या सहा गोष्टींवर ताबा मिळवणे अवघड जाते - संस्कृत सुभाषित रसग्रहण - shukraneeti sunskrit Subhashit knowledgepandit

या सहा गोष्टींवर ताबा मिळवणे अवघड जाते - संस्कृत सुभाषित रसग्रहण - shukraneeti sunskrit Subhashit knowledgepandit

 या सहा गोष्टींवर ताबा मिळवणे अवघड जाते   

संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ sunskrit Subhashit knowledgepandit

शुक्रनिती

         शुक्राचार्य एक ज्ञानी ऋषी होते. यासोबतच ते एक चांगले नीतिकार देखील होते. त्यांनी अनेक शास्त्रांची निर्मिती केली. त्यांची नितीचे खूप महत्व आहे. शुक्राचार्य महर्षी भृगुचे पुत्र होते. त्यांनी राक्षसांचे गुरू देखील म्हटले जाते. ऋषी शुक्राचार्यांनी दैत्यांना ज्ञान आणि तपाचा मार्ग दाखवला. योग्य आणि अयोग्य यांची माहिती देण्याचे काम देखील यांचेच होते. शु्क्राचार्यांची निती आजही काम करते.

         त्यांनी आपल्या एका नितीमध्ये 6 अशा गोष्टींविषयी सांगितले की, ज्यांच्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे अवघड आहे.

शुक्राचार्यानुसार धर्माच्या मार्गावर चालताना त्यांचा उपभोग करणे चांगले आहे.

श्लोक :-

यौवनं जीवितं चित्तं छाया लक्ष्मीश्र्च स्वामिता ।

चंचलानि षडेतानि ज्ञात्वा धर्मरतो भवेत् ।।

अर्थ - यौवन, जीवन, मन, छाया, लक्ष्मी आणि सत्ता या ६ गोष्टी अत्यंत चंचल असतात. या गोष्टीं समजुन घेऊन धर्माच्या कार्यात मग्न रहायला पाहिजे.

१. तारुण्य :- आपले रंग-रूप नेहमीच असेच रहावे, कधीच वृद्ध होऊ नये पण असे होणे कोणासाठीच शक्य नाही. एक ठराविक कालावधीनंतर प्रत्येकाचे तारूण्य त्याची साथ सोडत असते. हा प्रकृतीचा नियमच आहे. तरुण राहण्यासाठी मानवाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला तसे करता येत नाही.

२. जीवन जन्म आणि मृत्यु :- मानवाच्या जीवनातील अभिन्न भाग आहेत. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्तित आहे. एखाद्या व्यक्तीने कितीही पुजा-अर्जना केली, औषधींचा आधार घेतला तरी एका निश्चित वेळेनंतर त्याचा मृत्यू होणारच.

३. मन :- मन हे अत्यंत चंचल असते. अनेकजण आपल्या मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतात. पण कधी ना कधी त्यांच्याकडून ते अनियंत्रित होते आणि जे काम करायचे नाही ते काम त्याच्याकडून होऊन जाते.

४. सावली :- मनुष्याची सावली फक्त उन्हातच त्याची सोबत देते. अंधार येताच मनुष्याची सावली त्याला सोडून निघून जाते.

५. लक्ष्मी (धन):- मनाप्रमाणे धन देखील चंचल असते. ते प्रत्येक वेळी एका ठिकाणी किंवा एका व्यक्तीजवळ टिकत नाही. यामुळे धनाचा लोभ करणे योग्य नाही.

६. सत्ता किंवा अधिकार :- अनेकांना सत्ता किंवा अधिकाराचा लोभ असतो. मिळालेले पद किंवा अधिकार संपूर्ण आयुष्यभर त्यांच्यासोबत रहावे असे त्यांना वाटते. पण असे शक्य नाहीये. ज्याप्रमाणे परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे अगदी त्याचप्रकारे पद आणि अधिकारांचे परिवर्तन होत असते.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post