संस्कृत सुभाषित रसग्रहण
बहुकालं वदामो हि सर्वासु
वाक्षु संस्कृतम् ।
वेदवाग्बुधवागेषा देववागिति
निश्चितम् ।।१।।
अर्थ :- खरोखरच पुष्कळ काळापासून आपण 'संस्कृत सर्व भाषांमध्ये मुख्य आहे; ती वेदवाणी आणि ज्ञानी जनांची भाषा आहे, निश्चितपणे देववाणी आहे' इत्यादी म्हणत आहोत.
ज्ञानभाषा भवेदेषा विश्वस्य
भारतस्य च ।
विश्वगुरुत्वलाभाय साधनं
बलवत्तरम् ।।२।।
ही भाषा संपूर्ण भारताची ज्ञानभाषा झाली पाहिजे कारण भारताला विश्वगुरुत्वाचा लाभ होण्यासाठी हे अत्यंत बलशाली असे साधन आहे.
कार्यक्षेत्रेषु
त्वप्यस्याः व्यवहारो न दर्श्यते ।
सारल्यं मधुमत्वं च क्षमत्वमर्थगामिता
।।३।।
तथापि सर्व कार्यक्षेत्रांमध्ये संस्कृतच्या साह्याने व्यवहार, तिची सरलता, माधुर्य , सामर्थ्य आणि मुख्य म्हणजे अर्थकारणाशी असलेला तिचा संबंध जोपर्यंत आपल्याकडून दाखविला जाणार नाही,
तावन्न पुनरोत्थानं संस्कृतस्य
परं भवेत् ।
तदर्थं सङ्घदृष्ट्या च यावन्न
प्रयतामहे ।।४।।
आणि जोपर्यंत आपण यासाठी संघदृष्ट्या प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत संस्कृतचे उत्तम पुनरुत्थान होणार नाही.
सङ्गणकाय भाषेयं युक्तेति
तु चिरश्रुतिः ।
किमर्थं न कृतैषोक्तिः सफला
ज्ञानिभिस्तथा ।।
ही भाषा संगणकासाठी उपयुक्त आहे इत्यादी आपण दीर्घकाळ ऐकत आहोत. पण ही उक्ती बुद्धिमंतांनी का बरं तशी अजून सफल करून दाखविलेली नाही?
जन्मभूस्त्वीक्षमाणासौ
साधयामः कदा वयम् ।
अतो
यत्नो भवेद्भूयान् सूक्ष्मदृष्ट्या यथाक्रमम् ।।६।।
या सर्व गोष्टी आपण कधी साधणार म्हणून आपली मातृभूमी प्रतीक्षा करत आहे. म्हणून आपल्याकडून सूक्ष्म दृष्टीने क्रमबद्ध आणि जोरदार प्रयत्न व्हायला हवेत, नाही का?
संस्कृतदिननिमित्तम् हार्दाः शुभाशयाः
राष्ट्रेषु
वर्यं मम भारतं तद् । खगेषु बर्हिः कुसुमेषु पद्मम् ।
पुरीषु मुम्बा मनुजेषु रामः भाषासु मुख्या सुरभारतीयम् ॥ - राजेन्द्र भावे (प्रातिभेयः)
(ज्याप्रमाणे) ह्या विश्वामधील सर्व देशांमध्ये माझा भारतदेश श्रेष्ठतम आहे; (जसे) सर्व पक्ष्यांमध्ये मोर सुंदर; (जसे) सर्व फुलांमध्ये कमळ सुंदर; (जशी) सर्व नगरशहरांमध्ये मुंबापुरी (मुंबई) श्रेष्ठ; (ज्याप्रमाणे) सर्व मनुष्यमात्रांमध्ये दशरथपुत्र सीतापती राम आग्रणी (त्याचप्रमाणे) विश्वातील सर्व भाषांमध्ये ही सुरभारती संस्कृत भाषा सर्वश्रेष्ठ आहे.
सुन्दरोऽपि
सुशीलोऽपि कुलिनोऽपि महाधन: ।
शोभते न
विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम् ॥
अर्थ - मनुष्य सुंदर, सुशील, कुलीन व श्रीमंत असला तरी विद्या नसेल तर तो शोभून दिसत नाही.
विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये ।
आद्या
हास्याय वृद्धत्वे द्वितियाद्रियते सदा ॥३-२२॥
अर्थ - शस्त्र व शास्त्र यांची विद्या ही ज्ञानासाठी असते. पण पहिली म्हातारपणी ही हास्यास्पद ठरते व दुसरीचा सदा आदर केला जातो. विद्या हेच खरे भूषण आहे.
माता शत्रु: पिता वैरी येन बालो न पाठित: ।
न शोभते
सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥
अर्थ - जे आई वडील आपल्या मुलाला शिकवत नाहीत ती आई त्या मुलाची शत्रू आहे व वडील वैरी आहेत. ज्याप्रमाणे हंसांमधे बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे तो अशिक्षित मुलगा सभेमधे शोभून दिसत नाही.
कामधेनुगुणा विद्या ह्यकाले फलदायिनी ।
प्रवासे
मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम् ॥
अर्थ - कामधेनूप्रमाणे गुण असणारी विद्या ही खरोखर अचानक फळ देणारी असते. प्रवासामधे आईप्रमाणे असणारी विद्या गुप्त धन म्हणून मानली गेली आहे.
क्षणश:
कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे
कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ॥
अर्थ - क्षणाक्षणाने विद्या मिळवावी व कणाकणाने धन मिळावावे. क्षणाचा त्याग केला तर विद्या कशी मिळेल व कणाचा त्याग केला तर धन कसे मिळेल?