहार फार फार गरजेचा आहे. जंक फुड महिण्यातून एखाद्या
वेळेला खाल्ले तर चालते पण रोज खाऊ नये. जंक फुड रोज खाल्ले तर पोटाचे विकार वाढतात,
पाचनशक्ती मंदावते, त्यामुळे आरोग्य ढासळते. शरीराला आवश्यक पोषक असे घटक मिळत नाही
आणि नाना प्रकारच्या व्याधी जडतात.
५) विश्रांती -
पुरेसी
विश्रांती घ्यावी. २४ तासातून किमान सहा तास तरी झोपावे. आणि सकाळी लवकर उठावे. दुपारी
झोपू नये त्यामुळे चरबी वाढते.
६) ताठ बसणे :-
बसतांना
पाठीचा कणा ताठ ठेवूनच बसावे. कणा जर वाकलेला असेल तर पुढे मणक्यांचे दुखणे वाढू शकते.
७) नियमित आहार -
नियमित
व संतुलीत आहार आणि योग्य आहार, वेळेवर जेवण यामुळे उत्तम आरोग्य लाभते. चांगल्या ठिकाणी
विहार अर्थात जिथे मनाला शांती मिळेल, मन प्रसन्न होईल अशा ठिकाणी फिरायला जाणे, मंदिरात
जाणे, तिथे देवाचे नामस्मरण करत बसणे, ध्यान करणे इत्यादि विहार
८) पाणी भरपूर पिणे :-
सकाळी
उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी प्यावे. दिवसातून ३ लीटरच्या वर पाणी प्यावे. त्यामुळे
रोग प्रतिकारक शक्ती वाढून त्वचा चमदार बनते. पिंपल नाहिशे होतात. पोटातली उष्णता बाहेर
पडते.
९)
स्वच्छ
वस्त्रे घालणे. स्वच्छ धुतलेली आणि सात्वीक पेहराव. ज्यामुळे आपल्या मनातही अपवित्र
विचार येणार नाहीत अशी वस्त्रे परिधान करावी.
१०)
मनाची पवित्रता