लीजा स्टालगर - पुण्याचा अनाथाश्रम ते ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारापर्यंतचा प्रवास!
"ज्या पालकांनी जन्म दिल्यानंतर मुलीला दूर केले ते आता मनातून रडत असतील कारण ते त्यांच्या जन्मलेल्या मुलीला आता भेटू शकत नाहीत" महाराष्ट्रातील पुणे शहरात एक अनाथाश्रम आहे, त्याला 'श्रीवास्तव अनाथाश्रम' म्हणतात. शहराच्या एका अज्ञात कोपऱ्यात 13 ऑगस्ट 1979 रोजी एका मुलीचा जन्म झाला, ही त्यांची काय मजबुरी होती हे पालकांना माहीत नव्हते, त्यांना ती मुलगी नकोशी होती. त्यांनी भल्या पहाटेच 'श्रीवास्तव अनाथाश्रम' या अनाथाश्रमा समोर जाऊन आपल्या काळजाचा तुकडा तेथिल पायऱ्यांवर ठेऊन दिला. आणि काढता पाय घेतला.
अनाथालय व्यवस्थापनाने ती गोंडस मुलगी पाहिली आणि तिला आत नेले. आश्रमाने या गोंडस चिमुरडीचे नाव 'लैला' असे ठेवले. त्या दिवसांत हरेन आणि स्यू नावाचे अमेरिकन जोडपे भारतात आले होते. त्यांना दांपत्याच्या हसत्या खेळत्या कुटुंबात आधीच एक मुलगी होती, पण ते एका मुलाला दत्तक घेण्यासाठी भारतात आले होते. भारतात येण्याचा मुख्य हेतू त्यांचा मुलगा दत्तक घेण्याचा होता. सुंदर आणि देखण्या लहान मुलाच्या शोधात ते 'श्रीवास्तव अनाथाश्रम' या आश्रमात आले. तिथे त्यांना मुलगा काही सापडला नाही, पण स्यूने पाळण्यात असलेल्या चिमुकल्या लैलाकडे पाहिले आणि लैलाचे चमकदार तपकिरी डोळे आणि निष्पाप चेहरा पाहून ती त्या चिमुकलीच्या प्रेमात पडली.
आणि त्यांनी लैलेला दत्तक घेण्याचे ठरवले. कायदेशीररित्या कागदोपत्रे तयार करून मुलीला दत्तक घेण्यात आले, स्यूने तिचे नाव लैला बदलून 'लिझ' केले, नंतर ते परत अमेरिकेत गेले, परंतु काही वर्षांनी ऑस्ट्रेलेया येथे सिडनीमध्ये कायमचे स्थायिक झाले. वडिलांनी लिजाला क्रिकेट खेळायला शिकवले, घराजवळच्या पार्कपासून सुरुवात करून लिझ रस्त्यावरच्या मुलासोबत खेळायला जायला लागली. तिची क्रिकेट बद्दलची आवड अफाट होती, पण तिने शिक्षणही पूर्ण मनलावून केले. जिवनात तिला चांगल्या संधी मिळत गेल्या, तिचा शिक्षण पूर्ण झाले. आणि तिची प्रगती दिवसेंदिवस वाढतच गेली. आधी ती बोलायची, मग तिची बॅट बोलायला लागली आणि मग तिचे रेकॉर्ड बोलायला लागले.
लीजा स्टालगरचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट मधले
योगदान
1997 - न्यू साउथ वेल्सचा
पहिला सामना
2001 - ऑस्ट्रेलियाचा पहिला
एकदिवसीय सामना
2003 - ऑस्ट्रेलियाकडून पहिली
कसोटी
2005 - ऑस्ट्रेलियाकडून पहिला T20
आठ कसोटी सामने, 416 धावा, 23 विकेट
125 वनडे, 2728 धावा, 146 विकेट्स
54 टी-20, 769 धावा, 60 विकेट्स
वनडेमध्ये 1000 धावा आणि 100 बळी घेणारी पहिली महिला क्रिकेटर आयसीसी रँकिंग सिस्टम लागू करण्यात आली
तेव्हा ती जगातील नंबर एकची अष्टपैलू खेळाडू होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार! खुप छान! तिने एकदिवसीय आणि टी-२० अशा चार विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. 2013 मध्ये त्याच्या संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, दुसऱ्याच दिवशी या खेळाडूने अंतरराष्ट्रीय
क्रिकेटला अलविदा केला. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने लिजा स्टॅल्गरचा आपल्या हॉल
ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.
म्हणूनच असं म्हणतात की प्रत्येक माणूस आपलं नशीब
घेऊन येतो, आई-वडिलांनी
मुलीला अनाथाश्रमात सोडलं, पण नियतीने तिला आधी
अमेरिकेत नेलं आणि मग तिला ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कॅप्टन बनवलं आणि तिचं एक
महान क्रिकेटपटू बनवलं.