हे सहा लोक नेहमी दुःखी असतात - dukhachi 6 karane sunskrit Subhashit knowledge

हे सहा लोक नेहमी दुःखी असतात - dukhachi 6 karane sunskrit Subhashit knowledge

 संस्कृत सुभाषित रसग्रहण मराठी अर्थ - sunskrit Subhashit 

हे सहा लोक नेहमी दुःखी असतात -

          मित्रांनो! जगात सुखी कुणीच नाही. प्रत्येकाला काहीनाकाही दुःख आहेच आणि त्या दुःखाची कारणेही अनेक आहेत. पण आपले पूर्वज क्रान्तदर्शी ऋषींनी दुःखाची सहा कारणे वर्णन केलेली आहे. तसं पाहायला गेलं. तर दुःखाची अनेक कारणे असू शकतात. पण त्यातही मुख्यत्वे ही सहा कारणे माणसाला दुःख देण्याला कारणीभूत ठरतात. ती सहा कारणे कोणती? ते आपण या लेखात पाहणार आहोत.

ईर्षुर्घृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः

परभाग्योपजीवी षडेते नित्यदुःखिताः

पूर्वोक्त सहा जण नेहमी दुःखी असतात. हे या सुभाषितात सांगितलेले आहे. ते पुढे विस्तारपूर्वक सांगितले आहे.

) ईर्ष्यु म्हणजे सतत दुसऱ्याशी स्पर्धा करणारा, स्वतःची इतरांशी तुलना करणारी व्यक्ती नेहमी दुःखी असते. अशी व्यक्ती कालांतराने न्युनगंडाने पछाडते. आणि नेहमी इतरांशी तुलना केल्याने स्वतःचे अस्तित्व गामावून बसते. म्हणू कधीच आपण इतरांशी स्पर्धा करण्याच्या भाणगडीत पडू नये. आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं. इतरांशी स्पर्धा करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही.

) घृणी म्ह. सतत दुसऱ्याची घृणा करणारा. काही लोकांना सवयच असते सतत कोणाची अन्कोणाची घृणा करत असतात. काही लोकांना एखाद्याचे शारीरीक व्यंग पाहून घृणा करण्याची सवय असते. गरीब लोकांची घृणा करणारेही लोक असतात. गरीब माणसांची सावलीही त्यांना नकोशी वाटते. गरीबाचा स्पर्श झाला तरी ते स्वतःला स्वच्छ करण्याची खटाटोप करतात.

) फार सहानुभूति बाळगणारा :- सहानुभूतिची अपेक्षा असणे हेही फार चुकीचे आहे. काही लोकांना फारच सहानुभूतिची अपेक्षा असते. अशा लोकांना सहानुभुती नाही मिळाली तर ते दुःखी होतात.

) असमाधानी वृत्ती असणारा :- असमाधानी वृत्ती असणारे लोक आपल्याला दहातून ७ नक्कीच सापडतील. कितीही मिळाले तरी त्यांना कधीच समाधान वाटत नाही. १०० मिळाले तर १००० पाहिजे, १००० मिळाले तर लाख पाहिजे, लाख मिळाले तर करोड पाहिजे. असे असमाधानी लोक नेहमी दुःखीच असतात.

) सतत भिणारा किंवा शंका काढणारा :- गीतेत म्हटलेले आहे. ‘संशयात्मा विनश्यति’ जो प्रत्येक गोष्टीवर तर्क करून शंका घेतो तो नेहमी दुःखीच होतो. काही गोष्टींवर पूर्वज विश्वास ठेवत आले आपणही विश्वास ठेवला पाहिजे. हे त्यांना पटत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट तर्काच्या शंकेच्या दगडावर घासण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. मग ते दुःखी होतात. आणि जो जास्त भितो, घाबरतो तोही दुःखीच असतो. म्हणून सुखी व्हायचे असेल तर भित्रेपणा काहीच उपयोगाचा नाही.

) दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा :- जी व्यक्ती परोपजीवी आहे, इतरांच्या आश्रयाला राहते, ती नेहमी दुःखी असते. ‘सर्वं परवशे दुःखम्‌’ असे सुभाषितात नितीकारांनी सांगितले आहे. महाभारतातही पराश्रयाने राहणाऱ्या माणसाचे दुःख वर्णन केले आहे. पांडव विराट राजाच्या आश्रयाने राहत होते. तेव्हा त्यांना अनेक प्रकारची संकटे आली त्यामुळे नाना प्रकारचे दुःख भोगावे लागले. म्हणून आपल्या बळावर, स्वतःच्या पायावर उभे राहून जो जीवन जगतो तोच सुखी असतो.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post