कोंबड्याकडून ४ आणि कावळ्याकडून या ५ गोष्टी शिकल्या पाहिजेत संस्कृत चाणक्य नीती रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge pandit

कोंबड्याकडून ४ आणि कावळ्याकडून या ५ गोष्टी शिकल्या पाहिजेत संस्कृत चाणक्य नीती रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge pandit

संस्कृत सुभाषित रसग्रहण -  sunskrit-subhashit

कोंबड्याकडून ४ आणि कावळ्याकडून या ५ गोष्टी शिकल्या पाहिजेत

 चाणक्य नीती

प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बन्धुषु ।

स्वयमाक्रम्य भुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ॥

अर्थ :- कोंबड्याकडून शिकल्या पाहिजेत या ४ गोष्टी चाणक्य म्हणतात कि व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये कोंबड्या कडून या ४ सवयी घेतल्या पाहिजेत. जर त्याने या ४ गोष्टी अवलंबल्या तर कधी दुखी होणार नाही. कोणत्या ४ गोष्टी व्यक्तीने कोंबड्या कडून शिकल्या पाहिजेत चला जाणून घेऊ.

  1.  योग्य वेळी जागे होणे.
  2.  युद्ध करण्यासाठी तयार राहणे.
  3.  कुटुंबीय, मित्र आणि आपले सोबती यांना त्यांचा हिस्सा देणे.
  4. स्वतः आक्रमण करून म्हणजेच मेहनतीने कमवणे.

आणि

गूढमैथुनचारित्वं काले काले च सङ्ग्रहम् ।

अप्रमत्तमविश्वासं पञ्च शिक्षेच्च वायसात् ॥

अर्थ :- कावळ्याकडून शिकल्या पाहिजेत या ५ चांगल्या सवयी चाणक्य नीती मध्ये कावळ्याच्या ५ चांगल्या सवयी बद्दल देखील सांगितलं आहे. कावळ्याच्या या चांगल्या सवयी आपल्या जीवना मध्ये अवलंब केल्याने व्यक्ती नेहमी यशस्वी होतो आणि त्यास कधीही कोणीही त्रास देऊ शकत नाही. जो कावळ्याच्या या सवयी फॉलो करतो तो जीवना मध्ये नेहमी प्रगती करतो. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या चांगल्या सवयी.

  1. लपून प्रणय करणे.
  2. कोणत्याही स्थिती मध्ये धैर्य बाळगणे.
  3. वेळीच बचत करणे किंवा घरामध्ये जीवन चालवण्यासाठी आवश्यक सामग्री एकत्र करणे.
  4. नेहमी सावध राहणे.
  5. कोणावरही विश्वास न करणे.

    मित्रांनो चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये या ९ महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना व्यक्ती जीवनात अवलंब करून यश मिळवू शकतो. आचार्य चाणक्य किती विद्वान होते हे आपण सगळे जाणून आहोत. चाणक्य त्यांच्या न्यायप्रिय आचरणासाठी ओळखले जायचे. 

मोठ्या साम्राज्याचे मंत्री असून देखील ते एका सामान्य झोपडी मध्ये राहत होते. त्यांचे राहणीमान अगदी साधे होते. आचार्य चाणक्य यांनी आपले ज्ञान चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे. चाणक्य नीती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी व्यक्तीने पालन केल्यास त्याला जीवनातील सगळे सुख मिळू शकते. यामध्ये सांगितलेल्या मार्गावर चालल्यास यश निश्चितच मिळेल. 

या नीती मध्ये सुखी जीवनाचे रहस्य आहे. चाणक्य नीती मधील ६ व्या अध्याया मधील १८ आणि १९ व्या श्लोकामध्ये प्रगतीचे काही नियम सांगितले आहे. या  श्लोकामध्ये कावळा आणि कोंबडा यांच्या सवयी बद्दल सांगितले आहे. ज्या सवयी व्यक्तीने अनुकरण केल्या तर प्रगती होण्या पासून कोणीही अडवू शकत नाही. 

त्याचे कामकाज कोणत्याही अडथळा शिवाय चालत राहील आणि त्यामध्ये यश मिळेल. या नीती नोकरी, बिजनेस आणि जीवनातील इतर बाबतीत देखील प्रभावी आहे. कावळ्या कडून ५ आणि कोंबड्या कडून या ४ सवयी शिकणारा व्यक्ती जीवनात नेहमी आनंदी राहतो सुखी राहतो. 

 

 

 

 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post